Logo
Latest Blog

पीसीओडी चा फर्टिलिटी वर होणारा परिणाम, निदान आणि उपचार 

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

सारांश : आजकाल आपण बघत आहोत कि, पीसीओडी आजार अधिकच व्हायरल होत आहे. एकीकडे पीसीओडी मुळे चिंतेत असणाऱ्या महिला, तर दुसरीकडे एखाद्याला पीसीओडी असल्याचे मेडिकल रिपोर्ट सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. अनेक नायिकांनी पीसीओडी सह गर्भधारणेचा प्रवासही प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. पीसीओडी चे वाढते प्रमाण पाहता त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणार परिणाम, शरीरात  होणारे बदल आणि पीसीओडी चे नियंत्रण याविषयी लेखात चर्चा करण्यात आली आहे.

Old blog : जाणून घ्या PCOD ची मुख्य कारणे, लक्षणे आणि योग्य उपचार

पीसीओडी म्हणजे काय?

पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) हि एक हार्मोनल समस्या आहे. प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये हि समस्या दिसून येत असली तरी पीसीओडी महिलांचे आरोग्य अधिक क्लिष्ट असते. 

जगभरात पीसीओडी प्रमाण किती आहे?

  • जगभरात 6-26% आणि भारतात ते 3.7-22.5% महि��ा पीसीओडी /PCOS ने ग्रस्त आहेत.
  • जगभरात २६ % महिलांना पीसीओडी मुळे "वंध्यत्व समस्या" निर्माण झालेली आहे.
जगभरात पीसीओडी प्रमाण

Reference: pib.gov.in

पीसीओडी महिलांच्या फर्टिलिटी आरोग्यावर होणारा परिणाम

पीसीओडी या अंतःस्रावी विकारामुळे महिलांची रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ बरीच प्रभावित होते. फर्टिलिटी क्षमता कमी होते आणि वंध्यत्व समस्या निर्माण होऊ शकते.

अनियमित मासिक पाळीसह अनियमित ओव्यूलेशन समस्या निर्माण होते. या स्थितीत अंडाशय नियमितपणे स्त्रीबीजे सोडत नाहीत. त्यामुळे वंध्यत्व समस्या निर्माण होते.

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर चे सिनिअर फर्टिलिटी कन्सल्टन्ट सांगतात कि, जर तुम्हाला पीसीओडी असल्याचे माहिती आहे आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर कमी वयात फर्टिलिटी उपचार घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मधील आधुनिक ART उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी आणि विशेषज्ञ डॉक्टर पॉजिटीव्ह रिझल्ट देण्यास सक्षम आहेत.

पीसीओडी रुग्णांच्या शरीरात घडणाऱ्या रासायनिक क्रिया समजून घ्या

  • पीसीओडी रुग्णांच्या शरीरात हार्मोनल कार्याचा गोंधळ सुरु असतो.
  • अंडाशय एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे विकसित करू लागतात; त्यामुळे इस्ट्रोजेन हार्मोन चे प्रमाण वाढते.
  • अनेक स्त्रीबीजे विकसित होतात, मात्र त्यांची पूर्णपणे वाढ होत नाही.
  • अपुरी वाढलेली स्त्रीबीजे म्हणजेच सिस्ट अंडाशयांवर साचू लागतात. आणि अंडाशयांचा आकार वाढतो.
  • स्त्रीबीजे व्यवस्थित फुटत नाहीत आणि इनफर्टिलिटी समस्या येते.
  • महिलांच्या शरीरात अँड्रोजेन या पुरुषी हार्मोनचे प्रमाण वाढते आणि महिलांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात.
  • स्वादुपिंड (लिव्हर) अधिक इंश्युलीन तयार करू लागतात.
  • प्रोजेस्टेरॉन हार्मोन मध्येही वाढ होते.

पीसीओडी मध्ये दिसणारी सर्वसामान्य लक्षणे

  • अनियमित किंवा दीर्घ मासिक पाळी
  • मासिक पाळीत वेदना
  • चेहऱ्यावर अतिरिक्त केसांची वाढ
  • चेहऱ्यावर पुरळ
  • वजनवाढ होणे
  • डायबेटिज / ब्लड प्रेशर
पीसीओडी ची लक्षणे

पीसीओडी होण्याची कारणे

  1. अनुवांशिक : तुमच्या कुटुंबात पीसीओडी चा इतिहास असल्यास तुम्हालाही पीसीओडी होण्याची संभावना अधिक असते.
  2. हार्मोनल असंतुलन : पीसीओडी हे प्रोजेस्टेरॉनच्या कमी पातळीसह, एंड्रोजेन (पुरुष संप्रेरक) आणि इन्सुलिनच्या उच्च पातळीशी संबंधित आहे. हे हार्मोनल असंतुलन अंडाशयांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते आणि अत्यधिक सिस्टचा विकास होतो.
  3. इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लठ्ठपणा : शरीराच्या पेशी इंश्युलीन ला योग्य रितीने प्रतिसाद देत नाहीत, या प्रतिकारामुळे अतिरिक्त इंसुलिनचे उत्पादन होऊ लागते. लठ्ठपणामुळे पीसीओडी चा धोकाही वाढतो.

