एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?
एंडोमेट्रिओसिस हा एक वेदनादायी आणि वाढत जाणारा आजार आहे. शिवाय पुन्हा पुन्हा होऊ शकणारा आजार आहे. एन्डोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचा आतील थर. हा गर्भाशयाबाहेर वाढू लागतो. जगभरात करोडो महिलांना हा आजार असतो. १० पैकी १ महिला एंडोमेट्रिओसिस ची शिकार असल्याचे आढळले आहे. मासिक पाळी आणि गर्भधारणेशी संबंधित असतो.
एंडोमेट्रिओसिस कसा होतो?
गर्भाशय तीन थरांचे बनलेले असते. एन्डोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेट्रियम. सर्वात आतील थराला एन्डोमेट्रिअम म्हणतात. फॅलोपि ट्यूब मध्ये एग फर्टाईल झाल्यानंतर तयार झालेला गर्भ एन्डोमेट्रियम मध्ये येऊन रुजतो आणि तिथेच वाढतो. गर्भधारणेसाठी एन्डोमेट्रियम लेयर अतिशय महत्त्वाचा असतो. त्यासाठी प्रत्येक मासिक पाळी चक्रात एन्डोमेट्रियम ची लेयर तयार होत असते. ज्यावेळी गर्भधारणा होत नाही तेव्हा हा लेयर मासिक पाळीत तुकड्यांच्या स्वरूपात (क्लॉट्स) रक्तस्रावासोबत बाहेर पडतो. ही झाली सर्वसामान्य प्रक्रिया. पण एंडोमेट्रिओसिस या आजारामध्ये काय होते? तर, मासिक पाळी चा रक्तस्त्राव कधी कधी फ्लॉपी ट्यूब द्वारे पोटात लीक होतो. सोबतच स्कार टिश्यू युटेरस बाहेर पडतात. याला रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन म्हणतात. हे टिश्यूज तिथेच वाढू लागतात. थोडक्यात एन्डोमेट्रियम टिश्यूज गर्भाशय बाहेर अंडाशयात, फॅलोपि नलिका आणि पेल्वीस मध्ये वाढू लागतात.
एंडोमेट्रिओसिस ची इंटेन्सिटी आणि स्टेजेस
स्टेज १: मिनिमल | यामध्ये ब्लड चे छोटे-छोटे क्लोट्स दिसून येतात. इतर डॅमेज नसते. |
स्टेज २: माईल्ड | पहिल्या स्टेज मध्ये असलेले क्लोट्स या स्टेज मध्ये वाढलेले दिसून येतात. |
स्टेज ३: मॉडरेट | या स्टेज मध्ये चॉकलेट सिस्ट दिसून येतात. थोडेफार ऑर्गन चिटकलेले दिसून येतात. |
स्टेज ४: सेव्हिअर | हि सिव्हिअर स्टेज असते. यामध्ये जास्त डॅमेज झालेले असते. शिवाय ऑर्गन जास्त प्रमाणात चिटकलेले असतात. |
एंडोमेट्रिओसिस रिस्क फॅक्टर्स
- कँसर होऊ शकतो
- फॅलोपियन ट्यूब्ज डॅमेज होऊ शकतात. ज्यामुळे गर्भधारणेत अडथळे येतात.
- ओव्हरीज डॅमेज होऊ शकतात.
- ४० ते ५० टक्के महिलांना वंध्यत्व समस्या एंडोमेट्रिओसिस मुळे निर्माण होतात.
- फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात किंवा फॅलोपियन ट्यूब एग्ज पिक-अप करू शकत नाही.
- स्त्रीबीजाची गुणवत्ता (quality) कमी होते. परिणामी होणाऱ्या बाळाची गुणवत्ताही खालावते.
- एकूणच फर्टिलिटी खालावते.
- सर्जरी केल्यास स्त्रीबीज नष्ट होऊ शकतात. हा गर्भधारणेतील एक धोका आहे. कारण स्त्रीबीजांची निर्मिती पुन्हा पुन्हा होत नाही.
एंडोमेट्रिओसिस ची लक्षणे
- सूज येणे
- इंफ्लेमेशन होणे
- अवयव चिटकणे
- पॅचेस तयार होणे
- इन्फेक्शन्स
- फॅलोपि नलिका आणि अंडाशय चिटकल्यामुळे कार्यक्षमता कमी होते.
- युरिनरी ब्लॅडर चिटकले तर, युरीन मध्ये ब्लड येणे, वेदना होणे
- ओव्हरीज मध्ये रक्त जमल्यामुळे सिस्ट बनणे. याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. हे रक्त जुने असते. यामुळे ओव्हरीज मधील उसाइट्स किंवा एग्स नष्ट होतात.
- इन्फर्टिलिटी समस्या
- मासिक पाळी अतिशय वेदनादायी असते. असह्य वेदना होतात.
