गर्भपात: लक्षणे, कारणे, निदान आणि योग्य उपचार

गर्भपात ही एक संवेदनशील आणि महत्त्वाची बाब आहे, जिचा संबंध महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी असतो. या ब्लॉगमध्ये आपण गर्भपात म्हणजे काय, त्याची लक्षणे, कारणे, निदान, उपचार आणि गर्भपातानंतर काय करावे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

Share This Post

miscarriage in marathi

गर्भपात म्हणजे काय?

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात नैसर्गिकरित्या किंवा वैद्यकीय कारणास्तव गर्भ गमवावा लागणे, याला गर्भपात असे म्हणतात. गर्भपात नैसर्गिकरित्या होऊ शकतो, किंवा काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपात करण्याची गरज असते. त्यामुळे गर्भपात हा प्रामुख्याने नैसर्गिक गर्भपात आणि आवश्यक किंवा वैद्यकीय गर्भपात या दोन प्रकारांमध्ये विभागला आहे. 

1. नैसर्गिक गर्भपात (Natural Miscarriage):

नैसर्गिक गर्भपात प्रामुख्याने गर्भाच्या गुणसूत्रांतील दोषांमुळे होतो, जिथे गर्भाचा विकास नैसर्गिकरीत्या थांबतो. यामध्ये कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता नसते, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

2. आवश्यक/ वैद्यकीय गर्भपात (Medical Abortion):

काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे गर्भपात करावा लागतो. उदाहरणार्थ, गर्भाचा योग्य विकास होत नसल्यास किंवा गर्भाशयावर धोका निर्माण झाल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा गर्भपात केला जातो. 

गर्भपात नैसर्गिक असो अथवा वैद्यकीय दोन्ही परिस्थितीत महिलेस शारीरिक आणि मानसिक आधार देणे अत्यावश्यक असते.

गर्भपाताची लक्षणे –

गर्भपाताची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. गर्भपात होण्यापूर्वी किंवा त्यावेळी महिलेला काही विशिष्ट लक्षणे जाणवू शकतात. यामध्ये:

1. योनीमार्गातून रक्तस्राव (Bleeding) – हे सर्वात सामान्य लक्षण आहे. रक्तस्राव हलक्या स्पॉटिंगपासून जास्त प्रमाणात होऊ शकतो, जो सामान्यतः काळसर स्वरूपाचा असतो. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. 

2. पोटात खूप दुखणे (Severe Abdominal Pain) – पोटात होणाऱ्या वेदना हे देखील एक महत्त्वाचे लक्षण आहे. या वेदना सामान्य पाळीच्या वेदनांपेक्षा तीव्र असतात आणि थोड्या-थोड्या वेळाने सतत होत राहतात. 

3. कंबरदुखी (Back Pain) – कंबरेत होणारी वेदना सामान्य पाठीच्या दुखण्यापेक्षा अधिक तीव्र असते. अचानक होणाऱ्या या वेदना शरीरावर ताण आणतात.

4. फेटल मूव्हमेंट कमी होणे – गर्भाच्या हालचाली अचानक थांबणे किंवा कमी होणे हे गर्भाच्या स्थितीत काहीतरी समस्या असल्याचे दर्शवते.

5. थकवा आणि अशक्तपणा (Fatigue and Weakness): शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे गरोदरपणात अनेकदा अशक्तपणा जाणवतो. अचानक अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे हे देखील एक काळजीचे लक्षण असते.

हे देखील वाचा: वारंवार गर्भपात अनुभवताय? जाणून घ्या गर्भधारणेसाठी उपचार

गर्भपाताची कारणे आणि संभाव्य घटक –

गर्भपात होण्यामागे विविध शारीरिक, मानसिक आणि पर्यावरणीय कारणे असतात.

1. क्रोमोसोमल ॲबनॉर्मलिटी (Chromosomal Abnormalities):

क्रोमोसोमल ॲबनॉर्मलिटी, म्हणजेच गर्भाच्या गुणसूत्रांमध्ये दोष असणे. अशा परिस्थितीत गर्भ नैसर्गिकरीत्या विकसित होऊ शकत नाही आणि गर्भपात होतो. 

2. हॉर्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance):

महिलांच्या शरीरात गर्भधारणेसाठी प्रोजेस्टेरॉनसारख्या हॉर्मोन्सची आवश्यकता असते. जर या हॉर्मोन्सची पातळी कमी असेल तर गर्भाशय गर्भ टिकवून ठेवू शकत नाही.

3. इन्फेक्शन (Infections):

मातेला इन्फेक्शन झाल्यास त्याचा गर्भावर वाईट परिणाम होतो. इन्फेक्शन गर्भाशयाच्या पेशींना नुकसान पोहोचवते. उदा., टॉक्सोप्लाझ्मोसिससारख्या संसर्गामुळे गर्भाची वाढ थांबते.

4. आजार आणि आजारपण (Health Conditions):

गरोदरपणातील मधुमेह, थायरॉईड, किंवा उच्च रक्तदाब अशा आजारांवर योग्य नियंत्रण न ठेवल्यास गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

• गरोदरपणात मधुमेहाचे (Diabetes) योग्य व्यवस्थापन न केल्यास यामुळे गर्भपात होऊ शकतो.

• थायरॉईड च्या आजारात थायरॉईड हॉर्मोनचे होणारे असंतुलन गर्भाच्या विकासात अडथळा आणू शकते.

