वंध्यत्व समस्या : जाणून घ्या महिला वंध्यत्वाची कारणे, निदान आणि उपचार

महिला वंध्यत्व | Female infertility in Marathi

महिलांप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील इन्फर्टिलिटीची समस्या दिसून येते, हे जरी खरे असले तरी, मातृत्वाच्या प्रवासात आईचे एकूण आरोग्य आणि रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम ची निरोगी स्थिती गर्भधारणेत मुख्य भूमिका बजावत असते. त्यामुळेच महिलांमध्ये वंध्यत्व समस्या का निर्माण होते? महिला वंध्यत्वामागे कोणती शारीरिक-मानसिक-भौतालिक कारणे असतात? महिला वंध्यत्वाचे निदान कसे करतात? महिला वंध्यत्वावरील उपचार काय आहेत? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.