लेप्रोस्कोपी ही एक क्रांतिकारक उपचार पद्धती आहे. ज्यामध्ये पोटातील अवयव/पुनरुत्पादक अवयव (रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन) पाहण्याचा मार्ग मिळतो. ही पद्धती वापरून निदान आणि उपचार दोन्हीही केले जाते. त्यामुळे लॅप्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीक सर्जरी यामध्ये अंतर आहे. लॅप्रोस्कोपी ही एक सुरक्षीत प्रक्रिया आहे. IVF उपचारासाठी तुम्ही सेंटर ची निवड करता तेव्हा, त्या सेंटर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता महत्त्वाची असते. त्याचाच एक भाग म्हणून लॅप्रोस्कोपीची यशस्वी गर्भधारणेतील भूमिका जाणून घेणार आहोत.
लेप्रोस्कोपी ची गर्भधारणेतील भूमिका
आई होण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल, तुम्ही IVF उपचार घेत असाल किंवा तुम्हाला वारंवार IVF फेलियर चा अनुभव असेल, वारंवार ऍबॉर्शन होत असतील, तर अशा वेळी लॅप्रोस्कोपी चा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा विविध तपासण्या आणि अल्ट्रासाउंड करून देखील समस्येचे निदान (डायग्नोसिस) होत नाही. अशा वेळी लॅप्रोस्कोपी हा पर्याय वापरला जातो. लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून पोटातील स्थितीची सूक्ष्म पाहणी करता येते. अल्ट्रासाउंड, सोनोग्राफी यामध्ये लक्षात न येणारे दोष/बिघाड लॅप्रोस्कोपी शोधू शकते. या प्रक्रियेमध्ये एक बायनॉक्युलर नीडल पोटात टाकली जाते आणि प्रॉब्लेम शोधला जातो. ज्या केसेस मध्ये IVF पूर्वी लॅप्रोस्कोपी केलेली असते त्या केसेस मध्ये उत्तम रिझल्ट बघायला मिळतो.
वंध्यत्वासाठी लेप्रोस्कोपी चे फायदे काय आहेत?
१) | फायब्रॉईड च्या गाठी | गर्भाशयाला जर फायब्रॉईड च्या गाठी असतील आणि ती गाठ एन्डोमेट्रियम (गर्भाशयाच्या आतील अस्तर) मध्ये विकृती आणत असेल तर अशा वेळी लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी करून गाठी काढून टाकता येतात. |
२) | अडेनोमायोसीस | याचेही निदान लॅप्रोस्कोपीत केले जाते. गर्भाशयाला सूज असेल तर अस्तर (एन्डोमेट्रियम) व्यवस्थित बनत नाही. गर्भ रुजण्यात अडचणी येतात. ऍबॉर्शन ची स्थिती निर्माण होते. अशा वेळी लॅप्रोस्कोपीचं मदतीने डिबलकिंग सर्जरी करून गर्भाशयाची सूज कमी केली जाते. |
३) | हायड्रोसल्पिनक्स | म्हणजे गर्भाशयाच्या नळीत पाणी असणे. हे पाणी गर्भाशयात झिरपल्यास गर्भ रुजण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी IVF फेल होते. अशा केसेस मध्ये डीलिंकींग सर्जरी लॅप्रोस्कोपीच्या मदतीने करून गर्भधारणेचा मार्ग खुला होतो. |
४) | एन्डोमेट्रिओसिस | गर्भाशयातील अस्तर जाड असल्यास गर्भधारणेत अडथळे येतात. |
५) | ओरॅरियन सिस्ट | पीसीओडी किंवा पीसीओएस च्या रुग्णांमध्ये अंडाशयात सिस्ट साचून राहतात. मल्टिपल फॉलिकल्स असतात. अशा वेळी लॅप्रोस्कोपिक ओव्हरीयन ड्रिलिंग केले जाते. त्यामुळे गर्भधारणेचे चान्सेस वाढतात. |
६) | अधेशन्स | पोटातील दोन अवयव चिटकलेले असल्यास असे अधेशन्स लॅप्रोस्कोपीने काढून टाकले जातात. |
७) | ब्लॉक फॉलिकल ट्यूब | फॉलिकल ट्यूब ब्लॉक असतील तर त्या लॅप्रोस्कोपीने मोकळ्या करता येतात. यामुळे फॉलोकल ट्यूब होणारा फर्टिलायझेशन चा मार्ग खुला होतो. |
लेप्रोस्कोपी प्रक्रिया कशी केली जाते?
