प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये गर्भधारणेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी अनुभवी आणि एक्स्पर्ट डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. वंध्यत्व समस्येचे निराकारण करून गरजेनुसार सर्जिकल उपचार, फर्टिलिटी मेडिसिन आणि ART तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणेची संभावना वाढविली जाते. आमच्याकडील आधुनिक उपचारांविषयी जाणून घेण्यासाठी ब्लॉग जरूर वाचा.
गर्भधारणेसाठी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART)
चला तर मग, जाणून घेऊयात फर्टिलिटी क्षेत्रातील अविश्वसनीय आणि उल्लेखनीय रिझल्ट देणारे फर्टिलिटी उपचार, प्रक्रिया आणि फायदे.
१) आययूआय IUI :
आययूआय म्हणजे इंट्रा युटेरियन इनसेमिनेशन गर्भधारणेसाठी सर्वात कमी खर्चिक आणि प्राथमिक स्वरूपाची उपचार पद्धती आहे. यामध्ये पुरुषाचे शुक्राणू नैसर्गिक किंवा इतर पद्धतीने मिळवले जातात. स्पर्म वॉश केले जातात. ओव्यूलेशन काळात हे शुक्राणू कॅथेटर च्या मदतीने महिलेच्या गर्भाशयात, फेलोपियन ट्यूब जवळ ट्रान्स्फर केले जातात. शुक्राणूंचा प्रवास निम्मा करून गर्भधारणेचे चान्सेस वाढवले जातात. पुढील फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन प्रक्रिया अगदी नैसर्गिक पद्धतीने होते.
डोनर आययूआय :
सिव्हिअर मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी केसेस मध्ये दात्याचे शुक्राणू वापरून IUI केल्यास गर्भधारणा होऊ शकते.
डबल आययूआय :
आययूआय सक्सेस चे चान्सेस वाढविण्यासाठी ओव्यूलेशन काळात २ वेळा स्पर्म ट्रान्स्फर ची प्रक्रिया केली जाते.
आययूआय-क्रायोप्रिझर्वेशन :
काही दुर्धर आजारांचे उपचार करण्यापूर्वी किंवा तत्सम इतर कारणांसाठी शुक्राणू फ्रिज करून ठेवले जातात. गर्भधारणा हवी असते तेव्हा हे फ्रिज केलेले शुक्राणू महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात.
२) आयव्हीएफ IVF :
आयव्हीएफ हि सर्वात प्रभावी आणि सर्वाधिक रिझल्ट देणारी, सर्वाधिक वापरली जाणारी, प्रचलित उपचार पद्धती आहे. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये महिलेच्या अंडाशयातून स्त्रीबीजे काढली जातात. पुरुषांचे शुक्राणू मिळवले जातात. स्त्रीबीज आणि शुक्राणू एका लॅब मधील पेट्री ट्रे मध्ये ठेवून मिसळले जातात. या पद्धतीने अनेक एम्ब्रियो तयार होतात. हे एम्ब्रियो अनुकूल स्थितीत महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात. इम्प्लांटेशन प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते.
आयव्हीएफ-इक्सी IVF-ICSI :
IVF द्वारे गर्भधारणा अयशस्वी झाल्यास, गंभीर शुक्राणू समस्या असल्यास इक्सी फायदेशीर ठरते. इक्सी चा वापर करून सिव्हिअर अशा पुरुष वंध्यत्व समस्यांवर मात करणे शक्य आहे. हि एक ऍडव्हान्स IVF पद्धती आहे. आयव्हीएफ प्रमाणेच स्त्रीबीजे आणि शुक्राणू मिळवले जातात. आयव्हीएफ मध्ये शुक्राणू स्वतःहून स्त्रीबीज फर्टीलाइज करतात आणि गर्भ बनतो. इक्सी प्रक्रियेमध्ये मायक्रोपिपेट च्या मदतीने स्त्रीबीजामध्ये शुक्राणू इंजेक्ट केला जातो आणि गर्भ बनतो.
आयव्हीएफ- इम्सी IVF-IMSI :
चांगल्या क्वालिटीचे भ्रूण मिळवण्यासाठी वापरला जाणारा विश्वासार्ह मार्ग म्हणजे IMSI. अर्थात इंट्रा सायटोप्लाजमिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन. आयव्हीएफ-इक्सी प्रमाणेच शुक्राणू स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून गर्भ तयार केला जातो. यावेळी शुक्राणूंची निवड काळजीपूर्वक केली जाते. शुक्राणूंचे आकृतिविज्ञान म्हणजेच डोके, मान, शेपूट आणि एकंदरीत रचना तपासली जाते. त्यासाठी मायक्रोस्कोप चा वापर (x ६000 पेक्षा जास्त) केला जातो.
IMSI गर्भधारणेच्या पूर्ण कालावधीपर्यंत गर्भाला जगण्याची आणि विकसित होण्याची अधिक चांगली संधी देते.
