Logo
Latest Blog

वारंवार गर्भपात अनुभवताय? जाणून घ्या गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

वारंवार गर्भपात होणे म्हणजे काय?

युनायटेड स्टेट्स मधील व्याख्येनुसार दोन किंवा अधिक वेळा गर्भधारणेचे नुकसान झाल्यास त्यास ‘रिकरंट मिसकॅरेज’ किंवा वारंवार गर्भपात ��ोणे असे म्हणतात.

वारंवार मिसकॅरेज होत असल्यास काय करावे?

  1. या स्थितीत तुम्ही तुमच्या फर्टिलिटी डॉक्टरांची भेट घ्यावी.
  2. ते मिसकैरेज चे मूळ कारण शोधून काढण्यासाठी काही टेस्ट करतील. जसे कि, कायरोटायपिंग, ३D सोनोग्राफी, हिस्टेरोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी, रुटीन ब्लड टेस्ट, अँटी फॉस्फोलिपिड अँटी बॉडी टेस्ट, इन्फेक्शन टेस्ट्स इ.
  3. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी ते तुमच्यासाठी वैयक्तिकृत योजना (पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन) तयार करू शकतात. यामध्ये हार्मोन थेरपी, कोणत्याही सर्जिकल उपचार, अनुवांशिक चाचणी किंवा तुमच्या जीवनशैलीत काही निरोगी बदल करणे यांचा समावेश असू शकतो.

निदान आणि उपचार

वारंवार गर्भपाताचे कोणतेही कारण सापडले नाही तर, गर्भधारणेसाठी काय करावे?

७० टक्के एनएक्सप्लेन्ड रीकरन्ट मिसकॅरेज चे कारण इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर हे असते. अँटी-एम्ब्रियोनिक अँटीबॉडीज मातेच्या शरीरात तयार होत असतील तर मल्टिपल मिसकॅरेज होऊ शकते. काही केसेस मध्ये ३डी सोनोग्राफी मध्ये गर्भपाताचे निदान होत नाही तेव्हा डॉक्टर लॅप्रोस्कोपी किंवा हिस्टेरोस्कोपी सारख्या पद्धती वापरतात. ज्यामध्ये अधिक बारकाईने गर्भपाताचे निदान होऊ शकते. या कमी आक्रमक सर्जिकल उपचार पद्धती आहेत. ज्यामुळे योग्य निदान आणि उपचार होऊ शकते. फायब्रॉईड किंवा पॉलीप्स किंवा गर्भाशयात पडदा दिसल्यास त्याच वेळी ते हटविले जातात.

जेव्हा ऍडव्हान्स डायग्नोसिस पद्धती वापरून देखील निदान होत नाही तेव्हा 'आययूआय', 'आयव्हीएफ' किंवा जेनेटिक डायग्नोसिस पद्धतीचा वापर करून चांगल्या क्वालिटीचा भ्रूण निवडला जातो. यामुळे यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.

मिसकॅरेज चे कारण ‘गुणसूत्रातील विकार’ असल्यास गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार कोणते?

प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) सह इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हि सर्वात प्रभावी उपचार पद्धती आहे. तुम्ही PGT वापरल्यास यशस्वी गर्भधारणेची संभावना ६०-७०% असते.

सर्वात आधी डॉक्टर केस हिस्टरी घेतात आणि तुमचे अनुवांशिक समुपदेशन करतात.

PGT प्रक्रिया : IVF-PGT मध्ये अनेक भ्रूण बनविले  जातात. एम्ब्रियो मधील सेल सॅम्पल घेऊन जेनेटिक टेस्टिंग साठी पाठवले जातात. यावेळी क्रोमोझोम/गुणसूत्र दोष, डीएनए दोष, अनुवांशिक समस्या, गर्भातील गुणसूत्रांची असामान्य संख्या शोधण्यास मदत होते. अशा पद्धतीने निरोगी एम्ब्रियो ची निवड करून असा एम्ब्रियो मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो.

PGS : म्हणजे प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग. हि चाचणी सामान्य गुणसूत्र असलेल्या गर्भाला मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करण्याची अनुमती देते. पीजीएस गंभीर पुरुष घटक वंध्यत्व कमी करण्यास देखील मदत करते. शिवाय वारंवार गर्भपाताचा इतिहास असलेल्या जोडप्यांना परवानगी देते.

PGT चे फायदे :

  1. लवकर गर्भपात होत असल्यास
  2. वारंवार गर्भपात होत असल्यास
  3. वारंवार IVF सायकल अयशस्वी होत असल्यास
  4. बाळाचे आनुवंशिक मोनोजेनिक विकारांपासून संरक्षण

फायब्रॉईड मिसकॅरेज चं कारण असल्यास कसे उपचार केले जातात?

रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन च्या समस्या हाताळण्यासाठी सर्जरी चा पर्याय उपलब्ध असतो.

सेप्टेट युटेरस : सेप्टेट युटेरस म्हणजे गर्भाशयात वाढणारा पडदा. यामुळे गर्भाशय दोन भागात विभागले जाते. लॅप्रोस्कोपी च्या मदतीने नाभीला छेद देऊन एक दांडीसदृश उपकरण आत टाकले जाते. आणि हा सेप्टम काढून टाकला जातो. हि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक तास लागतो. एकदा सेप्टम काढून टाकल्यानंतर, तुमचे शरीर ते पुन्हा निर्माण करणार नाही. यामुळे यशस्वी गर्भधारणेची शक्यता सुमारे 65% वाढते.

