मधुमेह आणि फर्टिलिटी आरोग्याचा संबंध
रक्तातील साखरेची पातळी वाढणे म्हणजे मधुमेह. वाढलेल्या शुगर लेव्हल्स फ्री रॅडिकल्स तयार करतात. रॅडिकल्स हे एक प्रकारचे रेणू आहेत. जे पेशींना नुकसान पोहचवतात. त्याचप्रमाणे ते स्त्रीबीज आणि शुक्राणूंनाही हानी पोचवतात. मधुमेहामुळे बीजांमधील DNA डॅमेज होऊ शकतात. सोबतच हार्मोनल असंतुलन होऊन गर्भधारणेत समस्या निर्माण होतात. मधुमेहामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, ज्यामुळे ओव्हुलेशन करणे आणि ओव्हुलेशन केव्हा होईल हे सांगणे कठीण होते. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांसारख्या गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सच्या उत्पादनात व्यत्यय येऊ शकतो.
अधिक गंभीर स्वरूपाच्या मधुमेही रुग्णांमध्ये मज्जातंतूचे नुकसान आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान झाले तर फर्टिलिटी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. रिप्रॉडक्टिव्ह अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो आणि गर्भ रुजण्यात (इम्प्लांटेशन समस्या) अडचण येते.
टाइप 1 मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता असते.
मधुमेहाचे प्रकार
जीवनशैलीत सुधारणा आणि औषधोपचाराने मधुमेह नियंत्रित करता येतो. यशस्वी गर्भधारणेसाठी अशा प्रकारे मधुमेह नियंत्रित ठेवणे अनिवार्य आहे.
- टाइप १ डायबेटिज : इन्सुलिन संप्रेरक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते. टाइप १ डायबेटिज मध्ये शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करीत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
- टाइप २ डायबेटिज : टाइप २ डायबेटिज प्रौढांमध्ये सर्रासपणे आढळतो. टाइप २ डायबेटिज मध्ये इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होते, पण इन्सुलिन चा प्रतिकार होतो आणि ते प्रभावीपणे काम करीत नाही. याला ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ म्हंटले जाते.
- जेस्टेशनल डायबेटिज (Gestational Diabetes) : जेस्टेशनल डायबेटिज म्हणजे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह. याला तात्पुरत्या स्वरूपाचा मधुमेह देखील म्हणतात. कारण तो गर्भधारणेदरम्यान विकसित होतो आणि बाळाच्या जन्मानंतर बरा देखील होतो. पूर्वीपासून हाय ब्लड शुगर असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपात किंवा इतर गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.
मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार
मधुमेहाच्या रूग्णांसाठी आयव्हीएफ एक यशस्वी प्रजनन उपचार असू शकतो. गर्भधारणेतील गुंतागुंत कमी करण्यासाठी IVF प्रक्रियेत काही समायोजन करणे महत्त्वाचे आहे. जसे कि –
- IVF पूर्वी रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यामुळे स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळू शकते. तसेच गर्भधारणेत गुंतागुंत टाळता येऊ शकते.
- गर्भधारणेदरम्यान देखील रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे आवश्यक असते. यामुळे गर्भधारणेतील गुंतागुंत कमी होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची वेळोवेळी तपासणी करणे आणि गरजेनुसार औषधांचा डोस ठरवणे किंवा बदलणे आवश्यक असते.
- मधुमेह नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये IVF उपचारादरम्यान अधिक बारकाईने निरीक्षण केले जाते. यामध्ये रक्तातील साखरेची नियमित तपासणी आणि अल्ट्रासाऊंड यांचा समावेश असतो.
- इतरांच्या तुलनेत मधुमेही रुग्णांना ओवरियन स्टिम्युलेशन औषधांची अधिक आवश्यकता असते. याचे कारण असे के मधुमेहींमध्ये हि औषधे कमी प्रतिसाद देतात.
- मधुमेहाच्या रुग्णांना स्त्रीबीज मिळविण्याच्या (ओवम पीक-अप) प्रक्रियेदरम्यान ‘ओवरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम’ (OHSS) विकसित होण्याचा धोका थोडा जास्त असतो. OHSS ही अशी स्थिती आहे ज्यामुळे अंडाशय फुगतात आणि वेदना होतात.
- मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गर्भपात आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका तुलनेने जास्त असतो. त्यामुळे डॉक्टर कमी भ्रूण हस्तांतरित करण्याची शिफारस करू शकतात.
डायबेटिक रुग्णांसाठी IVF चे सक्सेस रेट
अभ्यास सूचित करतात की मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये IVF सक्सेस रेट कमी असू शकतात. यशाचा दर रुग्णाचे वय, मधुमेहाचा प्रकार आणि मधुमेहाची तीव्रता यासह अनेक घटकांवर अवलंबून असतो. परंतु आधुनिक IVF उपचारांनी यशदर वाढवणे आणि गर्भधारणा करणे शक्य आहे.
३५ हुन कमी वय असल्यास : ५०-६० टक्के
३५ ते ३७ वयात : ४०-५० टक्के
३८ ते ४० वयात : २५-३० टक्के
४१ ते ४२ वयात : १५-२० टक्के
४२ हुन अधिक वय असल्यास : १० टक्के हुन कमी
मधुमेही रुग्णांनी गर्भधारणेसाठी IVF चा विचार का करावा?
