Logo
Latest Blog

IVF म्हणजे काय? जाणून घ्या आईवीएफ ची पूर्ण प्रक्रिया, फायदे आणि यश दर

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

आईवीएफ बद्दल जाणून घेण्या आधी जरा नैसर्गिक गर्भधारणे बद्दल समजून घेऊ. नैसर्गिक गर्भधारणेदरम्यान शुक्राणू आणि स्त्रीबीजांचे मिलन स्त्री च्या शरीरात होते. ज्यानंतर गर्भधारणा होते आणि 9 महिन्यांनंतर मूल जन्माला येते.
परंतु शुक्राणू, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, किंवा स्त्रीबीजांमध्ये काही समस्या असतील ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नसेल, तर आईवीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

IVF चा फुलफॉर्म काय होतो?

आईवीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन.

आईवीएफ म्हणजे काय?

IVF ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबी म्हणून देखील ओळखली जाते. हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची स्त्रीबीज आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो. हा स्वस्थ गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो, ज्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अगदी नैसर्गिकरित्या होतो.

आईवीएफ सक्सेस रेट

सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF उपचारांचा यशस्वी दर 75-80% आहे.
यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते .तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची प्रोजेनेसिसमध्ये काळजी घेतली जाते. सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF उपचारांचा यशस्वी दर 75-80% आहे.

आईवीएफ प्रक्रिया

चला IVF प्रक्रियेबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेऊयात -

  1. डॉक्टरांसोबत कंसल्टेशन
  2. ओवेरियन स्टिमुलेशन (Ovarian stimulation): इंजेक्शन ने फॉलिकल्स विकसित(mature) केले जातात जेणेकरून जास्त स्त्रीबीज प्राप्त होतील. कारण जितकी जास्त चांगल्या गुणवत्तेची स्त्रीबीज मिळवता येतील तितके चांगले भ्रूण तयार होतील.
  3. सीमेन (वीर्य) सॅम्पल कलेक्शन (Semen sample collection): प्रत्येक IVF सेंटर मध्ये एक सीमेन सॅम्पल कलेक्शन रूम असतो जिथे सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जात. सॅम्पल घेतल्यानंतर एंड्रोलॉजिस्ट या सीमेन सॅम्पल मधून चांगले शुक्राणू वेगळे करून त्यांचं शुद्धीकरण करतात.
  4. फर्टिलाइजेशन (Fertilization): योग्य तपासणी आणि चाचणी केल्यानंतर, स्त्रीबीज आणि शुक्राणू गर्भाधानासाठी प्रयोगशाळेत ठेवले जातात, जे नंतर भ्रूण बनतात.
  5. गर्भ हस्तांतरण (Embryo transfer in IVF): 3-4 दिवसांच्या चाचणीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात अगदी स्वस्थ भ्रूण ट्रान्सफर केले जातात तसेच, ज्या प्रकरणांमध्ये गर्भाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे त्या केस मध्ये 14 दिवसांनी गर्भ हस्तांतरण केले जातात. या प्रक्रियेला मेडिकल भाषेत embryo transfer  म्हंटल जात.
  6. गर्भधारणेची चाचणी: IVF प्रक्रियेनंतर 14-15 दिवसांनी, महिलेची गर्भधारणा चाचणी पुष्टी केली जाते त्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिक पद्धतीने होतो.

nhttps://www.youtube.com/embed/Dq-Dy95TRFgn
IVF Process Step by Step in Marathi

IVF ची गरज कोणाला आहे?

वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी आईवीएफ प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच पुरुष वंध्यत्वाच्या अगदी गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये सुद्धा प्रगत आईवीएफ उपचारांनी यशस्वी रिझल्ट देण्यात मदत केली आहे.
इतर कोणतेही ट्रीटमेंट पर्याय कारगार नसल्यास डॉक्टर अनेकदा IVF उपचार निवडतात.

IVF उपचाराचा फायदा कोणाला होतो?

जर तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला खालील दिलेल्या परिस्थितींचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला आईवीएफची आवश्यकता असू शकते

  • एंडोमेट्रिओसिस
  • ओव्हुलेशन समस्या असल्यास (PCOS साठी IVF treatment)
  • ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स असल्यास (फॅलोपियन ट्यूब्ससाठी IVF treatment)
  • फायब्रॉइड्स असल्यास (फायब्रॉइड्ससाठी IVF treatment)
  • अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी (इनफर्टिलिटीची अस्पष्ट समस्या असल्यास IVF treatment)
  • अनुवांशिक समस्या असल्यास (अनुवांशिक समस्यांसाठी IVF treatment)
  • पुरुष वंध्यत्व (पुरुष वंध्यत्वासाठी IVF treatment)

