सोबतच संतुलित आणि परिपूर्ण आहाराचे सेवन, पुरेसा व्यायाम, तणाव नियंत्रित ठेवणे, व्यसने न करणे अशा प्रकारची स्वस्थ जीवनशैली अंगीकारणे महत्त्वाचे आहे. असे करूनदेखील गर्भधारणा होत नसेल तर फर्टिलिटी डॉक्टरांकडून निदान आणि उपचार घेणे गरजेचे असते.
Read: वंध्यत्व म्हणजे काय? जाणून घ्या वंध्यत्वाची कारणे, लक्षणे आणि उपचार
Table of Contents
महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी वंध्यत्वाची लक्षणे
अनियमित मासिक पाळी
स्त्रीचे सरासरी सायकल 28 दिवसांचे असते. काही महिलांची मासिक पाळी सायकल ३३ दिवसांची, ३५ दिवसांची किंवा ४० दिवसांची अशी वेगवेगळी असली तरीही ती नियमित असते. मग अनियमित मासिक पाळी कशाला आणि केव्हा म्हणायचे? ज्या महिलेची मासिक पाळी चक्रे इतकी बदलतात की तिला मासिक पाळी कधी येऊ शकते याचा अंदाजही लावता येत नाही तेव्हा तिला अनियमित मासिक पाळी येते. अनियमित मासिक पाळीमुळे वंध्यत्व येत नाही. पण अनियमित मासिक पाळी तुमचे फर्टिलिटी आरोग्य किंवा रिप्रॉडक्टिव्ह अवयवांची स्थिती उत्तम नाही याचे सूचक असते. अनियमित मासिक पाळी PCOD, PCOS, एन्डोमेट्रिओसिस, फायब्रॉईड, ऍनिमिया, हार्मोनल विकार अशा आजारांचे लक्षण असते. आणि हे आजार वंध्यत्वाची कारणे आहेत.
हलका किंवा जड रक्तस्त्राव आणि पेटके
बहुतेक स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी पेटके येतात. थोड्याफार वेदना होतात. परंतु आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतील अशा तीव्र स्वरूपाच्या वेदना एन्डोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉईड चे लक्षण आहेत. यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
अमेनोरिया / मासिक पाळी न येणे
जेव्हा प्रजोत्पादक वयात (फर्टिलिटी एज) किंवा ४५ वयापूर्वी एखाद्या महिलेची मासिक पाळी थांबते तेव्हा हे चांगले लक्षण नाही. यामुळे वंध्यत्व येऊ शकते. या स्थितीला मेडिकल टर्म मध्ये ‘अमेनोरिया’ असे म्हणतात. प्रिमॅच्युअर ओवरियन इन्साफीशिअन्सी (POI), रक्तक्षय (ऍनिमिया), रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचा क्षयरोग, अंडाशयाचा कॅन्सर यामुळे वेळेपूर्वी मासिक पाळी येणे थांबते. त्यामुळे असे लक्षण दिसल्यास त्यावर उपचार घेणे आणि फर्टिलिटी आरोग्य सुधारणे आवश्यक आहे.
कधीकधी खराब जीवनशैली, तणाव, गर्भधारणा, प्रसूतीनंतर, स्तनपान काळात पाळी येणे थांबते. असे होणे स्वाभाविक आहे.
फिकट किंवा गडद रंगाचा मासिक रक्तस्त्राव
मासिक पाळीचे रक्त नेहमीपेक्षा फिकट होत असेल तर हे चिंतेचे कारण असू शकते. तर खूप गडद किंवा चॉकलेटी, काळपट रंगाचा रक्तस्त्राव, सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI), गनोरिया, क्लॅमिडीया चे इन्फेक्शन, एन्डोमेट्रिओसिस चे लक्षण आहे. ज्यामुळे वंध्यत्व समस्या येऊ शकते. त्यासाठी वेळीच उपचार घ्या आणि फर्टिलिटी आरोग्याची काळजी घ्या.
ओटीपोटात वेदना
रक्ताची कमी, फायब्रॉईड च्या गाठी, ओवरियन सिस्ट, एन्डोमेट्रिओसिस, अशा फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आजारांमुळे ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात.
हार्मोनल असंतुलन
हायपोथॅलॅमिक यंत्रणेच्या कार्यातील बिघाड, पिट्युटरी ग्रंथीतील त ट्युमर, क्रोनिक स्ट्रेस यांसारख्या मेडिकल कंडिशन मुळे हार्मोनल असंतुलन होते. पिट्युटरी ग्रंथी, हायपोथॅलॅमस या हार्मोन निर्माण करणाऱ्या यंत्रणा आहेत. रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन चे कार्य बिघडल्यामुळे अनियमित मासिक पाळी, ओव्यूलेशन समस्या, गर्भाशयाच्या अस्तराच्या समस्या निर्माण होतात. संबंध ठेवण्यात अडचणी येतात. लैंगिक इच्छा कमी होतात. पुरुषांमध्ये इरेक्शन समस्या किंवा इजॅक्युलेशन समस्या निर्माण होते. pcod सारख्या हार्मोनल विकारांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि वजनवाढ होते. परिणामी गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.
