वेरिकोसिल म्हणजे काय? जाणून घ्या कारणे, लक्षणे, निदान, उपचार.
पुरुषांमध्ये दिसून येणारा एक आजार आहे. ही अशी स्थिती आहे जिथे अंडकोषाच्या आतील नसा वाढतात आणि पसरतात. तर कधी नसांचा गुच्छ तयार होतो. त्यांना वेरीकोस व्हेन्स असेही म्हणतात. वेरीकोस व्हेन तितकेसे गंभीर वाटत नसले तरीदेखील ते पुरुषांच्या फर्टिलिटी आरोग्याचे नुकसान करतात. कमजोर किंवा कमी गुणवत्तेच्या शुक्राणूंचे उत्पादन होते. हार्मोनल संतुलन बिघडते आणि टेस्टिक्युलर फंक्शन मध्ये व्यत्यय येतो. साधारणतः ३५-४०% पुरुषांमध्ये वेरिकोसिल चे निदान होते; तर १०-१५% पुरुषांचे फर्टिलिटी आरोग्य वेरिकोसिल मुळे प्रभावित होते.
वेरिकोसिल आणि पुरुष वंध्यत्वाचा संबंध
- वेरिकोसिल आणि शुक्राणूंची गुणवत्ता : वेरिकोसिल स्थितीत अंडकोषांचे तापमान वाढू शकते. वाढलेल्या तापमानामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होते. हालचाल (मोटिलिटी) कमी होते किंवा शुक्राणूंचा आकार (मॉर्फोलॉजी) खराब होते. अधिक तापमानामुळे कधीकधी शुक्राणू मारतात तर, कधी अचल (इमोटाईल) होतात.
- वेरिकोसिल – संबंधित हार्मोनल असंतुलन : टेस्टिक्युलर रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन चे उत्पादन करीत असतात. ज्यामध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोनचाही समावेश असतो. वेरिकोसिल मुळे टेस्टिक्युलर फंक्शन मध्ये बिघाड होतो. टेस्टीज मधील रक्तप्रवाह डिस्टर्ब होतो. परिणामी हार्मोन चे उत्पादन कमी होते. टेस्टेस्टेरॉन या सेक्स हार्मोन ची पातळी कमी झाल्याने यौन इच्छा कमी होते, नैराश्य येते आणि गर्भधारणेत अडचणी येतात.
- वेरिकोसिल आणि टेस्टिक्युलर फंक्शन : वेरिकोसील च्या स्थितीत वाढलेल्या किंवा सुजलेल्या नसा अंडकोषाच्या सभोवतालचा भाग गरम करतात. त्यामुळे टेस्टीज ला थंड राहणे आणि तापमान नियंत्रित करणे कठीण होते. शिवाय रक्तप्रवाहात देखील अडथळे येतात. या बिघडलेल्या टेस्टिक्युलर फंक्शन मुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.
वेरिकोसिल ची कारणे
- नसांमधील वाल्व्ह खराब असणे : वाल्व्ह म्हणजे नसांमधील झडप, जी रक्तप्रवाहाचे नियमन करते. रक्तप्रवाह सुरळीत होत नाही तेव्हा रक्तप्रवाह उलटल्याने दिशेने सरकतो आणि नसा रुंदावतात.
- टेस्टिकल ची वेगाने वाढ : साधारणपणे तारुण्यात अंडकोषांची जलद वाढ होऊ लागते, तेव्हा सर्वात जास्त रक्ताची आवश्यकता असते. यावेळी रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही आणि वेरिकोसिल होऊ शकतो. या वयातील ८५% तरुणांना डाव्या टेस्टिकल मध्ये वेरिकोसील झाल्याचे दिसून येते.
- अनुवंशिकता : आई किंवा वडील, आजोबा यांना वेरिकोसिल असल्यास तुम्हालाही तो होण्याची शक्यता असते.
- जीवनशैली : सातत्याने उभे राहणे, सातत्याने बसून राहणे, अवजड वस्तू उचलणे, अवजड कामाची पद्धत यांमुळे नसांवरील ताण वाढतो आणि वेरिकोसिल होऊ शकतो.