आधुनिक IVF उपचारांनी खालील जोखीम घटक टाळणे शक्य आहे.
- मिसकॅरेज चा धोका असतो.
- एम्ब्रियो क्वालिटी कमी होऊ शकते किंवा इम्प्लांटेशन समस्या येऊ शकते.
- प्री टर्म डिलिव्हरी किंवा लो बर्थ वेट समस्या होऊ शकते.
- एकाधिक गर्भधारणेची शक्यता असते.
- गर्भधारणेत मधुमेह होण्याची शक्यता असते.
- मधुमेहींमध्ये फर्टिलिटी रेट कमी असतो.
- इन्फर्टिलिटी समस्या येऊ शकते.
- DNA डॅमेज होऊन जेनेटिक समस्या निर्माण होऊ शकतात.
- 20 टक्के महिलांना मधुमेहामुळे गर्भधारणेत गुंतागुंत होऊ शकते.
- मॅक्रोसोमिया : गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात, रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने गर्भातील बाळाचे वजनदेखील वाढू शकते.
- इंट्रायूटरिन डेथ : गर्भात बाळ दगावू शकते.
आयव्हीएफ आणि टाइप २ मधुमेह
मधुमेह मेलिटसमुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो, ज्यामुळे मासिक फॉलिक्युलोजेनेसिस आणि स्त्रीबिजांचा प्रतिबंध होतो. हि स्थिती हे वंध्यत्वाला प्रोत्साहन देते. मेटाबोलिक बदलांमुळे स्त्रीबीजांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मधुमेह हा मुख्यतः इतर चयापचय विकारांशी संबंधित आहे जसे की लठ्ठपणा (ओबेसिटी), उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि कोरोनरी आर्टरी डिसीज.
पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (PCOS) असलेल्या महिलांमध्ये खास करून इंसुलिन प्रतिरोध आणि डायबिटिज मेलिटसचा त्रास असतो.
डायबिटिज मेलिटस महिलांप्रमाणेच पुरूषांमध्येही वंध्यत्वाची समस्या निर्माण करते. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमवर परिणाम झाल्यास यौन इच्छा कमी होते. पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) आणि रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्या होऊ शकते. मधुमेह मेलिटस सूक्ष्म-आण्विक बदलांना प्रेरित करते ज्यामुळे सीमेन पॅरामीटर्स (संख्या आणि गुणवत्ता) कमी होतात. मधुमेहात ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे शुक्राणूंची रचना (मॉर्फोलॉजी) बिघडते. शुक्राणूंची गतिशीलता कमी होऊ शकते आणि गर्भधारणेत समस्या निर्माण होते.
टाइप २ डायबेटिक रुग्णांसाठी औषधे आणि अँटिऑक्सिडेंट थेरपी महत्त्वाची ठरू शकते. अँटीऑक्सीडेंट थेरपी वापरून सीमेन पॅरामीटर्स नॉर्मल होण्यास मदत होते.
गर्भधारणेसाठी उपचार
मधुमेहामुळे गर्भधारणेत समस्या असल्यास गर्भधारणेसाठी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये एक्स्पर्ट डॉक्टर तुम्हाला तुमच्या स्थितीनुसार योग्य उपचार पर्याय सुचवतील. तुमच्यासाठी पर्सनलाईज ट्रीटमेंट प्लॅन बनवतील. त्यामध्ये IUI (इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन), IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन), ICSI (इंट्रा सायटोप्लाजमिक स्पर्म इंजेक्शन), IMSI (इंट्रा सायटोप्लाजमिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन), LAH (लेजर असिस्टेड हॅचिंग), ब्लास्टोसिस्ट, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) अशा अनेक अत्याधुनिक उपचारांचा समावेश असू शकतो. अशा आधुनिक उपचारांनी मधुमेही रुग्णांना यशस्वी गर्भधारणा करणे शक्य आहे.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न :
पतीला मधुमेह असल्यास पत्नी गर्भवती होऊ शकते का?
मधुमेह असलेल्या पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये डीएनए खराब होण्याची शक्यता असते. सीमेन पॅरामीटर्स नॉर्मल पेक्षा कमी असल्यास गर्भधारणेत समस्या येऊ शकते. गर्भधारणा झालीच तर, मिसकॅरेज किंवा बाळामध्ये जन्मदोष असण्याची शक्यता असते. आधुनिक फर्टिलिटी उपचारांची मदत घेतल्यास गर्भधारणा यशस्वी होऊ शकते.
टाइप २ मधुमेहामुळे पुरुषांना वंध्यत्व येऊ शकते का?
टाइप 1 मधुमेह किंवा टाइप 2 मधुमेह पुरुषांच्या फर्टिलिटी क्षमतेवर हानिकारक परिणाम करू शकतो. जसे कि – शुक्राणूंची गुणवत्ता, शुक्राणूंची गतिशीलता, शुक्राणूंची डीएनए अखंडता आणि सेमिनल प्लाझमाचे घटक.