इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय? इरेक्शन आणि वंध्यत्वाचा संबंध आणि उपचार

इरेक्शन समस्या हि पुरुषांसाठी कठीण वेळ असते. ती लैंगिक जीवन प्रभावित करते आणि नैसर्गिकरित्या मूल होण्यात अडचण निर्माण करते. ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ मध्ये वंध्यत्वाचे कारण ED असेल तर गरजेनुसार योग्य औषधे देऊन, कौन्सेलिंग करून यशस्वी उपचार केले जातात.

Share This Post

इरेक्शन समस्या हि पुरुषांसाठी कठीण वेळ असते. ती लैंगिक जीवन प्रभावित करते आणि नैसर्गिकरित्या मूल होण्यात अडचण निर्माण करते. ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ मध्ये वंध्यत्वाचे कारण ED असेल तर गरजेनुसार योग्य औषधे देऊन, कौन्सेलिंग करून यशस्वी उपचार केले जातात.

इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंधादरम्यान इरेक्शन होण्यास किंवा टिकवून ठेवण्यात अडचण येते तेव्हा या स्थितीला ‘इरेक्टाइल डिसफंक्शन‘ म्हणतात. शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे इरेक्शन समस्या उद्भवू शकते. शिवाय इरेक्शन समस्या लॉन्ग टर्म किंवा शॉर्ट टर्म देखील असू शकते.

इरेक्शन समस्येचे प्रकार

  1. शॉर्ट टर्म इरेक्शन समस्या : तणाव, थकवा, चिंता, कामाचा ताण, मनःस्थिती, खालावलेली जीवनशैली, कौटुंबिक किंवा कामाच्या ठिकाणचे तणाव यामुळे अल्प काळ किंवा काही दिवस इरेक्शन समस्येचा अनुभव येऊ शकतो.
  2. लॉन्ग टर्म इरेक्शन समस्या : जेव्हा वारंवार आणि अनेक महिने इरेक्शन समस्या येत असेल तर त्यामागे शारीरिक वैद्यकीय कारण असू शकते. जाणकार डॉक्टरांकडून या स्थितीचे निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे.

इरेक्शन कसे काम करते समजून घ्या

लैंगिक उत्तेजना (सेक्श्युअल अराउजल) दरम्यान लिंगातील रक्तप्रवाह वाढतो. लिंग ‘कॉर्पस कॅव्हर्नोसम’ नावाच्या ऊतींनी बनलेले असते. येथील रक्तप्रवाह वाढल्यामुळे सैल ऊती (स्पॉन्जी टिश्यू) शिथिल होतात आणि इरेक्शन होते.

इरेक्टाइल डिसफंक्शन मुळे वंध्यत्व येऊ शकते का?

इरेक्शन समस्येमुळे शुक्राणूंची संख्या किंवा गुणवत्ता प्रभावित होत नाही. प्रजनन क्षमता प्रभावित होत नाही. परंतु इरेक्शन समस्येचा चुकीचा इलाज केल्यास शुक्राणूंची गुणवत्ता खराब होऊ शकते. शिवाय लैंगिक संबंधात अडचण निर्माण होते आणि नैसर्गिक रित्या मूल होण्यात अडथळा निर्माण होतो. अशा वेळी ED वर योग्य उपचार घेतल्यास नैसर्गिक गर्भधारणा देखील होऊ शकते. याशिवाय अधिक गुंतागुंत असल्यास प्राथमिक किंवा आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी नक्कीच गर्भधारणा होऊ शकते.

