अधिक वजनामुळे गर्भधारणेत समस्या? ‘हे’ केल्यास होईल गर्भधारणा

सारांश : जेव्हा गर्भधारणेचा प्रश्न येतो तेव्हा तुमचे वजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जास्त वजन किंवा कमी वजनामुळे तुमच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या शरीराला गर्भधारणा करणे कठीण होते. त्यामुळे, तुमचे वजन तुमच्या प्रजनन प्रवासावर कसा परिणाम करू शकते हे समजून घेणे आवश्यक आहे.

Share This Post

अति वजनाचा गर्भधारण प्रक्रियेवर होणारा परिणाम

  • गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो.
  • गर्भधारणेतील मधुमेह
  • वंध्यत्वाचे उच्च दर
  • गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत
  • गर्भपात
  •  स्टील बर्थ /मृत जन्म
  •  वारंवार गर्भपात
  •  नियमित ओव्यूलेशन करणे करणे शरीरासाठी आव्हानात्मक होऊन बसते.
  • हार्मोनल इम्बॅलन्स मुळे अनओव्यूलेशन किंवा अनियमित ओव्यूलेशन, किंवा अनियमित मासिक पाळी समस्या होऊ शकते.
  •  स्त्रीबीजांची क्वालिटी खराब होऊ शकते.
  •  गर्भाशयाचे अस्तर व्यवस्थित बनत नाही.
  •  इम्प्लांटेशन समस्या येते आणि गर्भधारणा होत नाही.
  •  गर्भधारणा झालीच तर, गर्भपाताचा धोका संभवतो.
  • हायपरअँड्रोजेनेमिया 
  • इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि लेप्टिनची पातळी वाढते.

अधिक वजन आणि गर्भधारणेचे हे कनेक्शन समजून घेतल्याने तुम्हाला निरोगी वजन मिळविण्यासाठी आणि गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात मदत होऊ शकते.

ओव्हरवेट स्थितीत गर्भधारणेसाठी काय करावे?

१) डॉक्टरांचे कन्सल्टेशन

अंतर्निहित परिस्थितीचे मूल्यमापन करू शकतात आणि तुमच्या प्रजनन प्रवासाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे अतिवजन स्थितीत गर्भधारणेसाठी सर्वप्रथम फर्टिलिटी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

२) बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणे आणि त्याचे परिणाम समजून घेणे

BMI काय दर्शवते? तर तुमचे वजन कमी आहे, निरोगी वजन श्रेणीत आहे, जास्त वजन आहे किंवा लठ्ठ आहे, याविषयी संकेत देते. BMI समजला कि तुमचे वजन निरोगी श्रेणीत आणण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी निर्णय घेण्यात मदत होते.

BMI वजन श्रेणी
कमी वजन : १८.५ पेक्षा BMI इंडेक्स
निरोगी वजन :१८.५ ते २३ दरम्यान BMI इंडेक्स
जास्त वजन :२३ पेक्षा जास्त BMI इंडेक्स
ओव्हरवेट/लठ्ठपणा :२७.५ पेक्षा जास्त BMI इंडेक्स

३) फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम करणारे इतर घटकही तपासून घ्या

अर्थात, वजन हे वंध्यत्वाचे एकमेव कारण असू शकत नाही. फर्टिलिटी डॉक्टर फर्टिलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. ते महिला आणि पुरुष दोघांच्याही फर्टिलिटी आरोग्याचे मूल्यांकन करतात. वंध्यत्व समस्येचा सखोल अभ्यास आणि अचूक निदान करून गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार योजना (पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन) बनवतात.

फायब्रॉईड, गर्भाशयाच्या अस्तराच्या समस्या, हार्मोनल असंतुलन, ब्लॉक फेलोपियन ट्यूब, लो ओवॅरियन रिझर्व्ह, PCOS, एन्डोमेट्रिओसिस किंवा पुरुषांमधील शुक्राणू समस्या तपासणीअंती शोधून काढणे आणि गर्भधारणेसाठी योग्य उपचार करण्याचे काम फर्टिलिटी डॉक्टर करतात.