वेरिकोसिल सामान्य लक्षणे
- अंडकोषात वेदना
- जडपणा
- नसा वाढलेल्या दिसणे
- वृषणकोष लहान होणे
- वंध्यत्व
वेरिकोसिल चे निदान
- कन्सल्टेशन : सुरुवातीला डॉक्टर, तुम्हाला जाणवणारी लक्षणे, शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय इतिहास जाणून घेतील.
- अल्ट्रासाउंड : हि पद्धती आतील बाजूच्या प्रतिमा तयार करण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करते.
- डॉपलर अल्ट्रासाऊंड : याचा वापर करून व्हॅरिकोसेल्सचे अचूक निदान आणि मूल्यांकन करता येते. हि प्रक्रिया रुग्णांना रेडिएशनच्या संपर्कात न आणता निदान करू शकते.
- थर्मोग्राफी स्कॅन : हि निदान प्रक्रिया स्क्रोटमच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅन कार्य करते.
वेरिकोसिलसाठी सर्जिकल उपचार
- ओपन सर्जिकल ट्रीटमेंट : या प्रक्रियेत, थेट वेरिकोस व्हेन्समध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या ओटीपोटात किंवा मांडीवर एक लहान चीरा बनवला जातो. मग, सर्जन त्या त्रासदायक नसांना बांधण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी काम करतात.
- मायक्रोसर्जिकल व्हॅरिकोसेलेक्टोमी : उच्च गुणवत्तेचे मायक्रोस्कोप वापरून आणि आजूबाजूच्या ऊतींना कमीत कमी नुकसान करून नसा शोधून काढल्या जातात. ओपन सर्जरी च्या तुलनेत या सर्जरी चा सक्सेस रेट अधिक असतो. कमी इन्व्हेसिव्ह प्रक्रिया असल्याने रिकव्हरी लवकर मिळते.
- लॅप्रोस्कोपिक व्हॅरिकोसेलेक्टोमी : या प्रक्रियेमध्ये तुमच्या ओटीपोटात काही लहान चीरे करणे आणि त्या वेरिकोस नसांना कापण्यासाठी, सील करण्यासाठी किंवा क्लिप करण्यासाठी आधुनिक कॅमेरा आणि शस्त्रक्रिया उपकरणे वापरणे समाविष्ट आहे.
नॉन सर्जिकल उपचार
- मेडिकेशन : रक्तप्रवाह सुधारण्यासाठी, हार्मोनल संतुलनासाठी किंवा नसा मजबूत करण्यासाठी डॉक्टर काही औषधे लिहून देतात.
- पर्क्यूटेनियस एम्बोलायझेशन : या नॉन-सर्जिकल प्रक्रियेमध्ये प्रभावित नसांमध्ये कॅथेटर घालणे आणि रक्त प्रवाह रोखण्यासाठी आणि त्या त्रासदायक व्हॅरिकोज नसांचा आकार कमी करण्यासाठी कॉइल सारखी विशेष सामग्री इंजेक्ट करणे समाविष्ट आहे. हि प्रक्रिया कोणत्याही भुलीशिवाय केली जाते.
- थेराप्युटिक टेस्टिक्युलर कूलिंग : या थेरपीमध्ये प्रभावित भागात शीतकरण यंत्र लावले जाते, जे तेथील तापमान कमी करण्यास आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. या उपचाराने वेदना कमी करण्यात आणि वेरिकोसिल असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यात मदत होते.
गर्भधारणेसाठी आधुनिक फर्टिलिटी उपचार
- इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि व्हॅरिकोसेल : जेव्हा वेरिकोसिल च्या स्थितीत शुक्राणूंची संख्या कमी असते किंवा IUI उपचार अपयशी होत असतील तर तेव्हा IVF तुमच्यासाठी योग्य उपचार पर्याय आहे. IVF उपचार प्रक्रियेत स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे लॅब मध्ये फर्टिलायझेशन होते आणि अशा रीतीने बनवलेला गर्भ महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. गर्भ इम्प्लांट झाल्यानंतर यशस्वी गर्भधारणा होते.
- इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) : वेरिकोसील च्या स्थितीत शुक्राणूंची गुणवत्ता खराब असते. खराब आकार, कमी हालचाल किंवा अचल शुक्राणू असतात तेव्हा ते स्त्रीबीज फर्टीलाइज करण्यास असमर्थ ठरतात. अशा वेळी आधुनिक IVF-ICSI तंत्रज्ञानाने यशस्वी गर्भधारणा होऊ शकते. या प्रक्रियेमध्ये छोट्याशा इंजेक्शन च्या मदतीने स्वस्थ शुक्राणू स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केला जातो. अशा रीतीने गर्भ बनवून IVF प्रमाणे एम्ब्रियो ट्रान्स्फर केले जाते.
- प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) : वरती चर्चा केल्याप्रमाणे वेरिकोसिल कंडिशन मध्ये शुक्राणूंची गुणवत्ता खराब होत असल्याचे आपण पहिले. अशा वेळी मिसकॅरेज चा धोका असतो किंवा DNA डॅमेज असल्यास बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता अधिक असते. या स्थितीत PGT/PGD फायदेशीर ठरते. या उपचार प्रक्रियेत गर्भ ट्रान्स्फर करण्यापूर्वी गर्भातील DNA टेस्ट, जेनेटिक टेस्ट करून गर्भ स्वस्थ असल्याची खात्री केली जाते. यामुळे मिसकॅरेज चा धोका टळतो. गर्भधारणा यशस्वी होते. आणि स्वस्थ बाळाच्या जन्माची संभावना वाढते. वेरिकोसिल असलेल्या प्रत्येक पुरुषामध्ये शुक्राणूंची गुणवत्ता खराब नसते. ग्रेड I स्थितीत शुक्राणूंना हानी पोचत नाही. अशा वेळी सर्जिकल उपचारांनंतर गर्भधारणा होऊ शकते. मात्र ग्रेड III च्या स्थितीत शुक्राणूंची क्वालिटी खराब असते. यामुळे कमी क्वालिटी चा एम्ब्रियो बनतो आणि गर्भधारणेत अपयश येऊ शकते.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
पुरुषांमध्ये व्हॅरिकोसेल किती सामान्य आहे?
साधारणतः ३५-४०% पुरुषांमध्ये वेरिकोसिल चे निदान होते; तर १०-१५% पुरुषांचे फर्टिलिटी आरोग्य वेरिकोसिल मुळे प्रभावित होते.
वेरिकोसिल मुळे कायमचे वंध्यत्व येऊ शकते का?
वेरिकोसिल मुळे कायमस्वरूपी वंध्यत्व येऊ शकत नाही. सौम्य स्वरूपाचा वेरिकोसिल असलेले बरेच पुरुष उपचारांविना मुलांना जन्म देऊ शकतात. परंतु तीव्र स्वरूपाच्या वेरिकोसिल मुळे पुरुषांचे फर्टिलिटी आरोग्य प्रभावित होते आणि त्यांना फर्टिलिटी उपचारांची गरज लागू शकते.
वेरिकोसिल रुग्णांमध्ये फर्टिलिटी आरोग्य सुधारण्यास मदत करणारे जीवनशैली बदल आहेत का?
जीवनशैलीत बदल केल्यास काहीशी सुधारणा दिसू शकते. जसे कि:
– निरोगी वजन राखल्यास शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.
– नियमित व्यायाम केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच टेस्टिक्युलर चे तापमान नियंत्रित होते. हार्मोनल बॅलन्स साठी उपयुक्त आहे.
– फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांसारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध पौष्टिक आहाराच्या सेवनाने फर्टिलिटी स्वास्थ्य सुधारते.
परंतु वेरिकोसिल साठी सर्जिकल हस्तक्षेप किंवा गर्भधारणेसाठी फर्टिलिटी उपचारांची आवश्यकता असते.
उपचारानंतरही वेरिकोसिल पुन्हा होऊ शकतो का?
काही प्रकरणांमध्ये उपचारानंतरही व्हेरिकोसेल्स पुन्हा उद्भवणे शक्य आहे.