शुक्राणूंचे स्वास्थ्य त्यांची गती व हालचाल (मोटिलिटी), रचना आणि आकार (मॉर्फोलॉजी) आणि वीर्यातील शुक्राणूंची संख्या (स्पर्म काउंट) या घटकांवर अवलंबून असते. पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. अनुवंशिकता, रिप्रॉडक्टिव्ह अवयवांच्या स्ट्रक्चरल समस्या, इन्फेक्शन, प्रदूषण, तापमान, मानसिक स्वास्थ्य, झोपेच्या समस्या, असंतुलित आहार, व्यसने असे अनेक घटक पुरुषांच्या फर्टिलिटी क्षमतेवर परिणाम करतात.
पुरुषांची फर्टिलिटी क्षमता/ शुक्राणूंची क्वालिटी ठरवणारे घटक
शुक्राणूंची फर्टिलिटी क्षमता मोटिलिटी, मॉर्फोलॉजी आणि संख्या या घटकांवर अवलंबून असते. शुक्राणूंची फर्टिलिटी क्षमता तपासण्यासाठी ‘सीमेन अनालिसिसटेस्ट’ केली जाते. पुरुषांचे सीमेन सॅम्पल घेऊन नमुन्यातील शुक्राणूंची संख्या, हालचाल, गती, आणि त्यांची रचना व आकार तपासला जातो.
मोटिलिटी म्हणजे काय?
स्त्रीबीज फर्टाईल करण्यासाठी शुक्राणू फॅलोपियन ट्यूब पर्यंत ज्या वेगाने प्रवास करतात त्याला शुक्राणूंची गतिशीलता म्हणतात. शुक्राणूंची गतिशीलता कमी असल्यास, शुक्राणू आपला प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. किंवा हालचाल चांगली नसल्यास शुक्राणू स्त्रीबीजात प्रवेश करण्यास अपयशी होतात. आणि गर्भावस्था कठीण होते. गर्भधारणेसाठी शुक्राणूंची सामान्य मोटिलिटी ५०% असावी लागते.
मोटिलिटी ३ प्रकारे मोजली जाते.
- प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी : शुक्राणूंची जलद गतीने आणि सरळ दिशेने पुढे जाण्याची क्षमता म्हणजे प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी. वंध्य पुरुषांमध्ये बऱ्याचदा शुक्राणूंची हालचाल फास्ट फॉरवर्ड नसते. शुक्राणू झिगझॅग दिशेने प्रवास करतात किंवा एकाच ठिकाणी गोल-गोल फिरतात.
- नॉन प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी : या प्रकारात शुक्राणू गतिशील असतात पण पुढे जाऊ शकत नाही. एक जागी व्हायब्रेट होतात.
- इमोटाईल स्पर्म : हि अशी स्थिती आहे जिथे शुक्राणू अचल असतात. अजिबात हालचाल करू शकत नाहीत. एकूण शुक्राणूंपैकी काही शुक्राणू किंवा सर्वांच्या सर्व शुक्राणू इमोटाईल असू शकतात.
मॉर्फोलॉजी म्हणजे काय?
शुक्राणू बनण्याच्या प्रक्रियेत काही अज्ञात अडचणी आल्यास, सामान्य आकारापेक्षा वेगळ्या किंवा विकृत आकाराचा शुक्राणू बनतो. शुक्राणूंच्या आकार आणि रचनेतील विकृती म्हणजे मॉर्फोलॉजी होय. शुक्राणूंचे डोके, मान आणि शेपूट असे तीन भाग असतात. मॉर्फोलॉजी तपासताना शुक्राणूंचे डोके-मान-शेपटीची संख्या व आकार तपासतात.
स्पर्म हेड ऍबनॉर्मलिटी : शुक्राणूंचे डोके अंडाकार असते. त्यामध्ये न्यूक्लिअस आणि DNA (जेनेटिक मटेरियल) असतात. डोक्याच्या पुढच्या बाजूला टोकदार अशी ऍक्रोसोमल कॅप असते, ज्याच्या मदतीने शुक्राणू स्त्रीबीजात प्रवेश करू शकतात. मोठे डोके (मॅक्रोसेफली), लहान डोके (मायक्रोसेफली), पिनहेड, पातळ डोके (टॅपर्ड हेड), गोल शुक्राणू (ग्लोबोझूस्पर्मिया), डोकं नसलेले शुक्राणू, दोन डोके असलेले शुक्राणू (ड्युब्लिकेट स्पर्म) या काही स्पर्म हेड ऍबनॉमिलिटिज आहेत.