लॅप्रोस्कोपी प्रक्रियेसाठी जे उपकरण वापरले जाते त्याला ड्रिल (एक लांब कांडी) बसवलेली असते. बेंबी जवळ १ सेमी पेक्षा लहान असा छेद देऊन हि कांडी आत टाकली जाते. सर्वप्रथम पोटात गॅस (कार्बन डाय ऑक्साइड) भरला जातो, ज्यामुळे पोट फुगते आणि सर्व अवयव स्पष्टपणे दिसू लागतात. या कांडीला एक लहानसा कॅमेरा (टेलिस्कोप) आणि सोबतच लाईट बसविलेला असतो. ज्यामुळे पोटातील चित्रे कॉम्प्युटर वर स्पष्टपणे पाहता येतात. लॅप्रोस्कोपी प्रक्रिया झाल्यानंतर वॉटरप्रूफ ड्रेससिंग केली जाते.
लेप्रोस्कोपी निदान प्रक्रिया : लॅप्रोस्कोपी चे निदान करताना पोटातील चित्रे (इमेजेस) संकलित केली जातात. काही वेळा टिश्यू (ऊतींचे) चे सॅम्पल कट करून तपासणीसाठी दिले जातात. तर काही प्रकरणात एखादा अवयव काढून तो देखील तपासणीसाठी पाठविला जातो.
लेप्रोस्कोपी उपचार प्रक्रिया : बऱ्याच वेळा डिग्नोसिस करतेवेळी काही किरकोळ समस्या दिसल्यास त्यावर लगेचच उपचार केला जातो. जसे कि लहान शी गाठ असेल तर ती बर्न करणे किंवा दोन अवयव चिटकलेले असतील तर ते वेगळे करणे असा उपचार लागलीच केला जातो आणि त्याचा पॉसिटीव्ह रिझल्टही मिळतो.
लेप्रोस्कोपी म्हणजे काय?
‘लॅपरो’ म्हणजे ‘शरीर’. आणि ‘स्कोपी’ म्हणजे ‘बघणे’. शरीरातील प्रामुख्याने पोटातील अवयव तपासणे, पोटातील आजार किंवा बिघाड यांचे निदान करणे अथवा केलेल्या डायग्नोसिस नुसार लहान-मोठी शस्त्रक्रिया करणे म्हणजे लॅप्रोस्कोपी होय. पोटातील अवयवांत झालेला बिघाड तपासण्यासाठी बेंबीजवळ १ सेमी पेक्षा कमी चीर पाडली जाते. लॅप्रोस्कोपचे मशीन ला लावलेली कांडी आत टाकली जाते आणि पोटातील अनेक अवयवांची स्थिती पाहून निदान केले जाते. जसे की,
१) अन्न नलिका २) पॅनक्रियाज (स्वादुपिंड) ३) लिव्हर (पित्ताशय) ४) अपेंडिक्स ५) इन्टेस्टाईन (आतडे) ६) ब्लॅडर (मूत्राशय) ७) किडनी (मूत्रपिंड) ८) युटेरस (गर्भपिशवी) ९) (ओव्हरीज) अंडाशय १०) इतर रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन ११) हर्निया इ.
