आयव्हीएफ (IVF) उपचार कुणी आणि कधी घ्यावे?

IVF उपचार कुणी आणि कधी घ्यावे
वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. 'वंध्यत्व' समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असू शकते. दोघांपैकी एक किंवा दोघांमध्ये असलेल्या वंध्यत्व समस्या आणि तुमच्या वंध्यत्व समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर तुम्हाला 'पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन' देतात. शेवटी तुमचे ''आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करणे" हेच फर्टिलिटी उपचारांचे अंतिम उद्दिष्ट आहे.

Share This Post

IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) हे सर्वात लोकप्रिय, अधिक वापरले जाणारे आणि हमखास पॉजिटीव्ह रिझल्ट देणारे असे तंत्रज्ञान आहे. वंध्यत्वाचा सामना करणार्‍या जोडप्यांसाठी पालक बनण्याचा एक मार्ग म्हणजे IVF.

IUI, बेसिक IVF, प्रगत IVF, ओव्यूलेशन इंडक्शन अशा अनेक प्रकारच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट IVF सेंटर मध्ये उपलब्ध असतात. त्याला सहाय्यक ART तंत्रज्ञान (Assisted Reproductive Technology) असे म्हणतात.

वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. ‘वंध्यत्व’ समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असू शकते. दोघांपैकी एक किंवा दोघांमध्ये असलेल्या वंध्यत्व समस्या आणि तुमच्या वंध्यत्व समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर तुम्हाला ‘पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन’ देतात. शेवटी तुमचे ”आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करणे” हेच फर्टिलिटी उपचारांचे अंतिम उद्दिष्ट आहे.

IVF म्हणजे काय? IVF उपचार कुणी घ्यावेत? IVF उपचाराचे फायदे काय आहेत? अशा प्रकारे IVF उपचारांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणे हेच या लेखाचे उद्दिष्ट्य आहे.

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मधील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांबरोबरच उच्च यश दर देण्यास सक्षम आहे. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या मदतीने आजपर्यंत हजारो जोडप्यांना पॉजिटीव्ह रिझल्ट मिळालेले आहेत.  

महिलांनी कोणत्या समस्या असल्यास IVF उपचार घ्यावेत?

खालीलपैकी काही स्थितींमध्ये IVF हा एकमेव उपचार पर्याय उपलब्ध राहतो तर काही परिस्थितीत लवकर IVF उपचारांचा निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरते.

