वेगवेगळ्या वंध्यत्व समस्यांमध्ये गर्भधारणा कशी करावी?

जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार गर्भधारणेसाठी संघर्ष करत असाल, तर लक्षात ठेवा की या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होण्यात अडचण येत असेल, तर प्रजनन क्षमता डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. त्याने तुमच्या वंध्यत्वाचे अचूक निदान करून उपचार करावेत.

Share This Post

सारांश : जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार गर्भधारणेसाठी संघर्ष करत असाल, तर लक्षात ठेवा की वंध्यत्वाच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही. गर्भधारणेसाठी सर्वप्रथम तुमची जीवनशैली सुधारा आणि ओव्हुलेशनचा मागोवा घ्या. वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होण्यात अडचण येत असेल, तर फर्टिलिटी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या वंध्यत्वाचे अचूक निदान व परिणामकारक उपचार करू शकतात. ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, आधुनिक उपचार आणि अनुभवाने अल्पावधीत हजारो जोडप्यांना पालकत्वाचा आनंद दिला आहे.

१) PCOS/PCOD सह गर्भधारणा कशी करावी?

जर तुम्हाला PCOD चे निदान झाले असेल तर सर्वप्रथम चांगली जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवा. सकस आहार आणि नियमित व्यायामाने PCOD नियंत्रणात ठेवा. PCOD सह नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करताना, डिजिटल ओव्हुलेशन किट वापरा आणि ओव्हुलेशन कालावधी दरम्यान असुरक्षित इंटरकोर्स करा. वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओव्हुलेशन इंडक्शन, ओव्हुलेशन मॉनिटरिंग, आययूआय या प्राथमिक उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.

अधिक माहितीसाठी: PCOD/PCOS ची समस्या असल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्य आहे का?

२) एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भधारणा कशी करावी?

जेव्हा गर्भाशयाचे अस्तर पोटाच्या इतर अवयवांमध्ये वाढू लागते तेव्हा त्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. गुठळ्या सुरुवातीला तयार होतात परंतु गंभीर एंडोमेट्रिओसिसमध्ये, चॉकलेट सिस्ट किंवा अडेजन्स (दोन अवयव चिकटणे) होतात. तुम्हाला सूज, वेदना, मलत्याग किंवा लघवी करण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर ट्यूबल ब्लॉकेज, अडेजन्स किंवा चॉकलेट सिस्ट असेल तर लेप्रोस्कोपीच्या मदतीने शस्त्रक्रिया केली जाईल.

‘एंडोमेट्रिओसिस फर्टिलिटी इंडेक्स’ (EFI) सारख्या साधनांच्या मदतीने, डॉक्टर तुम्हाला नैसर्गिक मार्गाने किंवा IVF उपचारांच्या मदतीने गर्भधारणा करता येईल का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

अधिक माहितीसाठी: एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? स्टेजेस, कारणे, लक्षणे, निदान, उपचार

३) थिन एन्डोमेट्रियम सह गर्भधारणा कशी करावी?

जर एंडोमेट्रियम पातळ असेल तर डॉक्टर प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुचवतात. इतर परिस्थितींमध्ये, गर्भाशयात प्लाझ्मा टाकण्यासाठी प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी) तंत्राचा वापर केला जातो.

जेव्हा एंडोमेट्रियम जाड (endometrial hyperplasia) असतो तेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन चे ओरल मेडिसिन किंवा इंजेक्शन्स दिले जातात.

अधिक माहितीसाठी : थिन यूटेराइन लायनिंग: जानिए क्या है थिन एंडोमेट्रियम? कारन, लक्षण, उपचार

४) फायब्रॉइड्ससह गर्भधारणा कशी करावी?

युटेरियन फायब्रॉईड च्या गाठी या नॉन-कॅन्सरस असतात. लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, एम्बोलायझेशन, फोकस्ड अल्ट्रासाऊंड (एफयूएस), मॉर्सेलेशन इत्यादींचा वापर फायब्रॉइड्सवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान अल्ट्रासाऊंडद्वारे फायब्रॉइड्सचे निरीक्षण केल्यास निरोगी बाळाचा जन्म होऊ शकतो. याशिवाय, फायब्रॉइड्समुळे वंध्यत्वाची समस्या असल्यास, प्रगत प्रजनन उपचार फायब्रॉइडच्या बाबतीतही गर्भधारणेसाठी मदत करू शकतात.

अधिक माहितीसाठी : फायब्रॉईड मुळे वंध्यत्व? जाणून घ्या फायब्रॉइड समस्या आणि समाधान

युटेरियन फायब्रॉईड सह गर्भधारणा कशी करावी?

५) ब्लॉक केलेल्या फॅलोपियन ट्यूबसह गर्भधारणा कशी करावी?

सूज किंवा संसर्गामुळे गर्भनलिका बंद झाल्यास त्यावर औषधोपचार केला जातो. जेव्हा पॉलीप्स, फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रिओसिसमुळे ट्यूब्ज अवरोधित होतात, तेव्हा सर्जिकल उपचाराने अडथळा दूर होतो. हिस्टेरेक्टॉमी किंवा मायोमेक्टोमी किंवा लॅपरोस्कोपिक सर्जरी हे कमी आक्रमक उपचार आहेत. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमचे डॉक्टर तुम्हाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याचा सल्ला देऊ शकतात. तर, काही कपल्स ना IUI, IVF किंवा ऍडव्हान्स IVF द्वारे गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक माहितीसाठी : ब्‍लॉक फैलोपियन ट्यूब के साथ गर्भधारण कैसे करे?

६) खराब झालेल्या फॅलोपियन ट्यूबसह गर्भधारणा कशी करावी?

जर फॅलोपियन ट्यूब खराब झाली असेल किंवा ट्यूब मध्ये पाण्याने भरलेले असेल तर ती नळी काढून टाकणे (सालपिंगेंक्टॉमी सर्जरी) आवश्यक आहे. असे नाही केले तर, नळीतील पाणी गर्भाशयात झिरपते आणि गर्भ रुजण्यात (इम्प्लांटेशन) समस्या येतात. जर एक ट्यूब चांगली असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या किंवा IUI द्वारे गर्भधारणा करू शकता. पण जर दोन्ही ट्यूब ब्लॉक असतील किंवा काढून टाकल्या असतील, दोन्ही ट्यूब नसतील तर, आयव्हीएफद्वारे गर्भधारणा नक्कीच होऊ शकते.

अधिक माहितीसाठी : ब्लॉक फैलोपियन ट्यूब के साथ गर्भधारण कैसे करे?

७) फॅलोपियन ट्यूबशिवाय गर्भधारणा कशी करावी?

दोन्ही फॅलोपियन ट्यूब नसतील तर, तुमच्यासाठी गर्भधारणेसाठी एकच पर्याय उरतो तो म्हणजे IVF. ज्यामुळे तुम्ही नक्कीच गर्भधारणा करू शकता. कारण फॅलोपियन ट्यूबमध्ये होणारी गर्भाधान प्रक्रिया आयव्हीएफ उपचारादरम्यान प्रयोगशाळेत केली जाते. ट्यूब पूर्णपणे बायपास केल्या जातात.

८) हार्मोनल असंतुलनाने गर्भधारणा कशी करावी?

हार्मोनल असंतुलन असेल तर, जीवनशैलीत सुधार आणणे, विशिष्ट औषधे आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीने (HRT) उपचार केले जातात. यानंतर तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकता.

अधिक माहितीसाठी : हार्मोनल असंतुलन के कारन गर्भधारण में कठिनाई? ऐसे करे इलाज

९) ३० वयानंतर गर्भधारणा कशी करावी?

२० ते ३० वयोगटातील स्त्री सर्वात जास्त प्रजननक्षम असते. ३० नंतर फर्टिलिटी क्षमता कमी होऊ लागते. या वयात तुमचे आरोग्य चांगले असेल, शुक्राणूंची संख्या चांगली असेल आणि तुमच्या पुरुष जोडीदाराला कोणतीही समस्या नसेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकता. एक वर्ष प्रयत्न करूनही तुम्हाला गर्भधारणा होण्यात समस्या येत असल्यास, तुम्हाला ओव्हुलेशन मॉनिटरिंग किंवा IUI सारख्या प्राथमिक प्रजनन उपचारांची आवश्यकता असू शकते.

अधिक माहितीसाठी : बढ़ती उम्र का फर्टिलिटी हेल्थ पर असर

१०) ४० वयानंतर गर्भधारणा कशी करावी?

वयाच्या 40 व्या वर्षी गर्भधारणेसाठी उपचार आवश्यक आहेत. आम्ही असे सांगत आहोत कारण, महिला आणि पुरुषांची प्रजनन क्षमता वाढत्या वयानुसार कमी होत जाते. वयाच्या ४० व्या वर्षी गर्भधारणेची शक्यता प्रत्येक मासिक पाळीसाठी फक्त ५% असते. स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेत घट झाल्यामुळे बाळामध्ये जन्मजात दोष किंवा गुणसूत्र विकृती (cromosome) होऊ शकतात. याशिवाय आईला शारीरिक आजार असल्यास आणि रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश केलेलाअसल्यास गर्भधारणा करणे आव्हानात्मक होते. गर्भपात होण्याची शक्यता असते. गर्भधारणेसाठी, IVF, ICSI सारख्या प्रगत उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे निरोगी बालकासाठी अनुवांशिक चाचणीचा पर्याय आहे.

अधिक माहितीसाठी : वाढत्या वयात प्रेग्नेंसी शक्य आहे का? ४० वयानंतर आई व्हायचंय? या गोष्टी जाणून घ्या

११) मेनोपॉज नंतर गर्भधारणा कशी करावी?

मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी चे थांबणे होय. रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणेसाठी IVF हा एकमेव उपचार पर्याय उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्रगत ART तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

अधिक माहितीसाठी : मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का?

१२) शून्य शुक्राणूंसह गर्भधारणा कशी करावी?

शून्य शुक्राणू म्हणजे वीर्यामध्ये शुक्राणूंची अनुपस्थिती. जर अझोस्पर्मियाचे कारण शुक्राणूवाहिनीतील ब्लॉकेज असेल, तर त्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन स्थितीत शुक्राणू ब्लॅडर मध्ये जमतात आणि मूत्रद्वारे बाहेर पडतात. तेव्हा युरीन सॅम्पल घेऊन शुक्राणू वेगळे केले जाऊ शकतात आणि आयव्हीएफद्वारे गर्भधारणा होऊ शकते. सूज किंवा इन्फेक्शन मुळे शुक्राणूंची संख्या कमी असल्यास त्यावर औषधोपचार केला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेव्यतिरिक्त, TESA, PESA, MESA, TESE यासारख्या शुक्राणू पुनर्प्राप्ती तंत्रांचा (sperm retrival techniques) वापर करून शुक्राणू मिळवले जातात आणि IVF किंवा ICSI च्या मदतीने गर्भधारणा होऊ शकते.

अधिक माहितीसाठी : एजुस्पर्मिया क्या होता है? जानिए निल शुक्राणु के कारण, लक्षण, प्रकार और उपचार

१३) कमी शुक्राणूंनी गर्भधारणा कशी करावी?

शुक्राणूंची कमतरता म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया. जरी शुक्राणू कमी असतील परंतु त्यांची गतिशीलता, आकारविज्ञान आणि गुणवत्ता चांगली असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या किंवा IUI द्वारे गर्भधारणा करू शकता. जर शुक्राणूंच्या कमतरतेचे कारण व्हॅरिकोसेल (नसांची सूज) असेल तर त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारून शुक्राणूंची संख्या वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये, शुक्राणूंच्या कमी बरोबरच गुणवत्ता देखील कमी असते, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये IVF फायदेशीर ठरते. जर शुक्राणू स्त्रीबीज फर्टीलाइज करण्यात अयशस्वी झाले तर, ICSI / IMSI / PICSI च्या मदतीने शुक्राणू स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केले जातात. अशा प्रगत उपचारांमुळे तुम्ही नक्कीच गर्भधारणा करू शकता.

अधिक माहितीसाठी : शुक्राणू संख्या कमी असल्यास गर्भधारणा कशी करावी?

१४) कमी AMH पातळीसह गर्भधारणा कशी करावी?

