वाढत्या वयाचा फर्टिलिटी आरोग्यावर होणारा परिणाम

सारांश : 'वय' आणि 'फर्टिलिटी' हे परस्परसंबंधित घटक आहेत. जे फॅमिली प्लॅनिंग आणि रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रगत वयानुसार फर्टिलिटी आरोग्य कसे खालावते, उशिरा आई व्हायचे नियोजन असेल तर काय करायचे आणि वाढत्या वयात आई होण्याचे चान्सेस किती आहेत, याबरोबरच वाढत्या वयात स्वस्थ बाळासाठी आणि यशस्वी गर्भधारणेसाठी आधुनिक उपचार पर्याय कोणते यांविषयी या लेखात जाणून घेऊयात.

Share This Post

वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजणाऱ्या जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तीही प्रामुख्याने ‘वाढत्या वयामुळे’. करिअरची ध्येय, शिक्षण घेण्याची स्वप्ने, उशिरा लग्न आणि उशिरा चान्स घेण्याचे नियोजन असा ट्रेंड हल्ली पाहायला मिळत आहे. ‘चूल आणि मुळ’ या जबाब्दारीबरोबरच स्त्रिया अनेक क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत आणि स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत. ‘आई केव्हा व्हायचंय?’, याबाबतचा निर्णयही स्वतंत्रपणे घेत आहेत. महिलांच्या या स्वप्नांना साथ देत आहेत आपल्या आधुनिक फर्टिलिटी उपचार पद्धती.

होय. हे खरे आहे कि वाढत्या वयानुसार महिला आणि पुरुषांची फर्टिलिटी क्षमता कमी होत जाते; परंतु हेही खरे आहे कि आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून वाढत्या वयातही गर्भधारणा शक्य आहे.

‘फर्टिलिटी क्षमता’ म्हणजे काय?

वंध्यत्व समस्या समजण्यासाठी सर्वात आधी ‘फर्टिलिटी क्षमता’ म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. महिला व पुरुषांची गर्भधारण करण्याची क्षमता म्हणजे ‘फर्टिलिटी क्षमता’ होय. व्यक्तीचे फर्टिलिटी आरोग्य व्यक्तीचे वय, शारीरिक व मानसिक आरोग्य, जीवनशैली आणि अशा अनेक घटकांवर अवलंबून असते.

वय आणि फर्टिलिटी क्षमता यांच्यातील संबंध

वय आणि फर्टिलिटी क्षमतेचे गणित समजून घ्या. जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे तुमच्या स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. पुरुषांमध्येही शुक्राणूंची संख्या आणि क्वालिटी कमी होऊ लागते.

२० ते ३० वय स्त्री सर्वात जास्त फर्टिलिटी क्षम असते.
३० वय फर्टिलिटी क्षमता (गर्भधारणा होण्याची क्षमता) कमी होण्यास सुरुवात होते.
३० ते ३५ वय फर्टिलिटी क्षमता झपाट्याने कमी होऊ लागते.
४५ वय फर्टिलिटी क्षमता इतकी कमी होते की नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे अशक्य होते. यावेळी तुम्हाला फर्टिलिटी ट्रीटमेंट ची मदत लागू शकते.

वाढत्या वयानुसार महिलांमध्ये होणारे जैविक बदल

1.  हार्मोनल असंतुलन

वाढत्या वयानुसार, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांसारख्या गर्भधारणेसाठी उपयुक्त अशा रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन ची पातळी कमी होऊ लागते. यामुळे ओव्हुलेशन अनियमित होऊ शकते किंवा ओव्हुलेशनचा अंदाज लावण्यास अडचण येऊ शकते. हार्मोन्सच्या कमी उत्पादनामुळे ‘युटेरियन लायनिंग’/एन्डोमेट्रियम समस्या उद्भवतात.

2.  ओवॅरियन रिझर्व्ह आणि स्त्रीबीजांची क्वालिटी

जन्माच्या वेळी, एका स्त्रीच्या अंडाशयात 3 ते 5 लाख स्त्रीबीजे असतात. जसजसे वय वाढते तसतसे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ लागते. वयानुसार स्त्रीबीजांमध्ये असामान्य गुणसूत्र असण्याची शक्यता असते. तसेच, वाढत्या वयाबरोबर फर्टिलिटी अवयवांचे कार्यावरही परिणाम होऊ लागतो. जसे की फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, संसर्ग, ब्लॉक केलेल्या फॅलोपियन ट्यूब इ.