४) फर्टिलिटी आरोग्यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करणे

दैनंदिन सवयीनमध्ये शाश्वत बदल केल्यास तुमचे वजन नियंत्रित होईलच शिवाय फर्टिलिटी आरोग्यही सुधारेल. रक्ताभिसरण आणि हार्मोनल संतुलन सुधारते, ओव्यूलेशन समस्या सुधारतात. शुक्राणू किंवा स्त्रीबीजांची क्वालिटी सुधारू शकते. बाळाचे स्वास्थ्य उत्तम राहते.

फर्टिलिटी आरोग्यासाठी काही टिप्स :

  • नियमित वेळी पुरेसा आणि पौष्टिक आहार घ्यावा.
  • काय खावे? – आहारात ताजी व सिजनल फळे, हिरव्या भाज्या, शेंगभाज्या, ड्राय फ्रुट्स, लीन प्रोटीन, सलाड, धान्य, कडधान्य यांचा समावेश असावा.
  • काय खाऊ नये? – रेड मीट, प्रक्रिया केलेली साखर, चहा कॉफी चे अतिसेवन, अल्कोहोल, मैद्याचे पदार्थ, पॅक्ड केलेले दही किंवा इतर अन्न, जंक फूड किंवा फास्ट फूड चे सेवन करू नये.
  • फॉलिक ऍसिड, लोह आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड यांसारखे पोषक घटक फर्टिलिटी आरोग्यासाठी विशेषतः महत्वाचे आहेत. त्यांचा आहारात समावेश करावा.
  • पुरेसा आणि मध्यम तीव्रतेचा व्यायाम  : अतिव्यायाम हानिकारक ठरू शकतो. रोज पुरेसा आणि मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. झुंबा, नाचणे, पोहणे, चालणे, योगा, ऑनलाईन वर्क आउट क्लास जॉईन करणे, यापैकी कोणताही एक प्रकारचा व्यायाम करावा.
  • स्ट्रेस मॅनेजमेंट : बऱ्याचदा वजनवाढीमुळे हार्मोनल डिस्टर्बन्स होते. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढते. अशा वेळी ध्यानधारणा, ओंकार चा उच्चार करणे, प्राणायाम, दीर्घ श्वसन क्रिया कराव्यात.
  • काही रीलाक्सेशन टेक्निक्स : हॉट बाथ, मसाज, अरोमा थेरपी, स्पा यांसारख्या हायड्रो थेरपी. ऑनलाईन उपलब्ध असलेल्या योगनिद्रा कराव्यात. म्युजिक ऐकावे किंवा म्हणावे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा.

5) ओव्हरवेट स्थितीत गर्भधारणेसाठी उपचार

  • मेडिसिन : ओवॅरियन स्टिम्युलेटिंग मेडिसिन, हार्मोनल बॅलन्स करणारी औषधे, वजन कमी करणारी औषधे सुचविली जातात.
  • सर्जिकल उपचार : बेरियाट्रिक सर्जरी सारख्या वेट लॉस सर्जरी उपचारांचा पर्याय उपलब्ध असतो.
  • लाइफस्टाइल मॉडिफिकेशन : वर उल्लेख केल्याप्रमाणे जीवनशैलीत बदल करून योग्य आहार- विहार राखल्यास वजन नियंत्रित होते तसेच फर्टिलिटी आरोग्य सुधारते.
  • असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) उपचार :
  • पुरुषांचे अधिक वजन गर्भधारणेत अडसर असल्यास हार्मोनल इम्बॅलन्स साठी औषधे दिली जातात. तर शुक्राणू समस्या कोणती आहे त्यानुसार IUI, IVF, इक्सी, इम्सी, पिक्सी उपचार सुचवले जातात.
  • महिलांचे अधिक वजन वंध्यत्व स्थितीत योगदान देत असल्यास, ओव्यूलेशन साठी फर्टिलिटी मेडिसिन, हार्मोनल संतुलनासाठी मेडिसिन दिले जाते.

