वंध्यत्व म्हणजे काय? जाणून घ्या वंध्यत्वाची कारणे, लक्षणे आणि उपचार

वंध्यत्व ही आजच्या काळातली वाढती समस्या आहे आणि जगभरातील अंदाजे 48 दशलक्ष जोडपी वंध्यत्वाच्या स्तिथी ने ग्रस्त आहेत. फक्त भारताचाच विचार केला तर दर 6 पैकी 1 जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे.

Share This Post

ह्या ना त्या अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्व संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत वंध्यत्व ओळखून फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे. या लेखाच्या मदतीने वंध्यत्वाची कारणे, लक्षणे, प्रकार समजून घ्या. वंध्यत्व समस्येचे निदान व उपचार कोणत्या प्रकारे केले जातात याविषयी वाचकांना माहिती होणे हाच या लेखाचा उद्देश आहे.

वंध्यत्व म्हणजे काय? | वंध्यत्वाचे प्रकार | By Dr. Prapti

घरात बाळाच्या हसण्या खिदळण्याचं सुख काही वेगळच असतं आणि प्रत्येकाला ते हवं असतं. वंध्यत्व समस्येत “आधुनिक उपचार पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि एक्स्पर्ट डॉक्टर्स असलेल्या फर्टिलिटी सेंटर ची निवड” म्हणजे ‘आई-बाबा’ होण्याचं सुख निश्चित.

वंध्यत्व समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही असू शकतात. तेव्हा जाणून घेऊयात वंध्यत्व समस्या, उपचार आणि बरेच काही.

वंध्यत्व म्हणजे काय?

  • सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा महिलेचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिक रित्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे  ‘इनफर्टिलिटी’ म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे म्हंटले जाते.
  • जर महिलेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्याहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नसेल तर हि सुद्धा वंध्यत्व स्थिती असते.
  • जगभरातील अंदाजे 48 दशलक्ष जोडपी वंध्यत्वाच्या स्तिथी ने ग्रस्त आहेत. फक्त भारताचाच विचार केला तर दर 6 पैकी 1 जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे. (source: www.who.int)

वंध्यत्व म्हणजे काय

वंध्यत्वाच्या समस्येत काय करावे?

  • जर तुमचं वय 20 ते 35 वयोगटात असेल तर नैसर्गिकरित्या एक वर्षासाठी गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो.
  • परंतु जर तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि 6 महिने नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर शक्य तितक्या लवकर योग्य फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी, मेनोपॉजची स्थिती, PCOD/PCOS, मिसकॅरेंजेस सारख्या समस्या किंवा पुरुषांमध्ये इरेक्शन सारख्या इतर समस्या असतील, तर तुम्ही वेळ न घालवता योग्य फर्टिलिटी डॉक्टर चा सल्ला घ्यावा.

वंध्यत्वाचे  प्रकार
  1. प्राथमिक वंध्यत्व (Primary Infertility) : जेव्हा महिलेला एकदाही गर्भधारणा होऊ शकत नाही त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
  2. दुय्यम वंध्यत्व (Secondary Infertility) : जेव्हा महिलेला पूर्वी गर्भधारणा झालेली असेल; पण नंतर गर्भधारणा होऊ शकत नाही, तेव्हा त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
  3. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी (Unexplained Infertility) : महिलेला वंध्यत्व समस्या असते मात्र अनेक तपासण्यांअंती देखील वंध्यत्वाचे निदान होऊ शकत नाही.

वंध्यत्वाची लक्षणे

पुरुष वंध्यत्वाची लक्षणे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे
यौन इच्छा कमी होणेअनियमित मासिक पाळी
अंडकोषात वेदना, गाठ किंवा सूज जाणवणे.मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात तीव्र वेदना
इजॅक्युलेशन च्या वेळेस समस्या येणं (Ejaculatory/Erectile Dysfunction)PCOD/PCOS च्या तक्रारी
इजॅक्युलेशन च्या दरम्यान कमी प्रमाणात वीर्य येणेथायरॉईडची समस्या
चेहरा आणि शरीरावरचे केस गळणेकामेच्छा कमी होणे (loss of lobido)
इरेक्टाइल डिसफंक्शनओटीपोटात वेदना, सूज
छातीची असामान्य वाढमहिलांमध्ये पुरुषी लक्षणे वाढणे. उदा. – चेहऱ्यावर, शरीरावर अतिरिक्त केस इ
जेवण, झोप यामध्ये बदल होणे (Apetite change)वजनवाढ होणे किंवा वजन खूप कमी होणे
जेवण, झोप यामध्ये बदल होणे

