४० वयातील गर्भधारणा म्हणजे ‘ऍडव्हान्स मॅटर्नल एज’ किंवा ‘प्रगत वयातील गर्भधारणा’ होय. चाळीशीत तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतला आहे तर हे समजून घ्या कि आता गोष्टी विसाव्या वर्षी होत्या तितक्या सरळ नाहीत. हल्ली करियर, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे उशिरा आई होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हि एक सामान्य बाब आहे. पण आधुनिक फर्टिलिटी उपचारांच्या मदतीने ४० वयातील गर्भधारणा यशस्वी होऊ शकते.
चाळीशी नंतर गर्भधारणेसाठी या गोष्टींची होईल मदत
१) तुमचे वय कमी आहे पण ४० नंतर आई होण्याची योजना आहे, मग हे करा.
आजकाल शिक्षण आणि करियर च्या निमित्ताने उशिरा आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. तर काही प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नीला कॅन्सरसारखा दुर्मिळ आजार असेल व उपचार सुरु असतील तर गर्भधारणेची योजना पुढे ढकलली जाते. परंतु वाढत्या वयानुसार शुक्राणू आणि स्त्रीबीजांची संख्या व गुणवत्ता कमी होते आणि गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. अशा वेळी काय करावे?
आययूआय-क्रायोप्रिझर्वेशन किंवा आयव्हीएफ-क्रायोप्रिझर्वेशन : ज्याप्रमाणे भाजीपाला वर्षानुवर्षे फ्रीज करून टिकवून ठेवता येतो, त्याप्रमाणे क्रायोप्रिझर्वेशन चा वापर करून तुमची स्त्रीबीजे, शुक्राणू किंवा एम्ब्रियो गोठवून ठेवता येतात. अशा प्रकारे फर्टिलिटी क्षमतेचे जतन करून ठेवा आणि भविष्यात हवे तेव्हा IUI किंवा IVF च्या मदतीने पालकत्वाचा अनुभव घ्या.
२) तुमचे वय ४० आहे आणि गर्भधारणेचा विचार करताय? असे करा उपचार.
४० वयात गर्भधारणा करताना उपचारांची गरज लागते. असे आपण म्हणत आहोत, कारण वाढत्या वयाबरोबर स्त्रिया आणि पुरुषांची फर्टिलिटी क्षमता कमी होत जाते. काही अभ्यासानुसार, ४० वयात गर्भधारणेची शक्यता प्रत्येक मासिक पाळी चक्रासाठी फक्त ५% इतकी असते. शिवाय मातेला गर्भधारण-प्रेरित आजार होण्याची शक्यता असते. तर स्त्रीबीज आणि शुक्राणूंची क्वालिटी कमी झाल्यामुळे बाळात व्यंग किंवा क्रोमोझोमल ऍबनॉर्मलिटी येऊ शकतात. मिसकॅरेज चे चान्सेस असतात.
अशा परिस्थितीत स्वस्थ बाळाची आणि सुरक्षित गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी आधुनिक उपचार फर्टिलिटी उपचारांची मदत घ्यावी. फर्टिलिटी क्लिनिक मध्ये तुमच्या केस चा डिटेल स्टडी आणि अचूक निदान केले जाते. त्यानुसार IVF, ICSI, जेनेटिक टेस्टिंग, ब्लास्टोसिस्ट असे उपचार डॉक्टर सुचवतात. यामुळे बाळ स्वस्थ राहतेच शिवाय गर्भधारणेची शक्यता अनेक पटींनी वाढते.
३) तुमचे वय ४० आहे आणि मेनोपॉज सुरु झालाय, तर अशी होऊ शकते गर्भधारणा.
स्त्री जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयात लाखो स्त्रीबिजं असतात. वाढत्या वयानुसार स्त्रीबीजांची संख्या कमी होत जाते आणि ४० वयात स्त्रीबीजांची संख्या १५ ते २५ हजार होते. क्वालिटी देखील कमी होते. त्यामुळे गर्भधारणेचे चान्सेस कमी होतात.
भारतातील स्त्रियांना इतर देशातील स्त्रियांच्या तुलनेत ५ वर्षे लवकर मेनोपॉज येतो. त्यामुळे साधारण ३० ते ४० दरम्यान मेनोपॉज ची लक्षणे दिसू लागतात. या वयात अंडाशय कमी इस्ट्रोजेन तयार करतात, त्यामुळे स्त्रीबीज रिलीज होण्याचे प्रमाण कमी होते, अनियमित ओव्यूलेशन होते. या वयात नैसर्गिकरित्या गर्भधारणेची क्षमता खूप कमी असते.
अशा वेळी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमचे आणि तुमच्या साथीदाराच्या प्रजनन स्थितीचे, स्त्रीबीजांचे आणि प्रजनन क्षमतेचे योग्य मूल्यांकन करतील. अचूक निदान करून यशस्वी उपचार पर्याय सुचवतील. ज्यामुळे स्वस्थ बाळाची आणि गर्भधारणेची शक्यता अनेक पटींनी वाढते.
४) ४० वयात आयव्हीएफ शिवाय गर्भधारणा होऊ शकते का?
जेव्हा तुम्ही पूर्णपणे निरोगी असतात तेव्हा ४० वयात नैसर्गिक गर्भधारणेचे चान्सेस प्रत्येक मासिक पाळी चक्रासाठी ५ टक्क्यांपेक्षाही कमी असतात. गर्भधारणा झालीच तरी बाळामध्ये व्यंग येऊ शकतो, बीजांची गुणवत्ता खराब झाल्यामुळे डाऊन सिंड्रोम सारखे आजार होऊ शकतात किंवा मिसकॅरेज किंवा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचे प्रमाण जास्त असते.
अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि आधुनिक फर्टिलिटी उपचारांच्या मदतीने गर्भधारणा होण्याचे आणि स्वस्थ बाळ होण्याचे चान्सेस वाढतात. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये अशा सर्व ऍडव्हान्स आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत.
५) तुमचे वय ४० आहे आणि तुम्हाला डायबेटिज, ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन असेल, तर हे करा.
४० वयात प्रेग्नन्सी चा निर्णय घेत आहेत तर तुम्ही स्वतःची शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर यांच्या तपासण्या करून घ्याव्यात. हार्मोनल विकार, गर्भाशयाच्या गाठी, पीसीओडी असेल तर ओवॅरियन सिस्ट, फेलोपियन ट्यूब ची स्थिती तपासणे आणि त्यासाठी उपचार घेणे गरजेचे आहे. फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस सारख्या स्थितीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्जिकल उपचार घेऊन गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यास गुंतागुंत टाळता येते.
६) पुरुष जोडीदाराचे वय ४० किंवा जास्त असल्यास गर्भधारणा होऊ शकते का?
जर तुम्ही वाढत्या वयात बाबा बनण्याचा प्रयत्न करत असाल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करणे योग्य ठरेल. कारण ते फर्टिलिटी क्षेत्रातले एक्स्पर्ट असतात. ते तुमच्या पालकत्वाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून तुम्हाला पितृत्व प्रदान करण्यासाठी सक्षम असतात. त्यासाठी फर्टिलिटी क्षेत्रात अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत.
महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी होते, शुक्राणूंची हालचाल कमी होते, शुक्राणूंच्या रचनेत दोष येऊ शकतो किंवा शुक्राणूंमधील DNA डॅमेज होतात, क्रोमोझोमल ऍबनॉमिलिटि येऊ शकतात. असे खराब शुक्राणू स्त्रीबीज फर्टीलाइज करण्यात अयशस्वी ठरतात. किंवा गर्भधारणा झालीच तर बाळंत व्यंग येऊ शकतो.
७) वयाच्या चाळीशीत गर्भधारणेची शक्यता अशी वाढवा.
– जीवनशैलीत सुधार :
- संतुलित आणि पोषक अन्नाचे सेवन करावे.
- पुरेसा व्यायाम करावा.
- चांगल्या दर्जाची आणि पुरेशी झोप घ्यावी.
- स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन, ध्यान, विश्राम तंत्रांचा वापर करावा.
- भरपूर पाणी प्यावे.
- व्यसने टाळावी.
- चहा कॉफी चे सेवन कमी करावे.
- वजन नियंत्रित ठेवा
- इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या.
– नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने केलेल्या अभ्यासानुसार, अशी काळजी घेतलेल्या स्त्रियांना यशस्वी गर्भधारणा आणि बाळंतपण झालेले आहे.
Reference: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4554509/
- पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या जुनाट आजारांवर वैद्यकीय आणि आहारात्मक उपचार घ्यावे.
- गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आजारांचे नियमितपणे निरीक्षण करावे आणि उपचार घ्यावे.
- नियमितपणे प्रसूतीपूर्व तपासणीसाठी उपस्थित राहावे.
- गर्भधारणेदरम्यान निरोगी जीवनशैलीचे पालन करावे.
८) ४० वयात गर्भधारणेतील जोखीम कमी करण्यासाठी काय करावे?
- शारीरिक आजारांची तपासणी करून घ्यावी. या वयात रक्तदाब, मधुमेह अथवा कोलेस्ट्रॉल पातळीत विसंगती येऊ शकते.
- गर्भाशयाचा कर्करोग (PAP) आणि स्तनांचा कर्करोग यांची तपासणी करून घ्यावी.
- रिप्रॉडक्टिव्ह अवयवांची तपासणी : फर्टिलिटी क्षमतेची तपासणी करून घ्यावी. ज्यामध्ये गर्भाशय, गर्भनलिका, गर्भाशयाचे अस्तर, अंडाशय, ओव्यूलेशन, रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन यांची तपासणी केली जाते. या चाचण्यांमध्ये मिळालेल्या परिणामांनुसार औषधोपचार, सर्जरी किंवा फर्टिलिटी उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
- जेनेटिक चाचणी : PGT सारख्या जनुकीय चाचण्यांचा वापर करून सर्वात निरोगी भ्रूण काळजीपूर्वक निवडणे शक्य आहे. त्यामुळे यामुळे केवळ बाळाच्या आरोग्याविषयी चिंता मिटते असे नाही तर, गर्भधारणा होण्याची शक्यता देखील वाढते. मिसकॅरेज चा धोका कमी होतो.
- कोणत्याही वयात आई व्हायचं असेल तरी बाळाला व्यंग असावा असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळे या टेस्ट चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.
- गर्भधारण प्रेरित आजार नियंत्रित ठेवावे. गभधारणेतील मधुमेह, हायपरटेन्शन, प्री-एक्लॅम्पसिया इ. ची नियमित तपासणी आणि उपचार करावेत.
९) ४० वयात दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करताय? असे उपचार करा.
तुम्हाला पहिले अपत्य आहे. आणि आता दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करीत आहेत व तुमचे वय ४० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तरीदेखील वर सांगितल्याप्रमाणे सर्व शारीरिक तपासणी, जीवनशैलीत सुधार, फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन, करावे. कारण अपत्य पहिले असो किंवा दुसरे, ४० वयातील गर्भधारणेची स्थिती सारखीच असते.
१०) आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी ४० वयात गर्भधारणेचे चान्सेस अनेक पटींनी वाढतात.
उपचारांमुळे महिलांना प्रजनन समस्यांवर मात करता येते आणि मोठ्या वयातही त्यांना मूल होण्याची शक्यता वाढते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये मोठ्या वयातील अश्या अनेक जोडप्यांना यशस्वी गर्भधारणा झालेली आहे. प्रोजेनेसिस मध्ये IUI, IVF, ICSI, IMSI, PICSI, ब्लास्टोसिस्ट, सिक्वेन्शिअल एम्ब्रियो ट्रान्स्फर, लेजर असिस्टेड हॅचिंग, PGT/PGT सारख्या जेनेटिक टेस्टिंग, क्रायोप्रिझर्वेशन, TESA/PESA/MESA सारख्या स्पर्म रिट्रायव्हल टेक्निक, डोनर एग, याबरोबरच वंध्यत्व दूर करणारे आधुनिक सर्जिकल उपचार एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे सक्सेस रेट देखील सातत्याने वाढत आहे!
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर च्या फर्टिलिटी कन्सल्टन्ट डॉ. सोनाली मळगांवकर सांगतात कि, ४० वयातील गर्भधारणेत जोखीम असली तरी सर्व असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक मध्ये IVF ने बेस्ट रिझल्ट मिळतो. कारण IVF चा वापर करून जी काही कमी स्त्रीबीजं शिल्लक आहेत त्याचा बेस्ट युज करता येतो.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) चाळीशीत आयव्हीएफ उपचारांचा सक्सेस रेट किती आहे?
अभ्यासानुसार, ३० वयानंतर IVF सक्सेस रेट कमी होत जातो. पण IVF मधील ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी च्या मदतीने गर्भधारणेची शक्यता अधिक आहे.
२) तुम्ही ४० वयात निरोगी असाल तर गर्भधारणेचे चान्सेस किती असतात?
तुम्ही निरोगी असाल तर ४० वयात नैसर्गिक गर्भधारणेचे चान्सेस प्रत्येक मासिक पाळी चक्रासाठी ५% हुन कमी असतात.