PCOS काय आहे?
PCOS म्हणजे ‘पॉलीसिस्टिक ओवरियन सिंड्रोम’. साधारणपणे वयाने लहान आणि पुनरुत्पादक वयातील स्त्रियांमध्ये आढळून येणारा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. PCOS मध्ये अंडाशय असामान्य प्रमाणात ‘एंड्रोजन’ तयार करतात, या असंतुलनामुळे अनियमित किंवा अनुपस्थित मासिक पाळी, पुरळ, केसांची जास्त वाढ आणि वजन वाढणे यासह विविध लक्षणे दिसू शकतात.
फर्टिलिटी क्षमतेवर PCOS चा प्रभाव
जेव्हा फर्टिलिटी क्षमतेचा विचार केला जातो तेव्हा, PCOS चा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. हार्मोनल असंतुलनामुळे कमी किंवा क्वचितच ओवुलेशन होऊ शकते. ज्यामुळे PCOS असलेल्या स्त्रियांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे अधिक कठीण होते. अंडाशयांवर सिस्टची उपस्थिती स्त्रीबीजांचा विकास रोखते आणि स्त्रीबीज सोडण्यात (एग रिलीज) व्यत्यय आणू शकते. एकंदरीतच पुढे जाऊन इन्फर्टिलिटी समस्या निर्माण होतात. ही आव्हाने असूनही, जीवनशैलीतील बदल (आहार आणि व्यायाम), औषधोपचार (उदा. मेटफॉर्मिन), आणि सहाय्यक पुनरुत्पादन तंत्र जसे की इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) असे विविध उपचार पर्याय उपलब्ध आहेत जे PCOS असलेल्या महिलांना यशस्वीरित्या गर्भधारणा साध्य करण्यात मदत करू शकतात.
PCOS सह गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी आजच संपर्क करा.
Free consultationPCOS कंडीशन मध्ये गर्भधारण पूर्व काळजी घेणे महत्त्वाचे का आहे?
PCOS असणा-या स्त्रियांसाठी गर्भधारणापूर्व काळजी घेणे महत्वाचे आहे कारण PCOS चा प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेच्या परिणामांवर संभाव्य परिणाम होतो. अनियमित ओवुलेशन मुळे स्त्रियांना गर्भधारणा करणे कठीण होते. त्यामुळे गर्भधारणापूर्व काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये संतुलित आहाराचा अवलंब करणे, नियमित व्यायाम करणे, निरोगी वजन राखणे आणि तणावाची पातळी व्यवस्थापित करणे यासारख्या जीवनशैलीतील बदलांचा समावेश असू शकतो. गर्भधारणापूर्व काळजी घेणे PCOS असलेल्या महिलांना निरोगी गर्भधारणेची संधी देते. शिवाय आई आणि बाळ दोघांसाठी सुधारित परिणाम देते.
PCOS ची अंतर्निहित लक्षणे व्यवस्थापित करणे शक्य होते
- अनियमित मासिक पाळी
- वजनवाढ
- इन्सुलिन ची वाढ
- हार्मोनल असंतुलन
या घटकांचे व्यवस्थापन केल्यास गर्भधारणेची शक्यता सुधारू शकते.
PCOS चे गर्भधारणेनंतर जोखीम घटक कमी करणे शक्य होते
- गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह (जेस्टेशनल डायबिटीस)
- प्रीक्लेम्पसिया (गर्भधारणेत उच्च रक्तदाब)
- गर्भपात (मिसकॅरेज)
यांचा धोका कमी करू शकतात.
PCOS मध्ये फर्टिलिटी हेल्थ राखण्यासाठी टिप्स
- वजन व्यवस्थापन (Weight management) : PCOS मध्ये इन्श्युलिन चे प्रमाण वाढल्यामुळे भूक जास्त लागते आणि वजनवाढ होते. वजन नियंत्रित ठेवल्यास हार्मोनल संतुलन होते आणि मासिक पाळी नियमित होते.
- संतुलित आणि पोषक आहार (Balanced diet) : फळे, भाज्या, लिन प्रोटीन, हेल्थी फॅट्स, असलेल्या संतुलित आहाराचा समावेश केल्यास हार्मोनल नियमनास मदत होते. कार्ब्स च्या योग्य सेवनाने इंश्युलीन चे प्रमाण राखणे, रिफाईंड शुगर टाळणे, धान्य आणि शेंगांचे सेवन करावे.
- सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम : पोहणे, डान्स, योगा, जिम यासारख्या तुमच्या आवडीच्या एक्सरसाइज केल्यास आरोग्य सुधारते.
- भावनिक स्थिति आणि तणावाचे व्यवस्थापन : हार्मोनल इम्बॅलन्स मुळे स्ट्रेस वाढू शकतो. किंवा इन्फर्टिलिटी च्या स्थितीत स्ट्रेस घेतल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते किंवा फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा किंवा मेडिटेशन, म्युजिक थेरपी घ्यावी. क्रोनिक स्ट्रेस साठी मात्र मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी.
- पुरेशी व दर्जेदार झोप घ्या : PCOS ची हार्मोनल असंतुलनाच्या स्थिती तुमची झोप बिघडवू शकते. त्यासाठी सायकॉलॉजिस्ट ची मदत घेऊन झोप सुधारा.
PCOS महिलांनी काय खावे?
- सूर्यफुलाच्या बिया व शेंगदाणे
- हिरव्या भाज्या व शेंगभाज्या
- फळे
- धान्य
- डाळी
- मासे आणि ऑलिव्ह ऑइल
PCOS महिलांनी काय खाऊ नये ?
- अल्कोहोल
- चहा व कॉफी चे अतिसेवन
- प्रक्रिया केलेले पदार्थ
- फास्ट फूड व जंक फूड व बेकारी फूड
- साखरेचे अतिसेवन
- तेलकट व तुपकट पदार्थ
औषधोपचार, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि फर्टिलिटी उपचार
PCOS संबंधित हार्मोनल समस्यांमुळे गर्भधारणेत समस्या असल्यास हार्मोनल मेडिसिन, फर्टिलिटी मेडिसिन किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे चांगले पर्याय आहेत. क्लोमिफेन सायट्रेट किंवा लेट्रोझोल सारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास ओव्हुलेशन उत्तेजित करू शकतात. त्यानंतर तुम्ही प्रकृतीकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करू शकतात.
काही गुंतागुंत असल्यास इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) किंवा इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) सारख्या सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाची शिफारस डॉक्टर करू शकतात. तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी सर्वोत्तम उपचार पर्यायांबद्दल चर्चा करण्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांशी कन्सल्टेशन करा.
PCOS ची सिव्हिरिटि आणि योग्य उपचार पर्याय जाणून घेण्यासाठी आजच मोफत कन्सल्टेशन करा.
Free consultationगर्भधारणेसाठी फर्टिलिटी हेल्थ आणि ओवुलेशन चा मागोवा घेणे
जेव्हा कुटुंब सुरू करण्याचा विचार करता, तेव्हा तुमचे शरीर आणि गर्भधारनेचे नैसर्गिक चक्र समजून घेणे महत्त्वाचे असते. गर्भधारणेच्या नैसर्गिक चक्रानुसार स्त्रीचे ओवुलेशन, ओवुलेशन वेळी शुक्राणू आणि स्त्रीबीजाचे फर्टिलायझेशन होणे आणि गर्भधारणा होणे महत्त्वाचे असते.
घरच्या घरी ओव्यूलेशन ट्रेकिंग कसे कराल?
प्रत्येक रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन गर्भधारणेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. PCOS ग्रस्त महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे वेळेवर ओवुलेशन होत नाही. अशा परिस्थितीत, ओवुलेशनचा मागोवा घेणे कठीण होते.
- बेसल बॉडी टेम्परेचर : सकाळी उठल्या उठल्या बॉडी टेम्परेचर मोजावे. ओवुलेशन दरम्यान तापमान वाढलेले असते.
- सर्व्हायकल म्यूकस चेंज
- ओव्हुलेशन प्रिडिक्टर किट्स
- स्मार्ट फोन ऍप्स
- ओवुलेशन कॅलेंडर
यांच्या मदतीने ओव्यूलेशन पिरियड ओळखून इंटरकोर्स केल्यास गर्भधारण करू शकतात.
