मासिक पाळी विषयी माहिती, लक्षणे, समस्या, आणि शंका

masik pali information in marathi
'मासिक पाळी ' म्हणजे पुनरुत्पादक प्रणाली (रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम) उत्तम असल्याची निशाणी'. मासिक पाळी संबंधी समस्या असलेल्या अनेक स्त्रियांना सतत भेडसावणारा प्रश्न म्हणजे ''अनियमित मासिक पाळी असेल तरी गर्भधारणा राहू शकते का?'' या प्रश्नाचे उत्तर 'होय' असेच आहे. प्रोजेनेसिस आय. व्ही. एफ. सेंटर चे चीफ फर्टिलिटी कन्सलटन्ट डॉ. नरहरी माळगांवकर आणि डॉ. सोनाली माळगांवकर याविषयी भावी मातांना आश्वस्थ करू इच्छितात.

Share This Post

मासिक पाळी हा स्त्री च्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. ज्याद्वारे स्त्री ला मातृत्व प्रदान होते. हे लक्षात घेता मासिक पाळी येण्याचे योग्य वय, प्रक्रिया, आधी आणि नंतर दिसणारी लक्षणे, पाळी न येण्याची लक्षणे, तसेच गर्भधारणेत नियमित मासिक पाळी चे महत्त्व यांविषयी या लेखात चर्चा केलेली आहे.

मासिक पाळी हा स्त्री च्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. ज्याद्वारे स्त्री ला मातृत्व प्रदान होते.

मासिक पाळी येण्याची प्रक्रिया काय असते?, मासिक पाळी चक्र किती दिवसांचे असते?, मासिक पाळीतील टप्पे, मासिक पाळी येण्याचे योग्य वय, मासिक पाळीपूर्वी आणि दरम्यान दिसून येणारी लक्षणे, कोणती लक्षणे नैसर्गिक असतात आणि कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी कन्सल्ट करावे?, अनियमित मासिक पाळीची कारणे काय असतात? रेग्युलर पिरीएड्स साठी काय करावे? अनियमित मासिक पाळी सह गर्भधारणा शक्य आहे का? अशा अनेक शंकांची उत्तरे जाणून घ्या आमच्यासोबत.

मासिक पाळीविषयी फॅक्ट्स

  • स्त्रिया जन्माला येतात तेव्हा त्यांच्या अंडाशयात लाखो स्त्रीबीजे उपस्थित असतात.
  • गर्भाशय योनीमार्गाचा जोडलेले असते. गर्भाशयाच्या वर दोन फेलोपियन ट्यूब आणि त्यालगत दोन्ही बाजूला दोन ओव्हरीज असतात. ओव्हरीज एग्ज रिलीज करू लागतात तेव्हा मासिक पाळी सुरु होते.
  • वयाच्या १२ ते १५ वर्षाच्या दरम्यान मासिक पाळी चक्र सुरु होते.
  • साधारणपणे पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी पाळी येते.
  • मासिक पाळीत रक्तस्त्राव होण्याचा कालावधी ४ दिवस असतो किंवा ८ दिवसापर्यंत असू शकतो.
  • प्रेग्नेंट असताना रक्तस्त्राव झाल्यास त्याला ‘इम्प्लांटेशन ब्लीडींग’ म्हणतात.
  • ४५ ते ५५ वयात मासिक पाळी बंद होते. स्त्रीबीजांचा साठा वयानुसार कमी कमी होतो आणि मासिक पाळी चक्र थांबते.
  • मासिक पाळी दरम्यान दिवसातून २ हुन अधिक पॅड बदलावे लागत असल्यास त्याला ‘हेवी पिरीएड्स’ म्हणतात.
  • मासिक पाळीतील रक्तस्त्राव शुद्ध असतो.

