प्रेग्नंन्सी साठी करा योग्य डॉक्टरांची निवड

find right doctor for pregnancy - Marathi
जाणून घेऊयात गायनॅक-ऑब्स्ट्रॅटिशिअन काय काम करतात? फर्टिलिटी डॉक्टर काय काम करतात? दोन्ही ठिकाणी कसे निदान केले जाते? कोणते उपचार उपलब्ध असतात? प्रेग्नन्सी साठी स्त्रीरोग तज्ज्ञाची  निवड केव्हा करावी आणि फर्टिलिटी डॉक्टर ची निवड केव्हा करावी? इत्यादी. ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

Share This Post

परिपूर्ण कुटुंबाची सुरुवात करणे हा अनेक लोकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आई-बाबा होण्याचा हा प्रवास काहींसाठी सुखद ठरतो, तर काहींसाठी आव्हानात्मक आणि निराशाजनक ठरू शकतो. जेव्हा आई-बाबा होण्याच्या स्वप्नात अडथळे येऊ लागतात, तेव्हा कपल्स उपचार घेण्याचा निर्णय घेतात. अशा वेळी प्रसूती-स्त्रीरोग तज्ज्ञाची ट्रीटमेंट घ्यावी कि फर्टिलिटी डॉक्टर ची याविषयी गोंधळ होऊ शकतो… कारण आपल्याला वंध्यत्व समस्या असू शकते याचा थांगपत्ताही जोडप्याना नसतो.

चला तर मग, जाणून घेऊयात गायनॅक-ऑब्स्ट्रॅटिशिअन काय काम करतात? फर्टिलिटी डॉक्टर काय काम करतात? दोन्ही ठिकाणी कसे निदान केले जाते? कोणते उपचार उपलब्ध असतात? प्रेग्नन्सी साठी स्त्रीरोग तज्ज्ञाची  निवड केव्हा करावी आणि फर्टिलिटी डॉक्टर ची निवड केव्हा करावी? इत्यादी. ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

तुमच्या समस्येनुसार योग्य डॉक्टरांच्या निवडीने तुमचा प्रवास सोपा आणि यशस्वी ठरू शकतो.

OB/GYN या समस्यांवर काम करतात

बाळंतपण, गर्भनिरोधक, कुटुंब नियोजन (family planning), मासिक पाळी समस्या, ऍम्नीओसेन्टेसिस, सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स (STI), रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स (RIT) अशा समस्या हाताळतात. याशिवाय अल्ट्रासाउंड, ब्लड टेस्ट्स, अनुवांशिक तपासणी (Genetic screening and testing), लॅप्रोस्कोपी, कोल्पोस्कोपी या तपासण्यांबरोबरच लॅप्रोस्कोपी सर्जरी, हिस्टेरोस्कोपी, हिस्टेरेक्टॉमी अशा सर्जरी गरजेनुसार करतात.

फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणजे काय?  

फर्टिलिटी स्पेशलिस्ट हे मेडिकल प्रोफेशनल्स असतात. जे महिला आणि पुरुषांच्या इनफर्टिलिटी समस्येचे (fertility issues) निदान आणि उपचार करतात.

ज्या कपल्स ला कन्सिव्ह करण्यात अडचणी आहेत किंवा गर्भ रुजण्यात (implantation) समस्या आहेत त्यांना मदत करतात.

तुमच्या वंध्यत्व समस्येचे नेमके कारण काय आहे ते शोधून योग्य आणि पर्सनलाईज ट्रीटमेंट प्लॅन देतात. शेवटी ‘गर्भधारणा होणे’ हेच उपचारांचे ध्येय असते.

आई-बाबा होण्यासाठी योग्य वेळी करा योग्य डॉक्टरांची निवड.

Free consultation

फर्टिलिटी स्पेशालिस्ट (बेबी मेकिंग एक्सपर्ट)

फर्टिलिटी डॉक्टर्स वंध्यत्व समस्येत येणाऱ्या अडथळ्यांवर उपचार करतात. ज्यामध्ये फायब्रॉइड्स, फेलोपियन ट्यूब डॅमेज किंवा ब्लॉकेज, ओव्हुलेशन समस्या, हार्मोनल विकार, वजन किंवा वय-संबंधित वंध्यत्व, पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस, ऍबनॉर्मल स्पर्म प्रोडक्शन, जेनेटिक कंडिशन्स, इन्फेक्शन्स, सेक्श्युअल डिसऑर्डर इ. चा समावेश होतो.