ओव्यूलेशन ट्रेकिंग ट्रीटमेंट
ओव्यूलेशन इंडक्शन आणि ओव्यूलेशन मॉनिटरिंग : PCOS सह गर्भधारणेसाठी हि प्राथमिक उपचार पद्धती आहे. यामध्ये ओव्यूलेशन सुधारण्यासाठी फर्टिलिटी मेडिसिन देऊन स्त्रीबीजांचा विकास आणि ओव्यूलेशन मध्ये सुधार केला जातो. अल्ट्रासाउंड च्या मदतीने ओव्यूलेशन चा मागोवा घेतला जातो. जेव्हा अंडाशय बीजांड सोडते तेव्हा, इंटरकोर्स चा सल्ला दिला जातो. किंवा IUI ट्रीटमेंट केली जाते.
फर्टिलिटी डॉक्टरांसोबत कन्सल्टेशन
- फर्टिलिटी डॉक्टरांशी मोफत कन्सल्टेशन करा. यावेळी डॉक्टर तुमचा केस स्टडी, तुम्हाला जाणवलेली कोणतीही लक्षणे आणि कदाचित तुमच्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम करणारे जीवनशैलीचे घटक यांवर चर्चा करतील.
- डॉक्टर कदाचित हार्मोन लेव्हल्स तपासण्यासाठी तुमच्या ब्लड टेस्ट करतील.
- PCOS ची सिव्हिरिटि आणि रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन ची स्थिती तपासण्यासाठी अल्ट्रासाउंड टेस्ट करतील.
- तुमच्या गरजांनुसार डॉक्टर तुमच्यासाठी पर्सनलाईज ट्रीटमेंट प्लॅन बनवतील.
गर्भधारणेदरम्यान भावनिक आव्हाने आणि तणाव हाताळणे
PCOS असणाऱ्या स्त्रिया त्यांच्या आरोग्याविषयी नेहमीच चिंतीत असतात. ‘गर्भधारणा’ हा विषय त्यांच्या चिंतेत आणखीनच भर घालते. इन्फर्टिलिटी चा स्ट्रेस आणि बाळाचे आरोग्य यांमुळे PCOS महिलांचा तणाव वाढतो. निरोगी गर्भधारणा होण्यासाठी या भावनिक आव्हानांचा सामना करणे महत्त्वपूर्ण ठरते.
तणावाचे व्यवस्थापन करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान किंवा प्रसवपूर्व योग.
PCOS आणि गर्भधारणेवर लक्ष केंद्रित करणार्या मित्र, कुटुंब किंवा ऑनलाइन समुदायांकडून समर्थन मिळवणे हा देखील चांगला पर्याय आहे.
लक्षात ठेवा, प्रत्येक गरोदरपणाचा प्रवास अनोखा असतो आणि या काळात तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असते.
निष्कर्ष : PCOS असलेल्या महिलांना यशस्वी गर्भधारणेसाठी सक्षम करणे
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) PCOS सह नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे शक्य आहे का?
होय. हे शक्य आहे. परंतु त्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज आहे. हार्मोनल असंतुलन, ओव्यूलेशन समस्या सुधारण्यासाठी फर्टिलिटी मेडिसिन, जीवनशैलीत सुधार आणि काहीसे वजन नियंत्रण केल्याने नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे.
२) PCOS महिलांनी गर्भधारणेदरम्यान विशेष आहार घेणे आवश्यक आहे का?
PCOS स्थितीमुळे गर्भधारणेदरम्यान विविध धोके असतात जसे की – गर्भधारणा मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया. म्हणून, PCOS असलेल्या महिलांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारा निरोगी आहार राखण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
३) गर्भधारणेदरम्यान PCOS औषधे बंद करावीत का?
गर्भधारणेदरम्यान पीसीओएसची औषधे बंद करावीत का? हे मुख्यत्वे तुम्हाला दिलेली औषधे, गर्भवती महिला आणि बाळासाठी संभाव्य धोके यावर अवलंबून असते. औषधे थांबवणे किंवा चालू ठेवण्याबाबत तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा.
४) मी PCOS आणि गर्भधारणेच्या भावनिक आव्हानांचे व्यवस्थापन कसे करू शकतो?
PCOS मध्ये भावनिक आव्हानांचे आणि तणावाचे व्यवस्थापन करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान किंवा प्रसवपूर्व योग.