राज्यातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही दुपारी १२ ते ५ या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. उच्चांकी उष्णतेचा दाह फक्त शरीरालाच हानी पोहचवत नाही तर, शरीरातील सूक्ष्म जैव घडामोडींवर देखील विपरीत परिणाम करीत असतो. प्रामुख्याने अतिरिक्त उष्णतेमुळे पुरुषांच्या टेस्टीज चे तापमान वाढते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. तेव्हा, पालकत्वाचा प्रवास करीत असलेल्या दाम्पत्यांनी अतिरिक्त उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर चे वंध्यत्व निवारण विशेषज्ज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दिला आहे.
संशोधन काय सांगते?
जपानमधिल ”जर्नल कम्युनिकेशन बायोलॉजी” ने नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, अधिक उष्णता ‘पुरुष वंध्यत्वाचे’ एक कारण आहे. अतिरिक्त उष्णतेचा परिणाम स्पर्म प्रॉडक्शन आणि स्पर्म क्वालिटी वरती दिसून आला आहे. ”नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक बायोलॉजी” चे ”सोशी योशिदा” म्हणतात कि, तापमानातील थोडासा बदल देखील शुक्राणूंची निर्मिती करण्याऱ्या अंडकोषांची क्षमता कमी करतो, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन दरांवर नाटकीयरित्या परिणाम होतो.
अंडरडॉग फर्टिलिटी च्या अहवालानुसार, गेल्या ४० वर्षात फक्त अति उष्णतेमुळे (overheating) स्पर्म काउंट कमी होण्याचे प्रमाण ५०-६०% झाले आहे.
उष्णता आणि स्पर्म चे आरोग्य यांचा संबंध
वृषणकोशात निरोगी स्पर्म तयार होण्यासाठी (healthy sperm production) ३४ डिग्री सेल्सिअस इतके तापमान पुरेसे असते. म्हणजेच शरीराच्या सरासरी तापमानापेक्षाही कमी तापमानाही गरज असते. याउलट ३७-३८ डिग्री सेल्सिअस तापमान स्पर्म प्रोडक्शन खराब करते.स्पर्म क्वालिटी देखील डॅमेज करते. ४० च्या पलीकडे उष्णता असले तर स्पर्म सर्वायवल करू शकत नाही; मरण पावतात. थोडक्यात पुरुष वंध्यत्वाचे दर्शवणारी स्पर्म ऍबनॉर्मलिटी आणि उष्णता यांचा जवळचा संबंध आहे.
उष्णतेचा स्पर्म वर होणारा परिणाम
- एकदा उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर स्पर्म डॅमेज झाले तर, पुन्हा निरोगी स्पर्मचे उत्पादन होण्यास ३ महिने लागतात.
- स्पर्म प्रोडक्शन कमी होते. (९०% पेक्षा कमी होते).
- अति उष्णतेच्या संपर्कात स्पर्म मरण पावतात.
- मोबिलिटी खराब होते. असामान्य आकाराचे स्पर्म तयार होतात.
- मोटिलिटी म्हणजेच स्पर्म ची हालचाल आणि गती यावर परिणाम होतो. (९० % पेक्षा कमी होते).
- वृषणकोष उतरणे
- डी.एन.ए. मध्ये कायमस्वरूपी आणि विकृत बदल होतात. ज्यामुळे आजार आणि इतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.
- स्क्रोटल तापमानात १ अंश सेल्सियस वाढ झाली तर ४० % स्पर्म प्रोडक्शन कमी होते.
- स्क्रोटल तापमानात २ अंश सेल्सियस वाढ झाली तर शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता (motility) शून्य होते. तसेच मोबिलिटी वर लक्षणीय परिणाम होतो.
