टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ? प्रक्रिया, खर्च, फायदे आणि सक्सेस रेट

Test tube baby in Marathi
२५ जुलै १९७८ या दिवशी ''फर्टिलायझेशन'' च्या क्षेत्रात यशस्वी क्रांती घडून आली. प्रयोगशाळेत बनविलेलं आणि मातेच्या उदरात वाढ झालेलं असं पाहिलं-वहिलं बाळ ‘झिगोत’ येथे जन्माला आलं. या घटनेच्या बरोबर ६७ दिवसांनी प.बंगाल मध्ये भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी ''दुर्गा'' (कनुप्रिया) जन्माला आली.

Share This Post

टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया, उपचार, खर्च, सक्सेस रेट, समज-गैरसमज आणि तुमच्या शंकांची उत्तरे जाणून घेऊयात.

२५ जुलै १९७८ या दिवशी ”फर्टिलायझेशन” च्या क्षेत्रात यशस्वी क्रांती घडून आली. प्रयोगशाळेत बनविलेलं आणि मातेच्या उदरात वाढ झालेलं असं पाहिलं-वहिलं बाळ ‘झिगोत’ येथे जन्माला आलं. या घटनेच्या बरोबर ६७ दिवसांनी प.बंगाल मध्ये भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी ”दुर्गा” (कनुप्रिया) जन्माला आली.

फर्टिलायझेशन च्या क्षेत्रात दिवसागणिक अनेक संशोधने झाली आणि आय.व्ही.एफ. चा पर्याय अधिक पॉझिटिव्हली स्वीकारला जातोय. आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट घेऊन अनेक स्त्रिया आई झाल्याचे सर्वोच्च सुख अनुभवत आहेत. हेच खरे यश.

टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?

टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्राज्ञान. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भधारण प्रक्रियेमध्ये ओव्हरीज मधून एग्ज रिलीज होतात आणि फेलोपियन ट्यूब कडे पाठविले जातात. येथे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे फर्टिलायझेशन होते आणि गर्भधारणा होते. जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही तेव्हा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात, आणि ऍडवान्सड लॅब मधील इन्क्युबेटर्स मध्ये फर्टीलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण/एम्ब्रियो स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होतो. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात.

योग्य आय.व्ही.एफ. सेंटर ची निवड करा आणि मातृत्वाच्या प्रवासातील लढाई जिंका.

टेस्ट ट्यूब बेबी आणि आय.व्ही.एफ. मधील फरक?

बऱ्याचदा टेस्ट ट्यूब बेबी आणि आय.व्ही.एफ. मधील फरक अनेकांना लक्षात येत नाही. दोन्हींमध्ये एक साम्य असे आहे की, दोन्ही प्रक्रियांमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिलन प्रयोगशाळेत केले जाते. सुरुवातीच्या काळात टेस्ट ट्यूब मध्ये स्त्रीभ्रूण तयार केला गेला त्याला ”टेस्ट ट्यूब बेबी” म्हणतात. जसजसा काळ गेला तसतसा तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि स्त्रीभ्रूण टेस्ट ट्यूब ऐवजी ”इन्क्युबेटर” मध्ये बनविला गेला; या प्रक्रियेला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आय.व्ही.एफ.) म्हणतात.

टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया :

स्टेप १:

ओवॅरियन स्टिम्युलेशन
एका मासिक पाळीत एक मॅच्युअर एग तयार होते. आय.व्ही.एफ. प्रक्रिया सक्सेस होण्यासाठी स्त्रीला GnRHa and gonadotrophins हे इंजेक्शन ८ ते १० दिवस दिले जाते. ज्यामुळे १०-१५ फॉलिकल्स मॅच्युअर होतील. तसेच स्त्री ची मासिक पाळी थांबवली जाते. फॉलिक्युलर एग ची वाढ तपासण्यासाठी दोन ते तीन वेळा ट्रान्स-व्हजायनल सोनोग्राफी केली जाते. एकदा का हवी तेवढी वाढ झाली की, ट्रिगर इंजेक्शन देऊन मॅच्युअर केले जाते. 
स्टेप २:

