‘मुल होण्यात असमर्थता असणे’ हि जोडप्यांसाठी एक तणावपूर्वक आणि निराशाजनक स्थिती आहे. खासकरून जेव्हा वंध्यत्वाचे कारण पुरुष असतात, पण चिंता करण्याचं कारण नाही; आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीने पुरुष वंध्यत्व समस्येचे निदान आणि यशस्वी उपचार करणे शक्य आहे.
चला तर मग जाणून घेऊयात, पुरुष वंध्यत्व का निर्माण होते? पुरुषांमधील वंध्यत्व समस्या कोणत्या? निदान व उपचार कसे केले जातात? आणि बरेच काही.
पुरुष वंध्यत्व म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या पुरुषाला वर्षभर प्रयत्न करूनदेखील महिला पार्टनर ला कन्सिव्ह करण्यात अपयश येते आणि विशेषतः जेव्हा महिला पार्टनर प्रजननक्षम (Fertile) असते, या स्थितीला ‘पुरुष वंध्यत्व’असे म्हणतात. वंध्यत्व समस्या स्त्री, पुरुष किंवा दोघांनाही असू शकतात. ज्यामुळे मूल होण्यात अडचणी येतात.
यामुळेच फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांचीही तपासणी होणे गरजेचे असते.
पुरुष वंध्यत्व समस्या कुणाला होऊ शकते?
- वजन जास्त असेल किंवा लठ्ठपणा असलेले पुरुष
- रेडिएशन थेरपी घेतलेली असणे
- वय ४० पेक्षा जास्त असणे
- तुम्ही शिसे, कॅल्शियम, कीटकनाशके, पारा किंवा यासारख्या पर्यावरणीय घटकांच्या संपर्कात आले आहे.
- Overheating the testicles : तुम्ही अतिउष्णतेच्या ठिकाणी काम करणे, लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे, उष्ण पाण्याने अंघोळ अशा सवयीनमुळे तुमच्या टेस्टीज चे तापमान वाढवते आणि शुक्राणू मारतात.
- तुम्हाला तंबाखू, अल्कोहोल किंवा तत्सम व्यसने असतील तर.
- Poor lifestyle : अयोग्य आहाराच्या सवयी. फास्ट फूड, जंक फूड चे सेवन, व्यायामाचा अभाव.
- दीर्घकाळ चिंता, नैराश्य, ताणतणाव अनुभवत असाल तर.
- वासेक्टॉमी, स्क्रोटल, प्रोस्टेट, टेस्टिक्युलर किंवा पोटाच्या मोठ्या सर्जरी झालेल्या असल्यास
- स्टिरॉइड चा वापर केलेली औषधे, कॅन्सर ची औषधे आणि उपचार, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी, अल्सर किंवा संधिवाताची औषधे घेतलेली असल्यास.
- इरेक्टाइल डिसफंक्शन, वेदनादायक संभोग, लैंगिक संबंधात व्यत्यय आणणाऱ्या मानसिक समस्या असल्यास.
पुरुष वंध्यत्वाची कारणे कोणती असू शकतात?
- स्पर्म काउंट संबंधित स्पर्म ऍबनॉर्मलिटीज : ड्राय इजॅक्युलेशन समस्या (Aspermia), सीमेन मध्ये शुक्राणूंची संख्या शून्य असेल (Azoospermia), विर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणे (low sperm count/ oligospermia), वीर्याचे प्रमाण कमी असेल, तर वंध्यत्व येऊ शकते.
- स्पर्म मोटिलिटी (हालचाल ) संबंधित स्पर्म ऍबनॉर्मलिटीज : वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या जास्त असून फायदा नाही, तर शुक्राणूंची हालचाल आणि पुढे प्रवास करण्याची गती चांगली असणे गरजेचे असते. तरच स्पर्म आणि एग्ज यांचे फर्टिलायझेशन होऊ शकते. जेव्हा सीमन चा वोल्युम, शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची रचना नॉर्मल असते परंतु सर्वांच्या सर्व स्पर्म अचल/इमोटाईल असतील (Asthenozoospermia), किंवा एकाच जागी व्हायब्रेट करीत असतील तर असे शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहचू शकत नाहीत. आणि वंध्यत्व समस्या निर्माण होते. यालाच ‘इमोटाईल सिलिया सिंड्रोम’ म्हणतात. याशिवाय जेव्हा वीर्यातील सर्व स्पर्म मेलेले (dead) असतील तरी वंध्यत्व येते. याला (Necrozoospermia) म्हणतात.
