सारांश : अनेक कारणांमुळे वंध्यत्व संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत वंध्यत्व ओळखून फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे.
या लेखाच्या मदतीने वंध्यत्वाची कारणे, लक्षणे, प्रकार समजून घ्या. वंध्यत्व समस्येचे निदान व उपचार कोणत्या प्रकारे केले जातात याविषयी वाचकांना माहिती होणे हाच या लेखाचा उद्देश आहे.
Table of Contents
वंध्यत्व म्हणजे काय?
- एक वर्ष गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनदेखील गर्भाधान होत नसेल तर वंध्यत्व आहे असे म्हंटले जाते.
- ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्याहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नसेल तर हि सुद्धा वंध्यत्व स्थिती असते.
वंध्यत्वाचे प्रकार
- प्राथमिक वंध्यत्व: जेव्हा महिलेला एकदाही गर्भधारणा होऊ शकत नाही त्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
- दुय्यम वंध्यत्व: जेव्हा महिलेला पूर्वी गर्भधारणा झालेली असेल; पण नंतर गर्भधारणा होऊ शकत नाही, तेव्हा त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
- अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी: महिलेला वंध्यत्व समस्या असते मात्र अनेक तपासण्यांअंती देखील वंध्यत्वाचे निदान होऊ शकत नाही.
वंध्यत्वाची लक्षणे
- गर्भधारणेत अडचण
- अनियमित मासिक पाळी किंवा अनियमित ओव्यूलेशन
- मासिक पाळीत वेदना
- वेदनादायी संभोग
- झोपेच्या समस्या
- वजनवाढ किंवा वजनात घट
- कामेच्छा कमी होणे
- अवजड पोट
- ओटीपोटात किंवा पोटात इतरत्र वेदना
- पुरुषांमध्ये अंगावरील केस कमी होणे
- सेक्श्युअल डिसफंक्शन : इजॅक्युलेशन समस्या इ.
- स्त्रियांमध्ये चेहऱ्यावरील केस वाढणे
वंध्यत्वाची कारणे
महिलांमध्ये | पुरुषांमध्ये |
अंडकोष संबंधी समस्या | शुक्राणूंची कमी |
स्त्रीबीजांची कमी संख्या व खराब गुणवत्ता | शुक्राणू नसणे |
गर्भाशयाचे आजार | बंद शुक्राणू वाहिनी |
बंद किंवा खराब गर्भनलिका | वेरिकोसिल |
एन्डोमेट्रिओसिस, फायब्रॉईड | अधिक तापमान, प्रदूषण असे पर्यावरणीय घटक |
PCOS, थायरॉईड सारखे हार्मोनल विकार | |
मेनोपॉज |
दोघांमध्ये :
- इन्फेक्शन किंवा इतर संसर्गामुळे फर्टिलिटी स्वास्थ्य बिघडते
- अधिक वय
- गर्भनिरोधक शस्त्रक्रिया
- व्यसने
- कँसर सारख्या आजारांचे उपचार
- लठ्ठपणा
- जननइंद्रियांची सर्जरी
- क्रोनिक स्ट्रेस
- चुकीची जीवनशैली
वंध्यत्व उपचार प्रक्रिया स्टेप बाय स्टेप
- पहिली स्टेप: डॉक्टरांसोबत कन्सल्टेशन हि असते. यावेळी डॉक्टर दाम्पत्यांची सामान्य शारीरिक तपासणी करतात आणि मेडिकल हिस्टरी घेतात.
- दुसरी स्टेप: निदान करण्यासाठी विविध तपासण्या करणे हि असते.
- तिसरी स्टेप: वंध्यत्व समस्येनुसार वैयक्तिकृत उपचार.
वंध्यत्वाचे वैद्यकीय निदान
मेडिकल फिल्ड मधील अनुभवानुसार, बऱ्याचदा असे दिसून येते कि, महिलांच्या खूप साऱ्या तपासण्या केल्या जातात; परंतु पुरुषांची एकही तपासणी झालेली नसते. यामुळे जोडप्यांचा वेळ आणि पैसे वाया जातात.
लवकर रिझल्ट हवा असल्यास फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी स्त्री-पुरुष दोघांचीही तपासणी महत्त्वाची ठरते.
महिलांमध्ये | पुरुषांमध्ये |
ब्लड टेस्ट : LH, AMH, प्रोजेस्टेरॉन, अँड्रोजिन, इस्ट्रोजीन, इंश्युलीन, शुगर इ. | सीमेन अनालिसिस |
हिस्टेरोसालपिंगोग्राफी (HSG) | स्क्रोटम अल्ट्रासाउंड / ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड |
लॅप्रोस्कोपी / हिस्टेरोस्कोपी / अल्ट्रासाउंड | टेस्टिक्युलर बायोप्सी |
निदानावर आधारित उपचार
- फर्टिलिटी मेडिसिन व ओव्यूलेशन इंडक्शन: वय कमी असेल आणि फर्टिलिटी स्थिती चांगली असेल तर हा उपचार केला जातो.
- आययूआय : इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन : बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो.
- आयव्हीएफ : आयव्हीएफ म्हणजे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’. ‘इन विट्रो’ म्हणजे शरीराच्या बाहेर आणि ‘फर्टिलायझेशन’ म्हणजे गर्भाधान. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू एका आधुनिक प्रयोगशाळेत जोडले जातात आणि गर्भ बनवला जातो.
Reference: वंध्यत्व म्हणजे काय? जाणून घ्या वंध्यत्वाची कारणे, लक्षणे आणि उपचार
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) वंध्यत्व किती सामान्य आहे?
जगभरातील प्रत्येक ८ जोडप्यांपैकी अंदाजे १ जोडप्याला वंध्यत्व असते. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही वंध्यत्वाचा अनुभव येऊ शकतो आणि हे विविध कारणांमुळे होऊ शकते.
२) सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (ART) चे यश दर काय आहेत?
एआरटी उपचारांचे यश जोडप्याचे वय, वंध्यत्वाचे कारण, पुनरुत्पादक पेशींची गुणवत्ता आणि विशिष्ट उपचार प्रोटोकॉल यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात.