स्पर्म ऍबनॉर्मलिटी म्हणजे काय? जाणून घ्या परिणाम, कारणे आणि उपचार

स्पर्म ऍबनॉर्मलिटी | Sperm Abnormality in marathi
स्पर्म अबनॉर्मलिटी म्हणजे स्पर्म ची रचना (Morfology), स्पर्म ची हालचाल व गती (Motiliti), स्पर्म तयार होण्याचे प्रमाण (Sperm Production), स्पर्म ची संख्या (Sperm Count) यामध्ये ऍबनॉर्मलिटी असते. ऍबनॉर्मल स्पर्म मध्ये स्पर्म चे डोके (हेड) मोठे किंवा लहान असते, शेपूट (टेल) आखूड, वाकडी किंवा दुहेरी असते. अशा दोषांमुळे स्पर्म ला स्त्रीबीजापर्यंत हालचाल करून जाणे शक्य होत नाही किंवा स्त्रीबीजात प्रवेश करणे शक्य होत नाही किंवा अर्ध्या रस्त्यात शुक्राणू मरण पावतात.

Share This Post

स्पर्म एबनॉर्मलिटी म्हणजे काय?

स्पर्म अबनॉर्मलिटी म्हणजे स्पर्म ची रचना, स्पर्म ची हालचाल व गती, स्पर्म तयार होण्याचे प्रमाण, स्पर्म ची संख्या यामध्ये ऍबनॉर्मलिटी असते. ऍबनॉर्मल स्पर्म मध्ये स्पर्म चे डोके (हेड) मोठे किंवा लहान असते, शेपूट (टेल) आखूड, वाकडी किंवा दुहेरी असते. अशा दोषांमुळे स्पर्म ला स्त्रीबीजापर्यंत हालचाल करून जाणे शक्य होत नाही किंवा स्त्रीबीजात प्रवेश करणे शक्य होत नाही किंवा अर्ध्या रस्त्यात शुक्राणू मरण पावतात.

  • लो स्पर्म काउंट
  • पुअर स्पर्म मॉटिलिटी
  • अबनॉर्मल स्पर्म मॉर्फोलॉजि
  • डी. एन. ए. डॅमेज
  • स्पर्म अग्ल्युटीनएशन किंवा दोन शुक्राणू चिकटलेले असणे

अशा स्पर्म अबनॉर्मलिटी असतात.

सीमेन एनालिसिस

सीमेन एनेलीसीस हि पुरुष वंध्यत्वासाठी केली जाणारी तपासणी आहे. यामध्ये स्पर्म ची मोटिलिटी, मॉर्फोलॉजि, स्पर्म काउंट, स्पर्म प्रोडक्शन, स्पर्म कॉन्सन्ट्रेशन तपासले जाते.

मोटिलिटी अबनॉर्मलीटीज :

मोटिलिटी म्हणजे स्पर्म ची गती. स्पर्म कोणत्या वेगाने प्रवास करतात आणि हालचाल करतात ती स्थिती. लैंगिक संबंधाच्यावेळी पुरुषांना इजॅक्युलेशन होते आणि शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात प्रवेश करतात. गर्भाशयाच्या वर दोन्ही बाजूला असलेल्या फॅलोपि नलिकांमध्ये असलेल्या स्त्रीबीजापर्यंत शुक्राणूला प्रवास करायचा असतो. त्यामुळे गर्भधारणा शक्य होते. यासाठी स्पर्म मोटिलिटी महत्त्वाची आहे. ‘लो मोटिलिटी’ असेल तर शुक्राणू आपला प्रवास पूर्ण करू शकत नाही आणि गर्भधारणा होऊ शकत नाही.

  1. प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी : यामध्ये स्पर्म सरळ दिशेत प्रवास करताय, कि सर्क्युलर फिरतंय, किंवा झिगझॅग प्रवास करत पुढे प्रवास करीत आहेत ते समजते.
  2. नॉन प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी : यामध्ये स्पर्म मोटाईल होतो परंतु तो पुढे जाऊ शकत नाही. एकाच ठिकाणी व्हायब्रेट होतो. टोटल मोटिलिटी मध्ये प्रोग्रेसिव्ह आणि नॉन प्रोग्रेसिव्ह मॉटिलिटी दोन्हीही तपासले जातात.
  3. इमोटाईल स्पर्म : यामध्ये स्पर्म अजिबात मूव्ह करीत नाहीत. काही स्पर्म इमोटाईल असू शकतात किंवा सर्व. म्हणजेच एग फर्टीलाइज होण्यासाठी स्पर्म प्रोग्रेसिव्ह मॉटिलिटी महत्त्वाची असते. ज्यामुळे स्पर्म फॅलोपियन ट्यूब पर्यंत पोहचू शकतात.

मॉर्फोलॉजिकल अबनॉर्मलीटीज :

मॉर्फोलॉजि म्हणजे स्पर्म दिसायला कसा आहे किंवा स्पर्म चे आयडेंटिफिकेशन कसे आहे. स्पर्म प्रॉडक्शन जेव्हा होते तेव्हा सुरुवातीचा स्पर्म इतर सेल्स सारखाच दिसतो. त्यानंतर अक्रोझोमल, हेड, नेक, टेल असे पार्ट विकसित होतात. अशा प्रकारे स्पर्म बनत असताना कुठेही गडबड झाली तर स्पर्म मॉर्फोलॉजी ही नॉर्मल स्पर्म पेक्षा वेगळी असते.

१) हेड अबनॉर्मलीटीज :

स्पर्म हेड च्या मध्ये न्यूक्लिअस आणि डी. एन. ए. असतात. हेड च्या पुढे अक्रोसोमल कॅप असते. जी टोकदार असते. ज्यामुळे स्पर्म ला स्त्रीबीजात पेनिट्रेट करता येणे शक्य होते.

  • मॅक्रोसेफली (मोठे डोके)
  • मायक्रोसेफली (लहान डोके)
  • पिनहेड
  • टॅपर्ड हेड
  • हेडलेस शुक्राणू
  • पातळ अरुंद डोके
  • ग्लोबोझूस्पर्मिया (गोलाकार शुक्राणू)

एका शुक्राणूला अनेक डोके, या हेड ऍबनॉर्मलिटीज आहेत.

२)  नेक अबनॉर्मलीटीज :

नेक मध्ये मेट्रोकॉर्डिया असतो जो स्पर्म च्या बॅटरी सारखं काम करतो.

  • मिटोकॉन्ड्रियाची कमतरता
  • मान डोक्यात असणे
  • वाकलेली मान
  • खूप जाड किंवा खूप पातळ असलेली मान

अशा काही नेक ऍबनॉर्मलिटीज असतात. ज्यामुळे स्पर्म चा स्पीड आणि एनर्जी यावर परिणाम होतो.

३) टेल अबनॉर्मलीटीज :

टेल ऍबनॉर्मलिटीज मुळे शुक्राणूंच्या मोटिलिटी वर परिणाम होतो.

  • कर्व्ह टेल
  • स्टंप टेल
  • ड्युप्लिकेट टेल
  • मल्टिपल टेल

अशा काही टेल ऍबनॉर्मलिटीज असतात.

स्पर्म काउंट (Sperm count) : दर मिलिलिटर सीमेनसॅम्पल मध्ये किती लक्ष शुक्राणू आहेत, ती संख्या म्हणजे स्पर्म काउंट. शुक्राणूंची संख्या प्रजनन क्षमता मोजण्यासाठी वापरली जाते. प्रति मिलिलिटर सीमेन सॅम्पल मध्ये 15 दशलक्ष शुक्राणू ते 200 दशलक्ष पेक्षा जास्त शुक्राणू असणे म्हणजे तुमचे स्पर्म काउंट नॉर्मल आहे.

