आईवीएफ फेल होण्याची कारणे आणि IVF फेलियर नंतर यशस्वी गर्भधारणा

IVF failure in Marathi | आईवीएफ फेल होण्याची कारणे
आईवीएफ म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF ट्रीटमेंट बद्दल तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल परंतु आईवीएफ हि प्रक्रिया काही जोडप्यांमध्ये पहिल्याच सायकल मध्ये यश देत नाही, हे तुम्हाला माहित आहे का? आईवीएफ फेल (ivf failure in Marathi) होण्याची कारणे बरीच आहेत, आणि सर्व कारणांचा अभ्यास आणि निदान करून आईवीएफ फेलियर वर मात केली जाऊ शकते. पण अयशस्वी IVF सायकल नंतर पुढे काय? चला जाणून घेऊ यात पुढील ब्लॉग मध्ये. 

Share This Post

आईवीएफ म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF ट्रीटमेंट बद्दल तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल परंतु आईवीएफ हि प्रक्रिया काही जोडप्यांमध्ये पहिल्याच सायकल मध्ये यश देत नाही, हे तुम्हाला माहित आहे का? आईवीएफ फेल (ivf failure in Marathi) होण्याची कारणे बरीच आहेत, आणि सर्व कारणांचा अभ्यास आणि निदान करून आईवीएफ फेलियर वर मात केली जाऊ शकते. पण अयशस्वी IVF सायकल नंतर पुढे काय? चला जाणून घेऊ यात पुढील ब्लॉग मध्ये. 

बऱ्याच पेशंट्स मध्ये दिसणारं कॉमन कारण म्हणजे आधीच्या क्लिनिक कडून त्यांच्या केसचा सखोल, पध्दतशीर आणि तपशीलवार अभ्यास न होणे.

सोबतच आईवीएफ अयशस्वी होण्याचे अनेक कारणे असतात. जर तुम्ही प्रोजेनेसिस मध्ये ट्रीटमेंट घेत असाल तर आम्ही तुमच्या केसचा सखोल अभ्यास, मूळ कारणाचे विश्लेषण करून त्यानंतरच नियोजित उपचार योजना तयार करतो.  

परंतु इतर फर्टिलिटी क्लिनिक मध्ये तुमचे सगळे टेस्ट आणि चेकअप करून सुद्धा आईवीएफ सायकल फेल होते. त्याचे कारण काय?

आईवीएफ यशसस्वी होण्या मागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. जसे:

  • तुमचं वय 
  • ट्रांसफर केलेल्या भ्रूणाची गुणवत्ता 
  • इम्प्लांटेशन समस्या 
  • गर्भाशयाचं खराब अस्तर 

ट्रीटमेंट मधील प्रत्येक स्टेप हि योग्य रित्या पार पडणे गरजेचे आहे. जर एकही स्टेप चुकली, तर आईवीएफ फेलियर ची शक्यता वाढते.

आईवीएफ फेल का होते?

भ्रूण हस्तांतरण (embryo transfer) झाले असल्यास, IVF अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे भ्रूण इम्प्लांटेशन अयशस्वी होणे. पण प्रत्येकवेळेस हेच कारण असेल असं नाही. बऱ्याचदा स्त्रीबीज आणि शुक्राणूंमध्ये काही समस्या असू शकतात. या सोबतच शरीराचा IVF सायकल ला प्रतिसाद, गर्भाशयाचं खराब अस्तर, तुमची जीवनशैली, किंवा क्रोमोसोमल अब्नोर्मलिटी पण आईवीएफ फेलियर चे कारण असू शकते. 

आईवीएफ अयशस्वी होण्याची कारणे:

  • स्त्रीच वय अधिक असणे: स्त्रियांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता खालावते हे सर्वांनाच माहित आहे. अंड्यांच्या प्रमाणात आणि मुख्यतः गुणवत्तेमध्ये घट झाल्याने आईवीएफ प्रक्रियेसाठी योग्य आणि स्वस्थ स्त्रीबीज निवडणे कठीण होते ज्यामुळे यशस्वी रित्या आईवीएफ आणि गर्भधारणा पार पडणे कठीण होऊ शकते. 
  • शुक्राणूंची खराब गुणवत्ता: आरोग्य, गतिशीलता आणि शुक्राणूंची संख्या गर्भाधान प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.असामान्य किंवा खराब गुणवत्तेच्या शुक्राणूंच्या बाबतीत, ही प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते, ज्यामुळे नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. शुक्राणूंची गुणवत्ता घसरते, आणि IVF अयशस्वी होण्याची शक्यता वाढते. 
  • भ्रूण निवडण्याच्या पद्धती: भ्रूण हस्तांतरासाठी भ्रूणाची निवड करतांना जर काही चूक झाली असेल तर आईवीएफ फेल होण्याचे चान्सस व्हाडतात. क्रोमोसोमली स्वस्थ आणि योग्य भ्रूणाची निवड करणं गरजेचं आहे. योग्य भ्रूण निवडतांना त्याचे सेल स्टेज, भ्रूण श्रेणी आणि पेशी विभाजनाचा दर विचारात ठेवणे गरजेचे आहे. योग्यरीत्या विकसित झालेल्या भ्रूणांमध्ये यशाचे प्रमाण जास्त असते.
  • आईवीएफ लॅब: आईवीएफ यशासाठी आईवीएफ लॅब देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आईवीएफ लॅब मध्ये योग्य नियंत्रित केलेले वातावरण असणं गरजेचं आहे. कारण या वातावरणात शुक्राणू, अंडी आणि भ्रूण जपले जातात. ऑक्सिजन कॉन्सनट्रेशन, कार्बन डायऑक्साइड कॉन्सनट्रेशन, सोबतच इतर घटक जसे योग्य PH, तापमान आणि प्रकाश यावर कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लॅबमधील उपकरणं, आणि त्यांची गुणवत्ता जपणं देखील तेव्हढंच महत्त्वाचं. याव्यतिरिक्त तयार भ्रूणांच काळजीपूर्वक निरीक्षण व योग्यरीत्या हाताळणी तेवढीच महत्त्वाची.  
  • इम्प्लांटेशन मध्ये समस्या: इम्प्लांटेशन न होणे हे आयव्हीएफ अयशस्वी होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. इम्प्लांटेशन फेलियर हे बहुतेकदा क्रोमोसोमल अब्नोर्मलिटी मुळे होते. यासोबतच जर गर्भाशयाचे अस्तर खराब असेल तर इम्प्लांटेशन समस्यांमध्ये व्हाढ होऊन आईवीएफ अयशस्वी होण्याची शक्यता वाढते. 
  • ओव्हेरिअन प्रतिसाद: IVF उपचाराच्या सुरुवातीला, स्त्रीला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH) नावाचे इंजेकशन दिले जाते ज्याने तिचे स्त्रीबीज वाढण्यात मदत होते. काही महिलांमध्ये अंडाशय या औषधाला योग्य प्रतिसाद देत नाहीत ज्यामुळे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडचण होते.
  • क्रोमोसोमल अब्नोर्मलिटी: बहुतेकदा क्रोमोसोमल अब्नोर्मलिटी मुळे आयव्हीएफ अयशस्वी होऊ शकते. या प्रकरणात ट्रान्सफर केलेल्या भ्रूणामध्ये क्रोमोसोम किंवा डीएनएचा गोंधळ असतो. ज्यामुळे ट्रांसफर नंतर शरीर गर्भ नाकारते आणि IVF अपयशी ठरते
  • जीवनशैलीचे घटक: आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी आणि दरम्यान निरोगी जीवनशैली राखणे यशासाठी महत्त्वपूर्ण आहे. या काळात धूम्रपान, अल्कोहोल टाळणे, योग्य व्यायाम, आणि निरोगी आहाराचा अवलंब करण्यास सांगितले जाते. सोबतच काहींना वजन कमी किंवा वाढवावं पण लागत. यामध्ये जर कुठलीही गोष्ट पाळण्यात नाही अली तर IVF अपयशी होण्याची शक्यता वाढते. 

आईवीएफ फेल गेलय? IVF सेकंड ओपिनियन चा विचार करताय?

हे सेकंड ओपिनियन तुमची पहिली प्रेग्नन्सी ठरू शकते! तुमचे फ्री कंसल्टेशन बुक करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

Free consultation

आईवीएफ फेलिअर ची लक्षणे

IVF फेल झाल्यास तुम्हाला हि लक्षणे जाणवू शकतात 

  • क्रॅम्पिंग
  • रक्तस्त्राव
  • डोकेदुखी
  • मळमळ
  • मूड स्वीग्स 
  • पाठीच्या खालच्या भागात वेदना

जर वरील लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा ! 

आईवीएफ फेलिअर नंतर यशस्वी गर्बधारणेची शक्यता 

आईवीएफ फेलिअर तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करते. पण खचुन जाऊ नका, आई-बाबा बनण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या आरोग्य स्थितीनुसार, तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य असलेले पर्याय सुचवू शकतात

