जेव्हा नैसर्गिक प्रयत्नांना यश मिळत नाही तेव्हा, IVF, IVF-ICSI, PICSI,IMSI, एम्ब्रियो ट्रान्स्फर, ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर, सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्स्फर, लेजर असिस्टेड हॅचिंग (LAH), क्रायोप्रिझर्वेशन या आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून वाढत्या वयात गर्भधारणा शक्य आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणून डोनर प्रोग्रॅम देखील उपलब्ध आहेत.
वयाच्या पस्तिशीत आई होऊ इच्छित असाल तर यशस्वी होण्यासाठी, आधुनिक सुविधांनी युक्त अशा फर्टिलिटी सेंटर ची निवड करा आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
Table of Contents
वय आणि गर्भधारणेतील समस्या यांचा संबंध
जसजसे महिलेचे वय वाढते तसतसे तिच्या अंडाशयातील स्त्रीबीजांची संख्या/साठा आणि क्वालिटी देखील खराब होऊ लागते. त्यामुळे फर्टिलायझेशनची क्षमता देखील खालावते.
- २० वर्षे वय : स्त्रीची प्रजननक्षमता ती जेव्हा 20 वर्षांची असते तेव्हा सर्वाधिक जास्त असते. तिच्या अंडाशयात असलेले 90% एग्ज हे सुस्थितीत असतात.
- २५ ते ३४ वर्षे वय : २५ ते ३४ या काळात प्रजानन क्षमतेचा दर 10 टक्क्यांनी कमी होतो. या काळात 1 वर्ष प्रयत्न करून सुद्धा गरोदर राहण्याचे चान्सेस हे फक्त 86% असतात.
- ३० किंवा त्याहून अधिक वय : वयाची 30 वर्षे पूर्ण झालेल्या स्त्रीला सुद्धा गरोदर राहण्यात जास्त अडचण येणार नाही. पण या काळात गर्भपाताची शक्यता 20 टक्क्यांनी वाढते पण वर्षभर प्रयत्न करून गरोदर राहण्याची शक्यता 80% इतकी असते.
- ३५ ते ३७ वर्षे वय : वयाची 37 वर्षे पूर्ण होण्याआधी सुद्धा स्त्री गरोदर राहण्याचा चान्स घेऊ शकते आणि यात तिला यश येऊ शकते.
- ४० किंवा त्याहून अधिक वय : वयाच्या 40 नंतर मात्र प्रजाननक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. जरी गरोदरपणाचा चान्स घेतला तरी गर्भपात होऊ शकतो किंवा जन्माला येणाऱ्या मुलामध्ये काही विकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर उशिरा आई होण्याची इच्छा असेल तर अशा स्त्रिया आईवीएफ ट्रीटमेंटचा मार्ग निवडू शकतात.
वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये होणारे बदल
पुरुषांबाबत सांगायचे झाले तर पुरुषांमध्ये वीर्य निर्मिती आणि शुक्राणू निर्मिती सतत होत राहते आणि कोटींच्या संख्येत होत राहते. परंतु; केवळ स्पर्म क्वांटिटी जास्त असून फायदा होत नाही, तर स्पर्म ची क्वालिटी, मॉर्फोलॉजि (स्पर्म दिसायला कसा आहे, त्याच्यात काय विकृती आहे), मोटिलिटी (गती आणि हालचाल) हे घटक देखील महत्त्वाचे असतात. वाढत्या वयानुसार पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता घसरत जाते. आणि स्त्रीबीजापर्यंत प्रवास करणे शक्य होत नाही. शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोचलेच तर त्यांना स्त्रीबीजात प्रवेश (पेनिट्रेट) करता येत नाही. त्यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात.
‘प्रोजेनेसिस’ चे तज्ज्ञ फर्टिलिटी डॉक्टर काय म्हणतात?
वाढत्या वयात गर्भधारणेत निर्माण होणारी आव्हाने टाळण्यासाठी डॉक्टर वयातच गर्भधारणेचा सल्ला देतात. काही केसेस मध्ये लवकर गर्भधारणा हवी नसल्यास एग फ्रिजिंग (Cryopreservation-IVF) हा उत्तम पर्याय आहे. मिसकॅरेज टाळण्यासाठी प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGD) सारख्या आधुनिक ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. वाढत्या वयात गर्भधारणेसाठी अडचणी येत असल्यास ART (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) मधील IUI, IVF, ICSI या प्रचलित उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
स्त्रियांनी ३५ वयापर्यंत आणि पुरुषांनी ४० वयापर्यंत गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे योग्य आणि फायद्याचे ठरते. जर तुमचं वय जास्ती असेल तर तुम्हाला गर्भधारणेसाठी फर्टिलिटी उपचारांची गरज लागू शकते.