IVF प्रक्रियेचे फायदे

आईवीएफ अनेक जोडप्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही आणि या प्रक्रियेचे फायदे असंख्य आहेत. स्वस्थ गर्भधारणेपासून ते स्वस्थ बाळाच्या जन्मापर्यंत आणि गर्भपाताचा धोका कमी करण्यापर्यंत, IVF मुळे लाखो जोडप्यांना फायदा झाला आहे.
चला IVF च्या फायद्यांना विस्तारपूर्वक जाणून घेऊ यात:

  1. स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ शिशु चा जन्म
  2. दात्याचे शुक्राणू आणि स्त्रीबीज वापरली जाऊ शकतात
  3. तुम्ही गर्भधारणेसाठीची वेळ ठरवू शकता
  4. वंध्यत्वावर IVF उपचार श्रेष्ठ

आईवीएफ चा खर्च किती आहे?

आईवीएफ उपचारांचा खर्च तुमच्या फर्टिलिटी गरजांवर आणि कारणांवर अवलंबून असतो. प्रत्येक जोडप्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात ज्यामुळे उपचाराचा खर्च जोडप्यानुसार बदलतो.

तसेच आईवीएफची किंमत तुमचे वय, वैद्यकीय इतिहास, तुमचे शहर, मागील अयशस्वी आईवीएफ किंवा आययूआय सायकल, फर्टिलिटी क्लिनिक आणि आईवीएफ डॉक्टरांचा अनुभव यावर अवलंबून असते.

आईवीएफ साठी महागडी उपकरणे आणि कुशल डॉक्टरांची आवश्यकता असते. शिवाय, या फर्टिलिटी प्रक्रियेसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आणि उपकरणांमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आवश्यक आहे.जर तुम्ही IVF चा विचार करत असाल तर तज्ञ अनुभवी आणि विश्वासार्ह डॉक्टर/क्लिनिक निवडणे महत्वाचे आहे.

योग्य क्लिनिक, प्रगत तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने तुम्हीही हजारो जोडप्यांप्रमाणे तुमचे कुटुंब पूर्ण करू शकता!
एक वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करून देखील जर गर्भधारणा राहत नसेल तर आजच अनुभवी IVF डॉक्टरांचा सल्ला घ्या.

IVF संबंधित सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न:

IVF साठी योग्य वेळ कोणती?

उत्तर: जर जोडप्याचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असेल आणि एक वर्ष प्रयत्न करूनदेखील मूल होत नसेल तर IVF डॉक्टर कडे जावे. आणि जर त्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रयत्न करण्याचा ६ महिन्याच्या आतच IVF डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला दिला जातो.

IVF चा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर: आईवीएफ – इन विट्रो फर्टिलाइजेशन.

IVF प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती वेळ लागतो?

उत्तर: साधारणपणे IVF च्या एका सायकलला सुमारे दोन ते तीन आठवडे लागू शकतात, पण ट्रीटमेंट साठी लागणारा काळ तुमच्या फर्टिलिटी स्तिथी नुसार कमी जास्त देखील होऊ शकतो.

IVF ट्रीटमेंट साठी EMI पर्याय असतात का?

उत्तर: बरेच IVF सेंटर्स ट्रीटमेंट दरम्यान तुम्हाला EMI चा पर्याय देतात. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये सर्व अडवान्सड IVF ट्रीटमेंटस आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही तुम्हाला 'नो कॉस्ट EMI' चा पर्याय देखील देतो.

IVF ही वेदनादायक प्रक्रिया आहे का?

उत्तर: IVF प्रक्रिये दरम्यान प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे?

उत्तर: IUI ही एक प्रक्रिया आहे जिथे शुक्राणू थेट गर्भाशयात ठेवले जातात आणि गर्भधानाची प्रक्रिया शरीरात होते. दुसरीकडे, आईवीएफ आहे ज्यामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे एकत्रीकरण लॅब मध्ये केले जाते.

आईवीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी मधील फरक काय?

उत्तर: आईवीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया दोन्ही एकच आहे. फरक फक्त इतकाच की आईवीएफ हि प्रक्रिया सामान्यतः आधी टेस्ट ट्यूब बेबी नावाने ओळखली जायची. आईवीएफ हेच टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिये च विकसित नाव आहे.

IVF ट्रीटमेंट नंतर सामान्य प्रसूती शक्य आहे?

उत्तर: IVF ट्रीटमेंट नंतर गर्भधारणा अगदी नैसर्गिक गर्भधारणेसारखीच असते. ज्या स्त्रिया IVF ने गरोदर राहिल्या आहेत त्यांची अगदी अन्य स्त्रियांप्रमाणेच C-Section किंवा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
IVF in Marathi | आईवीएफ म्हणजे काय? प्रक्रिया, फायदे, यश दर