मासिक पाळीतील समस्या आणि गर्भधारणा

मासिक पाळीतील समस्या आणि गर्भधारणा
मासिक पाळी पंधरा दिवसातून येणे, २८ दिवसांच्या आधीच पाळी येणे, ४५ दिवस उलटूनही पाळी न येणे, मासिक पाळीत चार दिवसांहून अधिक काळ रक्तस्त्राव होणे, १६ वर्षे वय उलटून गेले तरी पाळी आली नसेल तर अशा सर्व समस्यांसाठी वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

Share This Post

मासिक पाळी प्रक्रिया, टप्पे आणि अनेक शंकांविषयी चर्चा केल्यानंतर आपण मासिक पाळीत भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेऊयात. त्याचबरोबर तुमच्या मासिक पाळीचे स्वास्थ्य कसे ओळखावे आणि गर्भधारणेसाठी मासिक पाळीचे स्वास्थ्य कसे राखावे याविषयी देखील जाणून घेऊयात.

मासिक पाळीत गंभीर समस्या आणि लक्षणे दिसून येणे म्हणजे तुमच्या वंध्यत्वाचे कारण ठरू शकते. त्यासाठी तुमच्या मासिक पाळीचे स्वास्थ्य जाणून घेणे आणि योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे आहे.

मासिक पाळीत भेडसावणाऱ्या समस्या :

  1. अति-रक्तस्त्राव (हेवी पिरीएड्स): नॅशनल हेल्थ सर्व्हिस ने निर्देशित केल्याप्रमाणे ३० ते ७२ मिली (५ ते १२ चमचे) ब्लीडिंग होणे नॉर्मल समजावे. साधारणपणे ८० मिली हुन अधिक ब्लीडिंग झाल्यास त्याला हेवी पिरीएड्स म्हणतात. दिवसातून २ पेक्षा अधिक पॅड ची गरज लागणे म्हणजे तुमचे पिरीएड्स हेवी आहेत, असे समजावे. याशिवाय रक्तस्त्रावात गाठी येणं, पॅड सारखे बदलावे लागणं, तासातासाला पॅड बदलावं लागणं,औषधं घेऊनही पोटातल्या वेदना कमी न होणं अशी लक्षणं हेवी पिरियड्सची असतात. हेवी पिरीएड्स हे तुमच्या वंध्यत्वाचे कारणही असू शकते. Reference: https://www.cdc.gov/
    • अतिरक्तस्रावाची कारणे :
      • गर्भाशयाच्या गाठी
      • ओव्हरीज व फेलोपियन ट्यूब ला सूज
      • इन्फेक्शन्स
      • एन्डोमेट्रिअल पॉलीप्स
      • हार्मोनल इम्बॅलन्स
      • सर्विकल कॅन्सर
  2. मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडणे : गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले अस्तर (endometriam) शरीर तयार करत असते. हार्मोनल इम्बॅलन्स मुळे हे अस्तर व्यवस्थित बनत नाही. जाड किंवा पातळ बनते. त्यामुळे मासिक पाळीत गाठी येऊ शकतात. हि समस्या तुमच्या गर्भधारणेत अडथळे निर्माण करू शकते. अस्तर जाड असल्यास अशा केसेस मध्ये मासिक पाळीत अधिक रक्ताच्या गाठी पडतात. जर गुठळ्या मोठ्या असतील, अधिक ब्लीडींग आणि वेदना होत असतील तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे तुमच्या वंध्यत्वाचे लक्षण असू शकते.
    • कारणे :
      • इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स चे असंतुलन
      • पॉलीप्स
      • फायब्रॉइड्स
      • गर्भनिरोधकांचा वापर
      • एन्डोमेट्रिओसिस
      • मिसकॅरेज
      • एक्टोपिक प्रेग्नन्सी
  3. प्रिमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (P. M. S.) : मासिक पाळी दरम्यान वेदनादायी शारीरिक लक्षणांचा अनुभव येणे अथवा चिडचिडेपणा, आक्रमक वागणे, एकाग्रतेच्या समस्या, ताणतणाव, चिंता, डिप्रेशन अशा मानसिक समस्याही उद्भवू शकतात. यालाच प्रेमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असे म्हणतात. यावर उपचार करणे गर्भधारणेच्या दृष्टीने अनिवार्य असते. कारण अतिरिक्त ताणतणाव वा तत्सम समस्यांमुळे हार्मोनल इम्बॅलन्स (संप्रेरकांचे असंतुलन) होऊन गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी पी.एम.एस. कडे दुर्लक्ष्य न करता वेळीच औषधोपचार घेणे गरजेचे असते.
  4. PMDD (प्रिमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर) : प्रिमेन्स्ट्रुअल सिंड्रोम ची लक्षणे अधिक तीव्रतेने आणि अधिक काळ जाणवणे म्हणजेच प्रिमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर होय. मेंदूमधील सेरोटोनिन भावनांचे नियंत्रण करीत असतो. सेरोटोनिन ची  पातळी असंतुलित झाल्याने मूड सविंग्स, झोप आणि भूक यांमध्ये बदल, निराशा, ताणतणाव, नकारात्मकता यांचा अनुभव रुग्णाला येतो. ही एक मानसिक समस्या असून यावर वैद्यकीय औषधोपचार घेणे फायदेशीर ठरू शकते. PMS चे गंभीर रूप PMDD गर्भधारणेत अडचणी निर्माण करू शकते.
  5. ५ दिवसात मासिक पाळी येणे : अशा प्रकारे महिन्यातून दोनदा पाळी येण्याची अनेक कारणे असतात. जसे की,
    • योनी मार्गात जंतुसंसर्ग
    • वजन वाढणे किंवा कमी होणे
    • हायपरथायरॉईड (इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन ची अतिरिक्त निर्मिती)
    • अंडाशय किंवा योनीमार्गाचा कर्करोग
    • गर्भाशयात फायब्रॉईड
  6. पाळी आतल्या आत राहणे : काही मुलींच्या बाबतीत योनिमार्गावरचा पडदा अखंड-बिनछिद्रांचा असतो. इम्पारफोरेट हायमेन (छिद्ररहित योनेपटल) पाळी आली तरी रक्त आत योनिमार्गातच साठून राहते. रक्तस्राव बाहेर दिसत नाही. प्रत्येक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, ओटीपोटात फुगवटा येणे ही लक्षणे आढळतात. यासाठी त्वरित डॉक्टरांकडून चिकित्सा करावी.
  7. पाळी न येणे : १६ वर्षे वय उलटूनही पाळी न येणे ही एक समस्या समजावी. यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे जरूरीचे आहे. यामागे जन्मजात दोष असू शकतात. जसे की,
    • गर्भाशय किंवा योनिमार्ग बंद असणे
    • ओव्हरीज मध्ये दोष असणे
    • जन्मतः गर्भाशय नसणे
    • थॉयरॉईड
    • ग्लॅण्डस च्या कार्यात बिघाड
    • क्षयरोग (टी.बी.) सारखे आजार
    • स्त्रीजननसंस्थेची अपुरी किंवा सदोष वाढ
  8. पाळी थांबणे : गर्भधारणेच्या किंवा बाळाला अंगावर पाजण्याच्या काळात पाळी येत नाही. 45-50 वर्षे वयानंतर प्रजनन प्रक्रिया थांबते आणि पर्यायाने पाळी देखील थांबते. ही एक नैसर्गिक बाब आहे. परंतु पाळी पूर्वी येत होती; पण आता येत नसल्यास काही दोष तयार झाले असण्याची शक्यता आहे. जसे की,
    • गर्भाशयात अडथळा तयार होणे
    • योनिमार्गात अडथळा तयार होणे
    • ओव्हरीयन सिस्ट
    • इम्पारफोरेट हायमेन (छिद्ररहित योनेपटल)
  9. चार हुन कमी दिवस पाळी येणे : काही स्त्रियांमध्ये चार दिवसांहून कमी दिवस रक्तस्त्राव होतो. शिवाय होणारा रक्तस्त्रावाचे प्रमाणही कमीच असते. अशा वेळी गर्भधाराणा राहू शकेल का? असा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. याचे उत्तर होय असेच आहे. रक्तस्त्राव कमी असेल तरी देखील स्त्रीबीज निर्माण होण्याची प्रक्रिया होताच असते, त्यामुळे अशा स्त्रियांना इतरांप्रमाणेच गर्भधारणा होते.
  10. स्पॉटिंग होणे : कमी रक्तस्त्राव अथवा केवळ स्पॉटिंग होणे हा काही आजार नाही. युटेरस फंक्शन मध्ये बिघाड असण्याची शक्यता असते. काही वेळी अनुवांशिकता हे देखील एक कारण असते.
  11. स्कॅनटी पिरीएड्स : सुरुवातीला १ ते २ वर्ष कमी रक्तस्त्राव होतो. पण त्यानंतर कमी ब्लीडींग किंवा स्पॉटिंग होणे, अशी लक्षणे असतील तर तर त्याला स्कॅनटी पिरीएड्स म्हणतात.
    • स्कॅनटी पिरीएड्स ची कारणे :
      • ऍनिमिया : कमी रक्त असणे
      • कुपोषण
      • अनियमित जीवनशैली
      • व्यायामाचा अभाव
      • हार्मोनल समस्या
  12. मासिक पाळी येण्यापूर्वी पोटात वेदना होणे (pain in uterus before period): खूप जास्त प्रोस्टॅग्लॅंडिन च्या पातळीमुळे तुमच्या गर्भाशयाचे स्नायू घट्ट होतात आणि शिथिल होतात आणि त्यामुळे पेटके येतात. मासिक पाळीच्या एक किंवा दोन दिवस आधी वेदना सुरू होऊ शकतात. प्रोस्टॅग्लॅंडिन हे गर्भाशय बनवणारे रसायन असते.

