PCOD वर कोणते उपचार केल्यास एक वर्षात गर्भधारणा होईल?

सारांश : पॉलीसिस्टिक ओवरीयन सिंड्रोम, हा सर्रासपणे आढळणारा हार्मोनल विकार आहे. अनियमित किंवा अनुपस्थित ओव्हुलेशनमुळे गर्भधारणा आव्हानात्मक बनते तेव्हा प्राथमिक फर्टिलिटी उपचाराने गर्भधारणा होऊ शकते.

Share This Post

याउलट ओवॅरियन कॅन्सर सारख्या गंभीर स्थितीत IVF ने गर्भधारणा शक्य आहे. PCOD सह नैसर्गिक गर्भधारणेसाठी कमी वय, निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियंत्रित वजन, ओव्यूलेशन ट्रेकिंग करणे आवश्यक आहे.

अशी वाढवा गर्भधारणेची शक्यता

वंध्यत्व समस्येसाठी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१ वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर फर्टिलिटी डॉक्टरांचे उपचार घ्यावेत. हार्मोनल संतुलनासाठी औषधे, जीवनशैलीत सुधार, पुरुषी हार्मोन चे नियंत्रण, वजन नियंत्रणासाठी विशिष्ट टिप्स देऊन गर्भधारणेची संभावना वाढविली जाते.

वय कमी असेल आणि गर्भधारणेत अडचण येत असल्यास ओव्यूलेशन इंडक्शन किंवा IUI सारखे उपचार केले जातात. याउलट तुमचे वय जास्त असल्यास किंवा पुरुष साथीदाराला समस्या असल्यास तुम्हाला IVF, ICSI/IMSI/PICSI, PGT सारखे उपचारांची आवश्यकता लागू शकते.

गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी डाएटिशिअन चा सल्ला घ्या.

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये pcod सह गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी मानसिक आरोग्याला विशेष महत्व दिले जाते. तणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना कमी करण्यासाठी, आर्थिक चिंता कमी करण्यासाठी, तसेच आई-बाबा होण्याचा विश्वास बळावण्याची, उपचारांविषयी सकारात्मकता वाढविण्यासाठी समुपदेशन केले जाते.

PCOD चे प्रकार

  1. इंश्युलीन रिसिस्टन्स PCOD: सर्वात सामान्य प्रकार आहे. उच्च इंश्युलीन पातळी किंवा मेटाबोलिक सिंड्रोम मुळे होतो. या स्टेज मध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि या साखरेला प्रतिकार करण्यासाठी जास्त इंश्युलीन तयार होते. परिणामी अँड्रोजेन या पुरुषी हार्मोन ची पातळी वाढते. यामुळे पुरुषी लक्षणे दिसणे, वजनवाढ होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
  2. इंफ्लेमेटरी PCOS: या स्टेज मध्ये इंफ्लेमेशन हे मुख्य लक्षण असते. याबरोबरच ओव्यूलेशन न होणे, अँड्रोजेन या पुरुषी हार्मोन ची पातळी वाढणे, कॉर्टिसॉल या स्ट्रेस नियंत्रित करणाऱ्या हार्मोन च्या असंतुलनामुळे तणावा ची पातळी वाढते. डोकेदुखी, स्किन ऍलर्जी देखील होऊ शकते.
  3. पोस्ट पील PCOS: तुम्ही जेव्हा बर्थ कंट्रोल पिल ची औषधे घेणे थांबवता तेव्हा अंडाशय जास्त प्रमाणात एंड्रोजन तयार करतात. पुन्हा pcos ची लक्षणे दिसू लागतात. परंतु या स्टेज ला इंश्युलीन रिसिस्टन्स दिसून येत नाही.
  4. ऍडर्नल PCOS: या स्टेज ला इन्सुलिनचा प्रतिकार नसतो आणि जळजळ किंवा हार्मोनल गर्भनिरोधकांच्या वापरामुळे देखील pcos होत नाही. शरीर तणावाला प्रतिकार करू शकत नाही आणि तणावाची पातळी वाढते. परिणामी DHEAS या अँड्रोजेन हार्मोन ची पातळी सुद्धा वाढते.

PCOD मध्ये गर्भधारणेसाठी सर्जिकल उपचार

pcod ने जास्त गंभीर रूप धारण केलेले असेल तर, काही विशिष्ट स्थितींसाठी सर्जरीने उपचार करून वंध्यत्वाचे निवारण केले जाते.

1. लॅप्रोस्कोपिक ओवरियन ड्रिलिंग / लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी

हि एक कमी त्रासदायक आणि बाह्यरुग्ण प्रक्रिया आहे. अंडाशयात अधिक सिस्ट बनलेल्या असतील आणि ओव्यूलेशन डिस्टर्ब झाले असेल तर, असे सिस्ट सर्जरीने काढून टाकले जातात. यामुळे ओव्यूलेशन मध्ये सुधारणा होते, अंतःस्रावी यंत्रणा सुधारते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

परंतु यामुळे स्त्रीबीजांचा नाश होऊन ओवॅरियन रिझर्व्ह कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे ओवॅरियन कॅन्सर च्या स्थितीत हि सर्जरी सुचविली जाते. तर गर्भधारणेसाठी IUI किंवा IVF हे उपचार फायदेशीर आहेत.

