पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) : लक्षणे आणि उपचार

हा स्त्रीच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचा संसर्ग आहे. जेव्हा लैंगिक संक्रमित जीवाणू (STD infection) तुमच्या योनीतून तुमच्या गर्भाशयात, फॅलोपियन नलिका किंवा अंडाशयात पसरतात तेव्हा बहुतेकदा असे घडते. रिप्रॉडक्टिव्ह अवयव डॅमेज झाल्यास वंध्यत्व येऊ शकते. हे टाळण्यासाठी PID वर उपचार घेणे अनिवार्य आहे. PID हे तुमच्या वंध्यत्वाचं कारण असू शकतं. तेव्हा PID सह गर्भधारणा कशी करावी याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग नक्की वाचा.

Share This Post

PID म्हणजे काय?

PID म्हणजे पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज. ओटीपोटाचा दाहक रोग. जो महिलांच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचा एक संसर्ग (इन्फेक्शन) आहे. क्लॅमिडीया किंवा गोनोरिया यांसारखे लैंगिक संक्रमित जीवाणू (sexually transmitted bacteria) योनीतून गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयात पसरतात तेव्हा सहसा हे उद्भवते. PID ची लक्षणे वेगवेगळी असू शकतात परंतु अनेकदा खालच्या ओटीपोटात दुखणे, योनीतून असामान्य स्त्राव, वेदनादायक लघवी आणि ताप यांचा समावेश होतो. उपचार न केल्यास, PID मुळे वंध्यत्व किंवा एक्टोपिक गर्भधारणा यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात.

PID इन्फेक्शन आणि वंध्यत्व

स्त्रियांच्या रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक मधील विविध प्रकारच्या इन्फेक्शन मुळे प्रामुख्याने रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक च्या वरच्या भागात जळजळ होते. हा रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक चा एक प्रकारचा चढता संसर्ग आहे. कारण, सुरुवातीला रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक च्या खालच्या भागात इन्फेक्शन होते आणि हे बॅक्टेरिया नंतर वरच्या दिशेने इतरत्र पसरतात. महिलांचे रिप्रॉडक्टिव्ह अवयव – गर्भनलिका, अंडाशय आणि गर्भाशयात इन्फेक्शन पसरते.

PID इन्फेक्शन चे फर्टिलिटीवर होणारे परिणाम :

  • रिप्रॉडक्टिव्ह अवयवांची कार्यक्षमता कमी होते. 
  • फेलोपियन ट्यूब खराब होऊ शकतात. 
  • इन्फेक्शनमुळे खराब झालेल्या ट्यूब मधून पाणी झिरपते तेव्हा गर्भ रुजण्यात अडचणी येतात. 
  • इन्फेक्शन मुळे शुक्राणूंच्या प्रवासात अडथळा येतो आणि शुक्राणू पुढील दिशेने प्रवास करू शकत नाही. परिणामी शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोचू शकत नाही आणि वंध्यत्व येते. 
  • मासिक पाळी अनियमित होते. 
  • अंडाशयांना संसर्ग झाल्यास अंडाशय खराब होतात. ओव्यूलेशन समस्या निर्माण होते. 
  • स्त्रीबीज फलित करण्याची शुक्राणूंची क्षमता कमी होते. 
  • एक्टोपिक प्रेग्नन्सी चा धोका जास्त असतो. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयाबाहेर होणारी अस्थानिक गर्भधारणा. जी प्रामुख्याने फेलोपियन ट्यूब मध्ये होते.

उपचार न केलेल्या PID चा रिप्रॉडक्टिव्ह अवयवांवर होणार परिणाम

PID ची लक्षणे दिसल्यानंतर लवकर उपचार केल्यास इन्फेक्शन रोखले जाते. परंतु लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शन चा प्रसार वाढतो आणि हे इन्फेक्शन पुढे जाऊन गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि अंडाशयांपर्यंत देखील पसरते. परिणामी वंध्यत्व आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी सारख्या दीर्घकालीन धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. 

तुमच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांना आणि फर्टिलिटी आरोग्याला होणारे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. खासकरून जेव्हा तुम्हाला PID असल्याची शंका आहे.

PID इन्फेक्शनची कारणे

  • असुरक्षित सेक्श्युअल इंटरकोर्स 
  • IUD उपकरणे / इंट्रायूटरिन उपकरणे 
  • प्रामुख्याने, सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STD), कॅलामीडिया, गनोरिया, क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस, निसेरिया अशा बॅक्टरीयांमुळे PID इन्फेक्शन होते.
  • डोचिंग 
  • बर्स्ट अपेंडिक्स 
  • सर्जरी – क्युरेटिंग, सर्जिकल ऍबॉर्शन आदी.

