मेनोपॉज लक्षणे, कारणे, आणि उपचार | Menopause in Marathi

Menopause म्हणजे मासिक पाळी बंद होणे. अर्थात रजोनिवृत्ती. जेव्हा एखाद्या स्त्री ला सलग १२ महिने मासिक पाळी येत नाही. तेव्हा मेनोपॉज असल्याचे म्हंटले जाते. थोडक्यात, हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जिचा स्वीकार करणे महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते. खासकरून जेव्हा फॅमिली कंप्लीट नसते आणि मेनोपॉज येतो तेव्हा चिंता व्यक्त केली जाते.

Share This Post

Menopause म्हणजे मासिक पाळी बंद होणे. अर्थात रजोनिवृत्ती. जेव्हा एखाद्या स्त्री ला सलग १२ महिने मासिक पाळी येत नाही. तेव्हा मेनोपॉज असल्याचे म्हंटले जाते.

थोडक्यात, हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जिचा स्वीकार करणे महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते. खासकरून जेव्हा फॅमिली कंप्लीट नसते आणि मेनोपॉज येतो तेव्हा चिंता व्यक्त केली जाते.

आम्ही आश्वस्त करू इच्छितो कि, आधुनिक ART (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञानाच्या मदतीने मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे. रजोनिवृत्तीनंतरही आई-बाबा होण्याचा आनंद अनुभवता येणार आहे.

मोनोपॉजमध्ये नेमकं काय होतं?

मासिक पाळी संपते. जेव्हा एखाद्या स्त्री ला १२ महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा तिला अधिकृतपणे मेनोपॉज आलेला असतो.

मेनोपॉज येताना महिलांच्या अंडाशयातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या प्रमुख रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स ची घट होऊ लागते. अंडाशयातून एग्ज सोडण्याची क्रिया अनियमित होते. आणि मेनोपॉज मध्ये ओव्हरीज एग्ज रिलीज करणे पूर्णपणे थांबवतात. हार्मोनल इम्बॅलन्स मुळे शारीरिक आणि भावनिक बदल होऊ लागतात.

Menopause in Marathi

मेनोपॉजची सुरूवात कधी होते?

साधारणपणे ४५ ते ५५ च्या दशकात मेनोपॉज येतो. आणि ४० ते ५० च्या दशकात मेनोपॉज ची सुरुवात होते. मेनोपॉज ची कमी-अधिक लक्षणे दिसू लागतात. अर्थात, प्रत्येकासाठी हा काळ वेगवेगळा असू शकतो. काही स्त्रियांना कमी वयात म्हणजेच ३५-४० वयात देखील मेनोपॉज येऊ शकतो. याला premature menopause असेही म्हणतात.

मेनोपॉज चे प्रकार

  1. नैसर्गिक मेनोपॉज : जेव्हा, स्त्रीच्या अंडाशयात नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबते आणि तिच्या हार्मोन्स ची पातळी कमी होते.
  2. प्रेरित मेनोपॉज (Induced Menopause) : शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपी यासारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे इंड्यूस मेनोपॉज येतो.

मेनोपॉज चे टप्पे

मेनोपॉज हि एकाएकी घडणारी घटना नाही. तर, हि एक क्रमिक प्रक्रिया आहे. काही वर्ष चालणारी प्रक्रिया आहे.

मेनोपॉज हि प्रक्रिया ३ टप्प्यात घडून येते.

