IVF म्हणजे काय? जाणून घ्या आयव्हीएफ ची पूर्ण प्रक्रिया, फायदे आणि यश दर

IVF in Marathi

पालकत्वाची अनुभूती खास असते. परंतु काहीवेळा काही कारणांमुळे जोडप्यांना मूल होण्यात अडचण येऊ शकते, ही जोडपी IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट-ट्यूब बेबी तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतात.

Table of Contents

आईवीएफ मराठी

आईवीएफ बद्दल जाणून घेण्या आधी जरा नैसर्गिक गर्भधारणे बद्दल समजून घेऊ. नैसर्गिक गर्भधारणेदरम्यान शुक्राणू आणि अंड्याचे मिलन स्त्री च्या शरीरात होते. ज्यानंतर गर्भधारणा होते आणि 9 महिन्यांनंतर मूल जन्माला येते.
परंतु शुक्राणू, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, किंवा अंड्यांमध्ये काही समस्या असतील ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नसेल, तर आईवीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

IVF चा फुलफॉर्म काय होतो?

आईवीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन.

आईवीएफ म्हणजे काय?

IVF ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबी म्हणून देखील ओळखली जाते. हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो. हा स्वस्थ गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो, ज्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अगदी नैसर्गिकरित्या होतो.

आईवीएफ सक्सेस रेट – IVF success rate

सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF उपचारांचा यशस्वी दर 75-80% आहे.
यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते .तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची प्रोजेनेसिसमध्ये काळजी घेतली जाते. सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF उपचारांचा यशस्वी दर 75-80% आहे.
यश दर तुम्हाला आयव्हीएफ गर्भधारणा होण्याच्या तुमच्या शक्यतांचे संकेत देतात, परंतु ते तुमच्या परिस्थितीसाठी विशिष्ट नाहीत.प्रोजेनेसिस येथील आमचे IVF डॉक्टर तुम्हाला IVF तंत्रज्ञान वापरून तुमच्या यशाच्या शक्यतांचे योग्य संकेत देतील.
एक वर्षाहून अधिक प्रयत्न करून देखील गर्भधारणा राहत नाहीये? अनुभवी IVF डॉक्टरांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल.

IVF काय आहे?

IVF म्हणजेच टेस्ट-ट्यूब बेबी तंत्रात शुक्राणू अंड्यामध्ये अनैसर्गिक पद्धतीने इंजेक्ट केले जातात.
कसे? जाणून घेऊया-

आयव्हीएफ प्रक्रिया | IVF Process in Marathi

चला IVF प्रक्रियेबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेऊयात-


1. आई वी एफ डॉक्टरांसोबत कंसल्टेशन: 

IVF ट्रीटमेंट च्या सुरवातीला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टर सोबत तुमच्या स्तिथी च विश्लेषण करून ट्रीटमेंट साठी तुम्हाला मानसिक रित्या तयार केल जात.
त्यानंतर तुमच्या फर्टिलिटी स्थितीनुसार योग्य IVF उपचार प्रक्रिया सुरू केली जाते.


2. ओवेरियन स्टिमुलेशन (Ovarian stimulation)

इंजेक्शन ने फॉलिकल्स विकसित(mature) केले जातात जेणेकरून जास्त स्त्रीबीज प्राप्त होतील. कारण जितकी जास्त चांगल्या गुणवत्तेची स्त्रीबीज मिळवता येतील तितके चांगले भ्रूण तयार होतील.


3. सीमेन (वीर्य) सॅम्पल कलेक्शन (Semen sample collection)

प्रत्येक IVF सेंटर मध्ये एक सीमेन सॅम्पल कलेक्शन रूम असतो जिथे सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जात. सॅम्पल घेतल्यानंतर एंड्रोलॉजिस्ट या सीमेन सॅम्पल मधून चांगले शुक्राणू वेगळे करून त्यांचं शुद्धीकरण करतात.


4. फर्टिलाइजेशन (Fertilization)

योग्य तपासणी आणि चाचणी केल्यानंतर, अंडी आणि शुक्राणू गर्भाधानासाठी प्रयोगशाळेत ठेवले जातात, जे नंतर भ्रूण बनतात.


5. गर्भ हस्तांतरण (Embryo transfer in IVF)

3-4 दिवसांच्या चाचणीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात अगदी स्वस्थ भ्रूण ट्रान्सफर केले जातात तसेच, ज्या प्रकरणांमध्ये गर्भाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे त्या केस मध्ये 14 दिवसांनी गर्भ हस्तांतरण केले जातात.
या प्रक्रियेला मेडिकल भाषेत embryo transfer  म्हंटल जात.