  1. PCOD/PCOS : PCOD च्या समस्येत महिलांमध्ये पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि मासिक पाळी अनियमित होते. ओव्हरीज अनेक अपरिपक्व स्त्रीबीजे सोडू लागतात, ओव्हरीज मध्ये सिस्ट बनतात आणि त्यामुळे गर्भधारणेत अडचण येते. या स्थितीत IVF उपचारांच्या मदतीने, 70% गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
  2. फाइब्रॉइड्स :
    • काही वेळा गर्भाशयात अनेक ठिकाणी फायब्रॉइड्स च्या गाठी वाढल्यामुळे गर्भधारणेत अडचण येते, किंवा बाळाच्या वाढीमध्ये अडचण येते. विशेषतः जेव्हा फायब्रॉइड्स फॅलोपियन ट्यूबच्या जवळ असतात आणि नलिकांवर दबाव टाकतात तेव्हा गर्भधारणा (Conception) होत नाही.
    • जेव्हा फायब्रॉइड गर्भाशय ग्रीवा (Cervix Aria) भागात असतात तेव्हा शुक्राणू गर्भाशयात प्रवेश करू शकत नाहीत आणि गर्भधारणा होत नाही.
    • जेव्हा फायब्रॉइड्समुळे वंध्यत्व समस्या असेल आणि IUI फेल्युअर चा अनुभव असेल तेव्हा, IVF उपचार चांगले परिणाम देतात.
  3. रीप्रोडक्टीव्ह ऑर्गन नसणे : जन्मजात अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूब सारख्या पुनरुत्पादक अवयव नसेल किंवा काही कारणांमुळे एखादा अवयव काढून टाकलेला असेल तर अशा वेळी गर्भधारणेसाठी IVF हा एकमेव पर्याय उरतो जो पॉजिटीव्ह रिझल्ट देण्यास सक्षम आहे.
  4. फैलोपियन ट्यूब च्या समस्या :
    • दोन्ही फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असल्यास गर्भधारणेसाठी IVF हा एकमेव पर्याय असतो. जेव्हा फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असतात, तेव्हा शुक्राणू फॅलोपियन ट्यूबमध्ये असलेल्या स्त्रीबीजापर्यंत पोहोचू शकत नाहीत, व कन्सेप्शन होत नाही. अशावेळी IVF हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
    • जेव्हा इन्फेक्शन्स मुळे ट्यूब डॅमेज झाल्या असतील तेव्हा नळीतून पाणी झिरपते आणि गर्भ रुजण्यात (Implantation) अडचण येते. या स्थितीत फॅलोपियन नलिका कट करणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत गर्भधारणेसाठी IVF हा एकमेव पर्याय उरतो.
  5. मेनोपॉज ची स्थिती : मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी थांबणे. वयाच्या ४५-५० व्या वर्षी रजोनिवृत्ती येते. या वयात महिलांना मधुमेह, बीपी किंवा गर्भाशयाशी संबंधित अनेक समस्या असण्याची शक्यता असते. तसेच, ओव्हरीयन रिझर्व्ह कमी होतो. या प्रकरणात फर्टिलिटी मेडिसिन्स ने तुमची मासिक पाळी पुन्हा सुरु करणे शक्य आहे. यानंतर, IVF च्या मदतीने गर्भधारणा शक्य आहे.
  6. प्रायमरी ओवरियन सिंड्रोम (POI) : प्रायमरी ओवरीयन सिंड्रोममध्ये, ओव्हरीज काम करणे थांबवतात. ओव्हरीज मधून स्त्रीबीजे सोडली जात नाहीत. मासिक पाळी अनियमित होते. अशा स्त्रियांमध्ये मेनोपज ची स्थिती लवकर येते. त्यामुळे अशा केसेस मध्ये लवकरात लवकर IVF चा निर्णय घेतल्यास पॉजिटीव्ह रिझल्ट मिळू शकतो. 
  7. PID किंवा इतर इन्फेक्शन्स : सेक्श्युअल ट्रान्समिटेड (STI) किंवा रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स (RTI) मुळे रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचे आरोग्य बिघडते. काम करण्याची क्षमता कमी होते. योनिमार्गाच्या संसर्गामुळे शुक्राणूंना गर्भाशयात पोहून जाण्यास अडथळा येतो. पुरुषांमधील संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये पू पेशी (Pus Cell) आढळतात; त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता बिघडते. अशा परिस्थितीत, जेव्हा IUI देखील सकारात्मक परिणाम देऊ शकत नाही, तेव्हा IVF हा एक चांगला पर्याय आहे. 
  8. एंडोमेट्रिओसिस : या स्थितीत गर्भाशयाचे अस्तर (Endometriam) गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते. जेव्हा एंडोमेट्रिओसिस मध्यम ते गंभीर अवस्थेत असते तेव्हा चॉकलेट सिस्ट तयार होतात, तसेच प्रजनन अवयव एकमेकांना चिकटलेले दिसतात (adesions). अशा आसंजनांमुळे पुनरुत्पादक अवयवाची कार्य क्षमता कमी होते. एंडोमेट्रिओसिसचा उपचार केल्यानंतरही हा एक वारंवार होणारा आजार आहे. या प्रकरणात IVF चांगले परिणाम देण्यास सक्षम आहे.
  9. एक्टोपिक प्रेग्नेंसी चा इतिहास : एक्टोपिक प्रेग्नन्सी च्या केसेस मध्ये, फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार झालेला गर्भ गर्भाशयात येण्याऐवजी ट्यूबमध्ये वाढू लागतो. या प्रकरणात, IVF चा निर्णय फायदेशीर ठरतो.
  10. मिस्करेजेस हिस्ट्री : एकाधिक मिस्करेजेस इतिहास असल्यास प्रगत IVF तंत्रज्ञानाने यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.
  11. IUI फेल्युअर चा इतिहास : जर तुम्हाला अनेक IUI फेल्युअर चा अनुभव आला असेल, तर एक पुढे जाऊन IVF चा पर्याय निवडल्यास नक्की यश मिळू शकते. वेळ वाया न घालवता IVF उपचार निवडल्यास तुमचा सक्सेस रेट वाढेल.
  12. अनएक्सप्लेंड इनफर्टिलिटी : जेव्हा सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात आणि वंध्यत्व समस्येचे कारण स्पष्ट समजत नाही; परंतु वंध्यत्वाची समस्या अनुभवायला येते त्याला अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटी म्हणतात. या प्रकरणात, IVF सह गर्भधारणेची शक्यता जास्त असते.
  13. पिट्यूटरी ट्यूमर या इंडोक्राइन डिसऑर्डर्स : पिट्युटरी ग्लॅन्ड रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन ची निर्मिती करतात आणि रिप्रॉडक्टिव्ह कामाचे सिग्नल अवयवांना देतात. जेव्हा हार्मोनल विकार होतात तेव्हा लैंगिक हार्मोन्स रिलीज होत नाहीत आणि इन्फर्टिलिटी समस्या निर्माण होतात. अशावेळी काही औषधांसह आयव्हीएफ उपचार केल्यास चांगले परिणाम मिळतात.