• उच्च रक्तदाब (Hypertension) असताना रक्तदाबाचे योग्य नियंत्रण न राखल्यास गर्भाला पोषण मिळत नाही आणि गर्भपात होऊ शकतो.

5. जीवनशैलीशी संबंधित कारणे:

धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन, अपुरी झोप, पोषणाची कमतरता, आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित कारणेदेखील गर्भपातासाठी जबाबदार ठरू शकतात.

हे देखील वाचा: अधिक वजनामुळे गर्भधारणेत समस्या? ‘हे’ केल्यास होईल गर्भधारणा

गर्भपाताचे निदान –

गर्भपाताची शंका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी निदान करण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या करू शकतात. या चाचण्या डॉक्टरांना गर्भपाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यास मदत करतात, जे पुढील उपचारांसाठी उपयुक्त ठरते.

1. अल्ट्रासाऊंड स्कॅन (Ultrasound Scan) –

अल्ट्रासाऊंड स्कॅन (Ultrasound Scan) ही सर्वात महत्त्वाची तपासणी आहे, ज्याद्वारे गर्भाच्या हृदयाचे ठोके आणि गर्भाच्या स्थितीची माहिती मिळते.

2. ब्लड टेस्ट – 

गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या हॉर्मोनची पातळी तपासण्यासाठी आणि हॉर्मोनल असंतुलन आहे का हे पाहण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.

3. योनीमार्गाचा तपास (Pelvic Exam) –

योनीमार्गाच्या स्थितीचे परीक्षण (Pelvic Exam) करून गर्भाशय आणि योनीमार्गाच्या स्थितीचे निरीक्षण केले जाते. 

हे देखील वाचा: वंध्यत्व म्हणजे काय? Infertility कारणे, लक्षणे आणि उपचार

गर्भपातावरील उपचार (Treatment) –

गर्भपात झाल्यास त्यावर योग्य उपचार गरजेचे असतात. उपचार प्रकार खालीलप्रमाणे असू शकतात:

1. नैसर्गिक रिकव्हरी (Natural Recovery) –

काही वेळा शरीर स्वतः गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण करतो, ज्याला नैसर्गिक रिकव्हरी (Natural Recovery) म्हणतात. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. 

2. औषधोपचार (Medication) –

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भाशय पूर्णपणे साफ करण्यासाठी औषधे दिली जाऊ शकतात.

3. सर्जिकल उपचार (Surgical Treatment) –

जर औषधोपचार प्रभावी ठरले नाहीत तर गर्भाशय साफ करण्यासाठी छोट्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात, जसे की Dilation and Curettage (D&C). या सर्जिकल उपचारांनी डॉक्टर गर्भाशयाची संपूर्ण स्वच्छता करतात.

हे देखील वाचा: स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यावर मूल होऊ शकते का?

गर्भपातानंतर काय करावे? –

गर्भपातानंतर महिलांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

1. शारीरिक काळजी (Physical Care) –

• योग्य पोषणमूल्य असलेला संतुलित आहार घ्या आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या.

• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि सप्लिमेंट्स घ्या.

• पुढील गर्भधारणा करण्यासाठी किमान 3-6 महिने वाट पाहा.

2. मानसिक आधार (Emotional Support) –

गर्भपातामुळे महिलांमध्ये मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे, आपल्या भावना व्यक्त करा. कुटुंबीय व जवळच्या व्यक्तींकडून आधार घ्या. आवश्यक असल्यास समुपदेशन घ्या.

3. डॉक्टरांचा सल्ला घ्या –

गर्भपातानंतर नियमित वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील गर्भधारणेसाठी योग्य तयारी करा.

हे देखील वाचा:IVF साठी AMH लेवल किती महत्त्वाची? जाणून घ्या उपयुक्त माहिती!

पुन्हा गर्भपात होऊ नये यासाठी काय करावे?

गर्भपाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. गर्भपाताची दुर्दैवी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पुढील काही गोष्टींची काळजी घ्या:

1. योग्य आहार घ्या ज्यामध्ये प्रोटीन, आयर्न, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असेल.

2. तणाव कमी करण्यासाठी योग, मेडिटेशन यांचा अभ्यास करा. 

3. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहा.

4. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करा.

निष्कर्ष –

गर्भपात ही एक संवेदनशील बाब आहे. गर्भपातानंतर महिलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास पुढील गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

आपल्या शंका आणि समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि आवश्यक त्या उपाययोजना करून आपण आयुष्यातील या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकता.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

फाइब्रॉइड्स क्या हैं? जानें कारण, लक्षण और सही इलाज!

फाइब्रॉइड्स महिलाओं में पाई जाने वाली एक सामान्य समस्या हैं, लेकिन कई बार इसे नज़रअंदाज़ कर दिया जाता है। यह समस्या गर्भाशय (Uterus) में गांठों के रूप में विकसित होती है और कई महिलाओं को इसके कारण असुविधा और अन्य स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं। इस ब्लॉग में हम फाइब्रॉइड्स के बारे में विस्तार से जानेंगे, इसके कारण, लक्षण और प्रकार को समझेंगे, ताकि महिलाएं इस स्थिति को समय पर पहचानकर सही इलाज करवा सकें।

Implantation: Causes, Symptoms & Treatment

Implantation bleeding is an early indication of pregnancy that happens when a fertilized egg implants into the uterine wall. It can produce minor bleeding (or spotting) for up to two days. Implantation bleeding is considered a normal part of the pregnancy.