- मासिक पाळी काळात जीव घाबरणे, चक्कर येणे, उलटी होणे, मळमळ होणे, बेशुद्ध होणे
- त्रास अधिक वाढल्यास लघवी आणि मल विसर्जन वेळी त्रास होणे
- अनियमित मासिक पाळी
- हेवी पिरीएड्स
- वेदनादायी लैंगिक संबंध
अनेकांना एंडोमेट्रिओसिस ची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु गर्भधारणा होऊ शकत नाही म्हणून केल्या जाणाऱ्या तपासणीत एंडोमेट्रिओसिस असल्याचे दिसून येते.
एंडोमेट्रिओसिस ची कारणे
- आधुनिक जीवनशैली
- अनुवंशिकता
- गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन
- धूम्रपान किंवा अल्कोहोल सेवन
- वजन अधिक असणे
- स्ट्रेस
- हार्मोनल इम्बॅलन्स
एंडोमेट्रिओसिस चे निदान
पेल्विक एग्जाम | यामध्ये तुमच्या रिप्रोडक्टीव्ह ऑर्गन वर सिस्ट आहेत का, किंवा गर्भपिशवी च्या मागील भागात स्कार्स आहेत का, किंवा इतर काही अबनॉर्मलिटीज आहेत का याचे परीक्षण केले जाते. |
अल्ट्रासाउंड | सिस्ट इन्युमा आहे का, चॉकलेट सिस्ट आहेत का, याची माहिती अल्ट्रासाउंड मध्ये मिळते. |
MRI-मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग | जेव्हा खूप मोठे सिस्ट असण्याची शंका असेल किंवा कँसर ची शंका असेल तर, अशा वेळी MRI केला जातो. |
लॅप्रोस्कोपी | हि एक सर्वाधिक वापरली जाणारी पद्धती आहे. ज्या गोष्टी सोनोग्राफी मध्ये पाहणे शक्य होत नाही त्या गोष्टी लॅप्रोस्कोपी द्वारे निदान करता येतात. अधेशन्स (दोन अवयव चिकटलेले असणे) आहेत का, छोटे छोटे डिपॉसिट्स किंवा पॅचेस आहेत का अशा सूक्ष्म परीक्षणासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते. लॅप्रोस्कोपी मध्ये अधिक अचूक निदान होते. |
CA१२५ ब्लड टेस्ट |
एंडोमेट्रिओसिस वर उपचार
- लॅप्रोस्कोपी : याचा वापर करून निदान केले जाते. याचवेळी अधेशन्स काढणे, सिस्ट डिस्ट्रॉय करणे, रक्ताचे धब्बे शोषून घेणे, फॅलोपियन मालिकेतील ब्लॉकेज काढणे, असे उपचारही केले जातात. ज्यामुळे ऑर्गन्स ची कार्यक्षमता सुधारते. याशिवाय एंडोमेट्रिओसिस सिव्हिअर स्टेज ला असेल आणि कँसर चा धोका असेल, तसेच महिलेचे वय ४० पेक्षा जास्त असेल, तर अवयव काढून घेतले जाऊ शकतात. त्यासाठी रुग्णाला पूर्वकल्पना दिलेली असते.
- मेडिसिन्स : लॅप्रोस्कोपी उपचारानंतर ३ महिने मेडिसिन्स दिले जातात. जेणेकरून पुन्हा आजार होऊ नये. याशिवाय मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होण्यासाठी पेन किलर्स दिल्या जातात.
- इंजेक्शन्स : डायनोजिस्ट , GnRH अनालॉग इंजेक्शन्स दिले जातात.
- प्रेग्नन्सी हार्मोन्स एंडोमेट्रिओसिस मध्ये सुधार आणू शकतात. ६० ते ७० टक्के सुधारणा दिसून आलेली आहे. त्यामुळे एंडोमेट्रिओसिस महिलांना गर्भधारणेचा सल्ला दिला जातो. एंडोमेट्रिओसिस वर उपचारानंतर तीन महिने मेडिसिन दिले जाते आणि त्यानंतर लागलीच IUI ट्रीटमेंट सुरु केल्या जातात. नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसेल किंवा IUI सक्सेसफुल नसेल, तर IVF चा सल्ला दिला जातो.
- हार्मोनल पिल्स : ज्या स्त्रियांचे लग्न झालेले नाही त्यांना हार्मोनल पिल्स दिल्या जातात.
- ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योगा, मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला जातो.
- संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
- वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
- सर्जरी : गर्भधारणा होत नसेल तेव्हा सुरुवातीला अल्ट्रासाउंड केले जाते. यामध्ये ब्लड क्लोट्स दिसून आल्या, किंवा AMH (अँटीमुलेरीयम हार्मोन) हार्मोन टेस्ट अनुसार स्त्रीबीजणांची संख्या प्रमाणात असेल किंवा तुमचे वय ३५ वर्षांपर्यंत असेल तर डॉक्टर सर्जरी चा निर्णय घेतात. पण याउलट परिस्थितीत जर स्त्रीबीजांची संख्या कमी असेल आणि सर्जरी चा निर्णय घेतला तर स्त्रीबीज नष्ट होण्याचा धोका असतो.