निदान व उपचार करण्यासाठी ऍडव्हान्स पद्धतींचा (एआरटी टेक्नॉलॉजी) वापर करतात. जसे कि,

  • अल्ट्रासाउंड
  • प्री प्रेग्नन्सी स्क्रीनिंग टेस्ट (PGT/PGS)
  • लॅप्रोस्कोपी, हिस्टेरोस्कोपी, हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी इ.
  • ट्रॅक ओव्यूलेशन सायकल
  • ओव्यूलेशन इंडक्शन (OI)
  • आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन (AI)
  • इंट्रा युटेरिअन इन्सेमिनेशन (IUI)
  • इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)
  • इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI)
  • इंट्रा-साइटोप्लाज्मिक मॉर्फोलॉजिकल-सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन (IMSI)
  • फिजियोलॉजिकल इंट्रा-सायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (PICSI)
  • लेजर असिस्टेड हॅचिंग (LAH)
  • सिक्वेन्शिअल एम्ब्रियो ट्रान्स्फर (SET)
  • ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर
  • क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation)
  • प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGD)
  • डोनर प्रोग्राम

ob-gyn आणि फर्टिलिटी डॉक्टर यांच्या उपचारातील फरक

Ob- gynFertility Doctor
स्पेशलायझेशनमहिलांचे सामान्य आरोग्य आणि निरोगीपणामध्ये मदत करणारे डॉक्टर्स. प्रसूतीतज्ञ प्रसुतीपूर्व आणि प्रसूती नंतर उपचार करणारे डॉक्टर्स.पुनरुत्पादक औषधांमध्ये (reporductive medicines) विशेष प्रशिक्षण असलेले डॉक्टर.
फोकसस्त्री प्रजनन प्रणालीशी संबंधित विविध परिस्थितींचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित.वंध्यत्व आणि इतर पुनरुत्पादक समस्यांवर लक्ष केंद्रित करतात.
निदानहिस्टेरेक्टॉमी किंवा गर्भाशयाच्या फायब्रॉइड काढण्यासारख्या नियमित शस्त्रक्रिया देखील करू शकतात.फर्टिलिटी तज्ज्ञ प्रामुख्याने वंध्यत्वाचे निदान आणि उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. उदा. फायब्रॉइड्स जर वंध्यत्व समस्येचे कारण असेल तर सर्जरी करतात.
उपचारहार्मोन्सचे नियमन करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी औषधे लिहून देतात.इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारखे अधिक प्रगत उपचार प्रदान करतात.  ज्यामुळे गुंतागुंतीच्या स्थितीतही गर्भधारणा शक्य आहे.
ob-gyn आणि फर्टिलिटी डॉक्टर

फर्टिलिटी ट्रीटमेंट घेण्याची योग्य वेळ

  1. जर तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि 6 महिने नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर शक्य तितक्या लवकर योग्य फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  2. जर तुमचे वय ३५ वर्षापेक्षा कमी आहे आणि १ वर्ष नैसर्गिकरित्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तेव्हा फर्टिलिटी उपचारांची गरज असते. 
  3. मिसकॅरेज हिस्टरी असेल तेव्हा फर्टिलिटी उपचार गरजेचे आहेत.
  4. सेकंडरी इन्फर्टिलिटी केसेस : जर तुम्हाला पूर्वी गर्भधारणा झालेली असेल; पण दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यात अडचणी येत असतील, तर तुमची केस सेकंडरी इन्फर्टिलिटी ची असू शकते. यावेळी फर्टिलिटी उपचार घ्यावे.
  5. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी (Unexplained Infertility) : जर तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येत असतील, डॉक्टर इन्फर्टिलिटीचे कारण सांगू शकत नाहीत, तेव्हा तुमची केस Unexplained Infertility ची असते. यावेळी फर्टिलिटी उपचार घ्यावेत.
  6. PCOS सह लवकर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर, फर्टिलिटी ट्रीटमेंट ने पॉजिटीव्ह रिझल्ट मिळतो. 
  7. पुरुष वंध्यत्व : स्त्रियांच्या सर्व तपासणी करून झाल्या आहेत आणि उपचारांती पॉजिटीव्ह रिझल्ट मिळत नाही तेव्हा मेल इन्फर्टिलिटी समस्या (शुक्राणू दोष, कमी संख्या, कमी हालचाल) असू शकते. पुरुष वंध्यत्वावर फक्त फर्टिलिटी स्पेशालिस्ट उपचार करू शकतात.
  8. जर तुम्हाला कँसर सारखा आजार असेल तेव्हा किमो थेरपी किंवा रेडिओथेरपी सारखे उपचार घेण्यापूर्वी फर्टिलिटी सेंटर ला भेट द्यावी. तुम्ही तुमचे एग्ज जतन करून ठेवू शकतात. आणि रिकव्हरीनंतर IVF उपचार घेऊ शकतात. 
  9. प्रजनन प्रणालीशी संबंधित जन्मजात दोष किंवा अनुवांशिक दोष असल्यास फर्टिलिटी उपचार घ्यावे.
  10. फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस, फेलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस, नळीतून पाणी झिरपणे अशा समस्यामुले कन्सेप्शन अडचणी येतात तेव्हा फर्टिलिटी डॉक्टरांना भेट द्यावी. 
  11. मेनोपॉज नंतर म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर तुम्हाला आई होण्याची इच्छा असेल तेव्हा फर्टिलिटी उपचार घ्यावेत.
  12. तुम्ही सिंगल असाल आणि अपत्य हवे असल्यास फर्टिलिटी उपचार निवडावेत.

