सारांश : नैसर्गिक गर्भधारणेत अयशस्वी ठरल्यानंतर आयव्हीएफ उपचारांनाही जेव्हा अपयश येते तेव्हा दाम्पत्यांची खिन्नता आम्ही समजू शकतो. सर्वप्रथम भावनिक आणि शारीरिक रित्या स्वतःला तयार करा. तुमच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही. हार न मानता प्रयत्न करीत राहिल्यास पुढील वेळी गर्भधारणा नक्की होऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती एका सेकंड ओपिनियन ची, ऍडव्हान्स आणि वर्ल्ड क्लास सुविधांनी सज्ज अशा फर्टिलिटी क्लिनिक ची आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची.
IVF फेल होण्याची कारणे
- वय
- अतिरिक्त वजन
- शुक्राणूंची खराब गुणवत्ता
- स्त्रीबीजांची खराब गुणवत्ता
- एम्ब्रियो ची क्वालिटी
- अनुवांशिक दोष
- गर्भाशयाच्या समस्या
- ऍबनॉर्मल युटेरियन लायनिंग
1) आयव्हीएफ फेल होत असतील, तर गर्भधारणा होऊ शकते का?
होय. नक्कीच. औषधे घेण्यात हलगर्जीपणा केल्यास, किंवा संपूर्ण आयव्हीएफ प्रक्रियेत योग्य काळजी न घेतल्यास, चुकीच्या वेळी एम्ब्रियो ट्रान्स्फर केला असेल तर, ट्रान्स्फर च्या वेळी मातेचे स्वास्थ्य ठीक नसेल किंवा संक्रमण झाले असेल तर, किंवा तुम्ही जिथे आयव्हीएफ उपचार घेतले तिथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसतील तर अशा काही किरकोळ कारणांमुळे आयव्हीएफ फेल होऊ शकते.
दुसरे आयव्हीएफ करण्यापूर्वी अत्याधुनिक सुविधांनी युक्त फर्टिलिटी सेंटर ची निवड करावी. तिथे अधिक ऍडव्हान्स पद्धतींनी सूक्ष्म वंध्यत्व समस्यांचे निदान करता येऊ शकते. अचूक निदानानंतर योग्य दिशेने उपचार केल्यास गर्भधारणा नक्की होऊ शकते. ‘प्रोजेनेसिस फरटिलटि सेंटर’ मध्ये अशा अनेक जोडप्यांना पहिल्याच सायकल मध्ये गर्भधारणा झालेली आहे, ज्यांचे पूर्वी इतर ठिकाणी अनेक आयव्हीएफ फेल झालेले होते.
2) कमी वयात आयव्हीएफ फेल होत असेल तर काय करावे?
आम्ही समजू शकतो कि, कमी वयात नैसर्गिक गर्भधारणेत अपयश आल्यामुळे तुम्ही चिंतीत आहेत. शिवाय आयव्हीएफ उपचारही अपयशी झाल्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडलेली आहे. अशा स्थितीतहि हार न मानता तुम्ही पॉजिटीव्ह राहा. अयशस्वी होण्यामागील कारणे समजून घेण्यासाठी तज्ज्ञ फर्टिलिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. आयव्हीएफ फेल्युअर चे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टर जास्तीच्या तपासण्या सुचवतील. जसे कि –
- केरियोटायपिंग : क्रोमोझोमल अनालिसिस करण्यासाठी केरियोटायपिंग चाचणी
- इम्युनॉलॉजिकल समस्या शोधण्यासाठी ब्लड टेस्ट
- इंट्रालिपीड किंवा आयव्ही ग्लोबुलीन : रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित झालेली असेल तर ती सुधारली जाते.
- हिस्टेरोस्कोपी किंवा ४ डी स्कॅन : गर्भाशय किंवा इतर रिप्रॉडक्टिव्ह अवयवांमधील स्ट्रक्चरल ऍबनॉमिलिटिज शोधण्यासाठी केले जाते.
- जेनेटिक स्क्रीनिंग : PGT-A, PGS या जेनेटिक चाचण्या करून उत्तम प्रतीचा एम्ब्रियो सिलेक्ट करता येतो. असा एम्ब्रियो जेनेटिकली चांगल्या प्रतीचा असतो. यामुळे मिसकॅरेज चे चान्सेस कमी होतात. तसेच इम्प्लांटेशन आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.
- ERA एन्डोमेट्रियल रिसेप्टिव्हीटी असे : या टेस्ट च्या मदतीने ट्रान्स्फर साठी सर्वात ग्रहणक्षम कालावधीबद्दल माहिती मिळते. एन्डोमेट्रियम कडून भ्रूण ग्रहण करण्याची क्षमता अर्थात गर्भ रुजण्याची कॅपॅसिटी कळते. शिवाय इन्फेक्शन्स ची माहिती मिळते. ERA टेस्ट मध्ये इन्फेक्शन आढळून आल्यास एम्ब्रियो ट्रान्स्फर केले जाते. आणि पुन्हा योग्य वेळी केले जाते.
- मेडिसिन मध्ये बदल : ओवॅरियन स्टिम्युलेशन चा प्रोटोकॉल चेंज केला जाऊ शकतो. डोसेज मध्ये किंवा मेडिसिन मध्ये बदल केला जाऊ शकतो.
अशा प्रकारे अत्याधुनिक ART तंत्रज्ञान आणि आधुनिक डायग्नोस्टिक टूल्स चा वापर केल्यास आयव्हीएफ यशस्वी होऊ शकते. त्यासाठी तुमच्या क्लिनिक मध्ये ऍडव्हान्स सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
3) ४० वयानंतर आयव्हीएफ अयशस्वी झाल्यास काय करावे?
