वंध्यत्व समस्या : जाणून घ्या महिला वंध्यत्वाची कारणे, निदान आणि उपचार

महिला वंध्यत्व | Female infertility in Marathi
महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील इन्फर्टिलिटीची समस्या दिसून येते, हे जरी खरे असले तरी, मातृत्वाच्या प्रवासात आईचे एकूण आरोग्य आणि रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम ची निरोगी स्थिती गर्भधारणेत मुख्य भूमिका बजावत असते. त्यामुळेच महिलांमध्ये वंध्यत्व समस्या का निर्माण होते? महिला वंध्यत्वामागे कोणती शारीरिक-मानसिक-भौतालिक कारणे असतात? महिला वंध्यत्वाचे निदान कसे करतात? महिला वंध्यत्वावरील उपचार काय आहेत? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Share This Post

महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील इन्फर्टिलिटीची समस्या दिसून येते, हे जरी खरे असले तरी, मातृत्वाच्या प्रवासात आईचे एकूण आरोग्य आणि रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम ची निरोगी स्थिती गर्भधारणेत मुख्य भूमिका बजावत असते. त्यामुळेच महिलांमध्ये वंध्यत्व समस्या का निर्माण होते? महिला वंध्यत्वामागे कोणती शारीरिक-मानसिक-भौतालिक कारणे असतात? महिला वंध्यत्वाचे निदान कसे करतात? महिला वंध्यत्वावरील उपचार काय आहेत? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

महिला वंध्यत्व म्हणजे काय?

”आई-बाबा” होणं हे प्रत्येक जोडप्याचे सांसारिक स्वप्न असते. आपले एक तरी मूल असावे अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु प्रत्येक जोडप्याला नैसर्गिकरित्या मूल होईलच असे नाही. बऱ्याच जोडप्यांना इन्फर्टिलिटी च्या समस्येला तोंड द्यावे लागते. वंध्यत्व ही अशी स्थिती आहे जोडप्याला एक वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नाही (महिलेचे वय ३५ पेक्षा कमी असल्यास). जर महिलेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्याहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूळ होऊ शकत नसेल तर हि सुद्धा वंध्यत्व स्थिती आहे.

तुमच्या इन्फर्टिलिटी समस्येसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळावा. खालील बटनावर क्लिक करा.

Free consultation

महिला वंध्यत्वाचे प्रकार कोणते आहेत?

१) प्राथमिक वंध्यत्व (Primary Infertility)जेव्हा महिलेला एकदाही गर्भधारणा होऊ शकत नाही त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
२) दुय्यम वंध्यत्व (Secondary Infertility)जेव्हा महिलेला पूर्वी गर्भधारणा झालेली असेल; पण नंतर गर्भधारणा होऊ शकत नाही, तेव्हा त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
३) अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी (Unexplained Infertility)महिलेला वंध्यत्व समस्या असते मात्र अनेक तपासण्यांअंती देखील वंध्यत्वाचे निदान होऊ शकत नाही.
Types of female infertility

महिला वंध्यत्वाचे प्रमाण हल्ली का वाढत आहे?

एप्रिल २०२३ च्या WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या अहवालानुसार, ३७% जोडप्यांमध्ये ‘महिला’ या वंध्यत्वाचे कारण आहेत. १५% जोडपी वंध्यत्वाने प्रभावित असून इन्फर्टिलिटीचे प्रमाण वाढत चालले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जगभरात ६ जोडप्यांमागे १ जोडपं वंध्यत्वाच्या समस्येला तोंड देत आहे. अत्याधुनिक IVF आणि ART तंत्रज्ञान उपलब्ध असूनदेखील इन्फर्टिलिटीची समस्या आजही प्रबळ आहे. तेव्हा IVF सारख्या प्रगत उपचारांचा सक्रियपणे वापर करण्याची वेळ आता आलेली आहे.