मासिक पाळी प्रक्रिया

मासिक पाळी कशी येते हे जाणून घेण्यासाठी गर्भाशयाची रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पेअर या फळाप्रमाणे गर्भाशयाचा आकार असतो. गर्भाशय नलिका योनी मार्गाला जोडलेली असते, तर वरील दोन्ही बाजूला फेलोपी नलिका आणि त्यालगत दोन ओव्हरीज असतात. ओव्हरीज दर महिन्याला मॅच्युअर एग्ज रिलीज करण्याचे काम करतात. फेलोपियन नलिकांच्या पुढे असलेल्या कोशिका हे एग्ज कलेक्ट करतात तेव्हा एग्ज फेलोपियन ट्यूब मध्ये प्रवेश करतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शरीर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन असे रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन तयार करते. यावेळी प्रेग्नन्सी साठी गरजेचे असे गर्भाशयातील अस्तर (एन्डोमेट्रियम) बनते. ओव्यूलेशन काळात सेक्श्युअल इंटरकोर्स न झाल्यास मासिक पाळी येते. पाळीतील स्रवासोबत गर्भाशयातील अस्तर देखील तुकड्यांच्या स्वरूपात बाहेर पडते. यालाच ‘मासिक पाळी’ म्हणतात.

मासिक पाळीतील टप्पे

पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर दुसरी पाळी येईपर्यंतचा काळ म्हणजे मासिक पाळी चक्र. मासिक पाळी चे तीन टप्पे असतात. त्याला मेन्स्ट्रुअल फेजेस म्हणतात.

  1. मेन्स्ट्रुएशन फेज (Menstruation Phase) : मासिक पाळी सुरु होते तेव्हाच कालावधी.
  2. फॉलिक्युलर फेज (Follicular Phase) : मागील मासिक पाळीपासून (Last Menstrual Period – LMP) ते ओवुलेशन पर्यंतचा काळ. हा टप्पा मागील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरु होतो आणि ओवुलेशन पर्यंत म्हणजेच १०-१४ दिवसापर्यंत असतो.
  3. ओव्यूलेशन फेज (Ovulation Phase) : या काळात ओव्हरीज मॅच्युअर एग्ज रिलीज करू लागतात. २८ दिवसांच्या मासिक पाळी चक्रात ओव्यूलेशन फेज १२, १३ व १४ व्या दिवशी असते.
  4. ल्यूटल फेज (Lutal Phase) : मेन्स्ट्रुअल सायकल च्या दुसऱ्या सहामाहीला ल्यूटल फेज म्हणतात. ओवुलेशन झाल्यापासून ते मासिक पाळी येईपर्यंतचा टप्पा म्हणजे ल्यूटल फेज.

प्रेग्नन्सी मध्ये मासिक पाळीचे महत्त्व

ज्याप्रमाणे निसर्गात बीजाचे अंकुरण होण्यासाठी योग्य ऋतू, योग्य क्षेत्र, उत्तम बीज आणि योग्य आहार यांची आवश्यकता असते; अगदी त्याचप्रमाणे गर्भधारणेसाठी अर्थात उत्तम प्रजनन क्षमतेसाठी गर्भाशयाची सुस्थिती, हार्मोन्स चे योग्य प्रमाण व आहार, उत्तम बीज (स्पर्म्स व ओवुम), सुयोग्य ऋतूकाळ (मासिक पाळी चे चक्र) यांची आवश्यकता असते.

नियमित ‘मासिक पाळी ‘ म्हणजे रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम उत्तम असल्याची निशाणी. मासिक पाळी संबंधी समस्या असलेल्या अनेक स्त्रियांना सतत भेडसावणारा प्रश्न म्हणजे ”अनियमित मासिक पाळी असेल तरी गर्भधारणा राहू शकते का?” या प्रश्नाचे उत्तर ‘होय‘ असेच आहे.

अनियमित मासिक पाळीसह गर्भधारणा होऊ शकते. आजच करा मोफत कन्सल्टेशन

Free consultation

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर‘ सारख्या फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजिचा वापर करून गर्भधारणे च्या कोणत्याही समस्येवर मात करता येऊ शकते. मग अगदी मेनोपॉज नंतरही (पाळी येणे बंद झाल्यावरही) बाळ होऊ शकते.