शुक्राणूंची एकाग्रता (Sperm concentration) : शुक्राणूंची एकाग्रता म्हणजे वीर्य प्रति घन सेंटीमीटर शुक्राणूंची संख्या. 20 दशलक्ष ते 250 दशलक्ष प्रति घन सेंटीमीटर शुक्राणूंची एकाग्रता सामान्य मानली जाते, परंतु या श्रेणीपेक्षा कमी मूल्य असलेल्या पुरुषांद्वारे अंड्याचे फलन करणे शक्य आहे.

सीमेन अपिअरन्स (Semen Appearance) : वीर्याचा रंग तपकिरी किंवा पिवळा असल्यास अंडकोष किंवा नलिकांमध्ये समस्या असते.

नॉर्मल रेंज काय असते ?

मॉर्फोलॉजि (Morfology)५० % पेक्षा जास्त
मोटिलिटी (Motility)५० % पेक्षा जास्त
PH व्हॅल्यू7.2 ते 7.8 च्या दरम्यान
वोल्युम (Volume)2ml पेक्षा जास्त
लिक्विफिक्शन (Liquification)15 ते 30 मिनित्यांच्या आत
स्पर्म काउंट (Sperm Count)20 दशलक्ष ते 200 दशलक्ष प्रति मिलीलीटर
सीमेन अपिअरन्स (Semen Appearance)वीर्याचे सामान्य स्वरूप पांढरे आणि अपारदर्शक असते.
स्पर्म नॉर्मल रेंज

स्पर्म अबनॉर्मलिटी कोणत्या?­­

एस्पर्मिया (Aspermia)या ऍबनॉर्मलिटी मध्ये पुरुषाला ड्राय एजक्युलेशन होते. कोरडी कामोत्तेजना अनुभवाला येते.
हायपोस्पर्मिया (Hypospermia)1.5 मिलीलीटरपेक्षा कमी प्रमाणात एजॅक्युलेशन होते.
अझोस्पर्मिया (Azoospermia) निल शुक्राणूया स्थितीत एजॅक्युलेशन होते; परंतु वीर्यामध्ये शुक्राणू अजिबात नसतात. यालाच निल शुक्राणू म्हणतात.
ऑलिगोजूस्पर्मिया (Oligozoospermia)या स्थितीत शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी असते. शिवाय स्पर्म ची हालचाल आणि आकार यामध्येही विकृती असू शकते.
अस्थेनोझूस्पर्मिया (Asthenozoospermia)सर्वच्या सर्व स्पर्म इमोटाईल असतात. शुक्राणूंची मोठी संख्या असते. परंतु त्यांची हालचाल ऍबनॉर्मल असते. हा दोन प्रकारे होतो.

पहिला प्रकार लाईव्ह स्पर्म प्रेझेन्ट : यामध्ये स्पर्म मूव्ह करत नाही. सर्व स्पर्म इमोटाईल असतात. पण जिवंत असतात. याला इमोटाईल सिलिया सिंड्रोम म्हणतात. यामध्ये सीमन चा वोल्युम नॉर्मल असतो. स्पर्म काउंट नॉर्मल असतो. मॉर्फोलोगी व्हेरिएबल असते. परंतु सर्वांच्या सर्व स्पर्म इमोटाईल असतात.

दुसरा प्रकार ऑल स्पर्म डेड : यामध्ये सर्व स्पर्म इमोटाईल असतात आणि डेड असतात. याला नायक्रो-झूस्पर्मिया (Necrozoospermia) असे म्हणतात.
टेराटोझोस्पर्मिया (Teratozoospermia) यामध्ये शुक्राणूंना एकापेक्षा जास्त डोकी किंवा एकापेक्षा जास्त शेपट्या असतात. किंवा डोके वाकडे असते. त्यामुळे शुक्राणू स्त्रीबीज फर्टाईल करू शकत नाही.
ऑलिगो अस्थेनो टेराटोझोस्पर्मिया (OAT-Oligoasthenoteratozoospermia)हे पुरुष वंध्यत्वाचे सर्वात सामान्य कारण आहे. यामध्ये स्पर्म मोटिलिटी, मॉर्फोलोजी, स्पर्म काउंट कमी असतो.
ल्यूकोसाइटोस्पर्मिया (Leukocytospermia)ही अशी स्थिती आहे जिथे वीर्यमध्ये पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इथे शुक्राणू पेक्षा वीर्य विकृती जास्त असते.
स्पर्म अबनॉर्मलिटी