ओव्यूलेशन इंडक्शन : अधिक गंभीर वंध्यत्व समस्या नसल्यास ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांमध्ये नियमित ओव्यूलेशन मॉनिटरिंग करून ओव्यूलेशन काळात इंटरकोर्स करण्याचा चा सल्ला डॉक्टर देतात.

याशिवाय बेसिक किंवा आधुनिक IVF उपचारांच्या मदतीने नक्कीच गर्भधारणा होऊ शकते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने केलेल्या संशोधनानुसार,

Reference: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4456969/

  1. जीवनशैलीतील बदल, कमी शारीरिक हालचाली, पोषण शैलीतील बदल आणि कॅलरीजचे प्रमाण वाढल्यामुळे विकसित देशांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे.
  2. लठ्ठपणामुळे गर्भधारणेचे दर, जिवंत जन्मदर कमी होतो आणि उपचार चक्रात गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते.
  3. अंतःस्रावी विकार, हार्मोनल विकार, मानसशास्त्रीय विकार आणि स्टिरॉइड्स आणि एन्टीडिप्रेसंट्स सारख्या काही औषधांचा वापर यासारख्या इतर काही कारणांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

जास्त वजन असल्यास गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट असतात का?

होय. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये हार्मोन्सचे नियमन करण्यासाठी औषधे दिली जातात. निरोगी वजनासाठी टिप्स आणि डाएट दिला जातो. लाइफस्टाइल मॉडिफिकेशन केले जाते. ओव्हरवेट साठी काही वेट लॉस सर्जरी देखील उपलब्ध आहेत. शिवाय गर्भधारणेसाठी तुमच्या स्थितीनुसार ओव्यूलेशन इंडक्शन, IUI, IVF, इक्सी, इम्सी, पिक्सी, ब्लास्टोसिस्ट, LAH, जेनेटिक टेस्टिंग, असे अनेक उपचार उपलब्ध आहेत.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न :

जास्त वजनामुळे फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का?

होय. जास्त वजनामुळे फर्टिलिटी आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जास्त वजनामुळे हार्मोनल संतुलन विघडते. अनियमित ओव्यूलेशन किंवा ओव्यूलेशन ची अनुपस्थिती होऊ शकते. ज्यामुळे वंध्यत्व येते. जीवनशैलीत सुधार आणि आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.

अतिवजनामुळे गर्भधारणेत समस्या होत असल्यास डॉक्टरांना भेटावे का ?

होय. हेल्थकेअर प्रोफेशनल, शक्यतो प्रजनन तज्ज्ञ किंवा प्रजनन एंडोक्रिनोलॉजिस्टशी सल्लामसलत करण्याची शिफारस केली जाते. ते तुमच्या वजनाचे नियंत्रणाबरोबरच इतर अंतर्निहित समस्यांचे निराकरण करू शकतात. आधुनिक उपचार पद्धतींनी गर्भधारणेची शक्यता अनेक पटींनी वाढते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

अशुक्राणुता (Azoospermia) की स्थिती में गर्भधारण कैसे करे?

एज़ोस्पर्मिया एक ऐसी स्थिति है जहां पुरुष के वीर्य में कोई शुक्राणु नहीं होता है। शून्य शुक्राणु का सीधा संबंध पुरुष इन्फर्टिलिटी से है। लेकिन चिंता न करे। फर्टिलिटी डॉक्टर के मार्गदर्शन और आधुनिक ART उपचार विधियों का उपयोग करके निश्चित रूप से गर्भधारण हो सकता है।

मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार

मधुमेहाच्या रुग्णांना IVF प्रक्रिये दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो, जसे की गर्भपात, एकाधिक गर्भधारणा आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याची संभावना अधिक असते. पण चिंता करण्याचे कारण नाही. फर्टिलिटी क्षेत्रातील प्रगतीमुळे, मधुमेही रुग्णांसाठी IVF हे आशेचा किरण बनले आहे. मधुमेह आणि आयव्हीएफ उपचार याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.