गर्भधारणा होत नसल्यास फर्टिलिटी सेंटर ला भेट देण्याचे फायदे

फर्टिलिटी सेंटर ला भेट दिली तर, “IVF” च करायला लावतील हा एक गैरसमज दिसून येतो. त्यामुळे कपल्स बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात लहान-मोठ्या हॉस्पिटल्स ला भेट देऊन कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. परंतु “फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे IVF” किंवा “फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे खूप खर्च”  हा एक निव्वळ गैरसमज आहे.

  1. “इन डेप्थ इवॅल्यूएशन” : फर्टिलिटी डॉक्टर्स तुम्ही कन्सिव्ह का करू शकत नाही आहेत? स्पर्म आणि स्त्रीबीज फर्टाईल होऊन गर्भ बनण्यात काय अडचण आहे याचा मागोवा घेतात. फर्टिलिटी समस्येचे निदान करण्यासाठी “इन डेप्थ इवॅल्यूएशन” केले जाते. ज्यामुळे अचूक निदान करणे शक्य होते.
  2. केस हिस्टरी : सोबतच तुमची केस हिस्टरी घेतली जाते. आणि पूर्वी असलेले आजार आणि त्यावर घेतलेले उपचार, अनुवंशिकता, लाइफस्टाइल, व्यसने इ. गोष्टींचा मागोवा घेतला जातो.
  3. अचूक निदान : फर्टिलिटी समस्या काय असेल याविषयी अचूक निदानासाठी गरजेनुसार तपासणी केली जाते. आणि वंध्यत्वाचे अचूक कारण शोधले जाते.
  4. सक्सेसफुल ट्रीटमेंट प्लॅन : अर्थात अचूक निदान म्हणजेच तुमच्या ट्रीटमेंट ला योग्य दिशा मिळते. आणि सक्सेस चे चान्सेस देखील जास्त असतात.
  5. एकाच छताखाली सर्व सुविधा (under one roof) : फर्टिलिटी सेंटरमध्ये ब्लड टेस्ट्स, युरीन टेस्ट्स, सोनोग्राफी सारख्या बेसिक टेस्ट्स सह गरजेनुसार अडवान्सड टेस्ट्स देखील उपलब्ध असतात. फर्टिलिटी मेडिकेशन्स पासून, ओव्यूलेशन इंडक्शन, IUI ते IVF आणि अडवान्सड IVF सारखे उपचार एकाच छताखाली मिळू शकतात.
  6. एक्स्पर्ट इन्फर्टिलिटी तज्ज्ञ : अनुभवी, कुशल आणि तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम सक्सेस देण्यासाठी कार्यरत असतात.
  7. वेळ आणि पैशांची बचत होते.
  8. अनुवांशिक विकारांची शंका असल्यास योग्य ठिकाण : कुटुंबात दुर्धर अनुवांशिक आजार किंवा क्रोमोसोम संबंधित आजार असल्यास PGD, PGD-A सारख्या डी.एन.ए. टेस्ट देखील फर्टिलिटी सेंटर मध्ये उपलब्ध असतात. ज्यामुळे उच्चतम प्रतीचा डी.एन.ए. असलेले बीज फर्टिलायझेशन साठी निवडले जाते.
  9. हवे तेव्हा आई होता येते : जर तुम्ही शिक्षण, करियर ला प्रायोरिटी देत असाल आणि लवकर आई होऊ इच्छित नसाल, तर स्त्रीबीज आणि शुक्राणू किंवा एम्ब्रियो फ्रोझन करून ठेवू शकतात. याशिवाय रेडिओलॉजी थेरपी किंवा कँसर साठी किमो थेरपी घेणार असाल तर बीजे खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी क्रायोप्रिझर्वेशन च्या मदतीने केव्हाही आई होऊ शकतात.

