PCOD ची मुख्य कारणे, लक्षणे आणि योग्य उपचार | PCOD in Marathi

PCOD in marathi - PCOD meaning in marathi

PCOD म्हणजे काय?

PCOD in Marathi

पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD full form in Marathi) हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्तिथी आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते.
सामान्य भाषेत समजून घ्यायच तर ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते. या स्तिथी मध्ये हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन्स (एण्ड्रोजन) चे उत्पादन वाढते आणि अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. ज्यामुळे irregular periods म्हणजेच अनियमित मासिक पाळीची लक्षणे स्त्रियांमध्ये दिसू लागतात.

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF कंसल्टंट डॉ. सोनाली मळगांवकर सांगतात PCOD च्या लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, दीर्घ वेदनादायक पीरियड्स, पुरळ, ओटीपोटात वेदना,आवेरियन सिस्ट, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व यांचा समावेश होतो. काळजी करू नका, योग्य वेळी निदान, आणि  योग्य औषधोपचारांनी PCOD ची समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते.”

PCOD कोणाला आणि कधी होतो?

PCOD Problem in Marathi

पीसीओडी ची समस्या हि पूर्वी 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता हि समस्या झपाट्याने वाढत आहे आणि 18 ते 20 वयोगटातील मुलींमध्ये सुद्धा PCOD च्या समस्येचे लक्षणं दिसून येतात. याच कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात 5 ते 10% महिलांमध्ये PCOD ची समस्या आढळते मुख्यतः तेव्हा, जेव्हा स्त्रियां गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात.
म्हणूनच मासिक पाळी आणि वाढत्या वयानुसार, डॉक्टरांकडून तुमची नियमित तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
PCOD आनुवंशिक आहे, याचा अर्थ जर तुमच्या आई किंवा मावशी ला हि समस्या असेल तर तुम्हाला PCOD होण्याची शक्यता जास्त असते.

पीसीओडीची लक्षणं काय आहेत?

PCOD Symptoms in Marathi

मासिक पाळीच्या समस्या: PCOD चे मुख्य लक्षण म्हणजे oligomenorrhea (एका वर्षात 9 पेक्षा कमी पीरिअड्स येणे) किंवा amenorrhea ( 3 किंवा अधिक महिने मासिक पाळी न येणे) हे मानले जाते. तसेच, मासिक पाळीच्या इतर समस्या जसे अनियमित पीरिअड्स, किंवा दीर्घ वेदनादायक पीरियड्स देखील लक्षणं असू शकतात.
वंध्यत्व: पीसीओडी हे स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. अनियमित मासिक पाळी यामुळे महिलांमध्ये ओवेरियन सिस्ट होऊन वंध्यत्वाची समस्या उद्भवते.
शरीरावर अतिरिक्त केस: PCOD च्या समस्येदरम्यान, महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन्स (एंड्रोजन) चे उत्पादन वाढते, ज्यामुळे मुरुमांसोबतच चेहऱ्यावर आणि शरीरावर नको असलेले केस वाढू लागतात, तसेच केस पातळ होणे किंवा केस गळणे काही इतर लक्षणे आहेत.
वजन वाढणे: पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये सीरम इन्सुलिन, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि होमोसिस्टीनची पातळी देखील वाढलेली असते, त्यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांना वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
इतर लक्षणं जसे:

 • ओटीपोटात वेदना
 • वाढलेलं ब्लड प्रेशर
 • झोप न येणं
 • थकवा जाणवणे
 • डोकेदुखी
 • अचानक मूड बदलणे

PCOD च्या इतर लक्षणांपैकी आहे.

PCOD आणि PCOS मधील फरक:

PCOD and PCOS difference in Marathi

बऱ्याच स्त्रियांना पीसीओस आणि पीसीओडी मधील अंतर कळत नाही.(pcod and pcos difference)
पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) आणि पीसीओस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS).

PCOD काय आहे?