  • PGD/ PGS टेस्ट: ट्रान्सफर करण्याआधी भ्रूणाची योग्य चाचणी होणे गरजेचे आहे. यासाठीच PGD/ PGS सारख्या जेनेटिक टेस्ट्स फायदेशीर ठरतात. जर जोडप्याला काही अनुवांशिक रोग असतील तर हि टेस्ट करणे फायदेशीर ठरते कारण PGD/ PGS स्क्रिनिंग मध्ये क्रोमोसोम ची चाचणी केली जाते. ज्यामुळे योग्य क्रोमोसोम संख्येचेच भ्रूण ट्रान्सफर केले जातात आणि आईवीएफ सक्सेस ची शक्यता वाढते. 
  • डोनर एग च्या मदतीने आईवीएफ: ज्या केसेस मध्ये स्त्री चे वय अधिक असते, किंवा काही ओवारीण कॉम्प्लिकेशन मुळे चांगले स्त्रीबीज निर्माण होत नाहीत अशा महिलांसाठी डोनर एग च्या मदतीने आईवीएफ ट्रीटमेंट फायद्याचे ठरू शकते. जरी हा निर्णय जोडप्याचा वायतीक निर्णय आहे तरी या पद्धतीने IVF ट्रीटमेंट केल्यास यश दर चांगले दिसून येतात. 
  • IVF चा आणखी एक प्रयत्न:  IVF उपचारामध्ये काही कपल्स ला गर्भधारणेसाठी एकापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. दुसऱ्या आईवीएफ सायकल ची सुरवात करण्या अगोदर तुमचे डॉक्टर काही चाचण्या करायला सांगू शकतात. सोबतच काही जीवनशैलीत बदल सुचवू शकतात ज्यामुळे यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. पुढे तुमच्या स्तिथी चा योग्य अभ्यास करून दुसऱ्या आईवीएफ सायकल ची सुरवात केली जाते. 
  • अडवान्सड आईवीएफ टेक्नॉलॉजी च्या मदतीने: आईवीएफ मधील अडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान जसे: ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर, लेसर अस्सिस्टेड ह्याचिन्ग, आय.व्ही.एफ, इक्सी, इम्सी, पिक्सी  इत्यादी आधुनिक उपचार पद्धतीच्या सहाय्याने आईवीएफ चे यश दर द्विगुणित करण्यात मदत मिळते. जर पहिली IVF सायकल फेल गेली असेल तर दुसऱ्या आईवीएफ सायकल च्या वेळेस अडवान्सड आईवीएफ टेक्नॉलॉजी च्या मदतीने तुम्ही यशस्वी रित्या गर्भधारण करू शकता.

निष्कर्ष 

आईवीएफ फेलिअर सारख्या मोठ्या दुःखाचा सामना करणं सोपं नाही, हे आम्ही जाणतो. पण हे हि खर आहे कि आईवीएफ हे सर्वात यशस्वी फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. योग्य फर्टिलिटी क्लिनिक आणि IVF डॉक्टर च्या मदतीने तुमच IVF सक्सेसफुल होण्याची शक्यता तेवढीच वाढते. 

ऍडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आणि ART Labs ने सुसज्ज प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलाझेनशन) तंत्रज्ञान वापरून हजारो जोडप्यांना अगदी पहिल्याच सायकल मध्ये सक्सेसफुल रिजल्ट देण्यात यश आलय. प्रोजेनेसिस मध्ये थेट ट्रीटमेंट प्रदान न करता केसचा सखोल, पध्दतशीर आणि तपशीलवार अभ्यास केला जातो. मूळ कारणाचे विश्लेषण करून नंतरच नियोजित- सूचित उपचार योजना समजावून सांगितली जाते. 

IVF फेलिअर संबंधित सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न:

आयव्हीएफ फेलियर च सर्वात कॉमन कारण काय आहे? 

उत्तर: इम्प्लांटेशन न होणे हे आयव्हीएफ अयशस्वी होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. इम्प्लांटेशन फेलियर हे बहुतेकदा क्रोमोसोमल अब्नोर्मलिटी मुळे होते. यासोबतच जर गर्भाशयाचे अस्तर खराब असेल तर इम्प्लांटेशन समस्यांमध्ये व्हाढ होऊन आईवीएफ अयशस्वी होण्याची शक्यता वाढते. 

आईवीएफ चे किती प्रयत्न योग्य आहे?

उत्तर: बहुतेक वेळेस ३ प्रयत्नांपर्येंत आईवीएफ सकसेस मिळत. पण तुमची तयारी, शारिक प्रतिसाद आणि डॉक्टरांच्या मत लक्ष्यात घेता तुमचे डॉक्टर आणि तुम्ही आईवीएफ सायकल्स चा निर्णय घेऊ शकता. 

पहिल्याच प्रयत्नात आईवीएफ सकसेस मिळू शकत का?

उत्तर: आईवीएफ साठीचे सर्व घटक लक्ष्यात घेता, तुमचं निवडलेलं फर्टिलिटी क्लिनिक आणि योग्य डॉक्टर च्या साहाय्याने बऱ्याच केसेस मध्ये पहिल्याच आईवीएफ प्रयत्नात यश मिळू शकत. 

आईवीएफ सकसेस वाढवण्यासाठी काय करावे? 

योग्य वजन मेंटेन करणे, पुरेसे व्हिटॅमिन डी घेणे, ताण तणाव टाळावे, सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, जंक फूड टाळणे.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।

Essential Nutrients Your Body Needs When Pregnant

During pregnancy, you provide all of the nutrition your baby requires. As a result, you may need more nutrients in your body while you’re pregnant. Taking prenatal vitamins and eating healthy foods will help you get all the nutrients you and your baby require throughout your pregnancy.