३५ व्या वर्षी गर्भधारणेसाठी फर्टिलिटी उपचार
IUI : आययूआय म्हणजे इंट्रा युटेरियन इन्सिमिनेशन. वयाच्या पस्तिशीत गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तेव्हा आययूआय उपचारांनाही यश मिळू शकते. मात्र त्यासाठी तुमची शारीरिक स्थिती, स्त्री आणि पुरुषाच्या रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन ची स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. तसेच स्त्रीबीजांचा साठा, स्पर्म काउंट, शुक्राणूंची हालचाल चांगली असणे आवश्यक आहे.
IVF : आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. हा फर्टिलिटी उपचार वंध्यत्वाच्या अनेक समस्यांना बायपास करून तुम्हाला यश मिळवून देतो. आययूआय ने गर्भधारणेचे चान्सेस अनेक पटींनी वाढतात. वयाच्या ३५ व्या वर्षी नैसर्गिक गर्भधारणा किंवा IUI उपचार अपयशी ठरतात तेव्हा तुम्हाला IVF ने नक्की पॉजिटीव्ह रिझल्ट मिळू शकतो. रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन शी संबंधित समस्या, जसे कि – युटेरियन फायब्रॉईड, पॉलीप्स, एन्डोमेट्रिओसिस, ओवॅरियन सिस्ट, PCOD/PCOS अशा समस्या असतील डॉक्टर तुम्हाला IVF उपचार सुचवू शकतात.
ICSI : जेव्हा तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी नैसर्गिक गर्भधारणेत अपयशी ठरतात आणि फर्टिलिटी डॉक्टरांकडे केलेल्या तपासणीत सिव्हिअर मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी असेल, मिसकॅरेज चा अनुभव आलेला असेल किंवा IUI आणि IVF उपचारांना अपयश मिळत असेल तर अशा वेळी आधुनिक IVF-ICSI ट्रीटमेंट घेतल्यास तुम्हाला खात्रीशीरपणे गर्भधारणा होऊ शकते.
TESA, PESA , MESA, TESE, मायक्रो TESE सारखे स्पर्म रिट्रायवल टेक्निक्स किंवा एम्ब्रियो डोनेशन, स्पर्म डोनेशन हे पर्याय देखील फर्टिलिटी क्लिनिक मध्ये उपलब्ध असतात. डॉक्टर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्वाधिक सक्सेस देणारा उपचार पर्याय सुचवतात.
सर्जिकल उपचार : फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस, ओवॅरियन सिस्ट, चॉकलेट सिस्ट, अडेजन्स अशा समस्या असतील तर लॅप्रोस्कोपी, हिस्टेरोस्कोपी, मायोमेक्टॉमी, एम्बोलायझेशन सारखे सर्जिकल उपचार देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे वंध्यत्व समस्येचे निराकरण करणे शक्य आहे.
मेनोपॉज किंवा इतर ओव्यूलेशन डिसॉर्डर्स मुळे वयाच्या पस्तिशीत तुमची मासिक पाळी बंद झाली असेल तर, तुम्हाला IVF किंवा ऍडव्हान्स IVF उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते.
३५ व्या वर्षी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी ‘हे’ करा
- नियमित व्यायाम
- संतुलित व पोषक आहाराचे सेवन
- ताणतणावापासून दूर राहा
- वजन नियंत्रित ठेवा
- तणाव कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स, योग, मेडिटेशन करा
- अल्कोहोल, कॅफेन चे सेवन करू नका
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न :
१) ३५ वय गर्भधारणेसाठी योग्य आहे का?
३५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये गर्भपातचा धोका जास्त असतो. तसेच, या वयात एकाधिक गर्भधारणा अधिक सामान्य असते. जसजसे अंडाशयांचे वय वाढत जाते, तसतसे ते दर महिन्याला एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे सोडू लागतात. या वयात स्त्रीबीजांची क्वालिटी खराब झाल्यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. पण, IVF, ब्लास्टोसिस्ट, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, ओवॅरियन स्टिम्युलेशन या उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
२) ३५ व्या वर्षी तुम्ही निरोगी गर्भधारणा करू शकता का?
होय. आधुनिक फर्टिलिटी उपचारांतील प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) सारख्या टेस्ट करून उत्तम गर्भाची निवड करून स्वस्थ बाळाच्या जन्माची शक्यता वाढते. तर इक्सी, इम्सी, पिक्सी सारख्या उपचारांमध्ये बायोलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकली उत्तम क्वालिटीचा शुक्राणू फर्टिलायझेशनसाठी निवडून निरोगी गर्भधारणा होऊ शकते.
३) ३५ वर्षी स्त्री ची फर्टिलिटी क्षमता किती असते?
वयाच्या ३५ व्या वर्षी, गर्भधारणेची शक्यता दर महिन्याला १५% इतकीच असते.