रुग्णाची एंडोमेट्रिओसिस स्टेज कोणती सुरु आहे; माईल्ड, मिनिमल, मॉडरेट किंवा सिव्हिअर ; त्यानुसार रुग्णाला कोणता उपचार द्यायचा हे ठरविले जाते.
एंडोमेट्रिओसिस बद्दल अधिक विचारले जाणारे प्रश्न:
एंडोमेट्रिओसिस मध्ये IVF सक्सेस रेट किती असतो?
एंडोमेट्रिओसिस मध्ये IVF सक्सेस रेट इतर केसेस च्या तुलनेत कमी असतो. कारण एंडोमेट्रिओसिस मध्ये स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी झालेली असते. याशिवाय तुमचे वय, इतर आजार, तुमची लाइफस्टाइल यावरही IVF सक्सेस रेट अवलंबून असतो.
चॉकलेट सिस्ट मुळे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का?
नाही. जर तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे तर, चॉकलेट सिस्ट मुळे किंवा एंडोमेट्रिओसिस मुळे कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. कारण प्रेग्नन्सीमध्ये तयार होणारे प्रेग्नन्सी हार्मोन्स एंडोमेट्रिओसिस बरा करू शकतात. तो एक प्रकारचा उपचार आहे. अनेक प्रसंगी सी-सेक्शन करून डिलिव्हरी करावी लागते, तेव्हाच हि सिस्ट काढून टाकली जाते व उपचार केला जातो.
ओवरियन एन्डोमेट्रिओम म्हणजे काय?
एंडोमेट्रिओसिस च्या स्टेज ३ मध्ये (मॉडरेट) ब्लड क्लोट्स वाढून चॉकलेट सिस्ट तयार होतात, तेव्हा त्याला ovarian endometrioma म्हणतात.
रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?
जेव्हा मासिक पाळी येते, तेव्हा वजायनल ट्रॅक मधून रक्तस्त्राव होतो. पण काही केसेस मध्ये काही रक्तस्त्राव फॅलोपियन ट्यूब मधून पोटात इतरत्र पसरतो. त्याला बाहेर पडायला जागा राहत नाही. या रक्तस्त्राव सोबतच ऊतक (tissue) देखील फॅलोपियन ट्यूब मधून पोटात इतरत्र चिटकतात. याला retrograde menstruation म्हणतात. यामुळे ब्लड क्लॉट्स तयार होऊन तिथेच वाढू लागतात याला retrograde menstruation endometriosis म्हणतात.
एंडोमेट्रिओसिस आणि अधेनोमायोसीस मधील फरक काय?
अधेनोमायोसीस मध्ये एन्डोमेट्रियम ऊतकांपासून तयार होणारे क्लॉट्स हे फक्त गर्भाशयात तयार होतात. तर एंडोमेट्रिओसिस मध्ये गर्भाशयाच्या बाहेर इतरत्र ब्लड क्लोट्स बनतात.
एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रॉईड मधील फरक काय?
फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठी. एन्डोमेट्रियम मध्ये तयार होणाऱ्या गाठी या एन्डोमेट्रियम टिश्यू पासून बनतात. तर गर्भाशयातील मधला थर म्हणजे मायोमेट्रियम. या मायोमेट्रियम मधील स्टेम सेल्स पासून तयार होणाऱ्या गाठी म्हणजे फ्रब्रॉईड होय. एन्डोमेट्रियम मध्ये कन्सिव्ह होणे अवघड होते. तर फायब्रॉईड मध्ये बऱ्याचदा कन्सिव्ह झाल्यानंतर ट्रान्स व्हजायनल सोनोग्राफी मध्ये कळते कि रुग्णाला फायब्रॉईड आहे.
एन्डोमेट्रिअल बायोप्सी म्हणजे काय?
एन्डोमेट्रियल बायोप्सी मध्ये एन्डोमेट्रियल लायनर ला बाहेर काढून तपासणीसाठी पाठविले जाते. ज्यामध्ये टीबी, कँसर, हार्मोनल इम्बॅलन्स यांची तपासणी केली जाते. थोडक्यात गर्भाशयाची तपासणी केली जाते. मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज, गर्भधारणेत समस्या, हार्मोनल समस्या यांसाठी एन्डोमेट्रिअल बायोप्सी केली जाते.
एन्डोमेट्रियल हायपरप्लेसिया म्हणजे काय ?
एन्डोमेट्रियल हायपरप्लेसिया मध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तर म्हणजेच एन्डोमेट्रियम जाड बनते. यामुळे गर्भ रुजण्यात अडचणी निर्माण होतात. याला एन्डोमेट्रियल हायपरप्लेसिया म्हणतात.