स्पर्म अबनॉर्मलिटी आणि गर्भधारणा

‘स्पर्म’ हा रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम मधील महत्त्वाचा घटक असतो. स्पर्म अबनॉर्मलिटी मुळे मूल होण्यात अडचणी येतात. स्पर्म अबनॉर्मलिटीज हे पुरुष वंध्यत्वाचे लक्षण आहे. वंध्यत्वाच्या समस्येत पुरुष वंध्यत्व हे स्त्री वंध्यत्व इतकेच महत्त्वाचे असते आणि त्यावर उपचार घेण्याची आवश्यकता असते.

स्पर्म अबनॉर्मलिटी ची कारणे

  • जनायटल ट्रॅक्ट चे इन्फेक्शन, पास्ट किंवा प्रेझेन्ट इन्फेक्शन्स
  • प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज : स्पर्म च्या विरुद्ध कार्य करणारे अँटी स्पर्म, अँटी बॉडीज बनलेले असणं
  • अंडकोष बिघडल्यामुळे, अंडकोषांना आघात झाल्यामुळे, खाली उतरलेले अंडकोष
  • तपकिरी किंवा पिवळ्या रंगाची छटा असलेले वीर्य वाहून नेणाऱ्या अंडकोष किंवा नलिकांमध्ये समस्या दर्शवते.
  • ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस
  • स्पर्म फ्रिज केलेला असणं किंवा क्रायो प्रिझर्वेशन केलेलं असणं
  • मेटाबोलिक डिसऑर्डर
  • इन्फ्रेकुएन्ट इजॅक्युलेशन
  • स्पर्म-डिलिव्हरी सिस्टीम ब्लॉकेज
  • सिकलसेल रोगासारख्या जन्मजात विकारांशी संबंधित
  • विविध आजारांमुळे होऊ शकते.
  • लो बर्थ वेट : हे अनेकांमध्ये पुरुष वंध्यत्वचे कारण असते.
  • हार्मोनल इम्बॅलन्स
  • जेनेटिक/ अनुवांशिक कारणे
  • लाइफस्टाइल फॅक्टर्स
  • मेडिकेशन्स
  • टेस्टिस्टेरॉन चा अधिक वापर
  • केमोथेरपी किंवा रेडिएशन ट्रीटमेंट्स
  • टेस्टिक्युलर इंज्युरी
  • व्हेरिकोसिस : टेस्टिकल भोवती व्हेरिकोज व्हेन्स
  • सिस्टिक फायब्रोसिस किंवा क्लाइनफेल्टर सिंड्रोम

स्पर्म अबनॉर्मलिटी चे निदान कसे करतात?

  1. हायपो ऑस्मॉटिक स्वेलिंग (HOS) : स्पर्म ला एका सोल्युशन मध्ये कल्चर केले जाते. जे सेल जिवंत असतात त्यांच्या मध्ये लिक्वीड ट्रान्स्फर होते. आणि यामुळे जिवंत स्पर्म ची टेल (शेपूट) कर्व्ह झालेली दिसते. तर मेलेल्या स्पर्म ची टेल स्ट्रेट राहते.
  2. मेकॅनिकल टच टेक्निक (MTT) : ICSI च्या पपेट मध्ये स्टिम्युलेट केले जाते. आणि HOS प्रमाणेच स्पर्म ची टेल पहिली जाते.