लेप्रोस्कोपीक सर्जरी म्हणजे काय? (laparoscopic surgery in Marathi)
‘लॅप्रोस्कोपीक सर्जरी’ ला ‘की होल सर्जरी’ (Fertility surgery) असेही म्हटले जाते. कारण पोटावर लहानसा छेद देऊन ही सर्जरी केली जाते. ५ मिमी पासून ते १ सेमी एवढा छेद दिला जातो. या छेदांची संख्या एकापेक्षा जास्तही असू शकते. स्वयंपाक घरात चाकूने लागल्यानंतर जेवढी जखम होते साधारण तेवढाच छेद दिला जातो. लॅप्रोस्कोपिक प्रक्रिया सुरु असताना रुग्णाकडे पहिले जात नाही, तर कॉम्प्युटर वर पोटातील जी स्थिती दिसत असते (मॅटलीफाईड व्ह्यू) त्याकडे पाहून शस्त्रक्रिया केली जाते. लॅप्रोस्कोपिक सर्जरी करताना पोटात टाकल्या जाणाऱ्या ड्रिल ला गरजेनुसार छोटे-छोटे इंस्ट्र्युमेंट वापरून शास्त्रक्रियेसंबंधी काही प्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये कापणे, शिवणे, हाताळणे यांचा समावेश होतो. शिवाय वापरले जाणारे इंस्ट्र्युमेंट अगदी छोटे आणि पातळ असे असतात आणि अल्हाददायक उपचार केले जाऊ शकतात. इतर शास्त्रक्रियेप्रमाणेच लॅप्रोस्कोपी करताना भूल (अनेस्थेशिया) दिली जाते.
लॅप्रोस्कोपी का केली जाते?
लॅप्रोस्कोपी ची गरज कुणाला असते?
१) | वंध्यत्व (इन्फर्टिलिटी) केसेस | बऱ्याचदा इन्फर्टिलिटी च्या केसेस मध्ये लॅप्रोस्कोपी ही एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असू शकते. ज्यामध्ये संपूर्ण पोटातील स्थितीचे निदान व उपचार केले जातात आणि गर्भधारणेसाठी सुयोग्य स्थिती निर्माण होते. IVF फेलियर देखील टाळता येते. |
२) | HSG (हिस्टेरोसालपिंगोग्राफी) | या तपासणीत युटेरियन आणि फेलोपियन ट्यूब ची स्थिती पहिली जाते. HSG रिपोर्ट पॉसिटीव्ह असेल तर कन्फर्मेशन साठी लॅप्रोस्कोपी करण्याचा सल्ला दिला जातो. काही वेळा HSG पॉसिटीव्ह रिपोर्ट लॅप्रोस्कोपीत निगेटिव्ह येतो. किंवा पॉसिटीव्ह असेल तरी लॅप्रोस्कोपी दरम्यान उपचार करून समस्या सोडविली जाते. |
३) | अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी | जेव्हा काही केसेस मध्ये सर्व तपासण्यांचा रिपोर्ट नॉर्मल आहे, तरीदेखील अनेक वर्षे बाळ होऊ शकत नाही अशा केसेस ला अनेक्सपेक्टेड इन्फर्टिलिटी म्हटले जाते. अशा वेळी लॅप्रोस्कोपी च्या साहाय्याने सूक्ष्म तपासणी आणि बारीक-सारीक उपचार केले जातात. ज्यामुळे पॉसिटीव्ह रिझल्ट मिळतो. |
४) | अधेशन्स (Adhesions) | यामध्ये दोन अवयव चिटकलेले असतात. बऱ्याचदा अल्ट्रासाउंड मध्येही हि समस्या दिसून येत नाही. |
५) | एन्डोमेट्रिओसिस | पेल्विक, ओवारीस याच्या आजूबाजूला गाठी होणे. यामध्ये गर्भाशयातील टिश्यू गर्भाशयाबाहेर वाढू लागतात. |
६) | हायड्रोसल्पिनक्स | नळीत पाणी असल्यास. |
७) | युटेरस फायब्रॉईड | गर्भाशयाला गाठी असल्यास. |
लॅप्रोस्कोपी चे प्रकार
- टेलिस्कोपिक रॉड लेन्स प्रणाली : सामान्यतः व्हिडिओ कॅमेराशी जोडलेली असते (सिंगल-चिप सीसीडी किंवा थ्री-चिप सीसीडी)
- डिजिटल लॅपरोस्कोप : जिथे लॅपरोस्कोपच्या शेवटी एक लघु डिजिटल व्हिडिओ कॅमेरा ठेवला जातो, रॉड लेन्स सिस्टम काढून टाकतो.