पीसीओडी ही एक स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी निर्माण होतात, ज्याचे नंतर सिस्ट तयार होतात. ज्यामुळे वेळेवर स्त्रीबीज फुटत नाही आणि पीरिअड्स इर्रेग्युलर होतात ज्यामुळे गर्भधारणेत अडचण निर्माण होते (pcod problem in Marathi).
PCOD च्या मागची कारणे अनेकदा हे असू शकतात:

 • वजन वाढणे
 • ताण
 • हार्मोनल असंतुलन
 • जीवनशैलीतील बदल असतात

PCOS काय आहे?

तसेच पीसीओस PCOS हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे. या परिस्थितीत, अंडाशय जास्त प्रमाणात एंड्रोजन रिलीज करते आणि अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात. ज्यामुळे स्त्रीबीज निर्मिती थांबते (pcos problem in Marathi).
PCOS च्या मागची कारणे अनेकदा हे असू शकतात:

 • इन्सुलिन प्रतिकार
 • हार्मोनल असंतुलन
 • आनुवंशिक करण
 • एंड्रोजन च्या लेव्हल्स वाढणं

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीसीओएस एक आजार आहे तर पीसीओडी हे त्याच एक लक्षण आहे.

पीसीओडी ची कारणे:

Causes of PCOD in Marathi

PCOD ची समस्या जरी सामान्य असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे की:
इन्सुलिनचे वाढते प्रमाण: जेव्हा इन्सुलिनचे प्रमाण वाढते तेव्हा अधिक एन्ड्रोजन तयार होतात. यामुळे हार्मोनल असंतुलन होते आणि महिलांमध्ये वंध्यत्वाची शक्यता वाढते.
जीन्स (Genes): पीसीओडी आनुवंशिक आहे, अनेक वेळा महिलांना अनुवांशिकरीत्या पीसीओडी ची समस्या असू शकते.
इतर कारण जसे:

 • अस्वस्थ जीवनशैली
 • निष्क्रिय जीवनशैली
 • अयोग्य आहार
 • पीरिअड्स मध्ये असंतुलन असणे
 • शरीरात इन्सुलिनची जास्त मात्रा
 • सिगरेट आणि दारूचा अतिरेक
 • अनुवांशिक घटक

पीसीओडी संबंधित समस्या:  

पीसीओडीवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे:

 • वंध्यत्व
 • मधुमेह
 • लिव्हर मध्ये सूज येणे
 • नैराश्य
 • असामान्य गर्भाशयाचे रक्तस्त्राव
 • एंडोमेट्रियल कैंसर (गर्भाशयाच्या आवरणाचा कैंसर)
 • क्वचित प्रसंगी ब्रेस्ट कैंसर

पीसीओडी आणि पीसीओस ट्रीटमेंट:

PCOD Problem Treatment in Marathi

पीसीओएस (PCOS) पीसीओडी (PCOD) पेक्षा अधिक गंभीर आहे.
पीसीओडी आणि पीसीओएस दोन्ही हार्मोनल समस्या आहे, ज्यामुळे त्याच्या उपचारांना बराच वेळ लागतो आणि डॉक्टर बहुतेक वेळा कारणांवर आधारित उपचार प्रक्रिया निवडतात.
पीसीओडी आणि पीसीओएस साठी प्राथमिक उपचारांमध्ये औषधांसह जीवनशैलीतील बदलांचा समावेश होतो. (PCOS treatment in Marathi)
मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि ओव्हुलेशन सुधारण्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात. सोबतच व्यायामाच्या मदतीने वजन कमी करण्याचा सल्ला देतात.
याव्यतिरिक्त, तुमचे डॉक्टर तुम्हाला फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा -3 आणि -6 फॅटी ऍसिड वाढवण्यास सांगतील.

“प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF कंसल्टंट डॉ. सोनाली मळगांवकर सांगतात पीसीओडीच्या आणि पीसीओएस च्या सर्व केसेस मध्ये अल्ट्रासाऊंडद्वारे ओव्हेरियन सिस्ट शोधणे आवश्यक आहे. पेल्विक अल्ट्रासाऊंड हे एक महत्त्वाचे निदान आहे जे योग्य उपचार देण्यात मदत करते.”

योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडी आणि पीसीओएस च्या समस्या नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात. हार्मोन्स नियंत्रित करून तुम्हाला औषधांनी सहज गर्भधारणा राहू शकते. सोबतच ऍडवान्सड फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे IVF च्या मदतीने स्वस्थ गर्भधारणा शक्य आहे.
PCOD ची कारणे आणि उपचार याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा:

पीसीओडी पासून कसे वाचावे:

Prevention of PCOD in Marathi

काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही PCOD ला दूर ठेऊ शकता, यात प्रामुख्याने समाविष्ट आहे:

 • उच्च कोलेस्टेरॉल, फैट, आणि कार्बोहाइड्रेट टाळणे
 • नियमितपणे व्यायाम करणे
 • वेळेवर औषधे घेणे
 • दारू आणि सिगरेट टाळणे
 • वजन नियंत्रित करणे
 • अधिक तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणे

हिंदी में पढ़ने के लिए इस लिंक पर क्लिक करे: https://progenesisivf.com/pcod-karan-lakshan-upchar/

सारांश (Conclusion)

पीसीओडी वर कोणतेही ट्रीटमेंट नाही हे खरे आहे. परंतु हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की पीसीओडी ने ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या येत नाही. (PCOD and pregnancy in Marathi) योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडीची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते, परंतु गंभीर समस्यांमध्ये महिलांना आयव्हीएफची (PCOD and IVF) गरज भासू शकते. काळजी ची गरज नाही, हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारण करू शकता.
आई होणे शक्य आहे. फक्त गरज असते तुमची स्थिती समजून घेऊन आणि योग्य उपचार प्रदान करण्याची. यशस्वी गर्भधारणेसाठी तज्ञ डॉक्टरांच मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरेल. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

PCOD म्हणजे काय?

उत्तर: पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (Polycystic Ovary Disorder). ही एक स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी निर्माण होतात, ज्याचे नंतर सिस्ट तयार होतात. ज्यामुळे वेळेवर स्त्रीबीज फुटत नाही आणि पीरिअड्स इर्रेग्युलर होतात आणि गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.

PCOS आणि PCOD मध्ये काय फरक आहे?

उत्तर: पीसीओएस पीसीओडीपेक्षा अधिक गंभीर समस्या आहे. पीसीओडी ही एक स्थिती आहे तसेच पीसीओस हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे. जीवनशैली आणि आहारात सकारात्मक बदल करून दोन्ही समस्या नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात.

PCOD का आणि कसा होतो?

उत्तर: मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे, या स्थितीत स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन एंड्रोजनची लेवल वाढते आणि अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.

PCOD असल्यास गर्भधारणा राहू शकते का?

उत्तर: पीसीओडी असलेल्या प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेत अडचण येत नाही. योग्य उपचार आणि सकारात्मक जीवनशैलीत बदल करून पीसीओडीची समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते. हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारणा करू शकता. सोबतच ऍडवान्सड फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे IVF च्या मदतीने स्वस्थ गर्भधारणा शक्य आहे.

PCOD पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

उत्तर: पीसीओडीवर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही हे खरे आहे. परंतु हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की पीसीओडीने ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या येत नाही. उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदल जसे की वजन कमी करणे आणि व्यायाम यांचा समावेश असू शकतो. यासोबतच योग्य औषधांनी मुरुम आणि नको असलेले केसांचं ट्रीटमेंट करण्यास मदत होऊ शकते.

PCOD किंवा PCOS संबंधित प्रत्येक शंकांचे समाधान मिळवण्यासाठी संपर्क करा : +91 70309 44041 किंवा WhatsApp: +91 94239 71620

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book an Appointment

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
 • Free Fertility Consultation & 3D Sonography
 • Save upto Rs. 20,000/- on your IVF