ओव्यूलेशन म्हणजे काय?
जेव्हा स्त्रीबीजांची वाढ आणि विकास होतो, तेव्हा अशी विकसित स्त्रीबीजे सोडण्याची प्रक्रिया अंडाशयांकडून केली जाते. या प्रक्रियेला ओव्यूलेशन म्हणतात.
‘ओव्यूलेशन इंडक्शन’ म्हणजे काय?
‘ओव्यूलेशन इंडक्शन’ हा एक प्राथमिक फर्टिलिटी उपचार आहे; जो अशा स्त्रियांना गर्भधारणेत मदत करतो, ज्यांना ओव्यूलेशन समस्या आहे. ओव्यूलेशन इंडक्शन उपचार प्रक्रियेत औषधांच्या मदतीने अंडाशयांना उत्तेजित करून स्त्रीबीजांचा विकास करणे समाविष्ट आहे. याला मेडिकल भाषेत ‘ओवरियन स्टिम्युलेशन’ म्हणतात. या ट्रीटमेंट चा वापर करून गर्भधारणेची शक्यता वाढवली जाते.
गर्भधारणेत ‘ओव्हुलेशन इंडक्शन’ चे महत्त्व
ओव्यूलेशन इंडक्शन (Ovulation Induction) उपचारांमध्ये क्लोमिफेन सायट्रेट किंवा लेट्रोझोल यांसारखी विविध औषधे वापरून ओवरीयन स्टिम्युलेशन केले जाते. ज्यामुळे एका वेळी अधिक स्त्रीबीजे परिपूर्णपणे विकसित होतात. अधिक स्त्रीबीजे फर्टिलायझेशन साठी तयार केली जातात. अधिक स्त्रीबीजे म्हणजे गर्भधारणेची शक्यताही अधिक असते. शिवाय ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांमध्ये ओव्यूलेशन बरोबरच मासिक पाळीचे देखील नियमन केले जाते.
‘ओव्हुलेशन इंडक्शन’ प्रक्रिया
ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांचा सरासरी कालावधी १२ ते १६ दिवसांचा असतो.
१) कन्सल्टेशन : प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये कोणताही फर्टिलिटी उपचार सुचवण्यापूर्वी तुमच्या केस चा डिटेल स्टडी केला जातो. इन डेप्थ इव्हाल्युएशन केले जाते. तुमचे वय, शारीरिक स्थिती, वंध्यत्व समस्या यानुसार प्रभावी उपचार सुचवला जातो. तुमचे वय कमी असेल आणि हलक्या स्वरूपाची वंध्यत्व समस्या असेल किंवा वंध्यत्वाचे कारण कळून येत नसेल किंवा PCOD स्थितीत, ओव्यूलेशन इंडक्शन प्रभावी प्राथमिक उपचार आहे.
२) मेडिसिन : मासिक पाळी सुरु झाल्यापासून पहिल्या ५ दिवसात औषधे सुरु केली जातात. डोस आणि औषधे प्रत्येक रुग्णांसाठी गरजेनुसार वेगळी असू शकतात. औषधांमध्ये क्लोमिड किंवा लेट्रोझोल सारखी औषधे किंवा गोनॅडोट्रोफीन सारखी इंजेक्शन असू शकतात. या औषधांमुळे अंडाशय उत्तेजित होतात आणि एका वेळी अनेक स्त्रीबीजांचा विकास होतो. साधारण १० व्या दिवसापासून ते २०-२२ व्या दिवसादरम्यान केव्हाही ओव्यूलेशन होऊ शकते.
३) हार्मोन्सच्या पातळीचे निरीक्षण : ओव्हुलेशन इंडक्शन दरम्यान औषधे काम करत आहेत कि नाहीत किंवा हार्मोन व्यवस्थितरीत्या तयार होत आहेत कि नाहीत हे तपासण्यासाठी डॉक्टर ब्लड टेस्ट घेऊन हार्मोन पातळीचा मागोवा घेतात.
४) फॉलिक्युलर स्टडी किंवा अल्ट्रासाउंड मॉनिटरिंग : हि एकाच प्रक्रियेची दोन भिन्न नावे आहेत. ओवरीयन स्टिम्युलेशन द्वारे स्त्रीबीजांचा विकास होतो, तेव्हा डॉक्टर वेळोवेळी अल्ट्रासाउंड च्या मदतीने निरीक्षण करतात. फॉलिक्युलर फुटण्याची वेळ आणि ओव्यूलेशन काळाचा मागोवा घेतला जातो. ओव्यूलेशन चा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये हि सर्वात अचूक पद्धत आहे.
‘ओव्यूलेशन इंडक्शन आणि प्लॅन्ड सेक्श्युअल रिलेशनशिप’ उपचार
या उपचारात डॉक्टर तुमचा ओव्यूलेशन कालावधी जाणून घेऊन ओव्यूलेशन काळात सेक्श्युअल रिलेशन ठेवण्याचा सल्ला देतात. त्यापूर्वी वरीलप्रमाणे सर्व ओव्यूलेशन इंडक्शन प्रक्रिया पूर्ण केली जाते.