लॅप्रोस्कोपी सर्जरी आणि ओपन सर्जरी मधील फरक काय?
पूर्वीच्या काळी तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ओपन सर्जरी केली जात होती. यामध्ये रुग्णाच्या पोटावर ८ ते १० सेंटीमीटर कट देऊन, जवळजवळ पूर्ण पोट उघडून शस्त्रक्रिया केली जात होती. हाताने अवयव बाजूला करून डोळ्यांनी हि शस्त्रक्रिया पूर्ण केली जात असे. साहजिकच मोठी शस्त्रक्रिया म्हणून रुग्णाला अधिक काळ बेड रेस्ट घ्यावी लागत असे. मात्र आता लॅप्रोस्कोपीस सर्जरी मुळे सूक्ष्म निरीक्षण, निदान आणि यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. यामध्ये रुग्णाला ऍडमिट होण्याची गरज नसते.
लॅप्रोस्कोपी बद्दल सर्वाधिक सर्च केले जाणारे प्रश्न:
१) लॅप्रोस्कोपी निदानासाठी/तपासणी साठी किती वेळ लागतो?
उत्तर : लॅप्रोस्कोपी डायग्नोसिस साठी ३० ते ४० मिनिटे अवधी पुरेसा असतो.
२) लॅप्रोस्कोपीक सर्जरी साठी किती वेळ लागतो?
उत्तर : लॅप्रोस्कोपीक सर्जरी साठी लागणार वेळ गरजेनुसार कमी-जास्त असू शकतो.
३) लॅप्रोस्कोपीक सर्जरी वेदनादायी असते का?
उत्तर : लॅप्रोस्कोपी प्रक्रिया सामान्य भूल देऊन केली जाते. त्यामुळे वेदनादायी नसते. सर्जरी नंतर औषधे दिली जातात.
४) लॅप्रोस्कोपी नंतर काय काळजी घ्यावी?
उत्तर : लॅप्रोस्कोपी नंतर चालणे आणि हॅन्ड मुव्हमेंट, लेग मुव्हमेंट असे साधे व्यायाम करावेत. वजन उचलणे टाळावे. वॉटरप्रूफ ड्रेसिंग केल्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच अंघोळ करू शकता.
५) लॅप्रोस्कोपी साठी ऍडमिट होणे गरजेचे असते का?असते का?
उत्तर : सर्वसाधारण केसेस मध्ये ऍडमिट होण्याची गरज नसते. कारण छोटासा छेद देऊन सर्जरी केली जात असल्यामुळे जास्त गुंतागुंत नसते. किरकोळ केस मध्ये २४ तासांहून अधिक वेळ ऍडमिट केले जाऊ शकते.
६) लॅप्रोस्कोपी शिवाय आय.व्ही.एफ. करता येते का?
उत्तर : केस कॉम्प्लिकेटेड नसल्यास लॅप्रोस्कोपी शिवाय IVF करता येते आणि ते यशस्वी होते. मात्र IVF फेलियर, ऍबॉर्शन, वंध्यत्व, मिसकॅरेज अशी हिस्टरी असेल तर लॅपट्रोस्कोपी करणे फायदेशीर ठरते.