पीसीओडी मुळे कोणते आजार होऊ शकतात?

  • डायबेटिज
  • ब्लड प्रेशर
  • उच्च कोलेस्टेरॉल
  • ओवरीयन कॅन्सर
  • वंध्यत्व
  • गर्भाशयाचे अस्तर संबंधित आजार
पीसीओडी मुळे कोणते आजार होतात

पीसीओडी चे निदान होण्यासाठी कोणत्या चाचण्या करतात?

  • अल्ट्रासाउंड व पेल्विक परीक्षण : पोटावर प्रोब ठेवून संगणकाव अंडाशयातील सिस्ट (पॉलिसिस्टिक ओवरी) आणि गर्भाशयाचे अस्तर (युटेरियन लायनिंग) तपासली जाते. 
  • हार्मोनल ब्लड टेस्ट : इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, इंश्युलीन, प्रोलॅक्टिन या रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन ची पातळी मोजली जाते. 
  • मेटाबोलिक टेस्ट : ग्लुकोज, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, कार्बनडायोक्सीड, क्लोराईड, ब्लड-युरिया आणि क्रिएटिनिन अशा ८ प्रकारच्या बेसिक मेटाबोलिक टेस्ट गरजेनुसार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • पीसीओडी नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय उपचार
  • मेडिसिन : मेटामॉर्फीन आणि कोमिफ्लोम सारखी औषधे पीसीओडी नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर प्रिस्क्राइब करू शकतात. 
  • हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : यामध्ये प्रोजेस्टेरॉन टॅबलेट किंवा इतर पद्धतिचा अवलंब केला जातो. 

फर्टिलिटी उपचार : अनियमित ओव्यूलेशन मुळे पीसीओडी सह गर्भधारणा कठीण असू शकते पण अशक्य नक्कीच नाही. पीसीओडी असेल आणि गर्भधारणेत अपयश येत असेल तर वेळीच फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फर्टिलिटी क्लिनिक मध्ये प्राथमिक फर्टिलिटी उपचारांपासून ते ऍडव्हान्स फर्टिलिटी उपचार उपलब्ध असतात. जसे कि, ओव्यूलेशन इंडक्शन, फर्टिलिटी मेडिसिन, डाएट प्लॅन पासून ते IUI व IVF सारख्या प्रगत उपचाराने गर्भधारणा होऊ शकते.  तुमच्या गरजेनुसार योग्य उपचार डॉक्टर सुचवतील.

पीसीओडी नियंत्रित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी?

काय करावे?काय करू नये?
नियमित व्यायामव्यसने
सर्वसमावेशक आणि पोषक आहाराचे सेवनफास्ट फूड / जंक फूड
वेळेवर औषधे घ्याप्रिझर्व फूड / बेकरी फूड
वजन नियंत्रण गोड़ पदार्थ
पीसीओडी नियंत्रित ठेवण्यासाठी

PCOD Infographic in Marathi:

PCOD Infographic in Marathi

पीसीओडी असलेल्या महिलेला प्रोजेनेसिस मध्ये १४ वर्षानंतर झाली गर्भधारणा

शिसोडे यांना १४ वर्षानंतर गर्भधारणा झाली आहे. विनल शिसोडे (वय  ३६) यांना पीसीओडी होता. फर्टिलिटी मेडिकेशन आणि IVF उपचारांनी त्यांना गर्भधारणा झालेली आहे.

nhttps://www.youtube.com/watch?v=zVmoI_LsRAY&pp=ygUPcGNvZCBwcm9nZW5lc2lzn
Overcoming PCOD/PCOS | Parenthood after 14 years of Struggle | IVF Success Story | Progenesis IVF

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

१) पीसीओडी कोणत्या वयोगटातील महिलांना होतो?

पीसीओडी ची समस्या हि पूर्वी 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता हि समस्या झपाट्याने वाढत आहे आणि 18 ते 20 वयोगटातील मुलींमध्ये सुद्धा पीसीओडी 

२) पीसीओडी महिलांनी गर्भधारणेसाठी काय करावे?

काहीसे वजन कमी केल्यास आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारल्यास हार्मोनल संतुलन राखता येते. घरगुती काळजीसोबत वैद्यकीय मदत घेतल्यास लवकर गर्भधारणा होऊ शकते.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...