जेव्हा अनियमित ओव्यूलेशन होत असते किंवा pcod च्या महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येत असल्यामुळे ओव्यूलेशन कालावधी अनिश्चित असतो अशा स्थितीत ‘ओव्यूलेशन इंडक्शन’ द्वारे गर्भधारणेची संभावना वाढविली जाते. ओव्यूलेशन च्या साधारण २ दिवस आधी आणि ओव्यूलेशन च्या दिवशी याप्रमाणे तुमचे डॉक्टर तुम्हाला ३ दिवस सेक्श्युअल रिलेशन ठेवण्याचा सल्ला देतात. कारण या काळात ओव्हरीज मध्ये फॉलिकल्स फुटून स्त्रीबीजे बाहेर पडतात; अंडाशय स्त्रीबीजे सोडतात आणि हि स्त्रीबीजे फेलोपियन ट्यूब मध्ये प्रवेश करतात, तेव्हा ती फर्टिलायझेशन साठी रेडी असतात. या काळात स्त्रीबीज फर्टीलाइज करण्यासाठी शुक्राणू उपस्थित झाले, तर निश्चितपणे गर्भधारणा होते.
प्राथमिक ओव्यूलेशन इंडक्शन उपचार कुणी करावे ?
१) अनओव्यूलेशन समस्या : जेव्हा ओव्यूलेशन ची अनुपस्थि असते. म्हणजेच अंडाशय स्त्रीबीजे सोडण्याची प्रक्रिया अजिबात करीत नाहीत. हार्मोनल असंतुलन, तणाव, जास्त व्यायाम, लठ्ठपणा किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) यांसारख्या विविध कारणांमुळे हे घडू शकते. अशा वेळी ओव्यूलेशन इंडक्शन प्रभावी उपचार आहे.
२) पॉलिसिस्टिक ओवरीयन सिंड्रोम (PCOD/PCOS) : पॉलिसीसक्तीक ओवरीयन सिंड्रोम हि अशी स्थिती आहे जिथे अनेक स्त्रीबीजांचा अर्धवट विकत होतो. त्यामुळे एकही स्त्रीबीज फर्टीलाइजेशन साठी तयार नसते. अशा वेळी ओव्यूलेशन इंडक्शन द्वारे स्त्रीबीजांचा पूर्ण विकास करणे शक्य आहे.
३) प्रिमॅच्युअर ओवॅरियन इन्साफीशिअन्सी (POI) : हि अशी स्थिती आहे जिथे स्त्रियांचे अंडाशय वयाच्या ४० पूर्वीच काम करणे थांबवतात. स्त्रीबीजे बनत नाहीत आणि मासिक पाळी येणे बंद होते. याला वेळेपूर्वी येणारा मेनोपॉज असेही म्हणतात. अनुवांशिक विकार, ऑटोइम्युन डिसऑर्डर, कॅन्सरवरील उपचार यांमुळे असे होऊ शकते. या स्थितीत हार्मोन रिप्लेसमेंट आणि ओव्यूलेशन इंडक्शन प्रभावी उपचार आहेत. तरीही अपयशी राहिल्यास IVF ने निश्चितपणे गर्भधारणा होऊ शकते.
४) एनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी : हि अशी स्थिती आहे जेव्हा सर्व तपासण्या करूनदेखील वंध्यत्वाचे कारण कळून येत नाही. अतिसूक्ष्म समस्या असल्यामुळे वंध्यत्वाचे निदान होऊ शकत नाही आणि गर्भधारणेत अडचण येते. अशा कपल्स ना ‘ओव्यूलेशन इंडक्शन’ ने रिझल्ट मिळू शकतो.
५) ओव्यूलेटरी डिसफंक्शन : जेव्हा ओवरी नियमितपणे काम करीत नाहीत तेव्हा ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
6) अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रियांसाठी देखील ओव्यूलेशन इंडक्शन प्रभावी उपचार आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
‘ओव्यूलेशन इंडक्शन’ चा सक्सेस रेट?
तरुण जोडप्यांमध्ये ओव्यूलेशन इंडक्शन चा सक्सेस रेट सर्वात जास्त आहे. ज्या स्त्रियांचा ओवरियन रिझर्व्ह नॉर्मल आहे आणि पुरुषांचे सीमेन पॅरामीटर्स नॉर्मल आहेत तसेच इतर कोणतीही गंभीर वंध्यत्व समस्या नसेल तर ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांचा सक्सेस रेट जास्त असतो. या उपचाराचा एकूण यश दर सुमारे 8-10% प्रति सायकल आहे.
ओव्यूलेशन इंडक्शन उपचार यशस्वी होण्यासाठी काय करावे?
ओव्यूलेशन इंडक्शन यशस्वी होण्यासाठी –
– वेळेवर औषधे घ्या.
– तणावमुक्त राहा
– व्यसने करू नका
– पौष्टिक आहाराचे सेवन करा
– भरपूर पाणी प्या.
वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी ओव्हुलेशन इंडक्शन योग्य आहे का?
नाही. अनओव्यूलेशन, ओव्यूलेटरी डिसफंक्शन किंवा अस्पष्ट वंध्यत्वाचा अनुभव घेत असलेल्या आणि कमी वयाच्या जोडप्यांसाठी ‘ओव्यूलेशन इंडक्शन’ प्रभावी उपचार आहे. गंभीर वंध्यत्व समस्यांसाठी IUI, IVF किंवा IVF मधील आधुनिक उपचारांची आवश्यकता असते.