एग रिट्रायवल आणि स्पर्म कलेक्शन
दुसरी पायरी ओवुम आणि स्पर्म कलेक्शन हि असते. या प्रक्रियेसाठी ट्रान्स-व्हजायनल सोनोग्राफी द्वारे सुईच्या माध्यमातून भूल देऊन ओवुम पीक अप केले  यामुळे स्त्रीला वेदना होत नाहीत. याचवेळी पुरुष जोडीदार हस्तमैथुनाद्वारे सीमेन सॅम्पल देतो. एखाद्या केस मध्ये पुरुषाला निल शुक्राणू/एझूस्पर्मिया (शून्य शुक्राणु) समस्या असेल तर, सर्जरी करून स्पर्म कलेक्शन केले जाते.
स्टेप ३:

एम्ब्रियो फॉर्मेशन
प्रयोगशाळेत स्त्रीभ्रूण तयार करण्याची ही पायरी. यावेळी मिळवलेली ओवुम आणि स्पर्म्स पेट्री-ट्रे मध्ये फर्टलाईज केली जातात. काही केसेस मध्ये स्पर्म्स कमकुवत असल्यास इंट्रा साइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन इक्सी चा वापर करून ओवुम मध्ये स्पर्म इंजेक्ट केले जाते. इक्सी वापरताना मायक्रो मॅनिपुलेटरद्वारे एकच एग एका स्पर्म द्वारे फर्टीलाइज केले जाते.
स्टेप ४:

एम्ब्रियो ट्रान्स्फर
यामध्ये एम्ब्रियो ट्रान्स्फर केले जाते. यावेळी एक किंवा दोन भ्रूण योनिमार्गाद्वारे स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात आणि उरलेले एम्ब्रियो फ्रोझन प्रक्रियेद्वारे गोठवले जातात. काही कारणांमुळे गर्भ लगेचच ट्रान्सफर करणे शक्य नसेल तर, त्यासाठी हि खबरदारी घेतली जाते.
स्टेप ५:

टेस्टिंग रिझल्ट
एम्ब्रियो ट्रान्स्फर केल्यानंतर १४ दिवसांनी एम्ब्रियो परीक्षण आणि ब्लड बीटा एच.सी.जी. टेस्ट केली जाते.
Test tube baby process

टेस्ट ट्यूब प्रोसेस वेदनादायी असते का?

टेस्ट ट्यूब प्रोसेस वेदनादायी नसते. शिवाय या संपूर्ण प्रक्रिया आउट-पेशंट आणि डे-केअर असतात. ज्यामध्ये ऍडमिट होण्याची गरज नसते. स्त्रीबीज संकलनाची प्रोसेस भूल देऊन केली जाते. तर, एम्ब्रयो (स्त्रीभ्रूण) गर्भाशयात टाकण्याची प्रक्रिया बऱ्याचदा भुलीविना केली जाते. अगदी किरकोळ गुंतागुंतीच्या केसेस मध्ये सौम्य भूल दिली जाते.

वारंवार आय.व्ही.एफ. फेलियर नंतरही होऊ शकते गर्भधारणा

जेव्हा एखादे कपल १, २, ३…वेळा आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट घेते आणि ती फेल होते याला आय.व्ही.एफ. फेलियर म्हंटले जाते. आय.व्ही.एफ. फेलियर टाळण्यासाठी समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची गरज असते. त्यामध्ये शुक्राणूंची मोरबीलीटी, फंक्शन कपॅसिटी, सर्व्हायवल, काउंट, डी.एन.ए. फ्रॅगमेंटेशन सोबतच तुमचे लाईफस्टायल विचारात घेतले जाते. स्त्री पार्टनर मध्ये गर्भाशयाची सूज, गाठी, अस्तर, जंतुसंसर्ग, पडदा, अस्तर चिटकलेलं असणं (adhesions), छोटा गर्भाशय, नळीत पाणी असणे, नळीचे पाणी गर्भाशयात झिरपणे इ. घटक तपासले जातात. त्याहीपुढे जाऊन भृणशास्त्रतील घटक; जसे की, अंडाशयाची क्षमता कमी असणे, पॉलीसिस्टिक ओवरी, स्त्रीबीजाची क्वालिटी, चांगला एम्ब्रियो बनत नसणे यांची तपासणी केली जाते. अचूक समस्या शोधणे म्हणजेच तुमच्या समस्येचे योग्य निदान होते. आणि त्यावर अचूक दिशेने योग्य उपचार पद्धती वापरून ट्रीटमेंट दिली जाते.

फर्टिलिटी विशेषज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर सांगतात की, ‘’इन-डेप्थ इव्हॅल्युएशन करून, कारणे शोधून त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली तर चांगले रिझल्ट मिळतात’’.