फर्टिलिटी ट्रीटमेंट का घ्यावी?

गायनॅक आणि ऑब्स्ट्रॅटिशिअन तुमच्या वंध्यत्व समस्येचे सखोल निदान करण्यास किंवा ऍडव्हान्स ART उपचार करू शकत नाहीत. याऊलट फर्टिलिटी डॉक्टर तुम्ही कन्सिव्ह का करू शकत नाही, याचे नेमके कारण शोधून काढतात. त्यासाठी इन डेप्थ इवॅल्युएशन म्हणजेच समस्येचे सखोल निदान करतात आणि यशस्वी उपचारांना दिशा देतात.

जसे कि,

  • फर्टिलिटी मेडिकेशन्स आणि जीवनशैलीतील बदल
  • सर्जरी : फायब्रॉइड्स, ब्लॉक फेलोपियन ट्यूब सर्जरी, ओवरियन ड्रिलिंग सारख्या सर्जरी महिलांमध्ये, तर पुरुषांमध्ये व्हास डिफरंस ब्लॉकेज सर्जरी, व्हेरिकोल सर्जरी गरजेनुसार केली जाते. खासकरून जेव्हा या समस्या फर्टिलायझेशन मधील अडसर असतात तेव्हा केल्या जातात. 
  • सेक्श्युअल इंटरकोर्स संबंधित समस्यांवर उपचार : इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा अरली इजॅक्युलेशन, ओर्गसमीक डिसऑर्डर सारख्या समस्येवर कौन्सेलिंग, सायकोथेरपी, औषोधोपचार केले जातात. जेव्हा या समस्या इन्फर्टिलिटीचे कारण असतात तेव्हा उपचार केले जातात. 
  • IUI : इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन : बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
  • IVF : इन विट्रो फर्टिलायझेशन हे एक प्रचलित ART तंत्रज्ञान आहे. IVF चा सक्सेस रेट देखील अधिक असतो. या प्रक्रियेत लॅब मध्ये स्पर्म आणि एग फर्टीलाइज करून बनवलेला भरून मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. 
  • असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) : यामध्ये सर्व सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाचा समावेश असतो.

योग्य फर्टिलिटी डॉक्टर आणि सेंटर निवड कशी करावी?

  • तुम्ही निवड करीत असलेल्या सेंटर मध्ये आधुनिक ART तंत्रज्ञान उपलब्ध असावे.
  • सेंटर मध्ये क्लास १००० मॉड्युलर लॅब असावी.
  • सर्व डायग्नोसिस साधने आणि आधुनिक उपचार उपलब्ध असावेत.
  • सेंटर मध्ये अनुभवी, कौशल्यपूर्ण आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असावी.
  •  सेंटर चा सक्सेस रेट जरूर तपासावा.
  • पॉजिटीव्ह रिझल्ट मिळालेल्या कपल्स चे रिव्ह्यूज पाहून खात्री करून घ्यावी.
  • स्टाफ चा व्यवहार आणि मनोधैर्य असणारे वातावरण असावे.
  • वंध्यत्व समस्येचे समूळ निदान होणे गरजेचे आहे.
  •  निदान अनुसार पर्सनलाईज ट्रीटमेंट प्लॅन देणारे सेंटर तुमचा सक्सेस निश्चित करते.
  • आयव्हीएफ ट्रीटमेंट साठी आर्थिक मदत करणारे कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत, हे देखील पाहणे गरजेचे असते.
  •  फर्टिलिटी ट्रीटमेंट साठी जवळचे नाही, तर बेस्ट IVF रिझल्ट देणारे सेंटर निवडावे.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।