3.  गर्भाशयातील बदल

वाढत्या किंवा प्रगत वयाचा परिणाम गर्भाशयावरही होऊ शकतो. गर्भाशयात संरचनात्मक बदल होतात ज्यामुळे गर्भधारणेची क्षमता कमी होऊ शकते. गर्भाशयाला होणाऱ्या रक्तपुरवठा कमी होणे, गर्भाशयाचे पातळ अस्तर (थिन एन्डोमेट्रियम), गर्भाशयाच्या श्लेष्माचे (सर्व्हायकल म्युकस) कमी उत्पादन हे काही बदल आहेत जे गर्भ रुजण्यात अडथळा आणतात.

4.  अनियमित मासिक पाळी

भारतीय महिलांमध्ये इतर देशातील महिलांच्या तुलनेत ५ वर्ष आधीच मेनोपॉज येतो. एकदा का महिलेने ३५ वयात प्रवेश केला कि मेनोपॉज ला सुरुवात होते. याला पेरी मेनोपॉज किंवा प्री-मेनोपॉज असे म्हणतात. या काळात मासिक पाळी अनियमित होणे, कमी किंवा जास्त दिवस रक्तस्त्राव होणे किंवा पाळीशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. मासिक पाळीशी संबंधित कोणतीही समस्या तुमची फर्टिलिटी क्षमता चांगली नसल्याचा संकेत देते. यामुळे गर्भधारणेत समस्या येऊ शकतात.

5.  इतर आजार आणि फर्टिलिटी क्षमतेवर त्यांचा प्रभाव

वाढत्या वयात महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब सारखे सामान्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच रिप्रॉडक्टिव्ह अवयवांशी संबंधित आजार – जसे कि, फायब्रॉईड, इन्फेक्शन, हार्मोनल समस्या, अनियमित ओवुलेशन असे आजार बळावू शकतात. यामुळे फर्टिलिटी क्षमता कमी होते आणि गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.

6.  जेनेटिक एब्नॉर्मिलिटीज

जसे आपण बऱ्याचदा म्हणालो कि वाढत्या वयानुसार स्त्रीबीजांची व शुक्राणूंची क्वालिटी कमी होते. पण म्हणजे नेमके काय होते? तर… बीजामध्ये डीएनए समस्या, डीएनए डॅमेज, गुणसूत्रांची कमतरता किंवा अतिरिक्त गुणसूत्र यांसारख्या जेनेटिक समस्या निर्माण होतात. बीजांचा दर्जा कमी झाल्यामुळे डाऊन सिंड्रोम सारख्या क्रोमोसोमल विकृतींचा धोका वाढतो. यामुळेच डॉक्टर मोठ्या वयात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना PGD, PGT, PGS, PGT-A सारख्या जेनेटिक टेस्टिंग ची शिफारस करतात.

मुले मोठी होत असताना अनुवांशिक विकृतींचा धोका असतो. कारण अंड्यांचा दर्जा कमी झाल्यामुळे डाऊन सिंड्रोम सारख्या क्रोमोसोमल विकृतींचा धोका वाढतो. यामुळेच डॉक्टर मोठ्या वयात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना अनुवांशिक चाचणीची शिफारस करतात.

वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये निर्माण होणाऱ्या वंध्यत्व समस्या

1.  शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण

पुरुषांचे वय वाढत असताना त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या कमी होते. शुक्राणूंची मोटिलिटी (गती), शुक्राणूंची मॉर्फोलॉजी (रचना आणि आकारविज्ञान) प्रभावित होऊ शकते. यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजापर्यंत पोहून जाणे आणि स्त्रीबीजात प्रवेश करणे अशक्य होते.

2.  इरेक्शन समस्या

पुरुषांचे वाढते वय इरेक्शन होण्यास आणि इरेक्शन टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. यालाच  ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’ म्हणतात. इरेक्शन समस्येमुळे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये अडचण येते. या परिस्थितीत, फर्टिलिटी डॉक्टर तुम्हाला गर्भधारणा करण्यात उपचार पर्याय सुचवतात आणि मदत करतात.

