इन्फेक्शन आणि वंध्यत्व: कोणत्या प्रकारच्या संसर्गामुळे वंध्यत्व येते?

इन्फेक्शन आणि वंध्यत्व | infection and infertility
तुम्हाला माहिती आहे का? वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे ''प्रजनन मार्गात होणारे इन्फेक्शन्स''. युरिनरी ट्रॅक च्या माध्यमातून प्रजनन मार्गात जंतुसंसर्ग (infections) झाल्यास वंध्यत्व समस्या उद्भवू शकतात. आपण जाणून घेणार आहोत इन्फेक्शन होण्याची कारणे, इन्फेक्शनचे प्रकार, लक्षणे आणि उपचारांबाबत.

Share This Post

तुम्हाला माहिती आहे का? वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे ”प्रजनन मार्गात होणारे इन्फेक्शन्स”. युरिनरी ट्रॅक च्या माध्यमातून प्रजनन मार्गात जंतुसंसर्ग (infections) झाल्यास वंध्यत्व समस्या उद्भवू शकतात. आपण जाणून घेणार आहोत इन्फेक्शन होण्याची कारणे, इन्फेक्शनचे प्रकार, लक्षणे आणि उपचारांबाबत.

जंतुसंसर्ग म्हणजे काय ?

शरीराला हानिकारक असणारे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा बुरशी यांच्या माध्यमातून होणारा संसर्गजन्य आजार म्हणजे इन्फेक्शन होय. इन्फेक्शन्स मुळे रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन्स ची कार्यक्षमता कमी होते आणि ऑर्गन्स डॅमेज देखील होऊ शकतात. जे वंध्यत्वाचे कारण ठरू शकतात.

इन्फेक्शनचे प्रकार

रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन (RTI) महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते. RTI हि संज्ञा सर्व प्रकारच्या इन्फेक्शनसाठी वापरली जाते. RTI मध्ये प्रामुख्याने ३ प्रकारच्या इन्फेक्शनचा समावेश होतो.

सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI)

STI caused PID (Pelvic Inflammatory disease): जे इन्फेक्शनसेक्श्युअल इंटरकोर्स च्या वेळी एका व्यक्ती कडून आपल्या पार्टनर कडे संक्रमित केले जातात त्यांना सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन(STI) असे म्हटले जाते. सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनमुळे महिलांमध्ये रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन चा संसर्ग होतो. यालाच पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) किंवा ओटीपोटाचा दाहक रोग म्हणतात. ओटीपोटात तीव्र वेदना होणे हे PID चे प्रमुख लक्षण आहे. पेल्विक इन्फ्लॅमेटरी रोगाची चिन्हे आणि लक्षणे सूक्ष्म किंवा सौम्य असू शकतात. जेव्हा PID वर उपचार केले जात नाहीत तेव्हा वंध्यत्व समस्या निर्माण होते. याबरोबरच STI मुळे पुरुषांमध्ये देखील रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन ला इन्फेक्शन होऊ शकते आणि वंध्यत्व समस्या येऊ शकते.

सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे काही प्रकार

बॅक्टेरियालक्षणे
गोनोरोई– पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) विकसित होतो
– वंध्यत्व येऊ शकते
– फॅलोपियन ट्यूब खराब होतात
– गर्भाशय आणि आजूबाजूच्या टिश्यूज चे नुकसान होऊ शकते
क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस– पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) विकसित होतो
– वंध्यत्व येऊ शकते
– फॅलोपियन ट्यूब खराब होतात
– गर्भाशय आणि आजूबाजूच्या टिश्यूज चे नुकसान होऊ शकते
ट्रेपोनेमा पॅलीडम– प्राथमिक टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत
– दुसऱ्या टप्प्यात अंगावर आणि जाणं मार्गात पुरळ दिसू लागते
– काही केसेस मध्ये जननांग वाढ होते
– डोकेदुखी येते, थंडी-ताप
–  तिसऱ्या टप्प्यात प्रजनन अवयवांचे नुकसान होते आणि वंध्यत्व समस्या येऊ शकते
लॅक्टोबॅसिलि– योनीतुन दुर्गंधी येणे
– करड्या रंगाचा योनीस्त्राव होणे
– मूत्रविसर्जन वेळी जळजळ होणे
क्लॅमिडीया ट्रेकोमॅटीस– जननांगाजवळ लाल रंगाची पुरळ येते
– अल्सर सदृश्य लक्षणे दिसू लागतात
– लिम्फ ग्लॅन्ड ला सूज येऊ शकते
– ग्रोइन एरिया लाल होणे
– मलमूत्र विसर्जनामुळे वेदना होणे
– रक्त किंवा पस येणे
हिमोफेलिस ड्युक्रियी– ह्युमन इम्युनो डेफिशियंसी व्हायरस (HIV) होण्याची जोखीम असते
ट्रायकोमोनास व्हॅजिनोलीस– पेल्विक एरिया मध्ये सूज येणे
– योनीवाटे रक्तस्त्राव होणे
– खाज, जळजळ, लाली, योनीवाटे दुर्गंधी येणे
हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस १

हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस २
– ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, स्नायुदुखी, फ्ल्यू ची लक्षणे
– योनी कार्यात अडथळे
– HIV संसर्गाचा धोका वाढतो
सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन

इन्फेक्शनदेखील तुमच्या वंध्यत्वाचे कारण असू शकते. वंध्यत्व निवारण तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

गनोरिया व क्लॅमिडीया (ganorreha and chlamydia) : गनोरिया व क्लॅमिडीया हे लैंगिक संबंधातून संक्रमित होणारे रोग आहेत. ”गोनोरोई” या बॅक्टेरिया मुळे गनोरिया होतो, तर क्लॅमिडीया हा आजार ”क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस” या बॅक्टेरिया मुळे होतो.

या इन्फेक्शनचा उपचार न केल्यास महिलांमध्ये पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज (PID) विकसित होतो. शिवाय वंध्यत्व येऊ शकते.

प्रामुख्याने गनोरिया व क्लॅमिडीया इन्फेक्शनमुळे फॅलोपियन ट्यूब खराब होतात आणि फर्टिलिटी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच गर्भाशय आणि आजूबाजूच्या टिश्यूज चे नुकसान होऊ शकते. वंध्यत्वाचा अनुभव टाळण्यासाठी यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

सायफिलीस (Syphilis) : हा एक गुप्त रोग आहे. प्रामुख्याने सेक्श्युअल ट्रान्समिशन मुले सिफिलिस होतो. शिवाय तो संसर्गजन्य देखील असतो. ट्रेपोनेमा पॅलीडम या बॅक्टेरिया मुळे सिफिलिस होतो. सिफिलिस च्या प्राथमिक टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र दुसऱ्या टप्प्यात अंगावर आणि जाणं मार्गात पुरळ दिसू लागते. काही केसेस मध्ये जननांग वाढ होते आणि डोकेदुखी येते, थंडी-ताप येऊ शकतो. तिसऱ्या टप्प्यात मात्र प्रजनन अवयवांचे नुकसान होते आणि वंध्यत्व समस्या येऊ शकते.

बॅक्टेरियल व्हॅजिओनीस (Bacterial Vaginosis) : योनीमध्ये काही हानिकारक आणि काही उपयोगी बॅक्टेरिया उपस्थित असतात. लॅक्टोबॅसिलि बॅक्टेरिया योनीचे आरोग्य चांगले ठेवतात. जेव्हा लॅक्टोबॅसिलि बॅक्टेरिया ची संख्या कमी होते आणि हानिकारक बॅक्टेरिया (गार्डनेरेला बॅक्टेरिया) ची संख्या वाढते तेव्हा BV संसर्ग निर्माण होतो यालाच बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस म्हणतात. यामध्ये योनीतुन दुर्गंधी येणे, गव्हाळ किंवा करड्या रंगाचा योनीस्त्राव होणे, मूत्रविसर्जन वेळी जळजळ होणे अशी लक्षणे दिसून येतात.