  1. पेरीमेनोपॉज : मेनोपॉज येण्यापूर्वीचा टप्पा म्हणजे पेरी मेनोपॉज. यामध्ये मासिक पाळी अनियमित होते, मात्र पूर्ण बंद होत नाही. अधिक महिलांमध्ये साधारण ३५-४० व्या वर्षी ही स्टेज निर्माण होते. यामध्ये हॉट फ्लॅशेस, अनियमित मासिक पाळी, मूड बदलणे आणि झोपेचा त्रास अशी लक्षणे दिसू लागतात.
    • पेरीमेनोपॉज सह गर्भधारणा होऊ शकते का? होय. पेरी मेनोपॉज च्या टप्प्यात तुमची मासिक पाळी अनियमित होते. पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे अनियमित का होईना, पण ओव्यूलेशन प्रक्रिया सुरु राहते. तसेच इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन ची पातळी कमी-अधिक होत असते. मात्र रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन चे निर्माण कमी-अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे महिला गर्भधारणा करू शकतात. अर्थात, त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचाराची निकड भासू शकते.
  2. मेनोपॉज : या अवस्थेत, अंडाशय एग्ज सोडणे आणि इस्ट्रोजेन तयार करणे पूर्णपणे थांबवते. रजोनिवृत्तीच्या सामान्य लक्षणांमध्ये योनिमार्गात कोरडेपणा, रात्रीचा घाम येणे, वजन वाढणे आणि हाडे ठिसूळ होणे, यांचा समावेश असू शकतो.
  3. पोस्टमेनोपॉज : जेव्हा सलग १२ महिने मासिक पाळी येत नाही, त्यानंतरचा काळ म्हणजे पोस्ट मेनोपॉज होय. या अवस्थेत, पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज दरम्यान अनुभवलेली अनेक लक्षणे कमी होऊ लागतात किंवा पूर्णपणे बंद होतात. या टप्प्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) यासारख्या दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष्य करू नये.

मेनोपॉज नंतर गर्भधारणा कशी करावी?

रजोनिवृत्ती दरम्यान गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांनी फर्टिलिटी डॉक्टरांशी कन्सल्टेशन करणे महत्वाचे आहे. एक्स्पर्ट फर्टिलिटी डॉक्टर तुम्हाला तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकतात.

मेनोपॉज नंतर गर्भधारणेसाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, सकस आहाराचे सेवन, स्ट्रेस न घेणे अशा सवयी अंगिकाराव्या.

मेनोपॉज नंतर प्राकृतिक गर्भधारणा करणे अशक्यच आहे. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण फर्टिलिटी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यास आधुनिक ART तंत्रज्ञानाचा वापर करून मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे. फर्टिलिटी मेडिसिन चा वापर करून मासिक पाळी पुन्हा सुरु केली जाते आणि IVF द्वारे गर्भधारणा करता येऊ शकते.

मेनोपॉज लक्षणे

  • अनियमित मासिक पाळी
  • उष्णतेच्या संवेदना जाणवणे (Hot Flashes)
  • रात्री किंवा अनेकदा घाम येणे
  • झोप न येणे (sleep disturbance)
  • सतत मूड बदलत राहणे (Mood Swings)
  • वजन वाढणे (Obesity)
  • मेटाबॉलिजम कमी होणे
  • त्वचा कोरडी होणे
  • अधिक प्रमाणात केसगळती
  • हृदयाचे ठोके वाढणे (Palpitation)
  • सतत डोकेदुखी होणे (Headaches)
  • थकवा
  • योनिमार्गात कोरडेपणा (Vaginal dryness)
  • कामवासना कमी होणे (Low Libido)
  • हाडांची झीज होणे आणि सांधेदुखी
  • रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन कमी होणे
  • ओव्हरीज एग्ज रिलीज करणे थांबवतात.

कमी वयातील मेनोपॉज (Early menopause)

कमी वयात येणाऱ्या रजोनिवृत्तीच्या वेळेपुर्वीची रजोनिवृत्ती किंवा premature ovarian failure असेही म्हणतात. ४० पूर्वी येणार मेनोपॉज म्हणजे अरली मेनोपॉज. अर्थात कमी वयात प्रजनन क्षमता संपुष्टात येते. महिलांसाठी हि एक आव्हानात्मक स्थिती आहे.

अरली मेनोपॉज ची कारणे :

  • आनुवंशिकता
  • खालावलेली जीवनशैली
  • ऑटोइम्युन डिसऑर्डर
  • केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी उपचार
  • धूम्रपान किंवा मद्यपान
  • ओवरीयन सर्जरी
  • ओव्हरी काढून टाकलेली असणे

रजोनिवृत्ती असलेल्या स्त्रिया अजूनही नैसर्गिकरित्या किंवा सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकतात, जोपर्यंत ते संपूर्ण रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचत नाहीत.