3.  हार्मोनल असंतुलन आणि सेक्श्युअल डिसफंक्शन

रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स किंवा सेक्स हार्मोन्स ची पातळी कमी झाल्यामुळे, पुरुषांना सेक्श्युअल डिसफंक्शन चा अनुभव येऊ शकतो. त्यामध्ये यौन इच्छा कमी होणे, इजॅक्युलेशन समस्या, संबंध ठेवण्यात इतर अडचणी निर्माण होऊ शकतात.

4.  आरोग्य आणि पुरुष फर्टिलिटी क्षमता

लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या शारीरिक परिस्थितीमुळे वाढत्या वयात वंध्यत्व येऊ शकते.

5.  जेनेटिक एब्नॉर्मिलिटीज

महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये वृद्धापकाळामुळे मुलांमध्येही अनुवांशिक विकार होऊ शकतात. यामुळे मुलांमध्ये ऑटिझम आणि स्किझोफ्रेनियासारखे विकार होऊ शकतात.

जोखीम घटक

  • मुलांमध्ये अनुवांशिक विकारांचा धोका वाढतो
  • गर्भपात होण्याचा धोका

फर्टिलिटी आरोग्याचे संरक्षण कसे करावे?

क्रायोप्रिझर्वेशन नावाचे ऍडव्हान्स IVF तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. अशी टेक्नॉलॉजी अत्याधुनिक फर्टिलिटी क्लिनिकमध्ये उपलब्ध असते. क्रायोप्रिझर्वेशन च्या मदतीने तुम्ही वीर्य किंवा शुक्राणू गोठवू शकतात. उशिरा आई-बाबा होण्याचे नियोजन असेल, तर हा पर्याय तुम्हाला नक्कीच मदत करेल.

उपलब्ध तंत्रज्ञान :

  • एग फ्रीझिंग
  • शुक्राणू गोठवणे
  • गर्भ गोठवणे
  • वाढत्या वयात गर्भधारणेसाठी फर्टिलिटी उपचार

‘एआरटी’ म्हणजेच ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’च्या मदतीने कठीणातील कठीण वंध्यत्व समस्येतही आई होणे शक्य झाले आहे. ART उपचारांमध्ये स्पर्म ट्रान्स्फर, स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे कृत्रिमरीत्या फर्टिलायझेशन करणे, निरोगी भ्रूणासाठी जेनेटिक टेस्ट करणे, भविष्यातील फर्टिलिटी क्षमतेचे संरक्षण करण्यासाठी एग्ज-स्पर्म-भ्रूण गोठविणे, डोनर शुक्राणू किंवा डोनर स्त्रीबीजांच्या मदतीने IVF अशा अनेक उपचारांचा समावेश होतो.   

तुमच्या स्थितीनुसार डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेसाठी खालील उपचार पर्याय सुचवू शकतात.

  • फर्टिलिटी मेडिसिन
  • हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी
  • IUI (इंट्रा यूटेरियन इन्सेमिनेशन)
  • IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन)           
  • ICSI/IMSI/PICSI
  • डोनर प्रोग्राम
  • PGD (pre implantation genetic testing)

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

१) वाढत्या वयात फर्टिलिटी आरोग्य कसे वाढवावे?

या टिप्स फॉलो करा आणि फर्टिलिटी आरोग्य सुधारा.
–  तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या
–  वेळेवर आणि पोषक अन्नाचे सेवन करा.
–  वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करा.
–  तणाव घेऊ नका
–  आधुनिक उपचारांच्या मदतीने आणि फर्टिलिटी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही फर्टिलिटी क्षमता जातन करू शकता.

२) पुरुष कोणत्या वयात सर्वाधिक फर्टिलिटी क्षम असतात?

२२ ते २५ वयोगटातील पुरुष सर्वाधिक फर्टिलिटी क्षम असतात. ३५ वयानंतर पुरुषांची फर्टिलिटी क्षमता कमकुवत होऊ लागते.

३) शुक्राणूंची निर्मिती कोणत्या वयात थांबते?

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन कधीच थांबत नाही; परंतु वाढत्या वयानुसार शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

Risks of Having an Extremely Large Uterine Fibroid

Fibroids are uterine growths that are sometimes called uterine leiomyomas or myomas. The uterus is made of muscle, and fibroids develop out of it. Fibroids can protrude from both the inside and outside of the uterus and if treated early can prevent severe consequences.