टेस्ट ट्यूब बेबी बद्दलचे गैरसमज

असा समज आहे कि टेस्ट ट्यूब बेबी कमी वजनाचे असतात. किंवा एकापेक्षा अधिक बालके जन्माला येण्याचा धोका असल्यामुळे समस्या निर्माण होतील असाही समाज आहे. परंतु टेस्ट ट्यूब बेबी इतर बाळांप्रमाणेच नॉर्मल असतात. एकाधिक बालके जन्माला येण्याची संभावना असली तरी एकाधिक बालके नॉर्मल प्रेग्नन्सीत देखील जन्माला येऊ शकतात. तसेच नैसर्गिक रित्या जन्मणारी बालके हि कमी वजनाची असू शकतात. ताणतणाव, आरोग्याकडे दुर्लक्ष, अशी काही कारणे यामागे असू शकतात. अन्यथा टेस्ट ट्यूब बेबी इतर बाळांप्रमाणेच हेल्दी असतात.

सक्सेस रेट

प्रोजेनेसिस आय.व्ही.एफ. सेंटर चा सक्सेस रेट सर्वाधिक म्हणजेच ८०-८५% आहे. यामध्ये नवीनतम संशोधने, ऍडव्हान्स्ड टेक्नोलॉजी, सुधारित औषधे, इंजेक्शन्स तसेच अनुभवी, कुशल डॉक्टर्स यांचे मोठे योगदान आहे. आय.व्ही.एफ. मध्ये एका सायकल मध्ये गर्भधारणा राहण्यातील सक्सेस रेट ७५% आहे तर, एक ते दोन सायकल मध्ये गर्भधारणा राहण्यातील सक्सेस रेट ८०-८५% आहे.

टेस्ट ट्यूब बेबी सक्सेस रेट विषयी बोलताना फर्टिलिटी विशेषज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर म्हणतात की, ”तुम्ही कोणत्या कोणत्या सेंटर ला आय.व्ही.एफ. करीत आहात, तिथे किती आधुनिक उपकरणे अस्तित्वात आहेत, या उपकरणांचा वापर किती प्रभावीपणे केला जात आहे, शिवाय कोणते अनुभवी आणि कुशल तज्ज्ञ आय.व्ही.एफ. प्रक्रिया करीत आहेत या सर्व गोष्टींवर आय.व्ही.एफ. चा सक्सेस रेट अवलंबून असतो.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणतात की, गर्भ रुजण्यात मातेचे गर्भाशय, एन्डोमेट्रियम, फॅलोपीयन ट्यूब ची स्थिती, हार्मोनल बॅलन्स, स्त्रीबीजांची संख्या, मासिक पाळी नियमितता, स्त्रीबीज किंवा शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता असे अनेक घटक हस्तक्षेप करीत असतात. अशा वेळी इन डेप्थ इव्हॅल्युएशन करणे (समस्या शोधणे) आणि त्यावर योग्य व प्रभावी उपचार केल्यास आय.व्ही.एफ. यशस्वी होते.

तुम्ही कोणत्या सेंटर ची निवड करता आहेत आणि तिथे किती आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, तसेच कोणते डॉक्टर्स केस हाताळत आहेत यावर तुमचं IVF प्रवास आणि सक्सेस अवलंबून असतो.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न:

१) टेस्ट ट्यूब बेबी चे बाळ कृत्रिम किंवा विकृत असते का?

उत्तर : या शंकेचे समाधान करताना डॉ. नरहरी मळगांवकर सांगतात कि, ”टेस्ट ट्यूब बेबी नैसर्गिकरित्या जन्माला येतात. याची उदाहरणे म्हणजे, अनेक टेस्ट ट्यूब बाळांना आज त्यांची स्वतःची बाळं झालेली आहेत. फरक फक्त इतकाच कि फेलोपियन नलिकेत होणारे फर्टिलायझेशन बाहेर ट्रे मध्ये केले जाते. यामध्ये कोणतीही कृत्रिमता नसते. शिवाय ही बाळे पूर्णतः निरोगी आणि सामान्य वाढ होणारी असतात.

२) टेस्ट ट्यूब बेबी भारतात कायदेशीर आहे का?

उत्तर : होय. भारतात IVF कायदेशीर आहे. पण IVF बाबत अद्याप कोणताही विशिष्ट कायदा नाही. गेल्या 20 वर्षांमध्ये, IVF उपचाराकडे लोकांचे खूप लक्ष वेधले गेले आहे.