6. गर्भधारणेची चाचणी

IVF प्रक्रियेनंतर 14-15 दिवसांनी, महिलेची गर्भधारणा चाचणी पुष्टी केली जाते त्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिक पद्धतीने होतो.

IVF Process Step by Step in Marathi

IVF ची गरज कोणाला आहे?

वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी आयव्हीएफ प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच पुरुष वंध्यत्वाच्या अगदी गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये सुद्धा प्रगत आयव्हीएफ उपचारांनी यशस्वी रिझल्ट देण्यात मदत केली आहे.
इतर कोणतेही ट्रीटमेंट पर्याय कारगार नसल्यास डॉक्टर अनेकदा IVF उपचार निवडतात.

शेवटी IVF उपचाराचा फायदा कोणाला होतो?

जर तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला खालील दिलेल्या परिस्थितींचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला आयव्हीएफची आवश्यकता असू शकते

  • एंडोमेट्रिओसिस
  • ओव्हुलेशन समस्या असल्यास (PCOD/PCOS साठी IVF treatment)
  • ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स असल्यास (फॅलोपियन ट्यूब्ससाठी IVF treatment)
  • फायब्रॉइड्स असल्यास (फायब्रॉइड्ससाठी IVF treatment)
  • अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी (इनफर्टिलिटीची अस्पष्ट समस्या असल्यास IVF treatment)
  • अनुवांशिक समस्या असल्यास (अनुवांशिक समस्यांसाठी IVF treatment)
  • पुरुष वंध्यत्व (पुरुष वंध्यत्वासाठी IVF treatment)


१ वर्षाहून अधिक काळ बाळासाठी प्रयत्न करताय? IVF ट्रीटमेंट मदतगार ठरू शकते.

तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी फ्री कंसल्टेशन बुक करा


IVF प्रक्रियेचे फायदे | Benefits of IVF Treatment in Marathi

आयव्हीएफ अनेक जोडप्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही आणि या प्रक्रियेचे फायदे असंख्य आहेत. स्वस्थ गर्भधारणेपासून ते स्वस्थ बाळाच्या जन्मापर्यंत आणि गर्भपाताचा धोका कमी करण्यापर्यंत, IVF मुळे लाखो जोडप्यांना फायदा झाला आहे.
चला IVF च्या फायद्यांना विस्तारपूर्वक जाणून घेऊ यात:
स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ शिशु चा जन्म (Pregnancy after IVF):
या प्रक्रियेत, स्वस्थ स्त्रीबीज आणि शुक्राणूंची निवड केली जाते, ज्यामुळे स्वस्थ गर्भधारणेची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त, IVF प्रक्रिया जोडप्याला आनुवंशिक रोग किंवा क्रोमोसोमल समस्या तपासण्यासाठी भ्रूण तपासण्याचा पर्याय देते.
यासोबतच IVF मधील एडवान्सड तंत्रज्ञान जसे PGD/PDS च्या मदतीने अनुवांशिक आजारांना टाळण्यास आणि स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ बाळाचा जन्म सुनिश्चित करण्यात मदत होते.
दात्याचे शुक्राणू आणि अंडी वापरली जाऊ शकतात (Donor egg and sperm for IVF treatment)
शुक्राणूंची गुणवत्ता खराब असल्यास किंवा अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी असल्यास दात्याचे शुक्राणू आणि अंडी आयव्हीएफ प्रक्रियेसह वापरली जाऊ शकतात. यासह, पहिल्या किंवा दुसऱ्या वेळी यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.
तुम्ही गर्भधारणेसाठीची वेळ ठरवू शकता ( Pregnancy planning)
IVF च्या मदतीने तुम्ही गर्भधारणेची वेळ आणि काळ ठरवू शकता तुम्‍हाला तुमच्‍या करिअरवर किंवा नोकरीवर काही काळ लक्ष केंद्रित करायचे असेल, तर IVF तुम्हाला तुम्‍हाला हवे असलेले पालक बनण्‍याचे स्‍वातंत्र्य देते.
वंध्यत्वावर IVF उपचार श्रेष्ठ
शुक्राणू, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा अंड्यांमधील कोणतीही समस्या, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नाही, जेव्हा वारंवार IUI अयशस्वी होतात किंवा गर्भपाताच्या समस्या आढळतात तेव्हा IVF एक परिपूर्ण पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे.

आईवीएफ ट्रीटमेंट चे साइड-इफेक्ट्स

IVF चे फायदे अनेक आहेत परंतु IVF उपचारांचे संभाव्य साइड-इफेक्ट्स जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

  • आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान कॉम्प्लीकेशन्स
  • ताण-तनाव
  • हल्के क्रैम्प्स
  • हेवी वेजाइनल ब्लीडिंग
  • एक्टोपिक प्रेगनेंसी
  • वेळेआधी प्रसूती
  • ओवेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम

काळजी करू नका, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर तुमच्या गरजेनुसार उपचार प्रदान करते, योग्य उपचार आणि अनुभवी IVF डॉक्टरांच्या मदतीने आमच्याकडे IVF च्या साइड-इफेक्ट्स चा धोका कमीत कमी ते नगण्य आहे.
यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते.
तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची प्रोजेनेसिसमध्ये काळजी घेतली जाते. निसंकोच राहा!

आईवीएफ चा खर्च किती आहे?

Cost of IVF treatment in Marathi

आयव्हीएफ उपचारांचा खर्च तुमच्या फर्टिलिटी गरजांवरआणि कारणांवर अवलंबून असतो. प्रत्येक जोडप्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात ज्यामुळे उपचाराचा खर्च जोडप्यानुसार बदलतो.
मायक्रोस्कोप, इनक्यूबेटर सारखी आयव्हीएफ उपचार उपकरणे खास डिझाइन केलेली आहेत जी यूएसए, युनायटेड किंगडम, जर्मनी सारख्या इतर देशांमधून आणली जातात.
तसेच आयव्हीएफची किंमत तुमचे वय, वैद्यकीय इतिहास, तुमचे शहर, मागील अयशस्वी आयव्हीएफ किंवा आययूआय सायकल, फर्टिलिटी क्लिनिक आणि आयव्हीएफ डॉक्टरांचा (IVF doctors) अनुभव यावर अवलंबून असते.
आयव्हीएफ साठी महागडी उपकरणे आणि कुशल डॉक्टरांची आवश्यकता असते. शिवाय, या फर्टिलिटी प्रक्रियेसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आणि उपकरणांमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आवश्यक आहे हेच कारण आहे जे इतर उपचारांपेक्षा आयव्हीएफ ला अधिक खर्चिक करते.

जर तुम्ही IVF चा विचार करत असाल तर तज्ञ अनुभवी आणि विश्वासार्ह डॉक्टर/क्लिनिक निवडणे महत्वाचे आहे.
योग्य क्लिनिक, प्रगत तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने तुम्हीही हजारो जोडप्यांप्रमाणे तुमचे कुटुंब पूर्ण करू शकता!
एक वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करून देखील जर गर्भधारणा राहत नसेल तर आजच अनुभवी IVF डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अजून काही प्रश्न आहेत? आमचे फर्टिलिटी तज्ञ तुमचं योग्य रित्या मार्गदर्शन करतील.

IVF संबंधित सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न:

IVF साठी योग्य वेळ कोणती?

उत्तर: IVF निवडण्यापूर्वी जोडप्यांना सहसा एक वर्ष नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो. जोडप्याचे वय येथे मुख्य भूमिका बजावते, जर जोडप्याचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असेल आणि एक वर्ष प्रयत्न करूनदेखील मूल होत नसेल तर IVF डॉक्टर कडे जावे. आणि जर त्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रयत्न करण्याचा ६ महिन्याच्या आतच IVF डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला दिला जातो.

IVF चा फुल फॉर्म काय आहे (Full-Form of IVF in Marathi)

उत्तर: आईवीएफ – इन विट्रो फर्टिलाइजेशन.

IVF ही वेदनादायक प्रक्रिया आहे का? (Is IVF Painful?)

उत्तर: IVF प्रक्रिये दरम्यान प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

IVF नंतर किती दिवसांनी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता?

उत्तर: अशा परिस्थितीत प्रतीक्षा करणे कठीण असले तरी, 2 आठवड्यांच्या कालावधीनंतर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता.

IVF किती वेळा करता येते?

उत्तर: अशा कोणत्याही मर्यादा नाहीत, अंतिम निर्णय आयव्हीएफ डॉक्टरांसोबत जोडप्याद्वारे निश्चित केला जातो.

IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे? (IUI and IVF Difference)

उत्तर: IUI ही एक प्रक्रिया आहे जिथे शुक्राणू थेट गर्भाशयात ठेवले जातात आणि गर्भधानाची प्रक्रिया शरीरात होते. दुसरीकडे, आयव्हीएफ आहे ज्यामध्ये अंडी आणि शुक्राणूंचे एकत्रीकरण लॅब मध्ये केले जाते.

हिंदी में पढ़ने के लिए इस लिंक पर क्लिक करे:

IVF Kya Hai? | IVF in Hindi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book an Appointment