इरेक्शन समस्येची कारणे

  • शीघ्रपतन (अरली इजॅक्युलेशन)
  • लैंगिक कार्याविषयी अँक्झायटी किंवा चिंतेचा आजार असणे
  • उदासीनता किंवा डिप्रेशन मुळे
  • मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये रक्तवाहिन्या कडक होतात.
  • मज्जातंतूचे विकार : यामध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक आणि पाठीचा कणा आणि मज्जातंतूंच्या दुखापतींचा समावेश होतो. पेल्विक शस्त्रक्रियांमुळे मज्जातंतूंना दुखापत झाल्यास ED होऊ शकते.
  • इतर औषधे : ब्लड प्रेशर, अँटी डिप्रेसंट, अँटी अँक्झायटी, काचबिंदू आय ड्रॉप आणि कॅन्सर केमोथेरपी अशा उपचारांमुळे इरेक्शन समस्या निर्माण होते.
  • हार्मोनल समस्या : वाढीव प्रोलॅक्टिन, पिट्यूटरी ग्रंथीद्वारे तयार केलेले हार्मोन, कमी किंवा जास्त थायरॉईड चे प्रमाण, प्रोस्टेट कर्करोगावर उपचार करण्यासाठी दिलेले हार्मोन्स, कमी टेस्टेस्टेरॉन किंवा अधिक कॉर्टिसॉल यांमुळे इरेक्शन समस्या निर्माण होऊ शकते.
  • जीवनशैलीचे घटक : धुम्रपान, अल्कोहोलचा जास्त वापर, वजन जास्त असणे आणि व्यायाम न करणे यामुळे देखील ईडी होऊ शकते.
  • D ३ ची कमी : व्हिटॅमिन डी शरीरात रक्ताभिसरण संतुलित ठेवण्याचे काम करते. संभोग दरम्यान रक्ताभिसरण वाढल्याने इरेक्शन होते. याउलट व्हिटॅमिन डी ची कमतरता रक्ताभिसरण रोखते आणि इरेक्शन समस्या निर्माण होते. 

इरेक्टाइल डिसफंक्शन चा अनुभव कुणाला होऊ शकतो?

  • ताणतणाव किंवा चिंता अनुभव केल्यास
  • इरेक्शन साठी व्यवस्थित रक्तपुरवठा ना झाल्यास
  • 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये
  • 40 ते 70 वयोगटातील सुमारे 60% पुरुषांमध्ये
  • मानसिक कारणांमुळे शॉर्ट टर्म इरेक्शन चा अनुभव कमी वयातही येऊ शकतो.
  • मधुमेह किंवा प्रोस्टेटशी संबंधित उपचार घेतल्यास
  • जननेंद्रियांची सर्जरी झालेली असल्यास 
  • रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार असल्यास
  • हृदयरोग किंवा उच्च कोलेस्टेरॉल
  • किडनी फेल किंवा डायलिसिस उपचार घेतलेले असल्यास
  • हार्मोनल असंतुल. टेस्टेरॉन या सेक्स हार्मोन ची कमी. कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढणे.

गर्भधारणेसाठी निदान आणि उपचार कसे केले जातात?

मूत्र विश्लेषणाबरोबरच विविध रक्त तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये CBC, यकृत आणि मूत्रपिंड केंद्र, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड, ब्लड हार्मोन चा समावेश असतो.

याशिवाय डुप्लेक्स अल्ट्रासाऊंड, बल्बोकेव्हर्नोसस रिफ्लेक्स, NPT (नाक्टर्नल पेनियल ट्यूमेसेंस), कैवर्नोसोग्राफी, आर्टेरियोग्राफी अशा इमेजिंग टेस्ट केल्या जातात. ज्यामुळे इरेक्शन समस्या उद्भवण्याची नेमके कारण कळून येते.

गर्भधारणेसाठी अशा प्रकारे उपचार केले जातात

  1. जीवनशैलीत सुधार : अल्कोहोल कमी करणे, धूम्रपान सोडणे, वजन कमी करणे, व्यायाम करणे यांचा समावेश होतो.
  2. डॉक्टर तुम्हाला सुरु असलेली औषधे तपासतील आणि गरज वाटल्यास बदलतील.
  3. मानसोपचार : नात्यातील समस्यांसाठी किंवा लैंगिक कार्यादरम्यान येणारी चिंता हाताळण्यासाठी मानसोपचार पुरविले जातात.
  4. हार्मोनल औषधे, जीवनसत्त्वे, किंवा इतर प्रिस्क्राइब औषधे दिली जातात.
  5. इतर औषधे : पुरुषांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा इतिहास असल्यास किंवा त्यांना रक्तवाहिन्यांचे विकार, पोटात अल्सर असल्यास त्याचाही इलाज औषधांनी केला जातो.
  6. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : टेस्टेस्टेरॉन थेरपी दिली जाते. यामुळे यौन इच्छेत वाढ होते.
  7. व्हॅक्यूम उपकरणे : लिंगाला रक्तप्रवाह होत नसल्यास अशा प्रकारचे व्हॅक्युम उपकरण वापरून लिंग ताठरता आणली जाते. आणि इरेक्शन टिकवण्यासाठी रिंग च्या साहाय्याने रक्त अडवले जाते.
  8. सर्जरी : पेनाइल इम्प्लांटेशन शस्त्रक्रिया केली जाते. किंवा वृषणात पंप आणि सिलेंडर बसवली जातात. त्याला इन्फ्लेटेबल इम्प्लांट सर्जरी म्हणतात. याव्यतिरिक्त मलियेबल इम्प्लांट सर्जरी वापरून वाकण्याजोगे रॉड्स बसवले जातात.