वंध्यत्वाची कारणे

स्त्री वंध्यत्वाची कारणे पुरुष वंध्यत्वाची कारणे
अधिक वयशुक्राणूंचे विकार (Sperm abnormalities)
स्त्रीबीजांची संख्या कमी असणेअंडकोषाच्या आजू बाजूच्या नसा सुजतात. (Varicoceles )
ब्लॉक्ड किंवा डॅमेज फेलोपियन ट्यूब्जशुक्राणूंना शरीरातून बाहेर पडणे अशक्य होते. (Obstruction)
ओवुलेशन समस्यावीर्य बाहेर येण्याऐवजी परत ब्लैडर मध्ये जाते (Retrograde Ejaculation)
हार्मोनल इम्बॅलन्ससिगारेट आणि अल्कोहोल सेवन
पिट्युटरी ट्युमरलठ्ठपणा/वजन कमी असणे
एन्डोमेट्रिओसिस (गर्भाशयातील अस्तराची समस्या)तीव्र ताण
फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स (गर्भाशयात गाठी)लो स्पर्म काउंट (Oligospermia)
इन्फेक्शन्सनिल शुक्राणू (Azoospermia)
लैंगिक संक्रमित रोगकॅन्सरची ट्रीटमेंट
POIमांडीचा सांधा, टेस्टिक्युलर, पुरुषाचे जननेंद्रिय किंवा स्क्रोटम सर्जरी
ऑटोइम्यून डिसऑर्डरलैंगिक संक्रमित रोग
PCOD/PCOSइन्फेक्शन्स
मासिक पाळी संबंधी समस्याटेस्टिक्युलर चे तापमान अधिक असणे (Overheating the testicles)
जन्मतः प्रजनन अवयव नसणेऔद्योगिक रसायने
Pelvic adhesions
सार्विकल ऍबनॉर्मलिटीज
कॅन्सरची ट्रीटमेंट
लठ्ठपणा/वजन कमी असणे
ऍनिमिया
व्यसने व चुकीची जीवनशैली

वंध्यत्वाचे निदान व उपचार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस केली जाते.

  1. पहिली स्टेप डॉक्टरांसोबत कन्सल्टेशन हि असते. यावेळी डॉक्टर दाम्पत्यांची सामान्य शारीरिक तपासणी करतात आणि मेडिकल हिस्टरी घेतात. ज्यामध्ये अनुवंशिकता, पूर्वी घेतलेले फर्टिलिटी उपचार, दुर्धर आजाराचे उपचार, प्रजनन अवयवांची सर्जरी, मिसकॅरेजेस, इन्फेक्शन्स, हार्मोनल समस्या, व्यसने, आहाराच्या सवयी अशी बरीच माहिती घेतली जाते. याशिवाय पॉजिटिव्हिटी किंवा मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करतात.
  2. दुसरी स्टेप निदान करण्यासाठी विविध तपासण्या करणे हि असते.
  3. तिसरी स्टेप वंध्यत्व समस्येनुसार वैयक्तिकृत उपचार पद्धती (personalized treatment plan) दिली जातो.

स्त्री आणि पुरुषांच्या महत्पूर्ण टेस्ट

मेडिकल फिल्ड मधील अनुभवानुसार, बऱ्याचदा असे दिसून येते कि, महिलांच्या खूप साऱ्या तपासण्या केल्या जातात; परंतु पुरुषांची एकही तपासणी झालेली नसते. यामुळे जोडप्यांचा वेळ आणि पैसे वाया जातात. लवकर रिझल्ट हवा असल्यास फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी स्त्री-पुरुष दोघांचीही तपासणी महत्त्वाची ठरते.

स्त्रियांमधील टेस्ट :
  1. हार्मोनल चाचण्या (Hormonal Tests) : FSH (फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन), LH (ल्युटेनायझिंग हार्मोन), AMH (अँटी म्यूलेरिअम हार्मोन), प्रोलॅक्टिन, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन (TSH), प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, इंश्युलीन लेव्हल
  2. ओवरीयन रिझर्व्ह टेस्ट : हि एक ब्लड आणि इमेजिंग टेस्ट आहे. ओव्हरीज मधील स्त्रीबीजांचा काऊंट आणि क्वालिटी समजते.
  3. हिस्टेरोसालपिंगोग्राफी (HSG) : गर्भाशय ग्रीवात एक द्रव पदार्थ इंजेक्ट केला जातो. आणि एक्स-रे च्या माध्यमातून हा पदार्थ फेलोपियन ट्यूब मधून कसा फिरतो हे पहिले जाते. यामुळे फेलोपियन ट्यूब ब्लॉक आहेत का हे समजते.
  4. लॅप्रोस्कोपी : युटेरस मध्ये एक रॉड सदृश उपकरण टाकून अवयवांची स्थिती तपासली जाते.
  5. ट्रान्सवजायनल सोनोग्राफी : दुर्बीण असलेले उपकरण युटेरस मध्ये टाकून अंडाशय, गर्भाशय तपासले जाते.
  6. Abdominal Altrasaund : पोटावरती प्रोब ठेवून कॉम्प्युटर वर पोटातील अवयवांची स्थिती तपासली जाते.
  7. हिस्टेरोस्कोपी : हे एक कॅमेरा बसवलेले लवचिक आणि पातळ उपकरण असते. गर्भाशयात टाकून हलवले जाते आणि आतील भाग तपासला जातो.
  8. सलाइन सोनोहायस्टेरोग्राम (SIS) : गर्भाशयातील स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स, फायब्रॉइड्स, पॉलीप्स, अस्तराची स्थिती तपासण्यासाठी गर्भाशय सलाईन च्या पाण्याने भरले जाते.