- स्पर्म मॉर्फोलॉजी (रचना) संबंधित स्पर्म ऍबनॉर्मलिटीज : जेव्हा शुक्राणूंना एकापेक्षा जास्त डोकी किंवा एकापेक्षा जास्त शेपट्या असतात, डोके लहान-मोठे-पातळ-वाकडे असेल किंवा मानेत डोके असेल तर असे अपंग शुक्राणु स्त्रीबीज फर्टाईल करू शकत नाही. या स्पर्म ऍबनॉर्मलिटी ला (Teratozoospermia) म्हणतात.
- इतर स्पर्म ऍबनॉर्मलिटीज : हे जेव्हा स्पर्म ची मोटिलिटी, मॉर्फोलॉजी ऍबनॉर्मल असेल, संख्या कमी असेल (OAT-Oligoasthenoteratozoospermia), वीर्यमध्ये पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण जास्त असेल ल्यूकोसाइटोस्पर्मिया (Leukocytospermia) तरी फर्टिलायझेशन समस्या दिसून येतात.
- व्हॅरिकोसेल (Varicocele) : व्हॅरिकोसेल्स म्हणजे टेस्टीज वरील नसांना सूज येते. व्हॅरिकोसेल्समुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.
- इन्फेक्शन्स : गनोरिया, एच.आय.व्ही., एपिडिडायमिस, एपिडिडाइमिटिस, ऑर्किटिस अशा इन्फेक्शन्स आणि व्हायरसेस मुळे स्पर्म प्रोडक्शन कमी होऊन स्पर्म ची संख्या कमी होते, स्पर्म्स ची क्वालिटी खराब होते, तसेच स्पर्म्स वाहून नेणारी नस ब्लॉक होऊ शकते, तसेच कायमस्वरूपी टेस्टिक्युलर डॅमेज देखील होऊ शकते. यामुळे पुरुष वंध्यत्व समस्या निर्माण होते.
- रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन (Retrogred Ejaculation) : सेक्श्युअल इंटरकोर्स च्या वेळी वीर्य बाहेर येण्याऐवजी युरिनरी ब्लॅडर मध्ये जाते. यालाच प्रतिगामी स्खलन म्हणतात. स्पायनल सर्जरीज, ब्लॅडर सर्जरीज किंवा इतर आजारांमुळे रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्या उद्भवते. यामुळे वंध्यत्व समस्या उद्भवते.
- शुक्राणूंवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज : अँटीस्पॅर्म-अँटीबॉडी हि रोगप्रतिकारक सिस्टीम जेव्हा उलट कार्य करू लागते तेव्हा शुक्राणूंना हानिकारक समजून शुक्राणूंवर अटॅक करते. त्यामुळे स्पर्म क्वालिटी आणि काउंट वर परिणाम होतो.
- खाली उतरलेले अंडकोष : काही पुरुषांमध्ये जन्मतः दोष असतो. गर्भात विकास होत असताना टेस्टिकल्स पोटातून उतरून स्क्रोटम मध्ये येत नाहीत. त्यामुळे वंध्यत्व समस्या येते.
- CF (cystic fibrosis and infertility) : स्पर्म्स वाहून नेणारी नलिका म्हणजेच व्हास डिफरेन्स (CBAVD) नसणे या जन्मजात दोषामुळे पुरुष वंध्यत्व येते. पुरुष वंध्यत्वाच्या एकूण केसेस मध्ये ९७-९८% पुरुषांना हि समस्या असते.