स्पर्म अबनॉर्मलिटी चे उपचार

  1. मेडिकेशन्स : हार्मोनल इम्बॅलन्स आणि संक्रमणांवर उपचार करण्यासाठी
  2. सर्जरी : वैरिकोसेल्स सारख्या समस्यांच्या बाबतीत सर्जरी.
  3. ART (ए.आर.टी.) तंत्रज्ञान
  4. स्पर्म क्वालिटी सुधारण्यासाठी लाइफस्टाइल मॉडिफिकेशन
  5. TESA : यामध्ये हि स्पर्म इमोटाईल असतात. स्पर्म इमॅच्युअर असणे किंवा स्पर्म सर्टोली सेल सोबत अटॅच असतात त्यामुळे ते इमोटाईल असतात.
  6. ICSI : स्पर्म मोटिलिटी किंवा मॉर्फोलोजी मध्ये समस्या असल्यास शुक्राणू कॉलेक्ट करून स्त्रीबीजात इंजेकट केला जातो. त्यानंतर एम्ब्रियो गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. ICSI हि IVF उपचारात वापरली जाणारी पद्धती आहे.
  7. स्पेर्म डोनर Sperm Donor
  8. IVF

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न 

१) निल शुक्राणू म्हणजे काय?

उत्तर : निल शुक्राणू म्हणजेच शून्य शुक्राणू. वैद्यकीय भाषेत त्याला अझोस्पर्मिया म्हटले जाते. हा एक स्पर्म ऍबनॉर्मलिटी चा प्रकार आहे. ज्यामध्ये पुरुषांच्या वीर्यात शून्य शुक्राणू असतात. थोडक्यात शुक्राणू अनुपस्थित असतात. ज्यामुळे पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. स्पर्म प्रोडक्शन न होणे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा अनुवांशिक कारणांमुळे निल शुक्राणू समस्या उत्पन्न होऊ शकते.

२) सर्व पुरुष वंध्यत्वात निल शुक्राणूंचा वाटा किती आहे?

उत्तर : अझोस्पर्मिया / शून्य शुक्राणू / निल शुक्राणू  यांचा वाटा पुरुष वंध्यत्वात १० ते १५ टक्के आहे. 

३) स्पर्म अबनॉर्मलिटीज बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात का?

उत्तर : नाही. शुक्राणूंच्या संरचनेचा बाळावर शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कोणताही दोष निर्माण होत नाही. कारण स्पर्म अबनॉर्मलिटी हि स्पर्म च्या आकार, रचना, हालचाल, गती, संख्या यांच्याशी संबंधित असते. ज्यामुळे गर्भ बनण्यात अडथळे निर्माण होतात किंवा उशिरा गर्भधारणा होते. जर स्पर्म अबनॉर्मलिटी मध्ये डी.एन.ए डॅमेज/न्यूक्लियर डॅमेज ची समस्या असेल तर, अनुवांशिक विकृती उद्भवू शकतात.

४) पुरुष वंध्यत्वाची कारणे काय? (Male Infertility Causes)

उत्तर : अंडकोष, अनुवांशिक दोष, मधुमेहासारख्या आरोग्य समस्या किंवा क्लॅमिडीया, गोनोरिया, गालगुंड किंवा HIV सारख्या संसर्गामुळे अबनॉर्मल शुक्राणूंची निर्मिती होते. अंडकोषातील (व्हॅरिकोसेल) वाढलेल्या शिरा देखील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात.

५) शुक्राणू किती दिवस जगू शकतात? (Life of Sperm)

उत्तर : जेव्हा शुक्राणू स्त्रियांच्या शरीरात असतात, तेव्हा ते 5 दिवसांपर्यंत जगू शकतात. जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या ओव्हुलेशनच्या काही दिवस आधी तुम्ही संभोग केला असेल तर ते गर्भवती होण्याची शक्यता आहे.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।