स्पर्म नेक ऍबनॉर्मलिटी : मानेमध्ये मेट्रोकोर्डिया असतात. हे शुक्राणूंच्या बॅटरीसारखे काम करतात. शुक्राणूंना एनर्जी प्रोड्युस करतात. नेक ऍबनॉर्मलिटीज मध्ये वाकलेली मान, पातळ मान, मान डोक्यात असणे, मान नसणे अशा समस्या असतात. यामुळे शुक्राणू आपले काम करू शकत नाहीत आणि वंध्यत्व समस्या येतात.
स्पर्म टेल ऍबनॉर्मलिटी : शुक्राणूंच्या शेपटीला फ्लॅगेलम म्हणतात. दोन शेपूट (डुप्लिकेट टेल), वाकलेली शेपूट (कर्व्ह टेल), अनेक शेपट्या (मल्टिपल टेल), गुंडाळलेली शेपटी (कॉईल टेल), स्टंप टेल अशा टेल ऍबनॉर्मलिटीज मुळे गर्भधारणेत समस्या निर्माणच्या होतात.
स्पर्म काउंट आणि फर्टिलिटी क्षमता
सीमेन सॅम्पल च्या प्रति मिलीलीटर मध्ये उपस्थित शुक्राणूंची संख्या म्हणजे स्पर्म काउंट. शुक्राणूंची संख्या जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. पण जास्त संख्या असणे पुरेसे नाही, चांगली गतिशीलता असणे देखील महत्वाचे आहे. कारण अनेकदा स्पर्म काउंट कमी असेल आणि मोटिलिटी व मॉर्फोलॉजी नॉर्मल असेल तर गर्भधारणा होऊ शकते. तर काहींना लो स्पर्म काउंट स्थितीत नैसर्गिक गर्भधारणेसाठी अडचणी येतात. तेव्हा त्यांना IUI सारख्या उपचारांची गरज लागू शकते.
शुक्राणूंची क्वालिटी प्रभावित करणारे घटक
१) जीवनशैली संबंधित घटक : अपुरा आणि असंतुलित आहार असल्यास शुक्राणूंची संख्या कमी होते. याशिवाय संशोधनातून सिद्ध झाले आहे कि धूम्रपान, मद्यपान केल्यास शुक्राणूंची क्वालिटी खराब होते. शुक्राणूंचे उत्पादनही कमी होऊ लागते.
२) लठ्ठपणा किंवा ओबेसिटी मुळे शुक्राणूंची असामान्यता वाढते.
३) झोपेची कमतरता : शुक्राणूंचे पुरेसे उत्पादन होण्यासाठी चांगल्या क्वालिटीची, पूर्ण आणि शांत झोप घेणे फायदेशीर ठरते. झोपेशी संबंधित समस्या किंवा सोमनिऑसिस समस्या असतील तर वीर्याचे प्रमाण, शुक्राणूंची संख्या किंवा सीमेन कॉन्सन्ट्रेशन प्रभावित होऊ शकते.
४) वय : वाढत्या वयानुसार पुरुषांची फर्टिलिटी क्षमता कमी होऊ लागते. शुक्राणूंची क्वालिटी आणि संख्या देखील कमी होऊ लागते.
५) पर्यावरण संबंधित घटक : अधिक तापमानात काम करणे किंवा इलेक्ट्रिक उपकरणं सातत्याने वापरल्यास शुक्राणूंचे स्वास्थ्य प्रभावित होते.
६) विषारी पदार्थांचा संपर्क : घटक केमिकल्स च्या संपर्कात काम केल्याने देखील शुक्राणूंचे स्वास्थ्य धोक्यात येते.
७) इन्फेक्शन्स : गनोरिया, एच.आय.व्ही., एपिडिडायमिस, एपिडिडाइमिटिस, ऑर्किटिस अशा इन्फेक्शन्स आणि व्हायरसेस मुळे स्पर्म प्रोडक्शन कमी होऊन स्पर्म ची संख्या कमी होते, स्पर्म्स ची क्वालिटी खराब होते.
८) रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन च्या समस्या : पूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया, शुक्राणूवाहिनी ब्लॉकेज किंवा जन्मतः अंडकोष नसणे किंवा वेरिकोसिल सारख्या समस्यांमुळे पुरुषांची फर्टिलिटी क्षमता प्रभावित होते. स्पर्म काउंट कमी होतो. किंवा अझूस्पर्मिया ची स्थिती उद्भवू शकते.