- पिट्युटरी ट्युमर : पिट्युटरी ग्लॅन्ड पुनरुत्पादक हार्मोन्स ची निर्मिती करीत असते. पिट्युटरी ग्लॅन्ड जवळ झालेला कॅन्सरस किंवा नॉन कॅन्सरस ट्युमर मुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. याशिवाय कॅन्सर वर उपचार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या किमो थेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी यांमुळे प्रजनन क्षमता घटते.
- हार्मोनल इम्बॅलन्स आणि इंडोक्राइन डिसऑर्डर : low testosterone infertility हायपोथॅलॅमस, पिट्यूटरी, थायरॉईड आणि adrenal ग्लॅण्ड यांच्यातील ऍबनॉर्मलिटीज मुळे वंध्यत्व समस्या निर्माण होते. लो टेस्टेस्टेरॉन (हायपोगोनॅडिझम), अँड्रोजिन या पुरुष हार्मोन्स च्या असंतुलनामुळे वंध्यत्व समस्या निर्माण होऊ शकते.
- क्रोमोसोम डिफेक्ट : वंध्यत्वाशी संबंधित अनुवांशिक सिंड्रोममध्ये सिस्टिक फायब्रोसिस, कॅल्मन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम (ज्यामध्ये XXY गुणसूत्र एकत्र येते) अशा अनुवांशिक दोषांमुळे वंध्यत्व समस्या येऊ शकते.
- सेलिआक रोग (Celiac disease) : सेलियाक रोग हा एक पाचक विकार आहे जो गव्हामध्ये ग्लूटेन नावाच्या प्रथिनाच्या संवेदनशीलतेमुळे होतो. ही स्थिती पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकते.
पुरुष वंध्यत्वाचे निदान कसे केले जाते?
बऱ्याचदा पुरुष वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंशी संबंधित असते. निदान करताना तुमची केस हिस्टरी आणि शारीरिक चाचण्या या दोन प्रकारे केले जाते.
- केस हिस्टरी : यावेळी डॉक्टर तुमच्या आरोग्याविषयी आणि तुमची प्रजनन क्षमता कमी करू शकतील अशा घटकांविषयी जाणून घेतात.
- पूर्वी असलेले आजार व आजारांसाठी घेतलेल्या ट्रीटमेंट
- पूर्वी झालेल्या सर्जरी
- हार्मोनल लक्षणे
- अपघात
- गालगुंड, मधुमेह आणि स्टिरॉइड्स
- अल्कोहोल, तंबाखू इ. व्यसने
- रेडिएशन, जड धातू किंवा कीटकनाशकांशी संपर्क
- लैंगिक कार्याचा इतिहास
- गर्भधारणेसाठी केलेले प्रयत्न इ.
- सीमेन अनालिसिस : म्हणजेच वीर्य विश्लेषण हि बेसिक टेस्ट पुरुष वंध्यत्वाचे निदान करण्यासाठी केली जाते. यामध्ये शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंचे प्रोडक्शन, शुक्राणूंची हालचाल आणि गती, शुक्राणूंची रचना, स्पर्म कॉन्सन्ट्रेशन, वीर्यातील इन्फेक्शन्स, स्पर्म ची सर्वाइव्ह करण्याची क्षमता, बीज फर्टीलाइज करण्याची क्षमता तपासली जाते. योग्य निदानानुसार योग्य उपचार करता येऊ शकतात.
- ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड : वीर्य वाहून नेणाऱ्या नलिका म्हणजेच स्खलन नलिका किंवा सेमिनल वेसिकल्स खराब आहेत का? ब्लॉकेजेस आहेत का हे तपासण्यासाठी रेक्टम (गुदाशय) वरती प्रोब ठेवून सोनोग्राफी केली जाते.
- स्क्रोटल अल्ट्रासाऊंड : अंडकोष आणि सपोर्टिंग स्ट्रक्चर्समध्ये व्हॅरिकोसेल किंवा इतर समस्या आहे का हे तपासण्यासाठी स्क्रोटल अल्ट्रासाऊंड केले जाते.