३) टेस्ट ट्यूब बेबी खर्च २०२३?

उत्तर : टेस्ट ट्यूब बेबी चा खर्च प्रत्येक दांपत्यासाठी वेगळा असतो. कारण तुम्हाला कोणती समस्या आहे, त्यानुसार कोणत्या तपासण्या करण्याची आणि कोणत्या उपचारांची आवश्यकता आहे यावर खर्च अवलंबून असतो. त्यासाठी एकदा सेंटर ला भेट देऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करणे योग्य.

४) टेस्ट ट्यूब बेबीचे फायदे काय?

उत्तर : टेस्ट ट्यूब बेबीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यशस्वी गर्भधारणा आणि निरोगी बाळ प्राप्त करणे. दुसरे म्हणजे अगदी अशक्य वाटणारी समस्या किंवा कॉम्प्लिकेशन असतील (उदा. ज्यामध्ये ट्यूब नसणे, अंडाशय नसणे, मासिक पाळी बंद झालेली असणे) तरी गर्भधारणा राहू शकते. तुम्ही सुखी मातृत्वाचा अनुभव घेऊ शकतात.

५) आय.व्ही.एफ. फेल्युअर  टाळण्यासाठी उपाय?

उत्तर : फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. सोनाली मळगांवकर आय.व्ही.एफ. सक्सेस चे सिक्रेट्स शेअर करताना सांगतात, डिटेल इव्हॅल्युएशन (समस्यांचे सखोल आणि अचूक निदान), मल्टिडिसिप्लिनरी अँड होलिस्टिक अप्रोच (लाइफस्टाइल मॉडिफिकेशन, वेट मॅनेजमेंट, योग, मेडिटेशन सारख्या रीलाक्सेशन टेक्निक, काउंसेलिंग, सायकोथेरपी), प्री आय.व्ही.एफ. आणि प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन (स्त्रीबीज आणि शुक्राणूंची क्वालिटी, अस्तराची सुस्थिती, महिलेचे आरोग्य, एन्डोमेट्रियल ब्लड फ्लो), इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट (एकसारखी ट्रीटमेंट न करता डायग्नोसिस नुसार आणि रुग्णाच्या शरीरानुसार स्वतंत्र ट्रीटमेंट प्लॅन करणे ), योग्य आय.व्ही.एफ. सेंटर ची निवड करणे गरजेचे असते.

६) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोण आहे?

उत्तर : रॉबर्ट एडवर्ड अणि पॅट्रिक स्टेपटो यांच्या प्रयत्नातुन जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुइस जॉय ब्राउन जन्माला आली. 25 जुलै 1978 रोजी, रात्री 11:47 वाजता इंग्लंडमध्ये लुइस ब्राउन जन्माला अली. तिच्या जन्मासाठी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.

७) भारतातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी कोणती?

उत्तर : १९८६ साली भारतातील आयसीएमआर चे सदस्य डॉ. टी. एन. आनंद कुमार यांच्या प्रयत्नातून भारतातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी हर्षा जन्माला आली. खरे तर भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी म्हणून हीचा गवगवा झाला. यापूर्वी डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या प्रयत्नातून पहिली टेस्ट ट्यूब बेबी दुर्गा प. बंगाल येथे जन्माला आली.

एकाच छताखाली बेसिक टू ऍडव्हान्स्ड ट्रीटमेंट घेण्यासाठी संपर्क करा

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

गर्भधारण की सम्भावना बढ़ानेवाली आधुनिक तकनीक : ERA टेस्ट

एंडोमेट्रियल रिसेप्टिविटी टेस्ट (ERA) गर्भाशय की परत की ग्रहणीय क्षमता को मापता है। यानी भ्रूण को प्रत्यारोपित करने की क्षमता। वन्ध्यत्व निदान कि यह ऍडव्हान्स टेस्ट IVF उपचार में एम्ब्रायो ट्रान्स्फर का सही समय तय करने में मदत करता है। ERA के बारे में अधिक जानकारी के लिए ब्लॉग को अंत तक पढ़ें।

Aspermia vs Azoospermia- Causes, symptoms, impact & treatment

Aspermia and Azoospermia are both conditions related to male infertility. While in Aspermia, men lack the presence of semen itself, in Azoospermia, there is a lack of the presence of sperm in the semen, making them both the primary causes of male infertility.