- अझोस्पर्मिया (Azoospermia), ऑलिगोजूस्पर्मिया (Oligozoospermia), अस्थेनोझूस्पर्मिया (Asthenozoospermia), ऑलिगो अस्थेनो टेराटोझोस्पर्मिया (OAT-Oligoasthenoteratozoospermia) अशा स्पर्म ऍबनॉर्मलिटीज ओव्हर हीटिंग मुळे तयार होतात.
स्पर्म ऍबनॉर्मलिटीबाबत अधिक माहिती
टेस्टिकल्स चे स्ट्रक्चर:
पुरुष प्रजनन क्षमतेसाठी शरीराच्या सरासरी तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस तापमान कमी असावे लागते. त्यामुळे शरीरापासून दूर टेस्टीज चे स्थान असते.
पॅम्पिनीफॉर्म प्लेक्ससचे नेटवर्क | टेस्टीज भोवती नसांचे एक जाळे कार्यरत असते, जे शरीरातील अतिरिक्त उष्णतेला टेस्टीज कडे येण्यापासून रोखते. |
क्रेमास्टर | हि अशी यंत्रणा असते कि जेव्हा थंडीत तापमान कमी असते तेव्हा वृषणकोष आकुंचन पावतो आणि शरीराच्या जवळ येतो. ज्यामुळे तापमानाचा समतोल राखला जातो. |
टेस्टिकल्स वर परिणाम करणारे उष्णतेचे स्रोत:
वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे टेस्टिक्युलर मेटाबॉलिजम वाढते. तसेच उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे ऑक्सिडाइज स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे टेस्टिक्युलर चे नुकसान होते. ऑक्सिडाइज स्ट्रेस हा टेस्टिक्युलर चे नुकसान करणारा मुख्य घटक समजला जातो. इजॅक्युलेटेड स्पर्म वर उष्णतेमुळे दीर्घकालीन परिणाम होतात (long-last) तर, एपिडिडायमल स्पर्म वर उष्णतेच्या ताणाचे तात्काळ किंवा दीर्घकालीन परिणाम होतात. थोडक्यात, वातावरणीय उष्णतेमुळे पुरुष वंध्यत्व येऊ शकते. त्यासाठी पालकत्वाच्या मार्गावर असलेल्या पुरुषांनी वाढत्या उन्हाळ्यात काळजी घेणे गरजेचे आहे.
- वातावरणातील किंवा पर्यावरणातील उष्णता
- ताप येणे
- ड्रायविंग करणे
- स्वयंपाक करणे
- लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे
- मोबाइलला चा अधिक वापर करणे
- वेरिकोसेल
- उशिरा उतरलेले अंडकोष
- लठ्ठपणा
उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी?
योग्य खबरदारी घेतल्यास स्पर्म डॅमेज पासून बचाव करता येतो आणि पुरुष वंध्यत्वही टाळता येऊ शकते.
- पर्यावरणातील उष्णतेपासून दूर राहा. १२ ते ५ या काळात बाहेर जाणे टाळा. शिवाय घरातील वातावरण थंड ठेवा.
- दैनंदिन सवयी ज्या शरीराचे तापमान वाढवतात, त्यामध्ये बदल करा. जसे कि अधिक काळ बसून काम करणे, स्वयंपाक घराजवळ जास्त वेळ राहणे, लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे, मोबाइल खिशात ठेवणे इ.
- पुरेशी विश्रांती घ्या. अपुरी झोप घेतल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.
- थंड पाण्याचा वापर करा. टेस्टिकल्स चे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गार पाण्याने अंघोळ आदी उपाय करावेत.
- कॉटन चे आणि सैलसर कपडे घाला. जाड कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.
- थंड पदार्थांचे सेवन करा. जसे की, सब्जा, काकडी, राजगिरा इ.
- उष्ण व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. गरम प्येय सेवन करणे टाळा.
- भरपूर पाणी प्या.
- शीतपेय आणि बर्फाळ पदार्थ टाळा. ते उष्ण असतात.
- अधिक काळ बसून काम करू नका.