- हार्मोनल टेस्ट्स hormonal test for male infertility : टेस्टेस्टेरॉन, ल्युटेनायझिंग हार्मोन (LH), फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), प्रोलॅक्टिन, थायरॉईड (TSH), कॉर्टिसॉल, ऑब्स्टरेडिओल असे हार्मोन्स जे लैंगिक कार्याशी संबंधित असतात त्यांची पातळी ब्लड सॅम्पल घेऊन तपासली जाते. blood test for male fertility.
- युरीन अनालिसिस : युरीन मध्ये शुक्राणू आढळून आल्यास रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन चे निदान करता येते.
- जेनेटिक टेस्ट : स्पर्म कॉन्सन्ट्रेशन अत्यंत कमी असते तेव्हा ‘Y’ क्रोमोसोम मध्ये सूक्ष्म बदल असण्याची शक्यता असते. तेव्हा हि ब्लड टेस्ट केली जाते.
- टेस्टिक्युलर बायोप्सी : स्क्रोटल मध्ये सुई टाकून नमुना घेतला जातो. शुक्राणूंची संख्या तपासण्यासाठी हि टेस्ट केली जाते.
- सीमेन कल्चर : इन्फेक्शन्स शोधण्यासाठी सीमेन कल्चर टेस्ट केली जाते.
पुरुष वंध्यत्वावर कोणत्या उपचार पद्धती असतात?
- मेडिकेशन्स : वीर्यात पस सेल्स आढळून आल्यास इन्फेक्शन्स असल्याचे समजते. अशा इन्फेक्शन्स साठी, हार्मोनल इम्बॅलन्स समस्या, हायपर प्रोलॅकःटोनेमिया यासाठी औषधोपचार केले जातात.
- सर्जरी : treatment for azoospermia व्हास डिफरेन्स म्हणजेच स्पर्म वाहून नेणारी नलिका ब्लॉक असेल, किंवा व्हेरिकोसिल समस्या असेल तर सर्जरी केली जाते. ज्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया च्या केसेस मध्ये सर्जरी केल्यास सीमेन मध्ये स्पर्म्स आढळून येतात.
- व्हॅरिकोसेलेक्टोमी सर्जरी केल्यास तुमच्या स्क्रोटममध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करून प्रजनन क्षमता वाढविण्यात मदत करू शकते, ज्यामुळे शुक्राणू आणि टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढू शकते. तुमची प्रजनन क्षमता किती सुधारते हे पाहण्यासाठी तुमचे डॉक्टर वीर्य विश्लेषण करतील.
- IUI : स्पर्म ऍबनॉर्मलिटीज असतील, सीमेन इन्फेक्शन्स असतील किंवा स्पर्म मोटिलिटी कमी असेल तर अशा केसेस मध्ये IUI चा पर्याय सुचविला जातो. यामध्ये स्पर्म कलेक्ट करून स्पर्म वॉशिंग केले जाते. यामुळे इन्फेक्शन्स राहत नाही आणि पोषण देखील पुरविले जाते. त्यानंतर स्त्री च्या गर्भाशयात स्पर्म इंजेक्ट करून शुक्राणूंचा स्त्रीबीजापर्यंतचा प्रवास कमी केला जातो.
- ART (Assisted reproductive techniques) : जेव्हा IUI आणि इतर बेसिक ट्रीटमेंट ला यश मिळत नाही तेव्हा, IVF, ICSI, IMSI अशा आधुनिक पुनरुत्पादक तंत्रांचा वापर करून गर्भधारणा शक्य आहे.
- IVF : लॅब मध्ये स्पर्म आणि स्त्रीबीज फर्टाईल करून गर्भ बनवतात आणि हा गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करतात.
- IVF-ICSI : जेव्हा स्पर्म स्त्रीबीज फर्टाईल करू शकत नाही जेव्हा इंट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) च्या मदतीने स्त्रीबीजामध्ये स्पर्म इंजेक्ट करून गर्भ बनविला जातो.