यशस्वी IVF साठी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आजच मोफत कन्सल्टेशन करा.

Free consultation

पुरुषांनी कोणत्या समस्या असल्यास IVF उपचार घ्यावेत ?

इन्फेक्शन्स, हार्मोनल इम्बॅलन्स सारख्या स्थितीत फर्टिलिटी मेडिसिन्स पॉजिटीव्ह रिझल्ट देतात. स्पर्म मोटिलिटी कमी असल्यास IUI ने रिझल्ट मिळतो. तर व्हास डिफरंस ब्लॉकेज, व्हेरिकोसिल समस्येत सर्जरी ने रिझल्ट मिळतो.

मात्र खाली नमूद केलेल्या समस्यांमध्ये IVF आवश्यक असतात.

जसे की,

  1. ऑब्स्ट्रक्टिव्ह एज़ूस्पर्मिया : या स्थितीत स्पर्म प्रोडक्शन होते; परंतु ऑब्स्ट्रक्शन मुळे स्पर्म बाहेर पडू शकत नाहीत. या परिस्थितीत, मूलभूत IVF किंवा प्रगत IVF च्या मदतीने गर्भधारणा शक्य आहे. TESE, Micro TESE, PESA सारख्या ऍडव्हान्स स्पर्म रिट्रायव्हल तंत्रांच्या मदतीने, शुक्राणू कलेक्ट करणे शक्य आहे. ऑब्सट्रॅक्टिव्ह अझूस्पर्मिया च्या स्थितीत अशा प्रगत IVF उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
  2. लो स्पर्म काउंट : ऑलिगोझूस्पर्मिया च्या केसेस मध्ये, शुक्राणूंची संख्या कमी असते. जेव्हा शुक्राणूंची संख्या कमी असताना गुणवत्ता देखील कमी असते, तेव्हा IVF पॉजिटीव्ह रिझल्ट देते.
  3. लो स्पर्म मोटिलिटी : जेव्हा शुक्राणूंची गती किंवा हालचाल कमी होते, तेव्हा शुक्राणू स्त्रीबीजापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. काही वेळा चांगली हालचाल न झाल्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजामध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही. या वंध्यत्व समस्येत, IVF उपचार आवश्यक आहेत.
  4. लो मॉर्फोलॉजी : शुक्राणूचे डोके, मान आणि शेपटीच्या संरचनेत ऍबनॉर्मलिटी असते. तेव्हा स्पर्म स्त्रीबीज फर्टीलाइज करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ICSI, IMSI, PICSI च्या मदतीने शुक्राणू स्त्रीबीजामध्ये इंजेकट केले जातात. अशा परिस्थितीत IVF हा सर्वोत्तम परिणाम देणारा पर्याय आहे.
  5. सेक्स्युअल डिस्फंक्शन : पेन डिसऑर्डर (Pain Disorder), एजॅक्युलेशन संबंधित समस्या  (Erectile Dysfunction, Early Ejaculation), यौन इच्छा कमी असणे (Arousal disorders), ओर्गसमीक डिसऑर्डर (Orgasm disorders) अशा सेक्स्युअल डिस्फंक्शन केसेसमध्ये IVF उपचारांची निवड केल्यास लवकर रिझल्ट मिळतो.

अशा अन्य स्थितीत आयव्हीएफ उपयुक्त आहे :

काही विशिष्ट परिस्थितींसाठी, तुम्ही तुमच्या तज्ज्ञ फर्टिलिटी डॉक्टरांशी कन्सल्टेशन करून प्रगत IVF पर्यायांची निवड करू शकतात.