पुरुषांमधील टेस्ट :
  1. सीमेन अनालिसिस : शुक्राणूंची संख्या (sperm count), गतिशीलता (motility), मॉर्फोलॉजी, प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी, इन्फेक्शन्स यासारख्या अनेक गोष्टी वीर्य विश्लेषणामध्ये तपासल्या जातात. हे पुरुषांच्या प्रजननक्षमतेची स्थिती दर्शवते. प्रायमरी स्टेज ला हि टेस्ट केली जाते.
  2. स्क्रोटल अल्ट्रासाउंड : टेस्टिक्युलर समस्या, वेरिकोसेल तपासली जाते.
  3. ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड : ऑब्स्ट्रक्शन्स आणि प्रोस्टेट तपासले जाते.
  4. हार्मोनल चाचण्या : टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजिन, प्रोलॅक्टिन, FSH असे रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स तपासले जातात.
  5. युरीन टेस्ट : इजॅक्युलेशन नंतर युरीन टेस्ट करून स्पर्म्स ब्लॅडर मध्ये जातात का ते तपासणे.
  6. जेनेटिक टेस्ट : स्पर्म्स कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर क्रोमोसोम तपासण्यासाठी हि टेस्ट केली जाते. हि चाचणी अनुवांशिक आजारांचेही निदान करू शकते.
  7. टेस्टिक्युलर बायोप्सी : शुक्राणूंची निर्मिती होत आहे कि नाही हे तपासणे.

निदानावर आधारित उपचार

  1. ओव्यूलेशन इंडक्शन : यामध्ये ओवुलेशन इंडक्शन च्या मदतीने स्त्रीबीजांची वाढ वेळोवेळी सोनोग्राफीद्वारे तपासली जाते. स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्याचे या तपासणीत दिसल्यानंतर योग्य वेळी सेक्श्युअल इंटरकोर्स साठी सांगितलं जातं.
  2. मेडिसिन्स : हार्मोनल इम्बॅलन्स साठी किंवा इन्फेक्शन्स असल्यास मेडिसिन्स दिले जातात. स्त्रियांमध्ये ओवुलेशन साठी फर्टिलिटी मेडिसिन्स दिले जातात.
  3. स्त्रियांमध्ये सर्जरी : लॅप्रोस्कोपिक सर्जरी, हिस्टेरोस्कोपिक सर्जरी किंवा ट्युबल सर्जरी करून फायब्रॉइड्स, पॉलीप्स, खराब ट्यूब्ज किंवा इतर अवयव काढले जातात. ब्लॉकेजेस असतील, तर ते काढले जातात. adhesions म्हणजेच दोन अवयव एकमेकांना चिकटलेले असतील तर, वेगळे केले जातात.
  4. पुरुषांमधील सर्जरी : स्पर्म्स वाहून नेणारी नलिका म्हणजेच व्हॅस डिफेरेन्सची दुरुस्ती केली जाते. व्हॅरिकोसेल सर्जरी केली जाते.
  5. सेक्श्युअल इंटरकोर्स संबंधित समस्यांवर उपचार : इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा अरली इजॅक्युलेशन समस्येवर कौन्सेलिंग, सायकोथेरपी, औषोधोपचार केले जातात.
  6. IUI : इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन : बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
  7. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) : यामध्ये मॅच्युअर एग्ज रिट्राईव्ह किंवा कलेक्ट केले जातात आणि प्रयोगशाळेतील ट्रे मध्ये स्पर्म सोबत फर्टाईल करून आणि पुन्हा गर्भ गर्भाशयात स्थानांतरित केले जातात. तसेच पुरुषांमधील स्पर्म कलेक्शन नैसर्गिक पद्धतीने केले जाते. याशिवाय ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया किंवा रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्या असेल, स्पर्म्स ब्लॅडर मध्ये जमा होत असतील तर, TESA, MESA, PESA,TESE, MICRO-TESE सारखे आधुनिक उपचार वापरून स्पर्म्स कलेक्ट केले जातात.
  8. IVF : इन विट्रो फर्टिलायझेशन हे एक प्रचलित ART तंत्रज्ञान आहे. IVF चा सक्सेस रेट देखील अधिक असतो.

