लग्नाला १ वर्ष झाले पण गर्भधारणा होत नाही, म्हणून चिंतीत आहात? काळजी करण्याचे कारण नाही. सर्वप्रथम तुम्ही करीत असलेले प्रयत्न प्रमाणित आहेत किंवा नाही हे आधी जाणून घ्या. म्हणजे नेमके काय?
… गर्भधारणेसाठी योग्य वेळी म्हणजेच ओवुलेशन काळात इंटरकोर्स होणे महत्त्वाचे आहे. सोबतच योग्य आहार, व्यायाम आणि तणावरहित जीवनशैलीच अवलंब केल्यास रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम चे कार्य अगदी सुरळीतपणे चालते. स्त्रीबीजांची व्यवस्थित वाढ होते, फलन होते, गर्भाशयाचे अस्तर व्यवस्थित बनते, शुक्राणूंची क्वालिटी सुधारते आणि योग्यरीत्या फर्टिलायझेशन होऊन गर्भाधान आणि गर्भधारणा होते.
जेव्हा योग्य आहार-विहारासह स्वस्थ जीवनशैलीचा अवलंब करून आणि ओव्यूलेशन काळात इंटरकोर्स करूनदेखील १ वर्षभर गर्भधारणा झाली नाही तर, समजावे की तुम्हाला वंध्यत्व समस्या आहे आणि त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांकडून महिला आणि पुरुष जोडीदाराचे चेक-अप करणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिने प्रयत्न करूनदेखील गर्भधारणा होत नसेल तर हीदेखील वंध्यत्व स्थिती आहे. फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन गरजेचे आहे.
लवकरात लवकर यशस्वी गर्भधारणा हवी असेल तर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ ला भेट द्या. येथील अनुभवी-विशेषज्ञ वंध्यत्व डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार प्रत्येक जोडप्याचे परिपूर्ण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत. ‘प्रोजेनेसिस’ च्या सौजन्याने आजवर हजारो जोडप्यांना मातृ-पितृ बनण्याचे सौभाग्य लाभलेले आहे. तेव्हा तुम्हीही आजच अपॉइंटमेंट बुक करा.
Table of Contents
प्रयत्न करूनदेखील गर्भधारणा होत नाहीये ? मग ‘हे’ करा.
१) योग्य फर्टिलिटी सेंटर ची निवड करा.
तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने कुटुंब सुरू करण्यासाठी फर्टिलिटी क्लिनिकची मदत घेण्याचे ठरवले आहे? मग तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. यशस्वी गर्भधारणेसाठी सुयोग्य आणि अधिक सक्सेस रेट असलेले सेंटर निवडणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही तुमची मदत करू शकतो.
योग्य क्लिनिक ची निवड करताना खालील गोष्टी बारकाईने पडताळून घ्या.
- सक्सेस रेट : यशदर उच्च असावा.
- सक्सेस स्टोरीज : तुमच्याशी मिळत्या जुळत्या सक्सेस स्टोरी सोशल मीडियावर बघा.
- लोकेशन : क्लिनिक दूरचे असले तरी हरकत नाही. परंतु पॉजिटीव्ह रिझल्ट मिळणे गरजेचे आहे.
- वेबसाइट : वेबसाईट चेक करा. क्लिनिक मध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत का, कोणते ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, डॉक्टरांचे शिक्षण आणि अनुभव यांसारखी सर्व माहिती मिळवा.
- गूगल रिव्ह्यू : रेटिंग तपासून घ्या.
- अनुभवी आणि विशेषज्ञ डॉक्टर्स असावेत.
- क्लिनिक मध्ये डाएटिशियन, कौन्सिलर असावेत.
- EMI सुविधा असाव्यात.
- सर्व सुविधा (टेस्ट्स, ट्रीटमेंट्स) एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात.
२) फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करा.
जर तुम्ही जीवनशैलीत बदल केले असतील आणि तरीदेखील गर्भाधान होत नसेल तर फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करून घेण्याची वेळ आलेली आहे. फर्टिलिटी डॉक्टर ‘बेबी मेकिंग एक्स्पर्ट’ आणि ‘फर्टिलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ’ असतात. बाळ होण्यात काय अडचण आहे हे हुडकून काढून तुमच्या गर्भधारणेत तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि पर्सनलाईज ट्रीटमेंट योजना सुचवतात. ज्यामुळे गर्भधारणेचे चान्सेस अनेक पटींनी वाढतात. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये वंध्यत्व जोडप्यांचे मोफत कन्सल्टेशन केले जाते. पुढे जाऊन या जोडप्यांना निश्चितपणे आई-बाबा बनण्याचे सुख मिळते.
३) गर्भधारणेतील अडचणी जाणून घेण्यासाठी सखोल तपासणी करून घ्या.
प्रजनन तज्ज्ञांना भेट दिल्यानंतर, तुम्हाला काही चाचण्या करण्यास सांगितले जाईल. तुमच्या चाचणी परिणामांवर आधारित, तुमचे जननक्षमता तज्ञ तुम्हाला पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग सुचवतील.