लिंफोग्रॅन्युलोमा व्हेनेरम (Limphogranyuloma venereum) : क्लॅमिडीया ट्रेकोमॅटीस या बॅक्टेरिया मुळे लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरम हा आजार होतो. यामध्ये जननांगाजवळ लाल रंगाची पुरळ येते. अल्सर सदृश्य लक्षणे दिसू लागतात; तसेच लिम्फ ग्लॅन्ड ला सूज येऊ शकते. ग्रोइन एरिया लाल होणे, मलमूत्र विसर्जनामुळे वेदना होणे, रक्त किंवा पस येणे अशी लक्षणे दिसून येतात.

चॅनक्रॉइड (chancroid) : हिमोफेलिस ड्युक्रियी या बॅक्टेरिया मुळे चॅनक्रॉइड हा संसर्गजन्य आजार होतो. या इन्फेक्शन मुले ह्युमन इम्युनो डेफिशियंसी व्हायरस (HIV) होण्याची जोखीम असते. संसर्ग झालेल्या जागेवर pus ने भरलेली एक पुळी दिसू शकते.

ट्रायकोमोनिओसिस (trichomoniosis) : ट्रायकोमोनिओसिस (trichomoniosis) ला ट्रेक (trich) असेही म्हणतात. या संसर्गामुळे महिलांची खालील भागातील जननांगे तर, पुरुषांचा मूत्रमार्ग प्रभावित होतो.  ट्रायकोमोनास व्हॅजिनोलीस नावाच्या प्रोटोझोआ मुळे हा आजार होतो. यामध्ये पेल्विक एरिया मध्ये सूज येणे, योनीवाटे रक्तस्त्राव होणे, खाज, जळजळ, लाली, योनीवाटे दुर्गंधी येणे अशी लक्षणे दिसून येतात.

हर्पिस (Herpis) : हा देखील लैंगिक संबंधातून पसरणारा जंतुसंसर्ग आहे. हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस १ आणि हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस २ मुळे हे इन्फेक्शन होते. ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, स्नायुदुखी, फ्ल्यू ची लक्षणे, योनी कार्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात. सुरुवातीचे काही दिवस कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हर्पिस मुळे गुप्तांगाचा अल्सर देखील होऊ शकतो. हर्पिस मुले HIV संसर्गाचा धोका वाढतो. तसेच बाळालाही संसर्ग होऊ शकतो. 

एंडोजेनस व्हजायनल इन्फेक्शन्स

एंडोजेनस इन्फेक्शनहे बॅक्टेरिया/जिवाणूंचे प्रमाण वाढल्यामुळे होते. हे बॅक्टेरिया स्त्रियांच्या जननेंद्रियांच्या क्षेत्रात राहतात. प्रजोत्पादक मार्गात अडथळा निर्माण करणारे इन्फेक्शन म्हणून जगभरात एंडोजिनिअस इन्फेक्शनकॉमन समजले जाते.

एंडोजेनस इन्फेक्शनचे काही प्रकार

1.   कँडिडायसस/ व्हॅजिनल यीस्ट इन्फेक्शन (candidiasis) : ‘कँडिडा’ नावाच्या फंगस ची अतिरिक्त वाढ झाल्यास ”कँडिडायसस” होतो. हे सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन नसले तरीदेखील योनीमार्ग यीस्ट इन्फेक्शन चा प्रसार होऊ शकतो. यामुळे योनी भित्तीला क्रॅक जाणे, सूज येणे, पाण्यासारखा डिस्चार्ज, योनीत पुरळ, खाज, वेदना अशी लक्षणे दिसून येतात. अतिरिक्त अँटिबायोटिक्स चा वापर, व्हॅजिनल डचिंग, प्रोजेस्टेरॉन हार्मोन असलेल्या गोळ्यांचे सेवन, किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या गोळ्यांचे सेवन या कारणांमुळे कँडिडायसस होऊ शकतो. जाड किंवा फाटलेल्या दुधासारखा किंवा दह्यासारखा व्हाईट डिस्चार्ज होणे, योनी मार्गात जळजळ होणे आणि इंटरकोर्स वेळी वेदना होणे हि कॅन्डीडीओसीस ची लक्षणे आहेत.