मासिक पाळी पूर्वी आणि दरम्यान दिसून येणारी लक्षणे

  • वोमिटिंग
  • नॉशिया
  • ओटीपोटात वेदना होणे
  • थकवा
  • तोंड कोरडे पडणे
  • बॉडी पेन
  • पोटात असह्य वेदना होणे (Cramping)
  • डोकेदुखी
  • ब्रेस्ट टेंडरनेस
  • झोपेसंबंधी समस्या
  • अधिक किंवा कमी भूक लागणे
  • चिडचिडेपणा
  • आक्रमकपणा
  • कॉन्सन्ट्रेशन कमी होणे
  • स्ट्रेस
  • डिप्रेशन
  • मूड स्विंग
  • निगेटिव्ह थिंकिंग
  • मानसिक अशांती
  • व्हाईट डिस्चार्ज

पाळी न येण्याची लक्षणे

what are signs of no period?

  • मासिक पाळी चक्राच्या दिवसांप्रमाणे पाळी न आल्यास पहिली शक्यता गर्भधारणेची असते. यावेळी तुम्ही प्रेग्नेंट असण्याची शक्यता अधिक असते.
  • तुम्ही स्तनदा माता असाल तर मासिक पाळी वेळेवर न येणे नॉर्मल असते.
  • तुम्हाला नुकतीच पाळी सुरु झालेली असल्यास, सुरुवातीच्या काळात पाळी वेळेवर न येणे नॉर्मल असते.
  • तुमचे वय ४० किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही मेनोपॉज मध्ये प्रवेश करीत असतात. मेनोपॉज च्या पूर्वीच्या काळात म्हणजेच ‘पेरी मेनोपॉज’ मध्ये पाळी वेळेवर न येणे नॉर्मल असते.

नियमित व अनियमित मासिक पाळीची लक्षणे

नियमित मासिक पाळीची लक्षणेअनियमित मासिक पाळीची लक्षणे
१२ ते १४ वर्षात मासिक पाळी सुरु होते१५ वर्ष होऊनदेखील मासिक पाळी सुरु होत नाही
२१ ते २८ दिवसात पाळी येतेमहिन्यातुन दोनदा पाळी येणे किंवा ४५ दिवसातून अधिक काळानंतर पाळी येणे
४ दिवस ब्लीडींग होणे५ किंवा त्याहून अधिक काळ ब्लीडींग होणे
दिवसाला २ पॅड ची गरज असणेसंपूर्ण पाळीत ३ हुन कमी पॅड्स लागणे किंवा दिवसाला २ पेक्षा अधिक पॅड्स लागणे
रक्तस्त्राव लाल रंगाचा असणेचॉकलेटी किंवा गडद लाल रंगाचा रक्तस्त्राव होणे

डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार केव्हा घ्यावेत?

  1. तुम्ही १५ वर्षांच्या आहात आणि तुम्हाला अजून मासिक पाळी सुरू झाली नसेल तर
  2. महिन्यातून दोनदा पाळी येत असेल तर
  3. २८ ते ३२ दिवसांहून अधिक काळाने मासिक पाळी येत असेल तर
  4. ७-८ दिवसांपेक्षा अधिक दिवस रक्तस्त्राव होत असेल तर,
  5. दिवसातून २ पेक्षा अधिक वेळा नॅपकिन चेंज करावे लागतील तर,
  6. अतिरिक्त रक्तस्त्राव आणि पेटके येण्याची समस्या असेल तर,
  7. प्रिमेन्स्ट्रुअल सिंड्रोम ची लक्षणे जाणवत असतील तर,
  8. पाळीपूर्वी अतिरिक्त ताणतणाव आणि चिडचिडेपणा, आक्रमकपणा अनुभवास येत असेल तर,
  9. मासिक पाळी पुढे ढकलण्याची औषधे हवी असल्यास,
  10. रक्तस्त्रावाचा रंग काळा, चॉकलेटी अथवा अधिक लाल असेल तर
  11. रक्तस्रावाचा वास येत असेल तर

अनियमित मासिक पाळीचे कारण जाऊन घ्या आणि प्रेग्नन्सी साठी योग्य उपचार करा.