संभोगादरम्यान वेदना होणे
याला मेडिकल टर्म मध्ये ‘डिस्पेरेनिया’ म्हणतात. काही स्त्रियांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेदनादायक संभोग अनुभवलेला असतो, त्यामुळे त्यांना ती एक सामान्य बाब वाटते. परंतु तसे नाही. हार्मोनल समस्या, सेक्श्युअल विकार किंवा एन्डोमेट्रिओसिस, प्रजनन अवयवांना सूज असणे, इन्फेक्शन अशा फर्टिलिटी आरोग्याशी संबंधित आजारांचे ते लक्षण असते. त्यासाठी उपचार घेणे अनिवार्य आहे.
गर्भ रुजण्यात अडचण/ वारंवार गर्भपात होणे
वारंवार गर्भपात होणे किंवा फर्टिलिटी उपचार अयशस्वी होणे हा वंध्यत्वाचाच एक प्रकार आहे. जिथे तुम्ही मातृ-पितृ सुखापासून वंचित राहतात. गर्भाशयाच्या अस्तराच्या समस्या, स्त्रीबीजांची आणि शुक्राणूंची खराब गुणवत्ता, क्रोमोझोमल विकार किंवा गुणसूत्रांची कमतरता किंवा जास्तीचे गुणसूत्र, डीएनए डॅमेज यांसारखाय जेनेटिक समस्यांमुळे इम्प्लांटेशन समस्या आणि मिसकॅरेज चा अनुभव येतो. या स्थितीतही आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे. त्यासाठी ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ सारख्या अत्याधुनिक क्लिनिक ला भेट द्या.
तपासणीअंती दिसून येणारी वंध्यत्वाची चिन्हे
- गर्भाशयाचे अस्तर, सर्विक्स एरिया, गर्भाशय, फेलोपियन ट्यूब जवळ फायब्रॉईड च्या गाठी दिसून येणे.
- गर्भाशयाचे अस्तर जाड किंवा पातळ असणे.
- फेलोपियन ट्यूब ब्लॉक किंवा खराब असणे.
- अंडाशयात फॉलिक्युलर सिस्ट किंवा चॉकलेट सिस्ट बनलेले दिसून येणे.
- अनियमित ओवुलेशन होणे.
- ओवरियन रिझर्व्ह म्हणजेच स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्तेत कमी असणे.
- रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक मध्ये इन्फेक्शन दिसून येणे.
- गर्भाशयाच्या इतर भागात एन्डोमेट्रियल टिश्यूज किंवा स्कार टिश्यूज दिसून येणे.
- गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा कमी असणे.
- रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन चे असंतुलित असणे
- एंडोक्राइन किंवा ऑटोइम्युन आजार असणे. ज्यामध्ये अनुक्रमे हार्मोनल असंतुलन होते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते.
- पूर्वी झालेल्या सर्जरीत प्रजोत्पादक अवयवांना इजा असणे.
- जन्मतः एखादा रिप्रॉडक्टिव्ह अवयव नसल्याचे निदर्शनास येणे.
- अनुवांशिक आजार असणे.
वंध्यत्वाच्या अंतर्निहित स्थितीची लक्षणे
फायब्रॉईड ची लक्षणे
- हेवी पिरीएड्स
- अनियमित मासिक पाळी
- ओटीपोटात वेदना आणि ताण जाणवणे
- वारंवार लघवीला जाणे
- बद्धकोष्ठता
एन्डोमेट्रिओसिस ची लक्षणे
- ओटीपोटात तीव्र वेदना
- इंटरकोर्स दरम्यान वेदना
- मासिक पाळीत अधिक किंवा कमी रक्तस्त्राव
- थकवा
- मलमूत्र त्यागणे त्रासदायक होते.
pcod/pcos ची लक्षणे
- अनियमित मासिक पाळी
- अनियमित ओवुलेशन
- वजनवाढ
- चेहऱ्यावर अतिरिक्त केस
- हार्मोनल असंतुलन
- मूड सविंग्ज
- इंश्युलीन रेसिस्टन्स
- पुरुषी लक्षणांमध्ये वाढ
ओवरियन सिस्ट ची लक्षणे
- अनियमित ओवुलेशन
- ओटीपोटात वेदना
- पोट फुगणे / बल्की युटेरस
ब्लॉक गर्भनलिकांची लक्षणे :
- गर्भधारणा होण्यात अडचण
- अनियमित मासिक पाळी
- मासिक पाळी बंद होणे
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) मला कसे कळेल कि मला वंध्यत्व समस्या आहे?
तुमचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि १ वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर तुम्हाला वंध्यत्व आहे असे समजावे.
तुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर तुम्हाला वंध्यत्व समस्या आहे.
२) वंध्यत्व समस्येत काय करावे?
फर्टिलिटी डॉक्टरांची भेट घेऊन मार्गदर्शन घ्यावे. ते पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वाचे अचूक निदान आणि प्रभावी उपचार करू शकतात. तुमच्या गरजांनुसार स्वतंत्र उपचार योजना बनवतात.
३) वंध्यत्व समस्येत गर्भधारणेसाठीचे उपचार कोणते?
‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ मध्ये ‘लाइफस्टाइल मॉडिफिकेशन’ आणि ‘समुपदेशन’ सह गर्भधारणेची संभावना वाढविली जाते. ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी – ART’ मध्ये ओव्यूलेशन इंडक्शन, आययूआय, आयव्हीएफ, इक्सी, इम्सी, पिक्सी, लेजर असिस्टेड हॅचिंग, क्रायोप्रिझर्वेशन, डोनर एग, जेनेटिक टेस्टिंग असे अनेक उपचार उपलब्ध आहेत. आधुनिक उपचारांनी गर्भधारणा नक्की होऊ शकते.