2.   बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस (Bacterial Vaginosis) : योनीमार्गाच्या आजूबाजूचे वातावरण कोंदट असेल तर बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस  होऊ शकतो. बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस असलेल्या महिलांमध्ये योनी मधील PH व्हॅल्यू वाढते. वैद्यकीय भाषेमध्ये सांगायचे झाले तर, प्रबळ लॅक्टोबॅसिलीची जागा गार्डनेरेला व्हॅजिनॅलिस, ग्राम नेगेटिव्ह रॉड्स आणि पेप्टो-स्टेप्ट्रोकोकस घेतात.

3.   अन-ट्रीटेड बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस (untreated bacterial vaginosis) : IUD म्हणजेच गर्भनिरोधक डिवाइस चा वापर, घट्ट अंतर्वस्त्राचा वापर, व्हॅजिनल ड्रायिंग चा वापर यांमुळे अन-ट्रीटेड बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस होऊ शकतो.

इंट्रोजेनिक इन्फेक्शन/ प्रजनन मार्गाशी संबंधित इतर इन्फेक्शन्स

इंट्रोजेनिक इन्फेक्शन: असुरक्षित मिसकॅरेज होणे किंवा गर्भनिरोधक साधनांचा वापर जसे कि IUD यामुळे इंट्रोजेनिक इन्फेक्शनहोऊ शकतात. उपचार करणारे डॉक्टर्स तज्ज्ञ नसतील किंवा आधीच सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनची उपस्थिती असेल तर इंट्रोजेनिक इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. इंट्रोजेनिक इन्फेक्शनमुळे युटेरस, एन्डोमेट्रियम, फेलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज बाधित होऊ शकतात. लवकर उपचार घेतले नाहीत तर, वंध्यत्व येऊ शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने सांगितल्याप्रमाणे, दरवर्षी २५ % ऍबॉर्शन्स असुरक्षित पद्धतीने केले जातात. त्यामुळे इंट्रोजेनिक इन्फेक्शनची संभावना अधिक असते.

रिस्क फॅक्टर्स :

  • अनट्रिटेड RTIs मुळे महिला आणि पुरुष वंध्यत्व येते.
  • पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज
  • रिप्रॉडक्टिव्ह ट्रक ब्लॉक होऊ शकतात. जसे कि, फॅलोपियन ट्यूब.
  • पुरुषांमध्ये व्हस डिफफरन्स होऊ शकतो
  • निदान आणि उपचार न झाल्यामुळे हजारो मृत्यू होतात.
  • सर्विक्स कँसर
  • एक्टोपिक गर्भधारणा
  • फेलोपियन ट्यूब आणि युटेरस चे क्रोनिक इन्फेक्शनहोऊ शकतात
  • अर्भकामध्ये कमी वजन, अंधत्व, मतिमंदत्व येऊ शकते

इन्फेक्शन होण्याचे प्रमाण किती आहे?

बऱ्याचदा या इन्फेक्शनची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे विकसनशील देशात हि एक तातडीची सार्वजनिक समस्या समजली जात आहे. इन्फेक्शनप्रगतशील आणि विकसनशील अशा दोन्ही देशात आढळून येतात. गेल्या दशकापासून RTI समस्येत नाटकीयरित्या वाढ झाली आहे.

इन्फेक्शनचा गर्भधारणेवर परिणाम

पुनरुत्पादक अवयवांना जंतुसंसर्ग झाल्यास लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. याचा परिणाम म्हणून गर्भधारणेत अडचणी येतात.