- स्पर्म रिट्रायवल टेक्निक : ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया केसेस मध्ये TESE, मायक्रो TESE, TESA, PESA, MESA या आधुनिक पद्धतींचा वापर करून स्पर्म कलेक्ट केले जातात आणि IVF करून गर्भधारणा शक्य आहे.
- रेक्टल प्रोब इलेक्ट्रोइजेक्युलेशन : स्पायनल कॉर्ड समस्या असल्यास या पद्धतीने भूल देऊन स्पर्म कलेक्शन केले जाते.
- ड्राय इजॅक्युलेशन समस्या असल्यास औषधोपचार किंवा सर्जरी हा पर्याय असतो. ड्राय इजॅक्युलेशनचे कारण काय आहे त्यानुसार उपचार केले जातात.
- हायपोगोनाडोट्रॉपिक/हायपोगोनाडिझम केसेस मध्ये पिट्युटरी ग्लॅन्ड चे कार्य बिघडल्यामुळे स्पर्म्स प्रोडक्शन होऊ शकत नाही. या समस्येचे कारण ट्युमर असल्यास सर्जरी केली जाते. ट्युमर नसेल तर गोनाडोट्रॉपिन रिप्लेसमेंट थेरपी देखील डॉक्टर सुचवू शकतात.
- oligospermia treatment : वेरिकोसिल सर्जरी, मेडिकेशन्स, राहणीमानात सुधारणा करून (लाइफस्टाइल मॉडिफिकेशन), हार्मोनल उपचार किंवा ART तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑलिगोस्पर्मीय किंवा लो स्पर्म काउंट सह गर्भधारणा शक्य आहे.
- asthenospermia treatment : यामध्ये स्पर्म जिवंत असतात पण अजिबात हालचाल करू शकत नसल्यामुळे स्त्रीबीज फर्टाईल करू शकत नाहीत. तेव्हा IVF-ICSI हा बेटर ऑप्शन असतो.
- asthenoteratozoospermia treatment : यामध्ये स्पर्म मोटिलिटी, मॉर्फोलॉजी खराब आणि स्पर्म काउंट देखील कमी असतो. राहणीमानात बदल करून, व्यसने सोडून आणि औषधोपचारानेही रिझल्ट मिळू शकतो. किंवा IUI, IVF, ICSI अशा ऍडवान्सड फर्टिलिटी ट्रीटमेंट ने गर्भधारणा शक्य आहे.
पुरुष वंध्यत्वाबद्दल अधिक विचारले जाणारे प्रश्न:
मेल इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट कुठे घ्यावी?
उत्तर : फर्टिलिटी सेंटर मध्ये महिला आणि पुरुष दोघांचेही उपचार शक्य आहे. एकाच छताखाली सर्व बेसिक आणि आधुनिक उपचार पुरविणारे आणि एक्स्पर्ट फर्टिलिटी तज्ज्ञ असलेल्या सेंटर ची निवड केल्यास नक्कीच यश मिळू शकते.
मेल इन्फर्टिलिटी टेस्ट साठी किती खर्च येतो?
उत्तर : सुरुवातीला डॉक्टर केस हिस्टरी घेऊन वंध्यत्वाची समस्या काय असेल याविषयी अंदाज बांधतात आणि गरजेनुसार वेगवेगळ्या टेस्ट्स सुचविल्या जातात. बेसिक टेस्ट मध्ये अल्ट्रासाउंड आणि सीमेन अनालिसिस टेस्ट केली जाते. तर गरजेनुसार ऍडवान्सड टेस्ट केल्या जातात.
मेल इन्फर्टिलिटी वाढवण्यासाठी काय करावे?
उत्तर : मेल इन्फर्टिलिटी वाढवण्यासाठी अल्कोहोल, तंबाखू आदींचे सेवन टाळावे. हिरव्या भाज्या, शेंग भाज्या, स्प्राऊट्स, केळी, अक्रोड, बेरीज, अंजीर यांसारखी ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. पुरेसा व्यायाम करावा. भरपूर पाणी प्यावे. टेस्टीज चे तापमान कमी ठेवावे.