असे जाणून घ्या तुमच्या मासिक पाळीचे स्वास्थ्य

तुमच्या मासिक पाळीतील रक्तस्रावाचा रंग तुमच्या मासिक पाळीचे स्वास्थ्य सांगत असतो.

लाल रंगाचा रक्तस्त्राव उत्तम मासिक पाळीचे लक्षण म्हणजे लाल रंगाचा रक्तस्त्राव होणे. मात्र जास्त प्रमाणात लाल रंग असणे हे पित्ताचे (ऍसिडिटी) प्रमाण वाढल्याचे लक्षण असते.
काळपट लाल रंगाचा रक्तस्त्रावपाळीच्या पहिल्या दिवशी अथवा शेवटी काळपट लाल रंगाचा रक्तस्त्राव होणे सामान्य (नॉर्मल) आहे. मात्र संपूर्ण पाळीदरम्यान काळपट रक्तस्त्राव होत असल्यास आणि त्यासोबतच ताप येणे, योनीमार्गात खाज येणे, लघवी करताना दुखणे अशी लक्षणे असल्यास इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) असल्याची शक्यता असते. त्यासाठी उपचार घ्यावेत.
ग्रे रक्तस्त्रावहे बॅक्टेरियल व्हजायनास (बॅक्टेरियल इन्फेक्शन) चे लक्षण आहे. बॅक्टेरियाची संतुलन बिघडल्यास ही समस्या उद्भवू शकते.
केशरी रक्तस्त्रावसर्व्हायकल फ्लुइड मिसळला गेला असेल तर पाळीतील रक्तस्त्राव केशरी रंगाचा असतो.
चॉकलेटी किंवा गडद लाल रंगाचा रक्तस्त्रावपाळीच्या सुरुवातीला आणि शेवटी या रंगाचा रक्तस्त्राव होणे स्वाभाविक आहे. परंतु संपूर्ण पाळीत असा रक्तस्त्राव होत असेल तर शरीरात ऑक्सिजन ची कमतरता असण्याची शक्यता असते.

मासिक पाळीतील आणि अरली प्रेग्नन्सी मधील वेदना

difference between period pain and pregnancy pain

पीएमएस आणि अरली प्रेग्नन्सीत होणारे क्रॅम्पिंग सामान्य आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या पेटके हे मासिक पाळीच्या क्रॅम्पसारखेच असतात, परंतु ते पोटाच्या खाली येऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान हे क्रॅम्प आठवडे किंवा महिने टिकू शकतात, कारण भ्रूण रोपण आणि गर्भाशय ताणले जाते.

मासिक पाळी विषयी अधिक विचारले जाणारे प्रश्न:

मासिक पाळीत कन्सिव्ह करणे शक्य आहे का?

उत्तर: होय. मासिक पाळीच्या दरम्यान गर्भनिरोधकांशिवाय इंटरकोर्स झाल्यास कन्सिव्ह होऊ शकतात.

मासिक पाळीत ओटीपोटात वेदना होत असल्यास काय करावे?

उत्तर: गरम पाण्याच्या पिशवीचा पोटावर शेक घ्यावा. कोमट तेलाने हलक्या हाताने पोटाला मसाज करावा. किंवा गरमागरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील नासा मोकळ्या होऊन रिलीफ मिळतो.

मासिक पाळीत ओटीपोटात वेदना होत असल्यास काय करावे?

उत्तर: गरम पाण्याच्या पिशवीचा पोटावर शेक घ्यावा. कोमट तेलाने हलक्या हाताने पोटाला मसाज करावा. किंवा गरमागरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील नासा मोकळ्या होऊन रिलीफ मिळतो.

गर्भधारणेनंतर मासिक पाळी थांबते का?

उत्तर : स्त्री गरोदर राहिल्यानंतर मासिक पाळी येत नाही. कारण ज्या स्त्रीबीजांच्या फुटण्याने मासिक स्त्राव सुरु होतो त्याच स्रावापासून बाळ बनते. गर्भधारणेनंतर वेगळ्या प्रकारचा रक्तस्त्राव होऊ शकतो त्याला इम्प्लांटेशन ब्लीडींग म्हणतात. पण ही मासिक पाळी नसते.

मासिक पाळीत इन्ड्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन चे कार्य काय असते?

उत्तर : ओव्हरीज एग्ज रिलीज करू लागतात तेव्हा ओव्हरीज एंड्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ची निर्मिती करू लागतात.

मासिक पाळीपूर्वी ताप येणे हे कशाचेलक्षण असते?

उत्तर : मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी तुमचा ओव्यूलेशन पिरियड सुरु असतो. या काळात ओव्हरीज एग्ज रिलीज करतात आणि तुम्ही कन्सिव्ह करण्यासाठी हा सुयोग्य काळ असतो. जेव्हा तुम्ही ओवुलेट करतात तेव्हा शरीराच्या तापमानात काहीशी वाढ होते त्याला “बसाल बॉडी टेम्परेचर” म्हणतात.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।