Free consultation

मासिक पाळी पुढे ढकलता येते का?

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. पाळी येण्यासाठी जे हार्मोन्स कार्यरत असतात त्या हार्मोन्स वर या गोळ्या काम करतात आणि पाळी पुढे ढकलता येते. या गोळ्या हार्मोनल असंतुलन करीत असतात. याशिवाय सातत्याने या गोळ्यांचे सेवन केल्यास पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक, फिट येणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सहसा डॉक्टर या गोळ्या घेण्याचा सल्ला देत नाहीत. इतर परिस्थितीत बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मर्जीप्रमाणे अधिक दिवसांसाठी गोळ्यांचे सेवन केले जाते. असा व्यवहार घटक ठरू शकतो. याशिवाय एखाद्या प्रसंगी पाळी पुढे ढकलणे अत्यावश्यक असल्यास डॉक्तरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलत येऊ शकते.

मासिक पाळी विषयी लोक कोणते प्रश्न सर्च करतात?

पंधरा दिवसात मासिक पाळी येत असल्यास काय करावे?

पंधरा दिवसात मासिक पाळी येत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे सोयीस्कर ठरते. याशिवाय संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, भरपूर पाण्याचे सेवन, मसालेदार आणि जंक फूड टाळणे फायदेशीर ठरते.

मासिक पाळीच्या काळात व्यायाम करावा का?

हो. मासिक पाळीच्या काळात व्यायाम करणे फायदेशीर ठरते. मात्र अतिरिक्त व्यायाम टाळावा.

मासिक पाळी येण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत का?

मासिक पाळी येण्यासाठी कोणत्याही औषधे उपलब्ध नाहीत. तरी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मासिक पाळी न आल्यास काय करावे?

मासिक पाळी न येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे ‘मेनोपॉज’ होय. साधारणपणे ४५ ते ५५ वयात मेनोपॉज येतो. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणे. साधारणपणे ४० व्या वयात महिलांना मेनोपॉज ची लक्षणे दिसू लागतात. यावेळी मासिक पाळी अनियमित होते आणि इतर लक्षणे हि दिसू लागतात. मेनोपॉज मुळे तुम्ही नैसर्गिकरित्या प्रेग्नन्ट राहू शकत नाहीत. परंतु चिंता करण्याचे काही कारण नाही. आधुनिक ART (Assisted Reproductive Technology) तंत्रज्ञानाच्या मदतीने मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे.

मासिक पाळी बंद झाल्यानंतरही गर्भधारणा राहू शकते का?

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे. उपचारांनी मासिक पाळी पुन्हा सुरु केली जाते आणि प्रेग्नंन्सी ट्रीटमेंट केली जाते. याशिवाय क्रायोप्रिझर्वेशन पद्धतीचा वापर करून स्त्रीबीजे फ्रिज करून ठेवणे आणि हवी तेव्हा गर्भधारणा शक्य होते.

मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?

फक्त १०-१५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळी २८ दिवसांनी येते. इतर स्त्रियांमध्ये हे चक्र २५ ते ३६ दिवसांचे असले, तर त्याला नियमित मासिक पाळी म्हणावे.  मात्र अनियमित मासिक पाळी च्या केसेस मध्ये ३६ दिवसांहून अधिक काळ किंवा अधिक महिने देखील पाळी येत नाही.

प्रेग्नन्सी साठी काही आधुनिक उपचारपद्धती 

– आय.व्ही.एफ. क्रायोप्रिझर्वेशन : स्त्रीबीजे फ्रिज करून ठेवणे
IVF 
– ऍडव्हान्स IVF

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।