फायब्रॉईड किंवा पॉलीप्स : गर्भाशयाच्या गाठी जर एन्डोमेट्रियम मध्ये असतील तर, बाळाला होणार रक्तपुरवठा रोखला जातो आणि गर्भपात होतो. अशा वेळी लॅप्रोस्कोपीद्वारे गाठी काढून टाकल्या जातात. गाठी पुन्हा होऊ नये म्हणून औषधे दिली जातात. ज्यामुळे यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.

अडेजन्स : इन्फेक्शन मुळे गर्भाशयातील अवयव एकमेकांना चिटकलेले असतील किंवा जाळे बनले असेल तर ते सर्जरीद्वारे दूर केले जाते.

हिस्टेरोसल्पिनक्स : गर्भनलिकेत साचलेले पाणी गर्भाशयात झिरपत असल्यास मिसकॅरेज होऊ शकते. डिबलकिंग, डीलिंक, किंवा सालपिंगेंक्टॉमी सर्जरी करून नलिका कट केली जाते.

हार्मोनल इम्बॅलन्स मुळे गर्भपात होत असल्यास गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार कोणते?

थायरॉईड विकार किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या विविध कारणांमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. प्रोजेस्टेरॉन हार्मोन ची पातळी असंतुलित झाल्यास गर्भाशयाचे अस्तर व्यवस्थित बनत नाही आणि गर्भ इम्प्लांट होत नाही मिसकॅरेज होऊ शकते. अभ्यासानुसार, गर्भपाताच्या अनेक प्रकरणांमध्ये प्रोजेस्टेरॉनचा अपुरा स्राव हे मुख्य कारण असू शकते.

असे उपचार केले जातात :

  1. मेडिसिन
  2. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी
  3. आयव्हीएफ

वारंवार गर्भपाताचा इतिहास असल्यास औषधोपचाराने गर्भधारणा होऊ शकते का?

खालील गर्भपाताची कारणे असल्यास औषधोपचाराने गर्भधारणा होऊ शकते.

  1. APS सारखी ऑटोइम्युन डिसऑर्डर
  2. थ्रोम्बोसिस विकार असल्यास रक्ताच्या बारीक गठुळ्या होतात. यावेळी गर्भधारणेनंतर ९ महिने रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन दिले जाते.
  3. ब्लड शुगर
  4. थायरॉईड किंवा पीसीओडी मुळे हार्मोनल इम्बॅलन्स
  5. इन्फेक्शन्स

काही परिस्थितीत औषधोपचारा सोबतच बेसिक किंवा ऍडव्हान्स फर्टिलिटी उपचारांची गरज असते.

अनएक्स्प्लेन्ड मिसकॅरेज म्हणजे काय? अशा वेळी काय करावे?

गर्भपाताचे कारण समजून घेण्यासाठी केलेल्या सर्व टेस्ट चे रिझल्ट नॉर्मल येतात तेव्हा त्याला 'अनएक्स्प्लेन्ड मिसकॅरेज' म्हणतात. ऍपला, अँटी कार्डिओ लिपीन, प्रोटीन सी आणि प्रोटीन एस टेस्ट, ३डी सोनोग्राफी टेस्ट असे सर्व टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असतील, तेव्हा पेशंट ला लिंफोसाइट इम्म्युनायझेशन थेरपी (LIT) सुचवली जाऊ शकते. यामध्ये पुरुषांचे ब्लड सॅम्पल घेऊन त्यातून लिंफोसाइट वेगळे केले जातात. हे लिंफोसाइट मातेच्या शरीरात इंजेक्ट केले जातात. परंतु हे समजून घेणे गरजेचे आहे कि याचा सक्सेस रेट तितकासा चांगला नाही. आजही हि एक एक्सपिरिमेंटल थेरपी आहे. 

अशा केसेस मध्ये जेनेटिक डायग्नोसिस सारख्या ऍडव्हान्स IVF तंत्रांचा वापर केल्यास गर्भधारणेची संभावना अनेक पटींनी वाढते.

YOUTUBE LINK:

nhttps://www.youtube.com/watch?v=dQo8aOXpVVMn
IVF Positive Result after Multiple Miscarriages and 4 to 5 IUI Failures | Progenesis IVF

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

मी मिसकॅरेज नंतर गर्भवती होण्याची शक्यता कशी वाढवू शकतो?

- स्वतःची मानसिक आणि शारीरिक काळजी घ्या
- कोणत्याही अंतर्निहित आरोग्य समस्यांचे निराकरण करा.
- संतुलित वजन ठेवा.
- तणावाचे व्यवस्थापन करा.
- कॅफिन चे सेवन कमी करा.
- धूम्रपान मद्यपान सेवन टाळा.

वारंवार गर्भपात होत असल्यास सर्वोत्तम फर्टिलिटी ट्रीटमेंट कोणती आहे?

यामध्ये PGS आणि PGD, इन विट्रो फर्टिलायझेशन आणि गरजेनुसार सर्जिकल उपचार प्रक्रियांचा समावेश आहे.

गर्भपात झाल्यानंतर गर्भवती होण्याची सर्वात सामान्य वेळ कोणती आहे?

गर्भपातानंतर तुम्ही शारीरिक आणि भावनिकरीत्या तयार होणे गरजेचे असते. गर्भपातानंतर डॉक्टर २ मासिक पाळी येण्याची वाट पाहण्याचा सल्ला देतात.
मिसकॅरेज नंतर दुसऱ्या गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला, मिसकॅरेज चे निदान, तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास पुन्हा मिसकॅरेज होण्याचे चान्सेस टाळता येऊ शकतात.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
वारंवार गर्भपात अनुभवताय? जाणून घ्या गर्भधारणेसाठी उपचार