मेनोपॉज चा फर्टिलिटी आरोग्यावर कसा परिणाम होतो?

  • फॉलिकल्स ची संख्या कमी होते.
  • इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन ची पातळी कमी होते.
  • मासिक पाळी सुरुवातीला अनियमित होते आणि नंतर बंद होते.
  • रिप्रॉडक्टिव्ह हार्मोनची घट झाल्यामुळे गर्भधारणेसाठी उपयुक्त असलेल्या स्त्रीबीजांची क्वालिटी कमी होते.
  • इंटरकोर्स दरम्यान वेदना होतात. कोरडेपणा असतो. योनीपटल पातळ होतात आणि यौन इच्छाही कमी होते.

थोडक्यात, हार्मोन्स पातळी कमी झाल्यामुळे आणि स्त्री च्या प्रजननक्षमतेत घट झाल्यामुळे प्रजनन क्षमता संपते.

मेनोपॉज नंतर गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट

रजोनिवृत्ती स्त्रीची पुनरुत्पादक वर्षे संपतात. सामान्यत: मासिक पाळी बंद होते. याचा अर्थ असा की तिचे शरीर यापुढे स्त्रीबीज निर्माण करण्यास किंवा गर्भधारणेला आधार देण्यास सक्षम नाही. तरीही काही आधुनिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा करणे शक्य आहे.

  1. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) : यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिप्लेस केले जातात. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता सुधारण्यास आणि गर्भाशयातील अस्तर बनण्यास मदत होते. काही प्रकरणांमध्ये follicle-stimulating hormone (FSH) सारख्या औषधांचा वापर करून हार्मोन स्टिम्युलेट करून ओव्हरीज ला एग्ज रिलीज करण्यास प्रोत्साहन देतात.
  2. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) : इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सहाय्यक पुनरुत्पादन तंत्र आहे ज्यामध्ये लॅब मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू फलित करून भ्रूण बनवतात आणि भ्रूण महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करतात. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.
  3. एग डोनर प्रोग्राम : स्त्री डोनर चे एग पुरुष पार्टनर च्या शुक्राणूंसोबत फर्टीलाइज करून बनवलेला गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात.
  4. Ovarian Tissue Transplantation : हे उपचार अंडाशयांना एग्ज प्रोड्युस करण्यास आणि पुन्हा प्रजनन क्षमता प्राप्त करण्यास मदत करते.
  5. इतर प्रगत पुनरुत्पादक तंत्रज्ञान : इतर अनेक प्रगत रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहेत, जसे की इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI), प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT), आणि गेमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर (GIFT), ज्यांचा विशिष्ट प्रकरणांमध्ये विचार केला जाऊ शकतो.

मेनोपॉज संबंधित अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

हॉट फ्लश कशामुळे येतात?

इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे शरीराच्या थर्मोस्टॅटचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे शरीरातील तापमान चढउतार होतात आणि हॉट फ्लश येतात.

मेनोपॉज ची सुरुवातीची लक्षणे कोणती?

रजोनिवृत्तीची सुरुवातीची चिन्हे प्रत्येक स्त्रीमध्ये बदलू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, हॉट फ्लॅशेस, रात्रीचा घाम येणे आणि मूड बदलणे यांचा समावेश होतो.

रजोनिवृत्तीनंतर आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी कोणते पर्याय आहेत?

IVF, डोनर प्रोग्रॅम, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी अशा अनेक उपचारणानी मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।

Essential Nutrients Your Body Needs When Pregnant

During pregnancy, you provide all of the nutrition your baby requires. As a result, you may need more nutrients in your body while you’re pregnant. Taking prenatal vitamins and eating healthy foods will help you get all the nutrients you and your baby require throughout your pregnancy.