प्रत्येक जोडप्याला सर्वांच्या सर्व तापसण्या करण्याची आवश्यकता नसते. तुमची घेतलेली केस हिस्टरी, इतर आजार, पूर्वी झालेल्या सर्जरी, वंध्यत्वाचा काळ आणि वंध्यत्वाचा प्रवास यानुसार डॉक्टर तुम्हाला तपासण्या सुचवतात.
४) गरजेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्जिकल उपचार करून घ्या.
तपासणी मध्ये मिळालेल्या परिणामांनुसार वंध्यत्व समस्या दूर करण्यासाठी गरजेनुसार सर्जिकल उपचार केले जातात.
- हिस्टेरोस्कोपी : गर्भाशयाच्या अस्तराची जाडी तपासणे, असामान्य रक्तस्त्राव तपासणे, गर्भाशयाचा आकार (shape & size) तपासला जातो. याचवेळी गर्भाशयाचे लहान फायब्रॉईड, पॉलीप्स हटवले जातात.
- लॅप्रोस्कोपी : हि एक कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपीचा वापर करून अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा तपासता येते. याचवेळी ओवरियन सिस्ट आढळून आल्यास त्या काढणे, ट्युबल ब्लॉकेज काढणे, खराब ट्यूब कट करणे, गर्भाशयातील गाठी काढणे, सार्विकल फायब्रॉईड काढणे, सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस चा उपचार, अडेजन काढणे शक्य होते.
- याशिवाय फायब्रॉईड हटवण्यासाठी फोकस्ड अल्ट्रासाउंड (FUI), मायोमेक्टॉमी, एम्बोलायझेशन, MRI केले जातात.
- ट्युबल समस्यांसाठी ट्यूबल रीअनास्टोमोसिस, ट्युबल लिगेशन रिव्हर्सल सर्जरी, सल्पिन्गोक्टॉमी, फिम्ब्रिओप्लास्टी, ट्यूबल कॅन्युलेशन असे आधुनिक सर्जिकल उपचार पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांच्या मदतीने वंध्यत्व समस्या दूर होऊ शकते. आणि मातृत्वाचे मार्ग खुले होतात.
५) गर्भधारणेसाठीचे प्राथमिक आणि आधुनिक फर्टिलिटी उपचार जाणून घ्या.
प्राथमिक उपचारांमध्ये डॉक्टर तुम्हाला खालील ३ उपचार सुचवतील.
1. नैसर्गिक गर्भधारणा : डॉक्टर तुम्हाला मासिक पाळीनंतर 11-18 दिवसांनी संभोग करून नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यास सुचवतील. ओव्यूलेशन उत्तेजित करण्यासाठी आणि सोबतच गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधे देतील, फॉलिक्युलर स्टडी किंवा ओव्यूलेशन मॉनिटरिंग करून अचूक ओव्यूलेशन काळ सांगतील.
खालील प्रकरणांमध्ये तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा सुचवली जाईल
- ३५ हुन कमी वय असेल तर
- सीमेन पॅरामीटर्स म्हणजेच शुक्राणूंची गती, मॉर्फोलॉजी आणि संख्या चांगली असेल तर
- स्त्रीबीजांचा साठा आणि क्वालिटी चांगली असेल तर
- ट्युबल ब्लॉकेज, फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस अशी कोणतीही अंतर्निहित स्थिती नसेल तर
2. IUI इंट्रा युटेरियन इन्सिमिनेशन : हा एक उपचार आहे; ज्यामध्ये ओव्यूलेशन काळात निरोगी शुक्राणू थेट तुमच्या गर्भाशयात पोहचवले जातात. शुक्राणूंचा प्रवास निम्मा केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.
IUI केव्हा केले जाते?
- शुक्राणूंची कमी असल्यास
- शुक्राणूंची अनुपस्थिती असल्यास स्पर्म रिट्राईव्ह करून IUI केले जाऊ शकते.
- सार्विकल म्युकस जाड असेल किंवा इन्फेक्शन मुळे स्पर्म ला पोहून जाण्यात अडचण असेल तर,
- शुक्राणूंची सर्वायवल कॅपॅसिटी कमी असेल तर
- वंध्यत्वाचे कारण माहिती नसेल तर
- डोनर एग किंवा फ्रोजन शुक्राणूंचा वापर करायचा असेल तर.
3. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन : अंडाशयातून स्त्रीबीजे मिळवणे, शुक्राणू मिळवणे, प्रयोगशाळेत एका पेट्री ट्रे एग्ज मिसळले जातात, अशा पद्धतीने फर्टिलायझेशन होऊन बनलेले भ्रूण महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करणे अशी IVF प्रक्रिया असते.
फेलोपियन ट्यूब ब्लॉकेज, शुक्राणूंची कमी, अयशस्वी आययूआय, वारंवार मिसकॅरेज, एनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी अशा वंध्यत्वाच्या अनेक समस्या बायपास करून IVF चांगले परिणाम देऊ शकते. सर्वाधिक यशदर असलेली हि प्रक्रिया आहे.
आमच्या फर्टिलिटी विशेषज्ञ वंध्यत्व निवारण डॉ. सोनाली काय म्हणतात ऐका :