Youtube link : https://www.youtube.com/watch?v=3Egm7swT28A

इरेक्शन समस्या बद्दल संकोच बाळगू नका – डॉ. स्नेहा बल्की

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर च्या Dr. Sneha Balki सांगतात कि, “इरेक्टाइल डिसफंक्शन ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरुषाला सेक्सुअल परफॉर्मन्सदरम्यान लिंग ताठ होण्यात किंवा ते टिकवून ठेवण्यात अडचण येते. लक्षणांमध्ये लैंगिक इच्छा किंवा कामवासना कमी होणे हे देखील समाविष्ट असू शकते.” बऱ्याच मानसिक कारणांमुळे, मॅरिटल रिलेशनशिप, परफॉर्मन्स प्रेशर, विविध प्रकारचे तणाव यांमुळे सायकोजेनिक इरेक्शन समस्येचा अनुभव येतो. याशिवाय दुखापत, सर्जरी, मज्जातंतूला दुखापत, रक्तवाहिन्यांचे विकार अशा शारीरिक समस्यांमुळे देखील इरेक्शन समस्या येते. इरेक्शन चे कारण शारीरिक आहे, मानसिक आहे कि लैंगिक आहे हे शोधून त्यानुसार उपचार केले जातात.

इरेक्शन समस्या किती सामान्य आहे?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने २०२२ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार – प्राथमिक वंध्यत्वाच्या तुलनेत दुय्यम वंध्यत्व समस्या असलेल्या जोडप्यांमध्ये इरेक्शन समस्येमुळे वंध्यत्व येण्याचे प्रमाण अधिक आहे.

Source: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7942006

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने २०२२ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार-

  • हायपोडक्टिव्ह लैंगिक इच्छा आणि लैंगिक समाधानाचा अभाव यामुळे इरेक्शन समस्या असलेल्या पुरुषांचे प्रमाण 8.9% ते 68.7% आहे.
  • ६ वंध्य पुरुषांपैकी एकाला शीघ्रपतनामुळे इरेक्शन समस्या येते.
  • १० वंध्य पुरुषांपैकी एकाला ओर्गसमीक डिसफंक्शन मुळे इरेक्शन समस्या अनुभवाला येते.

Source: https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/29532805

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

१) वेळीच कसा ओळखायची इरेक्शन समस्या ?

लैंगिक इच्छा कमी होणे, इरेक्शन न मिळणे, इरेक्शन टिकवून ठेवता न येणे अशी लक्षणे दिसल्यास वेळीच फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्या समस्येचे कारण मानसिक असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. किंवा कारण लैंगिक असेल तर सेक्श्युओलॉजिस्ट चा सल्ला घ्या. जर तुम्हाला इरेक्शन समस्येमुळे गर्भधारणेत अडचण येत असेल तर, फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

२) इरेक्शन सुधारण्यासाठी काय खावे?

पालक, गाजर, अक्रोड, टरबूज, केळी, संत्री, सी फूड, डार्क चॉकलेट, अश्वगंधा, द्राक्ष, लसूण यांचा आहारात समावेश करावा. शिवाय प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वे असलेले अन्नपदार्थ सेवन करावे.

हा ब्लॉग हिंदी मध्ये वाचण्यासाठी: इरेक्टाइल डिसफंक्शन क्या है – कारण, लक्षण, जांच और उपचार

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

Aspermia vs Azoospermia- Causes, symptoms, impact & treatment

Aspermia and Azoospermia are both conditions related to male infertility. While in Aspermia, men lack the presence of semen itself, in Azoospermia, there is a lack of the presence of sperm in the semen, making them both the primary causes of male infertility.

पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) : लक्षणे आणि उपचार

हा स्त्रीच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचा संसर्ग आहे. जेव्हा लैंगिक संक्रमित जीवाणू (STD infection) तुमच्या योनीतून तुमच्या गर्भाशयात, फॅलोपियन नलिका किंवा अंडाशयात पसरतात तेव्हा बहुतेकदा असे घडते. रिप्रॉडक्टिव्ह अवयव डॅमेज झाल्यास वंध्यत्व येऊ शकते. हे टाळण्यासाठी PID वर उपचार घेणे अनिवार्य आहे. PID हे तुमच्या वंध्यत्वाचं कारण असू शकतं. तेव्हा PID सह गर्भधारणा कशी करावी याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग नक्की वाचा.