जसे कि,

  • गर्भधारणा पोस्टपोन करायची असल्यास : जर तुम्हाला एज्युकेशन किंवा करिअरमुळे लवकर आई व्हायचे नसेल, तर तुम्ही क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation) तंत्राच्या मदतीने बीजे गोठवून ठेऊ शकतात. आणि हवे तेव्हा IVF करून आई होऊ शकता. क्रायोप्रिझर्वेशन च्या मदतीने वाढत्या वयात येणाऱ्या वंध्यत्व समस्यांवर एक प्रकारे मात करणे शक्य आहे.
  • कर्करोग रोग / रेडिओथेरपी / केमोथेरपी : केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीमुळे शुक्राणू किंवा स्त्रीबीजांचा दर्जा खराब होतो. अशी थेरपी सुरू करण्यापूर्वी क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation) तंत्राने बीजे गोठवणे शक्य आहे. तुमचा आजार बरा झाल्यानंतर, तुम्ही IVF च्या मदतीने गर्भधारणा करू शकता.
  • जेनेटिक डिसॉर्डर : PGT-M तंत्राच्या साहाय्याने अनुवांशिक रोगांचे संक्रमण थांबवणे शक्य आहे.
  • सिंगल पैरेंट देखील IVF तंत्रज्ञानाची मदत घेऊन पालकत्वाचा आनंद घेऊ शकतात.
  • अधिक वय (low ovarian reserve) : जसजसे वय वाढत जाते, तसतशी प्रजनन क्षमता कमी होते. विशेषतः स्त्रियांमध्ये, वाढत्या वयानुसार, ओव्हरीयन रिझर्व्ह कमी होतो. म्हणजेच स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि संख्या कमी होते. यामुळेच एका विशिष्ट वयानंतर गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी IVF हा अतिशय प्रभावी पर्याय आहे.

IVF साठी योग्य वेळी योग्य सेंटर ची निवड करा आणि जीवनातील आनंदी क्षण मिळवा.

Free consultation

IVF चे फायदे

  • आधुनिक फर्टिलिटी ट्रीटमेंट मुळे निरोगी बाळ होण्याची शक्यता वाढते.
  •  IVF उपचार पॉजिटीव्ह रिझल्ट ची हमी देते.
  • IVF प्रक्रियेत वंध्यत्वाचे अचूक निदान आणि उपचार करणे शक्य आहे.
  • सिंगल पालकांसाठी देखील IVF ने गर्भधारणा शक्य आहे.
  • सर्वात कठीण वंध्यत्व समस्यांवर देखील IVF उपचार हा यशस्वी रिझल्ट देणारा ऑप्शन आहे.
  • IVF केवळ वंध्यत्वाच्या समस्येतच नाही, तर इतर काही परिस्थितींमध्ये निवडले जाऊ शकते.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

IVF म्हणजे काय?

उत्तर : IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. जेव्हा दाम्पत्यांना गर्भधारणा शक्य होत नाही, तेव्हा कृत्रिम रित्या लॅब मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे फर्टिलायझेशन करून गर्भ बनवला जातो. हा गर्भ गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. याला IVF म्हणतात.

IVF ची आवश्यकता का असते ?

उत्तर : IVF चा वापर वंध्यत्व समस्येवर उपचार करण्यासाठी, काही अनुवांशिक समस्या टाळण्यासाठी, सिंगल पॅरेण्ट साठी केला जाऊ शकतो. IVF ने गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. 

IVF प्रक्रिया कशी करतात?

उत्तर : IVF प्रक्रियेत फर्टिलिटी मेडिसिन चा वापर करून ओव्हरीयन स्टिम्युलेशन करणे, ओवुम आणि स्पर्म कलेक्शन, स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे लॅब मध्ये फर्टिलायझेशन, एम्ब्रियो फॉर्मेशन, एम्ब्रियो ट्रान्स्फर आणि प्रेग्नन्सी टेस्ट या टप्प्यांचा समावेश होतो.

IVF सक्सेस रेट काय आहे?

उत्तर : IVF सक्सेस रेट अनेक घटकांवर अवलंबून असतो. जसे की, तुमचे वय, मेडिकल कंडीशन, ट्रांसफर करायच्या एम्ब्रियो ची संख्या इ.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

अशुक्राणुता (Azoospermia) की स्थिती में गर्भधारण कैसे करे?

एज़ोस्पर्मिया एक ऐसी स्थिति है जहां पुरुष के वीर्य में कोई शुक्राणु नहीं होता है। शून्य शुक्राणु का सीधा संबंध पुरुष इन्फर्टिलिटी से है। लेकिन चिंता न करे। फर्टिलिटी डॉक्टर के मार्गदर्शन और आधुनिक ART उपचार विधियों का उपयोग करके निश्चित रूप से गर्भधारण हो सकता है।