फर्टिलिटी सेंटर मधील आधुनिक उपचार

हल्ली बाळ होण्यासाठी बरेच “आधुनिक फर्टिलिटी उपचार” उपलब्ध असल्याचे आपण ऐकतो; पण नेमके कोणते उपचार आहेत? केव्हा आणि कसे केले जातात? याविषयी जाणून घेऊयात. खाली सांगितलेल्या सर्व आधुनिक उपचार पद्धतींना ART (ऍडवान्सड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) असे म्हणतात.

  1. IVF : बेसिक IVF ट्रीटमेंट मध्ये स्त्रीबीजे आणि स्पर्म्स कलेक्ट केले जातात. चांगल्या क्वालिटी ची स्त्रीबीजे आणि स्पर्म सिलेक्ट करून एका ट्रे मध्ये फर्टिलायझेशन साठी ठेवले जातात. यावेळी स्पर्म आणि स्त्रीबीजे यांचे नैसर्गिकरित्या फर्टिलायझेशन होते.
  2. IVF-ICSI : जेव्हा स्पर्म स्त्रीबीजांसोबत फर्टाईल होऊ शकत नाही, तेव्हा ऍडव्हान्स ICSI ट्रीटमेंट चा उपयोग करतात.  ICSI (Intracytoplasmic Sperm Injection) च्या मदतीने स्त्रीबीजामध्ये स्पर्म इंजेक्ट केला जातो व गर्भ तयार केला जातो. लो स्पर्म काऊंट (Oligosparmia), शुक्राणूंची गती कमी असणे (low sperm motility), शुक्राणूंचे डोके, लहान-मोठे असणे किंवा मॉर्फोलॉजी बॅड असणे, फंक्शनल कपॅसिटी कमी असेल किंवा इजॅक्युलेशन नंतर सर्वाइव्ह करू शकत नसेल, अचल शुक्राणू असेल, तर असा  अशा वेळी ICSI ट्रीटमेंट फायदेशीर ठरते.
  3. IMSI : म्हणजे इंट्रा-सायटोप्लाज्मिक मॉर्फोलॉजिकल-सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन. ICSI प्रमाणेच स्पर्म स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केला जातो. परंतु या प्रक्रियेत बारकाईने चांगल्या क्वालिटीच्या स्पर्म ची निवड केली जाते. प्रामुख्याने स्पर्म मध्ये मॉर्फोलिजिकल विकृती म्हणजेच स्पर्म च्या आकार व रचनेत दोष आहे का हे तपासण्यासाठी स्पर्मेटोझोआ प्रथम ६६००x पर्यंत वाढवले ​​जाते. आणि चांगले हेड, नेक, टेल असलेल्या शुक्राणूची निवड केली जाते. तसेच DNA फ्रॅगमेंटेशन रेट देखील पहिला जातो.
  4. PICSI: जेव्हा जोडप्यांमध्ये मिसकॅरेजेस झालेले असतील, DNA फ्रॅगमेंटेशन रेट जास्त असेल, किंवा ICSI ट्रीटमेंट फेल झाली असेल, तर PICSI चा वापर केला जातो. स्त्रीबीजाच्या पृष्ठभागावर असलेल्या पदार्थाला चिटकण्यासाठी स्पर्म सक्षम आहे किंवा नाही हे तपासले जाते. यावेळी स्पर्म ची मॅच्युरिटी, ऍक्टिव्हिटी, ताकद समजते. स्पर्म चे केवळ व्हिज्युअल ऑब्सर्व्हेशन केले जात नाही तर, स्पर्म चा केमिकल आणि बायोलॉजिकल स्टडी करून स्पर्म सिलेक्त केला जातो.
  5. LAH (लेजर असिस्टेड हॅचिंग) : जेव्हा बनवलेला गर्भ (एम्ब्रियो) चा बाहेरील लेयर जाड असतो तेव्हा, हि लेयर LAH च्या मदतीने पातळ केली जाते. ज्यामुळे एम्ब्रियो प्लांटेशन सक्सेसफुल होते.
  6. क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation) : हि एक फ्रिजिंग पद्धती आहे. याचा वापर करून गर्भ, ऊती, स्त्रीबीज किंवा शुक्राणू कमी तापमानात जतन करून ठेवता येतात. जर तुम्ही शिक्षण किंवा करियर करण्यासाठी लवकर आई होऊ इच्छित नाहीत तेव्हा या आधुनिक पद्धतीचा वापर करून हवे तेव्हा आई होणे शक्य आहे. तसेच कँसर सारख्या ट्रीटमेंट ज्या बीजांची क्वालिटी खराब करून वंध्यत्व समस्या निर्माण करू शकतात; अशा ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी फ्रिजिंग टेक्निक्स वापरू शकतात.
  7. PGT (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) : या प्रक्रियेचा वापर करून एम्ब्रियो ट्रान्स्फर पूर्वी गर्भात काही जन्मजात दोष आहे का, हे पाहणे शक्य होते. यामुळे स्वस्थ बाळ जन्माला येऊ शकते. अनुवांशिक समस्या किंवा गर्भातील गुणसूत्रांची असामान्य संख्या शोधण्यात देखील मदत करते.
  8. PGD (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस) : गंभीर किंवा प्राणघातक रोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर, असे दोष बाळात जाण्यापासून थांबवणे PGD मुळे शक्य आहे.
  9. PGS (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रिनींग) : अनुवांशिक आजार कमी करणे शक्य आहे. PGS गर्भातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या सामान्य आहे की नाही हे तपासते.
  10. ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर : स्त्रीबीज आणि स्पर्म चे फर्टिलायझेशन केल्यानंतर ५-६ दिवसात बनलेला ब्लास्टोसिस्ट स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो.
  11. एम्ब्रियो ट्रान्स्फर : स्त्रीबीज आणि स्पर्म चे फर्टिलायझेशन केल्यानंतर १०-१२ दिवसात बनलेला एम्ब्रियो स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो.
  12. SET (सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्सफर) : मासिक पाळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्री च्या गर्भाशयात दोन भ्रूण वेगवेगळ्या वेळी हस्तांतरित केले जातात.