  • फास्ट फूड, जंक फूड चे सेवन
  • उशिरा लग्न करणे
  • करियर हि प्रायोरिटी असल्यामुळे, मुलांचा विचार लांबणीवर टाकणे
  • व्यायामाचा अभाव
  • चुकीच्या जीवनशैलीमुळे वजनवाढ / ओबेसिटी
  • अतिरिक्त ताणतणाव आणि चिंता यांमुळे हार्मोनल इम्बॅलन्स
  • अनियमित आणि असंतुलित आहाराचे सेवन
  • धकाधकीची जीवनशैली

यांमुळे ओवरीयन रिजर्व्ह कमी होतो. हार्मोनल इम्बॅलन्स सारख्या समस्या वाढतात आणि फर्टिलिटी समस्या निर्माण होतात.

महिलांमधील इन्फर्टिलिटीची कारणे कोणती आहेत?

  1. ओव्हरीयन रिझर्व्ह कमी होणे : ओव्हरीत असलेल्या स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता म्हणजे ओव्हरीयन रिझर्व्ह. वाढते वय, हार्मोनल इम्बॅलन्स, इंडोक्राइन डिसऑर्डर, बदलते लाइफस्टाइल आणि पर्यावरण यामुळे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते.
  2. PCOD/PCOS : हार्मोनल इम्बॅलन्स मुळे स्त्रियांमध्ये पुरुषी हार्मोन्स ची पातळी वाढते. तसेच एका स्त्रीबीजाची पूर्ण वाढ होण्याऐवजी अनेक स्त्रीबीजांची अर्धवट वाढ झाल्याने ते फर्टीलाइज होऊ शकत नाहीत. ओव्हरीज मध्ये सिस्ट बनतात.
  3. एन्डोमेट्रिओसिस : एन्डोमेट्रिओसिस म्हणजेच गर्भाशयाच्या आतील अस्तर. हे अस्तर व्यवस्थित बनत नसेल, अधिक जाड बनत असेल तर गर्भ रुजण्यात अडचणी येतात.
  4. फायब्रॉइड्स : युटेरियन फायब्रॉइड्स किंवा गाठी फेलोपियन नलिकांजवळ किंवा गर्भाशयाच्या आतील तीन थरांमध्ये कुठेही होऊ शकतात. फायब्रॉईड मुळे गर्भधारणेत, गर्भ रुजण्यात आणि गर्भ वाढण्यात अडचणी येतात.
  5. ब्लॉक्ड किंवा डॅमेज फेलोपियन ट्यूब्ज : स्पर्म आणि ओवुम फर्टिलायझेशन ची प्रक्रिया फेलोपियन ट्यूब्ज मध्ये होते. फेलोपियन ट्यूब्ज ब्लॉक असतील तर फर्टिलायझेशन समस्या निर्माण होऊन गर्भ बनण्यात अडचणी येतात. आणि ट्यूब्ज खराब असतील, त्यातून पाणी झिरपत असेल तर गर्भ रुजण्यात अडचणी येतात.
  6. प्रायमरी ओव्हरीयन सिंड्रोम : POI मध्ये स्त्रीयांच्या ओव्हरीज लहान वयात हार्मोन्स आणि स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया थांबवतात. POI असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित ओवुलेशन समस्या निर्माण होतात आणि कन्सिव्ह करू शकत नाही.
  7. इन्फेक्शन्स : गनोरिया, क्लॅमिडीया, पेल्विक इन्फ्लेमिंटरी डिसीज, सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स अशा अनेक प्रकारच्या संसर्गामुळे फेलोपियन ट्यूब खराब होऊ शकतात, स्पर्म्स ला स्त्रीबीजापर्यंत पोहून जाण्यात अडचणी येतात. फर्टिलायझेशन समस्या निर्माण होऊन वंध्यत्व येऊ शकते.
  8. पॉलीप्स : पॉलीप्स या कँसर नसलेल्या गाठी असतात. ज्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर वाढतात आणि गर्भाशयाशी संबंधित समस्या निर्माण करतात.
  9. मासिक पाळी संबंधी समस्या : मासिक पाळीत अनेक टप्प्यांचा समावेश होतो आणि कोणत्याही एका टप्प्यातील समस्यांमुळे गर्भधारणा होण्यास किंवा वंध्यत्वात अडचण येऊ शकते. याशिवाय अनियमित, वेदनादायी, स्कॅनटी पिरीएड्स, हेवी पिरीएड्स, अमेनोरिया अशा मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांमुळे वंध्यत्व येऊ शकते.
  10. इम्प्लांटेशन फेल्युअर : गर्भाशयाच्या अस्तरात गर्भ रुजण्यात अडचणी येणे म्हणजे इम्प्लांटेशन फेल्युअर. जेनेटिक डिसीजेस, पातळ अस्तर, एंडोमेट्रिओसिस, प्रोजेस्टेरॉन रेजिस्टन्स, साकार टिश्यू यांमुळे इम्प्लांटेशन फेल होऊ शकते.
  11. जन्मजात समस्या : जन्मतः एखादा प्रजनन अवयव नसणे किंवा जन्मजात इंडोक्राइन डिसऑर्डर, डायबेटिज अशा काही आजारांमुळे वंध्यत्व समस्या निर्माण होऊ शकते.
  12. सर्जरी किंवा कँसर ची ट्रीटमेंट : पूर्वी रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन्स ची सर्जरी झाली असल्यास किंवा कँसर सारखी ट्रीटमेंट घेतली असल्यास वंध्यत्व समस्या येऊ शकते.
  13. ऑटोइम्यून डिसऑर्डर : रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास वारंवार संसर्ग होतो आणि वंध्यत्व समस्या येऊ शकते.
  14. Adhesions : पोटातील दोन अवयव एकमेकांना चिटकलेले असणे.