कमी AMH सह गर्भधारणेसाठी आक्रमकपणे प्रयत्न करणे महत्वाचे आहे. वीर्य कमी असताना लवकर गर्भधारणा होण्यासाठी प्रजनन उपचारांची मदत घेणे फायदेशीर ठरेल. प्रजनन उपचारांदरम्यान, डिम्बग्रंथि हायपरस्टिम्युलेशनद्वारे अधिक फॉलिकल्स वाढवले ​​जातात. गोनाडोट्रोपिन आणि एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) चे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे दिली जातात. जेव्हा जास्त स्त्रीबीज विकसित होतात तेव्हा गर्भधारणेची शक्यता वाढते.

अधिक माहितीसाठी :

१५) ओवरीयन सिस्ट सह गर्भधारणा कशी करावी?

PCOS मुळे अंडाशयांमध्ये सिस्ट निर्माण झाल्यास त्यावर गर्भनिरोधक गोळ्यांनी उपचार केला जातो. जर सिस्ट जुने असतील किंवा एंडोमेट्रियल सिस्ट किंवा चॉकलेट सिस्ट असेल किंवा रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन मुळे सिस्ट तयार होत असेल तर अशा परिस्थितीत ‘लॅप्रोस्कोपिक सर्जरी’ किंवा ‘ओवरीयन ड्रिलिंगच्या’ मदतीने सिस्ट काढून टाकली जातात. यानंतर, तुमच्या स्त्रीबीजांची संख्या, गुणवत्ता आणि इतर शारीरिक स्थिती तपासल्यानंतर डॉक्टर तुमच्यासाठी स्वतंत्र उपचार योजना तयार करतील. ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकते. त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी : ओवेरियन सिस्ट क्या हैं? जानिए ओवरियन सिस्ट होने के कारण, लक्षण, और उपचार

१६) एक्टोपिक गर्भधारणेचा इतिहास असल्यास गर्भधारणा कशी करावी?

एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये झालेली गर्भधारणा. वास्तवात गर्भाधान ट्यूब मध्येच होते, पण जेव्हा गर्भ ट्यूब मध्येच रुजतो/इम्प्लांट होतो, तेव्हा त्याला अस्थानिक गर्भधारणा म्हणतात. जर, तुम्हाला पूर्वी एक्टोपिक गर्भधारणा झाली असेल आणि ती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली असेल, तर ट्यूबला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. तसेच, असा इतिहास असल्यास पुन्हा एक्टोपिक गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत फर्टिलिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल.

अधिक माहितीसाठी : अस्थानिक गर्भधारणा (एक्टोपिक प्रेग्नेंसी) : प्रकार, लक्षणे, कारणे, निदान आणि उपचार

१७) ट्यूबल लिगेशनने गर्भधारणा कशी करावी?

ट्यूबल लिगेशन म्हणजे गर्भनिरोधक शस्त्रक्रिया. गर्भनिरोधक शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला पुन्हा गर्भधारणा करायची आहे? तर तुमच्यासाठी ‘ट्यूबल लिगेशन रिव्हर्सल सर्जरी’ चा पर्याय उपलब्ध आहे. या सर्जरीमध्ये बंद केलेल्या गर्भनलिका पुन्हा पूर्ववत उघडल्या. पण जर ट्यूबल लिगेशन सर्जरी करून काही वर्षे झालेली असतील तर, मर्यादा येऊ शकतात. अशा परिस्थितीत IVF किंवा ICSI द्वारे गर्भधारणा होऊ शकते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार

मधुमेहाच्या रुग्णांना IVF प्रक्रिये दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो, जसे की गर्भपात, एकाधिक गर्भधारणा आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याची संभावना अधिक असते. पण चिंता करण्याचे कारण नाही. फर्टिलिटी क्षेत्रातील प्रगतीमुळे, मधुमेही रुग्णांसाठी IVF हे आशेचा किरण बनले आहे. मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

A Fertility Specialist or A Gynaecologist – Who, When, and Why?

A fertility specialist specializes in fertility treatments, whereas a gynaecologist handles issues regarding women’s reproductive health in general. If you are having trouble getting pregnant then consult a fertility expert for solutions.