आयव्हीएफ-पिक्सी IVF-PICSI :
चांगल्या दर्जाचे भ्रूण तयार करण्याचा सक्सेस रेट PICSI मध्ये सर्वाधिक आहे. ज्यामुळे गर्भधारणेची आणि गर्भ रुजण्याची संभावना वाढते. इक्सी प्रमाणेच स्त्रीबीजामध्ये शुक्राणू इंजेक्ट केला जातो. यावेळी फर्टिलायझेशन साठी बायोलॉजिकली शुक्राणू ची निवड केली जाते. प्रबळ आणि स्वस्थ शुक्राणू निवडण्यासाठी ते हायलोरोनिक ऍसिड (HA) मध्ये ठेवले जातात. बायोलॉजिकल स्वस्थ शुक्राणू या द्रवाला चिकटतात. असे शुक्राणू फर्टिलायझेशन साठी निवडले जातात.
हाय DNA फ्रॅगमेंटेशन, DNA डॅमेज आणि मल्टिपल इक्सी फेल्युअर झालेले असल्यास पिक्सी ने गर्भधारणेचा सक्सेस रेट अधिक आहे.
आयव्हीएफ-क्रायोप्रिझर्वेशन:
या प्रक्रियेत, गॅमेट्स किंवा भ्रूण आणि उसाइट्स द्रव नायट्रोजनच्या कमी दाबाखाली गोठवले जातात कारण ते अत्यंत थंड परिस्थितीत अनिश्चित काळासाठी गोठलेले राहू शकतात. स्त्रीबीजांची संख्या कमी असल्यास किंवा लो स्पर्म काउंट स्थितीत उसाइट्स किंवा भ्रूण गोठवून ठेवल्यास डोनर ची गरज लागत नाही. अर्थात या पद्धतीचा वापर करीत असताना अनेक एम्ब्रियो गोठवले जातात. एम्ब्रियो ट्रान्स्फर पूर्वी सर्व चाचण्यांचे परिणाम चांगले आले तरच एम्ब्रियो ट्रान्स्फर केला जातो. अन्यथा पर्याप्त चांगल्या एम्ब्रियो ची निवड ट्रान्स्फरसाठी केली जाते.
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये, क्रायोप्रीझर्व केलेले शुक्राणू वापरते वेळी प्रजनन क्षमता कमी होणार नाही याची खात्री केली जाते. तसेच प्रोजेनेसिस मध्ये भविष्यातील काही परिस्थितींचा असे एम्ब्रियो जतन केले जाऊ शकतात. तशी सुविधा उपलब्ध आहे.
डोनर-आयव्हीएफ
दात्याचे शुक्राणू, स्त्रीबीज किंवा एम्ब्रियो ट्रान्स्फरसाठी वापरले जातात. यामुळे गर्भधारणा होऊ शकते.
३) लेजर असिस्टेड हॅचिंग LAH :
गर्भाची ब्लास्टोमेयर बायोप्सी घेण्यासाठी किंवा एक्टोडर्म बायोप्सी घेण्यासाठी LAH चा वापर केला जाऊ शकतो. भ्रूणाचे बाह्य आवरण ‘झोना पेलुसिडा’ ने बनलेले असते. इम्प्लांटेशन पूर्वी हे आवरण पडून जाणे अपेक्षित असते. असे न झाल्यास एम्ब्रियो इम्प्लांटेशन (गर्भ रुजण्याची प्रक्रिया) अयशस्वी होते. परिणामी IVF फेल होते. लेजर असिस्टेड हॅचिंग पद्धतीचा वापर करून हे बाह्य आवरण पातळ केले जाते. ज्यामुळे गर्भ यशस्वीपणे रुजतो आणि गर्भधारणा होते.
LAH केव्हा केले जाते?
- गर्भाचा बाह्य थर १६ मिमी पेक्षा जास्त जाडीचा असल्यास
- मल्टिपल आयव्हीएफ फेल झाल्यास
- इक्सी अयशस्वी झाल्यास
- जेनेटिक टेस्टिंग चा वापर करायचा असल्यास
- फ्रोजन एम्ब्रियो ट्रान्स्फर करतेवेळी
४) ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर:
ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर एक ऍडव्हान्स ART तंत्रज्ञान आहे जे गर्भधारणेचा सक्सेस रेट वाढवण्यासाठी IVF उपचारांबरोबर वापरले जाते. यामुळे एकाधिक गर्भधारणेचा (मल्टिपल प्रेग्नन्सी) धोका कमी होतो. या पद्धतीचा सक्सेस रेट ४०-६० % आहे. लॅब मध्ये स्त्रीबीज व शुक्राणूंचे फर्टिलायझेशन करून गर्भ बनविल्यानंतर हा गर्भ तिथेच वा ढवला जातो. ५ व्या किंवा ६ व्या दिवसापर्यंत वाढलेल्या गर्भाला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. अशा प्रकारे डे ५ किंवा डे ६ चा एम्ब्रियो ट्रान्सफर केला जातो.
५) एम्ब्रियो ट्रान्स्फर (ET) चे प्रकार आणि वापर
- फ्रेश एम्ब्रियो ट्रान्स्फर : एम्ब्रियो बनवल्यानंतर ताबडतोब ट्रान्स्फर केले जातात.
- फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्स्फर FET : पहिल्या आयव्हीएफ सायकल मध्ये बनवलेले एम्ब्रियो फ्रोझन केले जातात. पहिले सायकल फेल झाल्यास किंवा गरजेनुसार वापरले जातात.
- क्लीव्हेज एम्ब्रियो ट्रान्स्फर : डे ३ चा एम्ब्रियो ट्रान्स्फर केला जातो. यावेळी पेशी विभाजनाची प्रक्रिया सुरु असते.
- सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्स्फर SET : २-३ दिवसांचा एम्ब्रियो मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. त्यानंतर ५-६ दिवसांचा एम्ब्रियो पुन्हा ट्रान्स्फर केला जातो.
- सिंगल एम्ब्रियो ट्रान्स्फर (eSET) : केवळ एक एम्ब्रियो ट्रान्स्फर केला जातो.
- मल्टिपल एम्ब्रियो ट्रान्स्फर : एकापेक्षा जास्त गर्भ ट्रान्स्फर केले जातात. गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी काही मर्यादित केसेस मध्ये मल्टिपल एम्ब्रियो ट्रान्स्फर केले जाते.
६) जेनेटिक टेस्टिंग
भ्रूणातील अनुवांशिक समस्या, गर्भातील गुणसूत्रांची असामान्य संख्या शोधणे, निरोगी भ्रूण निवडणे यासाठी जेनेटिक टेस्टिंग केली जाते. एम्ब्रियो मधील सेल सॅम्पल घेऊन स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस करून क्रोमोझोम विकार, DNA तपासणे शक्य आहे.
जेनेटिक टेस्टिंग केव्हा केली जाते?
- मल्टिपल मिसकॅरेज
- मल्टिपल IVF फेल्युअर
- कुटुंबात गंभीर अनुवांशिक विकार असल्यास
- अधिक वय असल्यास
जेनेटिक टेस्टिंग चा वापर :
- PGD प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस : बाळातील सिस्टिक फायब्रोसिस सारखे अनुवांशिक विकार शोधणे
- PGT A / PGS : गर्भातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या सामान्य आहे की नाही हे तपासणे आणि सामान्य गुणसूत्र असलेला गर्भ ट्रान्स्फर साठी निवडणे.
अयशस्वी गर्भधारणेच्या बाबतीत, तुम्ही PGT वापरल्यास 60-70% यश मिळते.
७) स्पर्म रिट्रायवल टेक्निक्स
वीर्यात शुक्राणू नसणे, शुक्राणूवाहिनी ब्लॉकेज, पॉलीप्स या स्थितीत खालील पद्धतींचा वापर करून स्पर्म मिळवले जातात. आणि IVF किंवा IVF-ICSI केले जाते.
- TESA : टेस्टीक्युलर स्पर्म एस्पिरेशन : सुई च्या मदतीने व्हॅक्यूम वापरून टेस्टिस मधून वीर्य घेतले जाते.
- PESA : परक्युटेनस एपिडिडायमल स्पर्म एस्पिरेशन : यासाठी सर्जरी ची गरज नाही. सुई अंडकोषात टाकून वीर्य घेतले जाते.
- MESA : मायक्रोसर्जिकल एपिडिडायमल स्पर्म एस्पिरेशन : शुक्राणूवाहिनी ब्लॉकेज असल्यास वाहिनी कट करून वीर्य घेतले जाते.
- TESE : टेस्टीक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शन : टेस्टीस सर्जरी करून द्रव मिळवला जातो.
- मायक्रो टीसी : मायक्रोस्कोपिक टेस्टीक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शन : सूक्ष्म रीतीने टेस्टिक्युलर टिश्यूमधून थेट शुक्राणू मिळवले जातात. हि एक आधुनिक पद्धती आहे.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) IVF-ICSI कुणी करावे?
शुक्राणूंची कमी संख्या, कमी हालचाल, असामान्य आकार, स्त्रीबीजापर्यंत प्रवास करण्यासाठी कमी गती, सर्व्हायव्हल करण्याची क्षमता कमी असणे अशा पुरुष वंध्यत्व समस्यांमध्ये इक्सी फायदेशीर ठरते.
2) IVF-IMSI केव्हा केले जाते?
शुक्राणूंचा खराब शेप आणि लहान आकार (टेराटोझोस्पर्मिया), DNA फ्रॅगमेंटेशन रेट उच्च असणे, मल्टिपल इस्की उपचार असफल होत असतील, पूर्णवेळ गर्भधारणा राहण्यासाठी किंवा मल्टिपल मिसकॅरेज होत असतील तर इम्सी उपचाराने चांगले रिझल्ट मिळू शकतात.
3) IMSI आणि PICSI मध्ये नेमका फरक कोणता?
पिक्सी मध्ये परिपक्व आणि बायोलॉजिकल हेल्थी शुक्राणूंची निवड फर्टिलायझेशन साठी केली जाते. तर इम्सी मध्ये उत्तम रचना, आकार आणि आकारमान असलेला शुक्राणू फर्टिलायझेशन साठी निवडला जातो.
अधिक चांगल्या परिणामांसाठी इक्सी, इम्सी आणि पिक्सी चा वापर एकत्रितपणे केला जाऊ शकतो.