PID इन्फेक्शन ची लक्षणे

  • ओटीपोटात वेदना
  • मासिक पाळीत वेदना 
  • इंटरकोर्स दरम्यान वेदना 
  • वजायनल ब्लीडींग 
  • थंडी-ताप 
  • मलमूत्र विसर्जनावेळी वेदना 
  • अतिरिक्त थकवा 
  • मळमळ

गंभीरतेनुसार PID चे प्रकार :

PID चा प्रकार कोणताही असो, वंध्यत्व किंवा तीव्र ओटीपोटात दुखणे यांसारख्या गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला PID असण्याची शंका असल्यास, योग्य निदान आणि उपचारांसाठी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. 

१) Acute PID : तीव्र पीआयडी हा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि हा अचानक उद्भवतो, ज्यामुळे ताप, ओटीपोटात दुखणे आणि असामान्य योनि स्राव यांसारखी गंभीर लक्षणे उद्भवतात.

२) Chronic PID : क्रॉनिक पीआयडी, कालांतराने हळूहळू विकसित होते आणि सौम्य प्रकारची किंवा मधूनमधून लक्षणे दिसू शकतात.

३) एसिम्प्टोमॅटिक पीआयडी : हा आणखी एक प्रकार आहे जिथे लक्षात येण्यासारखी लक्षणे उपस्थित नसतात, ज्यामुळे वैद्यकीय चाचणी शिवाय निदान करणे कठीण होते.

PID इन्फेक्शन चे निदान

१) शारीरिक तपासणी (Physical Examination) : जेव्हा तुम्हाला दिसणारी लक्षणे PID ची आहेत असे डॉक्टरांना दिसते तेव्हा, डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करतात. त्यापूर्वी वैद्यकीय इतिहास घेतला जातो. 

२) लॅबोरेटरी टेस्ट :

  • ब्लड टेस्ट
  • युरीन अनालिसिस
  • पेल्विक अल्ट्रासाउंड
  • सर्विक्स किंवा युटेरस कल्चर

PID असल्यास गर्भधारणेसाठी उपचार

१) मेडिकेशन : इन्फेक्शन करणारा बॅक्टरीया कोणता आहे, त्यानुसार अँटिबायोटिक मेडिसिन किंवा इंजेक्शन डॉक्टर लिहून देतात. सोबतच इन्फेक्शनचा तीव्रतेनुसार औषधांचा डोस लिहून देतात. 

२) हॉस्पिटलायझेशन : तीव्र स्वरूपाच्या इन्फेक्शन साठी रुग्णाला ऍडमिट होण्याची गरज असते. साधारणपणे ३ किंवा अधिक दिवसांचा हा मेडिकेशन कोर्स असू शकतो. 

३) ART ट्रीटमेंट : अँटिबायोटिक औषधोपचारासह गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी डॉक्टर IUI (इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन) ट्रीटमेंट सुचवू शकतात. IUI उपचारामध्ये शुक्राणूंचा प्रवास निम्मा केला जातो. यामुळे इन्फेक्टेड एरियामधून शुक्राणूंचा अवघड प्रवास असलेला प्रवास सोपा होतो आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

४) IVF – इन विट्रो फर्टिलायझेशन : PID इन्फेक्शन व्यतिरिक्त इतर वंध्यत्व समस्या असतील, IUI वारंवार फेल होत असेल किंवा वय अधिक असेल किंवा इन्फेक्शन मुळे फेलोपियन ट्यूब खराब झाल्या असतील तर अशा गंभीर प्रकरणांमध्ये IVF गर्भधारणेसाठी उत्तम पर्याय आहे. IVF – इन विट्रो फर्टिलायझेशन उपचारामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू लॅब मध्ये फर्टीलाइज करून गर्भ बनवतात आणि तो मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करतात. यामुळे वंध्यत्वाच्या अनेक समस्या बायपास केल्या जातात आणि IVF चा सर्वाधिक सक्सेस रेट मिळतो.

सतत विचारले जाणारे प्रश्न :

PID सह गर्भधारणा शक्य आहे का?

होय. प्राथमिक किंवा आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे. एखाद्या महिलेने PID वर उपचार न घेतल्यास स्कार टिश्यू विकसित होतात आणि त्या फेलोपियन ट्यूब ब्लॉक करतात. याच कारणामुळे वर्षभरात १ लाख स्त्रिया वंध्यत्व उपचार सुरु करतात आणि त्या गर्भवती होतात.

PID होण्यापासून कसा बचाव करावा?

– भरपूर पाणी प्यावे
– हेल्थी अन्नपदार्थांचे सेवन करून इम्युनिटी वाढवावी 
– सुरक्षित संबंध ठेवावे 
– स्वच्छता राखावी
– डचिंग आणि टॅम्पॉन चा वापर टाळावा

PID कशामुळे होतो?

अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया मुळे PID होऊ शकतो. प्रामुख्याने कॅलॅमिडीया, गनोरिया आणि STD इन्फेक्शन मुळे PID होतो. याशिवाय वजायना मध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरिया मुळे (व्हजायनोसिस) PID विकसित होऊ शकतो.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।