  • पुरुष आणि स्त्री वंध्यत्व समस्या येऊ शकते. त्यामुळे व्यक्तीने RTI आणि STI पासून मुक्त होणे गरजेचे असते आणि त्यासाठी सर्वप्रथम लैंगिक संबंध सुधारले पाहिजेत. (improve sexual relationship).
  • जर रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन (RTI) आणि सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन(STI) वर उपचार घेतले नाहीत तर खासकरून वंध्यत्वाचे कारण ठरू शकतात.
  • होणाऱ्या बाळालाही नुकसान पोहचवू शकतात.

इन्फेक्शन्स मुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्व येऊ शकते. तेव्हा अवश्य तपासणी करा. मोफत सल्लामसलत करण्यासाठी संपर्क करा.

खालील घटक रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन वाढवतात.

जैविक कारणे (biological factors)यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमी असेल, तुमचे वय, संसर्गाचा कालावधी जास्त असेल, RTI सोबतच इतर सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनची उपस्थिती असेल तर गुंतागुंत वाढू शकते.
2आरोग्य विषयक कारणे (healthcare factors)तुम्ही इन्फेक्शनठीक होण्यासाठी कोणते उपचार घेत आहेत, कोणते उपचार उपलब्ध आहेत, आणि उपचारांचा दर्जा निम्न असणे हे घटक हि इन्फेक्शनचे प्रमाण वाढवू शकतात.
रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन

इन्फेक्शनची कारणे

रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन(RTI) वरच्या बाजूच्या रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन वर परिणाम करतो तर, कधी खालील बाजूच्या रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन वर परिणाम करीत असतो. किंवा काही केसेस मध्ये दोन्ही बाजूकडील रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन वर परिणाम करीत असतो. यामध्ये युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज, सर्विक्स, व्हजायना, व्हल्वा या अवयवांचा समावेश होतो.

सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) ची कारणे :

  • पार्टनर ला STI इन्फेक्शन असेल आणि इंटरकोर्स झाला तर,  तुम्हालाही STI इन्फेक्शन होऊ शकते.
  • काही केसेस मध्ये गर्भधारणेदरम्यान आई ला STI इन्फेक्शन झाले तर, बाळाकडे हे इन्फेक्शनट्रान्स्फर होऊ शकतात.
  • काही केसेस मध्ये रक्तदान, ब्लड सेल्स किंवा इतर ब्लड प्रॉडक्ट्स ट्रान्स्फर केल्यामुळे STI इन्फेक्शनहोऊ शकतात.
  • सिफिलिस, एड्स, सार्विकल कँसर अशा आजारांमुळे देखील STI इन्फेक्शनहोऊ शकतात.
  • कम्युनिटल्स विस्कळीत झालेले आहेत अशा ठिकाणी STI इन्फेक्शन ची वाढ वेगाने होते.

एंडोजेनस इन्फेक्शनची कारणे :

  • पर्यावरणातील बदल
  • हायजीन
  • हार्मोनल आणि इतर कारणांमुळे होऊ शकते.

इन्फेक्शनची लक्षणे :

  • खूप वेळा लघवीला जावे लागणे
  • जळजळ होणे
  • खाज येणे
  • पाणी पिण्याची इच्छा कमी होणे
  • लघवी तुंबून राहणे
  • थंडी वाजून ताप येणे
  • डोके दुखणे
  • ओटीपोट वा कंबर दुखणे
  • हातपाय दुखणे
  • डोके दुखणे
  • मूत्रपिंडास सूज येणे
  • रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
  • इतर अवयवांचे कार्य बिघडते. जसे कि, किडनी, रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन
  • पुरळ येणे 
  • योनीमार्गात दुर्गंधी येणे 
  • निळा-हिरवा-दह्यासारखा किंवा पाणीदार डिस्चार्ज होणे

निदान (Diagnosis)

  1. ब्लड टेस्ट : लघवीतील प्रथिने, साखर, रक्त, वेगवेगळ्या पेशींची तपासणीद्वारे जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.
  2. थुंकीच्या तपासणीमधूनही निदानाची पद्धती अवलंबली जाते.
  3. सोनोग्राफी
  4. युरीन टेस्ट
  5. पेनाईल स्रावाची तपासणी
  6. फोडतील पाण्याचे नमुने तपासणे

इन्फेक्शनसाठी उपचार

Treatment for Infections

१. कम्प्लिट ट्रीटमेंट : डॉक्टरांनी सुचविलेला ट्रीटमेंट प्लॅन नुसार पूर्ण उपचार घेणे.