वंध्यत्वावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

वंध्यत्व म्हणजे काय?

उत्तर: सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा एखाद जोडपं  एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिक रित्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे  ‘इनफर्टिलिटी’ म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहे. 

वंध्यत्वावर उपाय आहे?

उत्तर: होय, वंध्यत्वाच्या समस्येसाठी असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्निक उपलब्ध आहे, काही प्रकरणांमध्ये औषधांमुळे देखील गर्भधारणा होऊ शकते. तसेच, एडवांस्ड रिप्रोडक्टिव टेकनिक जसे आई यु आई (IUI), आई वी एफ (IVF), आई सी एस आई (ICSI) इत्यादी सह यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.

पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे लक्षणं काय आहे?

उत्तर:
– यौन इच्छा कमी होणे
– अंडकोषात वेदना, गाठ किंवा सूज जाणवणे.
– इजेकुलेशन च्या वेळेस समस्या येणं (Ejaculatory/Erectile Dysfunction)
– इजेकुलेशन च्या दरम्यान कमी प्रमाणात वीर्य येणे 
– चेहरा आणि शरीरावरचे केस गळणे
– इरेक्टाइल डिसफंक्शन असणे
– छातीची असामान्य वाढ

वंध्यत्व प्रकार किती आहेत?

उत्तर:
– प्राथमिक या प्राइमरी इनफर्टिलिटी
– सेकेंडरी इनफर्टिलिटी
– अनएक्सप्लेंड इनफर्टिलिटी

वंध्यत्वावर उपचार काय आहे?

उत्तर: वंध्यत्वासाठी IUI आणि IVF हे दोन सर्वात उपयोगी आणि योग्य फर्टिलिटी ट्रीटमेंट आहेत. 

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।