वंध्यत्व समस्येवर अचूक निदान आणि योग्य उपचार मिळवा.

+91 703 094 4041

महिला वंध्यत्वाचे निदान कसे केले जाते?

1) ब्लड किंवा युरीन टेस्ट : ब्लड आणि युरीन चे सॅम्पल्स घेऊन हार्मोनल समस्येचे निदान केले जाते. हार्मोनल इम्बॅलन्स वंध्यत्वाला कारणीभूत असतो. या टेस्ट्स मुळे तुम्ही ओवुलेट होत आहेत कि नाही हे कळते. खालील टेस्ट्स केल्या जातात. 

  • FSH (फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन)
  • LH (ल्युटेनायझिंग हार्मोन)
  • AMH (अँटी म्यूलेरिअम हार्मोन)
  • प्रोलॅक्टिन
  • थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन (TSH)
  • प्रोजेस्टेरॉन
  • इस्ट्रोजेन
  • इंश्युलीन लेव्हल

२) Ovarian Reserve Testing : हि एक ब्लड आणि इमेजिंग टेस्ट आहे. ओव्हरीज मधील स्त्रीबीजांचा काऊंट आणि क्वालिटी समजते. वाढत्या वयानुसार कमी होणारी स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता यामुळे वंध्यत्व समस्या येऊ शकते.

३) हिस्टेरोसालपिंगोग्राफी (HSG) : गर्भाशय ग्रीवात एक द्रव पदार्थ इंजेकट केला जातो. आणि एक्स-रे च्या माध्यमातून हा पदार्थ फेलोपियन ट्यूब मधून कसा फिरतो हे पहिले जाते. यामुळे फेलोपियन ट्यूब ची स्थिती समजते.

४) लॅप्रोस्कोपी : युटेरस मध्ये एक रॉड सदृश उपकरण टाकून अवयवांची स्थिती तपासली जाते तसेच लॅप्रोस्कोपी चा वापर करून adhesions , फायब्रॉईड असेल तर, उपचारही केले जातात.

५) ट्रान्सवजायनल सोनोग्राफी : दुर्बीण असलेले उपकरण युटेरस मध्ये टाकून अंडाशय, गर्भाशय तपासले जाते.

६) Abdominal Altrasaund : पोटावरती प्रोब ठेवून कॉम्प्युटर वर पोटातील अवयवांची स्थिती तपासली जाते.

७) हिस्टेरोस्कोपी : हे एक कॅमेरा बसवलेले लवचिक आणि पातळ उपकरण असते. गर्भाशयात टाकून आतील भाग तपासला जातो.

८) सलाइन सोनोहायस्टेरोग्राम (SIS) : गर्भाशयातील स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स, फायब्रॉइड्स, पॉलीप्स, अस्तराची स्थिती तपासण्यासाठी गर्भाशय सलाईन च्या पाण्याने भरले जाते.

महिला वंध्यत्वावर उपचार कोणते आहेत?

मेडिसिन्स हार्मोनल इमबॅलन्स साठी किंवा ओवुलेशन साठी फर्टिलिटी मेडिसिन्स दिले जातात.
सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी, हिस्टेरोस्कोपिक सर्जरी किंवा ट्युबल सर्जरी करून फायब्रॉइड्स, पॉलीप्स, खराब ट्यूब्ज किंवा इतर अवयव काढले जातात. ब्लॉकेजेस असतील तर ते काढले जातात. adhesions म्हणजेच दोन अवयव एकमेकांना चिकटलेले असतील तर, वेगळे केले जातात.
असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART)यामध्ये मॅच्युअर एग्ज रिट्राईव्ह किंवा कलेक्ट केले जातात आणि प्रयोगशाळेतील ट्रे मध्ये स्पर्म सोबत फर्टाईल करणे आणि पुन्हा गर्भ गर्भाशयात स्थानांतरित केले जातात.
IVF इन विट्रो फर्टिलायझेशन हे एक प्रचलित ART तंत्रज्ञान आहे. IVF चा सक्सेक रेट देखील ४ पटीने अधिक असतो.
IUI इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन : बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
ओव्यूलेशन इंडक्शनयामध्ये ओवुलेशन इंडक्शन च्या मदतीने स्त्रीबीजांची वाढ वेळोवेळी सोनोग्राफीद्वारे तपासली जाते. स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्याचे या तपासणीत दिसल्यानंतर योग्य वेळी सेक्श्युअल इंटरकोर्स साठी सांगितलं जातं.
महिला वंध्यत्वावर उपचार

महिला वंध्यत्वाबद्दल अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

१) वंध्यत्वासाठी सर्वात यशस्वी उपचार कोणता आहे?

उत्तर : IVF हा सर्वात यशस्वी उपचार आहे. जेव्हा इतर वंध्यत्व उपचार पर्याय अयशस्वी होतात तेव्हा IVF सक्सेसफुल ठरते. तुम्हाला लवकरात लवकर बाळ हवे असेल तरी तुम्ही IVF उपचार करू शकतात. किंवा उशिरा बाळ हवे असेल तर, फ्रोजन प्रक्रियांचा वापर करून हवे तेव्हा IVF करू शकतात.

२) वंध्यत्वासाठी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट कोणती?

उत्तर : वंध्यत्वावर फर्टिलिटी मेडिसिन्स, ओवुलेशन इंडक्शन, IUI, IVF अशा ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. प्रत्येक ट्रीटमेंट पहिल्या ट्रीटमेंट पेक्षा एक पाऊल पुढे असते. तुमच्या समस्या नुसार ट्रीटमेंट प्लॅन केला जातो.

३) वंध्यत्वाच्या समस्येत काय करावे? 

उत्तर : वंध्यत्व समस्येत तुमचे वय २५ पेक्षा कमी असेल आणि इतर स्थिती चांगली असेल तर फर्टिलिटी मेडिसिन्स देऊन नॅच्युरल कन्सिव्ह साठी प्रयत्न केले जातात. असे करून यश मिळाले नाही तर, IUI किंवा IVF किंवा अडवान्स्ड IVF चा पर्याय तुमच्या डायग्नोसिस स्थितीनुसार डॉक्टर देतात. याशिवाय वजन कमी करणे, ताजी फळे, हिरव्या भाज्या, नट्स, प्रोटीन, फॉलिक ऍसिड असलेला आहार सेवन करावा. फास्ट फूड, जंक फूड, अल्कोहोल आणि कॅफेन चे सेवन टाळावे. पुरेसा व्यायाम करावा.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।