महिलेचे वय ३५ पेक्षा कमी असेल तर आयव्हीएफ चा सक्सेस रेट साधारण ४० टक्के असतो. महिलेचे वय ४० पेक्षा जास्त असेल तर आयव्हीएफ उपचारांनी गर्भधारणा फक्त १० टक्के असते. ४० वयानंतर तुमचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम असेल, रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचे स्वास्थ्य चांगले असेल आणि स्त्रीबीजांची क्वालिटी चांगली असेल तर आयव्हीएफ यशस्वितेचा दर जास्त असतो. याउलट परिस्थितीत तुम्हाला आयव्हीएफ मधील ऍडव्हान्स उपचारांच्या मदतीने गर्भधारणेची आणि स्वस्थ बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढवता येते. आधुनिक IVF उपचारांमध्ये जेनेटिक टेस्टिंग, ICSI, IMSI, PICSI, ब्लास्टोसिस्ट, डोनर प्रोग्राम असे उपचार उपलब्ध आहेत. ज्यामुळे निश्चित गर्भधारणा होऊ शकते.
4) आयव्हीएफ फेल्युअर नंतर डोनर एग्ज ची मदत केव्हा घ्यावी लागते?
वय अधिक असेल आणि बीजांची क्वालिटी खराब असल्यामुळे कमी ग्रेड चा एम्ब्रियो बनत असेल तर अशा वेळी डोनर एग्ज चा वापर केल्यास चांगले रिझल्ट मिळू शकतात. अधिक वयातील गर्भधारणा किंवा मेनोपॉज नंतरची गर्भधारणा अशा केसेस मध्ये तरुण महिलेचे किंवा पुरुषांचे डोनर एग वापरल्यास उत्तम क्वालिटी चा एम्ब्रियो बनतो आणि गर्भधारणेची शक्यता अनेक पटींनी वाढते.
शिवाय अनुवांशिक दोष किंवा क्रोमोझोमल समस्या असल्यास देखील डोनर एग ची मदत घेता येते.
5) अस्तरामध्ये गर्भ न रुजल्यामुळे आयव्हीएफ फेल होत असल्यास काय करावे?
एम्ब्रियो इम्प्लांटेशन समस्या असल्यास ERA टेस्ट करून युटेरियन लायनींग (गर्भाशयाचे अस्तर) ची रिसेप्टिव्हीटी (ग्रहणक्षमता) तपासणे महत्त्वाचे असते. एम्ब्रियो क्वालिटी चांगली होती पण गर्भाशयाचे अस्तर म्हणजेच एन्डोमेट्रियन व्यवस्थिती बनलेले नसल्यामुळे गर्भ रुजत नाही. अशा केस मध्ये पहिल्या सायकल वेळी बनवलेले चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रियो आपल्याकडे शिल्लक असतात. अशा वेळी ERA (एन्डोमेट्रियम रिसेप्टिव्हीटी टेस्ट) टेस्ट द्वारे गर्भाशयाच्या अस्तराची ग्रहणक्षमता तपासली जाते आणि अस्तराचा रिसेप्टिव्हीटी चांगली असेल तेव्हाच एम्ब्रियो ट्रान्स्फर केला जातो. अशा पद्धतीने गर्भ रुजण्याची शक्यता वाढते आणि आयव्हीएफ यशस्वी होते.
6) एम्ब्रियो क्वालिटी कमी असल्यामुळे आयव्हीएफ अयशस्वी होत असल्यास काय करावे?
एम्ब्रियो ची क्वालिटी ग्रेड A, B, आणि C मध्ये मोजली जाते. ए ग्रेड चे एम्ब्रियो उत्तम क्वालिटीचे असतात. उच्च ग्रेड गर्भधारणेचा उच्च दर दर्शवतात. एम्ब्रियो ची क्वालिटी स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या क्वालिटीवर अवलंबून असते. बीज उत्तम असल्यास चांगले एम्ब्रियो फॉर्म होतात. आणि आयव्हीएफ यशस्वी होते.
दुसऱ्या आयव्हीएफ सायकल मध्ये स्वस्थ शुक्राणूंची निवड करून गर्भ बनवण्यासाठी ICSI, IMSI, PICSI ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. शिवाय जेनेटिकली स्वस्थ एम्ब्रियो ची निवड करण्यासाठी PGT-A, PGD, PGT टेस्ट चा वापर केल्यास आयव्हीएफ यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात.
महिलांचे अधिक वय, एन्डोमेट्रिओसिस, PCOD/PCOS असल्यास स्त्रीबीजांची क्वालिटी खराब होऊ शकते. DNA फ्रॅगमेंटेशन रेट ऍबनॉर्मल असू शकतो. शुक्राणूंविषयी बोलायचे झाले तर, क्वालिटी जितकी चांगली असेल, DNA फ्रॅगमेंटेशन रेट जितका कमी असेल आणि स्वस्थ शुक्राणूंची निवड ऍडव्हान्स तंत्रज्ञानाच्या मदतीने केली असेल, तर चांगल्या प्रतीचे एम्ब्रियो मिळतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) अयशस्वी IVF नंतर तुम्ही किती लवकर पुन्हा प्रयत्न करू शकता?
IVF चक्रांमधील अंतर साधारणपणे चार ते सहा आठवडे असते. IVF चे दुसरे चक्र सुरू करण्यापूर्वी तुम्ही किमान एक पूर्ण मासिक पाळी येईपर्यंत थांबावे. परंतु याआधी आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
२) आयव्हीएफ किती वेळा केले जाऊ शकते?
साधारणपणे, कोणतीही महिला ३ ते ४ वेळा IVF सायकल करू शकते. वारंवार आयव्हीएफ अयशस्वी झाल्यानंतर, डोनर एग चा पर्याय सुचवला जाऊ शकतो.