2. सिस्ट ऍस्पिरेशन

ओवरियन सिस्ट म्हणजे द्रवाने भरलेल्या पिशव्या. या सर्जरी प्रक्रियेत, सिस्ट्समधील द्रवपदार्थ काढला जातो. यामुळे फर्टिलिटी क्षमता सुधारते. सिस्ट एस्पिरेशन तेव्हाच होते जेव्हा सिस्ट कॅन्सरस नसतात आणि अल्ट्रासाऊंडद्वारे त्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते. सिस्ट कॅन्सरस आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी हा द्रव पदार्थ तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविला जातो.

IVF उपचारांपूर्वी हि सर्जरी केली जाते. कारण IVF दरम्यान स्त्रीबीज मिळविण्याच्या प्रक्रियेत असे खराब क्वालिटी चे सिस्ट मिळण्याची शक्यता कमी करण्यासाठी सिस्ट ऍस्पिरेशन केले जाते.

3. ओवॅरियन वेज रिसेक्शन

या सर्जरीमध्ये अंडाशयाचा काही भाग काढून टाकला जातो. नंतर विशेष मायक्रोसर्जिकल तंत्रांचा वापर करून अंडाशयाच्या कडा स्किलफुली शिवल्या जातात. परंतु हि एक आक्रमक सर्जरी आहे.

4. ओफोरेक्टॉमी

ओफोरेक्टॉमी ही एक प्रक्रिया किंवा शस्त्रक्रिया आहे ज्याद्वारे एक किंवा दोन्ही अंडाशय काढले जातात. सामान्यतः एंडोमेट्रिओसिस, ओव्हरीयन कँसर किंवा PCOD सारख्या काही परिस्थितींना प्रतिबंध करण्यासाठी हि सर्जरी केली जाते.

वंध्यत्वासाठी फर्टिलिटी उपचार

  • वंध्यत्व समस्येचे कारण pcod असते तेव्हा वय कमी असेल आणि pcod नियंत्रणात असेल तर औषधोपचार, ओव्यूलेशन इंडक्शन किंवा IUI ने उपचार केले जातात.
  • याउलट स्थितीत pcod ने गंभीर रूप धारण केलेले असेल, गुंतागुंत अधिक असेल किंवा ओवॅरियन कॅन्सर असेल किंवा अंडाशय काढून टाकलेले असतील तर अशा वेळी IVF किंवा ऍडव्हान्स IVF ने उपचार केल्यास नक्कीच गर्भधारणा होऊ शकते.
  1. ओवुलेशन इंडक्शन: यामध्ये ओवुलेशन इंडक्शन च्या मदतीने स्त्रीबीजांची वाढ वेळोवेळी सोनोग्राफीद्वारे तपासली जाते. स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्याचे या तपासणीत दिसल्यानंतर योग्य वेळी सेक्श्युअल इंटरकोर्स साठी सांगितलं जातं.
  2. IUI इंट्रा युटेरियन इन्सिमिनेशन: बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. IUI मुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
  3. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन: बेसिक IVF ट्रीटमेंट मध्ये स्त्रीबीजे आणि स्पर्म्स कलेक्ट केले जातात. चांगल्या क्वालिटी ची स्त्रीबीजे आणि स्पर्म सिलेक्ट करून एका ट्रे मध्ये फर्टिलायझेशन साठी ठेवले जातात. यावेळी स्पर्म आणि स्त्रीबीजांचे नैसर्गिकरित्या फर्टिलायझेशन होते. IVF उपचारांनी गर्भधारणेची संभावना अनेक पटींनी वाढते. IVF उपचार वंध्यत्वाच्या अनेक समस्या बायपास करून सक्सेस देऊ शकतात.
  4. PGD /PGT /PGS: या जेनेटिक टेस्टिंग चा वापर करून pcod मध्ये असलेला मिसकॅरेज चा धोका कमी करता येऊ शकतो. तसेच स्वस्थ बाळाच्या जन्माची संभावना वाढते.
  5. IVM इन विट्रो मॅच्युरेशन: PCOS असलेल्या वंध्यत्व नसलेल्या महिलांसाठी IVM हा एक उपचार विकल्प आहे. याशिवाय ओवुलेशन समस्या किंवा ओवरीयन कॅन्सर असलेल्या महिलांसाठी देखील हा एक उपचार पर्याय आहे. हि एक सौम्य आणि परिणामकारक उपचार प्रक्रिया असून मातृत्वासाठी प्रयत्नशील असलेल्या महिलांना अशा प्रदान करते.
    • IVM म्हणजे ‘इन विट्रो मॅच्युरेशन’. या प्रक्रियेदरम्यान जेव्हा अंडाशय कमी उत्तेजित असतात किंवा उत्तेजित नसतात; अशा वेळी अपरिपकव किंवा अर्धवट परिपकव स्त्रीबीजे मिळवले जातात (रिट्रायविंग इमॅच्युअर एग्ज). हि स्त्रीबीजे प्रयोगशाळेत विशिष्ट द्रावणात वाढविली जातात आणि त्यानंतर IVF किंवा ICSI उपचारांचा वापर करून फर्टिलायजेशन केले जाते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार

मधुमेहाच्या रुग्णांना IVF प्रक्रिये दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो, जसे की गर्भपात, एकाधिक गर्भधारणा आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याची संभावना अधिक असते. पण चिंता करण्याचे कारण नाही. फर्टिलिटी क्षेत्रातील प्रगतीमुळे, मधुमेही रुग्णांसाठी IVF हे आशेचा किरण बनले आहे. मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

A Fertility Specialist or A Gynaecologist – Who, When, and Why?

A fertility specialist specializes in fertility treatments, whereas a gynaecologist handles issues regarding women’s reproductive health in general. If you are having trouble getting pregnant then consult a fertility expert for solutions.