२. जनजागृती : समाजात RTI आणि STI इन्फेक्शनविषयी जनजागृती करणे. STI कंट्रोल करण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याबाबत आणि  रिप्रॉडक्टिव्ह ट्रक इन्फेक्शनच्या लक्षणांविषयी जनजागृती करणे.

३. बिहेविअर चेन्ज : आरोग्य राखणाऱ्या सवयी कोणत्या आहेत आणि आरोग्य बिघडविणाऱ्या सवयी कोणत्या आहेत याविषयी शिक्षण देणे आणि आरोग्याला पूरक असणारे बिहेविअर चेन्ज करणे.

४. हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स ला विशेष कौशल्य शिकविणे. जसे कि, असुरक्षित मिसकॅरेज इ.

५. टाइमली ट्रीटमेंट : वेळेवर आणि योग्य उपचार घेणे

६. प्रतिबंधात्मक उपाय : एकापेक्षा अधिक लैंगिक भागीदार टाळावेत, वैयक्तिक स्वच्छता राखणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, कंडोम वापरासंबंधी सामुदायिक शिक्षण देणे गरजेचे आहे.

७. मेडिकेशन्स, इंजेक्शन्स : एन्टीबीओटीक्स इ.

८. ज्या व्यक्तींमध्ये गनोरियाचा उपचार केला जातो त्यांच्यामध्ये क्लॅमिडीया चा उपचार देखील करावा लागतो. उपचार पूर्ण होईपर्यंत इंटरकोर्स टाळणे योग्य असते. उपचारानंतर पुन्हा फॉलोअप चाचणी करणे गरजेचे असते.

९. योनी थेरपी : यीस्ट इन्फेक्शनसाठी अँटीफंगल औषधे, योनीमार्गात लावण्याच्या क्रीम, योनीमार्गात ठेवण्याच्या गोळ्या, ७ ते १४ दिवसांची औषधाने केली जाणारी योनी थेरपी असे उपचार केले जातात.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

स्त्रियांमध्ये इन्फेक्शनच प्रमाण जास्त का असते?

स्त्रियांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असते, त्याला ‘पायलोनेफ्रिक’ स्थिती असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाची लांबी कमी असल्याने जंतुसंसर्ग फार कमी वेळात मूत्राशयापर्यंत पसरतो.

इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, जननांगांची स्वच्छता ठेवावी आणि त्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा, डटचिंग प्रोडक्ट्स किंवा क्लिनिंग प्रोडक्ट्स किंवा अतिरिक्त साबणाचा वापर करू नये, लक्षणांकडे दुर्लक्ष्य न करता वेळीच योग्य ट्रीटमेंट घ्यावी.

गर्भधारणेदरम्यान कोणते इन्फेक्शनधोकादायक ठरू शकतात?

व्हॅजिनल यीस्ट इन्फेक्शन, कॅन्डीडीओसीस, हर्पिस, GBS , BV हे इन्फेक्शनबाळाच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात.

इन्फेक्शनसह गर्भधारणा शक्य आहे का?

तुम्हाला फक्त इन्फेक्शनअसतील तर योग्य वेळी उपचार घेतल्यात सुरक्षित गर्भधारणा शक्य आहे. मात्र इन्फेक्शनजुने असेल आणि इन्फेक्शनमुले रिप्रॉडक्टिव्ह अवयवांवर परिणाम झालेला असेल तर, वंध्यत्व समस्या निर्माण होते. इन्फेक्शनमुळे स्त्री आणि पुरुष वंध्यत्व निर्माण होते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।