PCOD आणि PCOS मधील फरक समजून घेणे, कोणत्या कारणांमुळे PCOD होतो आणि कोणती लक्षणे दिसल्यास PCOD ची तपासणी करणे आणि उपचार घेणे गरजेचे आहे याविषयी माहिती देणे लेखाचे उद्दिष्ट्य आहे. PCOD कायमचा बारा नाही झाला तरी नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण अनुपचारित PCOD मुळे अनेक शारीरिक आजार उद्भवू शकतात.
Table of Contents
PCOD म्हणजे काय?
पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्तिथी आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते.
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF कंसल्टंट डॉ. सोनाली मळगांवकर सांगतात “PCOD च्या लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, दीर्घ वेदनादायक पीरियड्स, पुरळ, ओटीपोटात वेदना,ओवेरियन सिस्ट, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व यांचा समावेश होतो. काळजी करू नका, योग्य वेळी निदान, आणि योग्य औषधोपचारांनी PCOD ची समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते.”
PCOD कोणाला आणि कधी होतो?
पीसीओडी ची समस्या हि पूर्वी 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता हि समस्या झपाट्याने वाढत आहे आणि 18 ते 20 वयोगटातील मुलींमध्ये सुद्धा PCOD च्या समस्येचे लक्षणं दिसून येतात. याच कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात 5 ते 10% महिलांमध्ये PCOD ची समस्या आढळते मुख्यतः तेव्हा, जेव्हा स्त्रियां गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात.
पीसीओडीची लक्षणं काय आहेत?
- मासिक पाळीच्या समस्या
- वंध्यत्व
- शरीरावर अतिरिक्त केस
- वजन वाढणे
- ओटीपोटात वेदना
- वाढलेलं ब्लड प्रेशर
- झोप न येणं
- थकवा जाणवणे
- डोकेदुखी
- अचानक मूड बदलणे
PCOD च्या इतर लक्षणांपैकी आहे.
PCOD आणि PCOS मधील फरक:
बऱ्याच स्त्रियांना पीसीओस आणि पीसीओडी मधील अंतर कळत नाही. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) आणि पीसीओस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS).
PCOD काय आहे?
पीसीओडी ही एक स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी निर्माण होतात, ज्याचे नंतर सिस्ट तयार होतात. ज्यामुळे वेळेवर स्त्रीबीज फुटत नाही आणि पीरिअड्स इर्रेग्युलर होतात ज्यामुळे गर्भधारणेत अडचण निर्माण होते.
PCOD च्या मागची कारणे अनेकदा हे असू शकतात:
- वजन वाढणे
- ताण
- हार्मोनल असंतुलन
- जीवनशैलीतील बदल असतात
PCOS काय आहे?
तसेच पीसीओस PCOS हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे. या परिस्थितीत, अंडाशय जास्त प्रमाणात एंड्रोजन रिलीज करते आणि अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात. ज्यामुळे स्त्रीबीज निर्मिती थांबते.
PCOS च्या मागची कारणे अनेकदा हे असू शकतात:
- इन्सुलिन प्रतिकार
- हार्मोनल असंतुलन
- आनुवंशिक करण
- एंड्रोजन च्या लेव्हल्स वाढणं
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीसीओएस एक आजार आहे तर पीसीओडी हे त्याच एक लक्षण आहे.
पीसीओडी ची कारणे:
PCOD ची समस्या जरी सामान्य असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे की:
- इन्सुलिनचे वाढते प्रमाण
- जीन्स (Genes): पीसीओडी आनुवंशिक आहे, अनेक वेळा महिलांना अनुवांशिकरीत्या पीसीओडी ची समस्या असू शकते. इतर कारण जसे:
- अस्वस्थ जीवनशैली
- निष्क्रिय जीवनशैली
- अयोग्य आहार
- पीरिअड्स मध्ये असंतुलन असणे
- शरीरात इन्सुलिनची जास्त मात्रा
- सिगरेट आणि दारूचा अतिरेक
पीसीओडी आणि पीसीओस ट्रीटमेंट:
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF कंसल्टंट डॉ. सोनाली मळगांवकर सांगतात “पीसीओडीच्या आणि पीसीओएस च्या सर्व केसेस मध्ये अल्ट्रासाऊंडद्वारे ओवेरियन सिस्ट शोधणे आवश्यक आहे. पेल्विक अल्ट्रासाऊंड हे एक महत्त्वाचे निदान आहे जे योग्य उपचार देण्यात मदत करते.”
योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडी आणि पीसीओएस च्या समस्या नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात. हार्मोन्स नियंत्रित करून तुम्हाला औषधांनी सहज गर्भधारणा राहू शकते. सोबतच ऍडवान्सड फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे IVF च्या मदतीने स्वस्थ गर्भधारणा शक्य आहे.
पीसीओडी पासून कसे वाचावे:
काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही PCOD ला दूर ठेऊ शकता, यात प्रामुख्याने समाविष्ट आहे:
- उच्च कोलेस्टेरॉल, फैट, आणि कार्बोहाइड्रेट टाळणे
- नियमितपणे व्यायाम करणे
- वेळेवर औषधे घेणे
- दारू आणि सिगरेट टाळणे
- वजन नियंत्रित करणे
- अधिक तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणे
सारांश (Conclusion)
पीसीओडी वर कोणतेही ट्रीटमेंट नाही हे खरे आहे. परंतु हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की पीसीओडी ने ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या येत नाही. योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडीची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते, परंतु गंभीर समस्यांमध्ये महिलांना आयव्हीएफची गरज भासू शकते. काळजी ची गरज नाही, हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारण करू शकता.
आई होणे शक्य आहे. फक्त गरज असते तुमची स्थिती समजून घेऊन आणि योग्य उपचार प्रदान करण्याची. यशस्वी गर्भधारणेसाठी तज्ञ डॉक्टरांच मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
PCOD म्हणजे काय?
उत्तर: पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (Polycystic Ovary Disorder). ही एक स्थिती आहे ज्यामध्ये पीरिअड्स इर्रेग्युलर होतात आणि गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.
PCOS आणि PCOD मध्ये काय फरक आहे?
उत्तर: पीसीओएस पीसीओडीपेक्षा अधिक गंभीर समस्या आहे. पीसीओडी ही एक स्थिती आहे तसेच पीसीओस हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे.
PCOS सह प्रेग्नन्सी शक्य आहे का?
उत्तर: एडवांस रिप्रोडक्टिव टेक्निक च्या साहाय्याने तुम्ही गरोदर होऊ शकतात.
मला PCOS आहे पण नियमित मासिक पाळी येते. मी गर्भवती होऊ शकते का?
उत्तर: होय, तुम्ही PCOS सह गर्भवती होऊ शकता.
PCOD का आणि कसा होतो?
उत्तर: मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे, या स्थितीत स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन एंड्रोजनची लेवल वाढते आणि अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात.
PCOD असल्यास गर्भधारणा राहू शकते का?
उत्तर: पीसीओडी असलेल्या प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेत अडचण येत नाही. सोबतच एडवांस फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे IVF च्या मदतीने स्वस्थ गर्भधारणा शक्य आहे.