९) शुक्राणूंवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज : अँटीस्पॅर्म-अँटीबॉडी हि रोगप्रतिकारक सिस्टीम जेव्हा उलट कार्य करू लागते तेव्हा शुक्राणूंना हानिकारक समजून शुक्राणूंवर अटॅक करते. त्यामुळे स्पर्म क्वालिटी आणि काउंट वर परिणाम होतो.
१०) हार्मोनल समस्या किंवा पिट्युटरी ग्लॅन्ड च्या समस्या : पिट्युटरी ग्रंथी विविध रिप्रॉडक्टिव्ह हॉर्मोन प्रोड्युस करत असते. पिट्युटरी ट्युमर सारख्या समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे हॉर्मोनल समस्या उद्भवतात. ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन आणि लैंगिक क्रिया प्रभावित होतात.
११) शुक्राणूंवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज : अँटीस्पॅर्म-अँटीबॉडी हि रोगप्रतिकारक सिस्टीम जेव्हा उलट कार्य करू लागते तेव्हा शुक्राणूंना हानिकारक समजून शुक्राणूंवर अटॅक करते. त्यामुळे स्पर्म क्वालिटी आणि काउंट वर परिणाम होतो.
विविध शुक्राणू समस्यांसाठी फर्टिलिटी उपचार
IUI :
कमी शुक्राणूंची संख्या किंवा शुक्राणूंची खराब हालचाल असलेल्या पुरुषांसाठी, इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) हा एक प्राथमिक आणि प्रभावी उपचार आहे. यामध्ये फेलोपियन ट्यूब मध्ये असलेल्या स्त्रीबीजाजवळ शुक्राणू पोचवले जातात. शुक्राणूंचा प्रवास कमी करून गर्भधारणेची शक्यता वाढविली जाते.
IVF :
निवडक आणि स्वच्छ धुतलेले शुक्राणू पेट्री ट्रे मध्ये स्त्रीबीजांसोबत मिसळले जातात. इथे फर्टिलायझेशन होऊन गर्भ बनतो. हा गर्भ महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. IVF उपचारांनी गर्भधारणेची शक्यता अनेक पटींनी वाढते.
ICSI / IMSI / PICSI :
जेव्हा शुक्राणूंची मॉर्फोलॉजी आणि मोटिलिटी खराब असते तेव्हा गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी ICSI / IMSI / PICSI या आधुनिक ट्रीटमेंट चा वापर केला जातो. या उपचारांमध्ये मॉर्फोलॉजिकली आणि बायोलॉजिकल स्वस्थ शुक्राणूंची निवड मायक्रोस्कोप खाली केली जाते. इतकेच नव्हे तर मायक्रोपिपेत च्या मदतीने स्त्रीबीजामध्ये शुक्राणू इंजेक्ट करून गर्भ बनवला जातो. यामुळे शुक्राणूंच्या असामान्यतेवर मात करून गर्भधारणा शक्य होते.
जेनेटिक टेस्टिंग :
जेव्हा शुक्राणूंची क्वालिटी खराब असते तेव्हा जेनेटिक दोष असण्याची शक्यताही असते. अशावेळी गर्भ ट्रान्स्फर करण्यापूर्वी गर्भातील जेनेटिक मटेरियल ची तपासणी करून जेनेटिकली उत्तम क्वालिटी चा गर्भ ट्रान्स्फरसाठी निवडला जातो. यामुळे स्वस्थ बाळाची आणि गर्भधारणेची संभावना वाढते.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
नैसर्गिकरित्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही टिप्स?
निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हे करा :
– फळे, भाज्या, नट आणि संपूर्ण धान्य यांसारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध संतुलित आहार घ्या.
– नियमित व्यायामामुळे शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता देखील सुधारू शकते
– व्यसने टाळा आणि शीतपेय-चहा-कॉफी चे सेवन कमी करा.
– ध्यान किंवा योग यासारख्या रिलॅक्सेशन टेक्निक वापरून तणाव पातळीचे कमी करा.
– पुरेशी झोप घ्या.
– कीटकनाशके किंवा रसायने आणि तापमानाशी संपर्क टाळा.
शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही सामान्य उपचार कोणते आहेत?
फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अंतर्निहित कारणांसाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे किंवा हार्मोन थेरपी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. याशिवाय गर्भधारणेसाठी इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) किंवा ICSI, IMSI, PICSI, जेनेटिक टेस्टिंग सारख्या आधुनिक उपचारांचा वापर केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.