सारांश : वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी ‘शुक्राणूंची कमी’ हेसुद्धा एक वंध्यत्वाचे कारण असू शकते. याला ऑलिगोस्पर्मीय असेही म्हणतात. स्पर्म काउंट कमी असल्यास गर्भधारणेसाठी उपचार घेणे गरजेचे आहे का? कोणते उपचार घ्यावेत? किंवा स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय करावे? याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
शुक्राणू ची रचना (मॉर्फोलॉजी)
- एक डोके : डोक्यामध्ये DNA, क्रोमोझोम असे जेनेटिक मटेरियल असते.
- मान : मानेतील माइटोकॉन्ड्रिया शेपटीला एनर्जी पुरवतात.
- शेपूट : वेगाने प्रवास करायला मदत करते.
मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी
खालीलपैकी एकही घटकात दोष असेल, तरी पुरुष वंध्यत्व समस्या येते. फर्टिलिटी सेंटर मध्ये 'सीमेन अनालिसिस टेस्ट' करून शुक्राणूंची स्थिती तपासली जाते.
- शुक्राणूंची संख्या (काउंट)
- शुक्राणूंची गती (मोटिलिटी)
- शुक्राणूंची रचना (मॉर्फोलॉजी)
- शुक्राणूंचे आयुष्य कमी असणे (लाइफटाइम)
शुक्राणूंविषयी या गोष्टी तुम्हालाही माहिती असाव्यात
- एकावेळी ८०० करोड शुक्राणू बनत असतात.
- एका सीमेन सॅम्पल मध्ये १०० दशलक्ष शुक्राणू असतात.
- एका महिलेच्या शरीरात ५ दिवस जिवंत राहू शकतात.
- गर्भधारणेसाठी केवळ १ शुक्राणूंची आवश्यकता असते.
- १५ दशलक्ष पेक्षा कमी शुक्राणू असणे म्हणजे बॉर्डरलाईन पेक्षा कमी शुक्राणू. याला लो स्पर्म काउंट किंवा ऑलिगोस्पर्मीया असे म्हणतात.
- १ शुक्राणू बनण्यासाठी ६४ दिवस लागतात.
- ६४ दिवसात ८०० करोड शुक्राणू बनत असतात.
शुक्राणूंची संख्या कमी होण्याची कारणे
जीवनशैली संबंधित कारणे :
- अपुरी पोषकतत्त्व असलेल्या आहाराचे सेवन
- व्यसने
- झोपेची कमतरता
- ताणतणाव
- वजन जास्त असणे
- टेस्टीज चे तापमान अधिक असणे
वैद्यकीय कारणे :
- व्हेरीकोसेल : अंडकोषात नसांना सूज असणे
- इन्फेक्शन : संक्रमणामुळे प्रजनन मार्गात ऑब्स्ट्रक्शन येतात किंवा स्कार येतात.
- इरेक्शन समस्या : अपुरे वीर्य स्खलन होणे किंवा प्रतिगामी स्खलन झाल्याने ब्लॅडर मध्ये शुक्राणू जमा होणे.
- हार्मोनल समस्या : पिट्युटरी ग्लॅन्ड किंवा हायपोथॅलॅमिक डिसफंक्शन
- टेस्टिकल सर्जरी झालेली असणे
लो स्पर्म काउंट सह अशी करा गर्भधारणा
१) ऑलिगोस्पर्मीय ची लक्षणे कोणती? अशी लक्षणे दिसल्यास काय करावे?
जर तुम्ही इरेक्शन समस्या, टेस्टिकल भोवती वेदना, टेस्टिकल ला सूज, लो सेक्स ड्राइव्ह किंवा लो लिबिडो चा अनुभव करीत असाल तर तुम्हाला शुक्राणूंची कमी असण्याची शक्यता आहे. अशी लक्षणे दिसल्यास फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि तुमचे फर्टिलिटी आरोग्य आणि शुक्राणूंची स्थिती तपासून घ्यावी. टेस्ट च्या परिणामांनुसार डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार पर्याय सुचवतील.
२) लो स्पर्म काउंट सह नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते का?
शुक्राणूंची संख्या कमी असली तरीदेखील नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते. कारण स्त्रीबीज फर्टीलाइज करण्यासाठी केवळ एका शुक्राणूंची आवश्यकता असते. मात्र त्यासाठी शुक्राणूंची क्वालिटी चांगली असली पाहिजे. शुक्राणूंचे डोके, मान, शेपूट यांची घडण दोषरहित असली पाहिजे. शुक्राणूंची प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी म्हणजेच पुढच्या दिशेने प्रवास करण्याची गती चांगली असायला हवी. शिवाय शुक्राणूंचा जिवंत राहण्याचा कालावधी म्हणजेच सर्व्हाइवल टाइम जास्त असणे गरजेचे असते. सोबतच तुमच्या महिला साथीदाराची फर्टिलिटी हेल्थ चांगली असेल तर नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते.
'लो स्पर्म काउंट' सह नैसर्गिक गर्भधारणेत अडचण येत असेल, तर फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करावे. लो स्पर्म काउंट स्थितीत गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी IUI (इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन) उपचाराने रिझल्ट मिळतो. यामध्ये शुक्राणूंना एका कॅथेटर च्या मदतीने महिलेच्या गर्भाशयात फेलोपियन ट्यूब जवळ पोहचवले जाते.
३) तुमच्या परिचयातील व्यक्तीला शुक्राणूंची कमी असताना पितृसुख मिळाले. मग तुम्हाला गर्भधारणेत अडचण का?
तुमच्या परिचयातील एखाद्या व्यक्तीला शुक्राणूंची कमी होती आणि त्यांना नैसर्गिक गर्भधारणा झालेली असेल, तर शुक्राणूंची क्वालिटी चांगली असल्यामुळे असे घडले असण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला लो स्पर्म काउंट सह गर्भधारणेत अडचण येत असेल तर, शुक्राणूंमध्ये इतर असामान्यता असण्याची शक्यता आहे. हे समजून घ्या आणि फर्टिलिटी डॉक्टरांची भेट घेऊन एकदा कन्सल्टेशन करून घ्या. ते तुम्हाला टेस्ट च्या परिणामांनुसार फर्टिलिटी मेडिसिन, IUI किंवा IVF उपचार सुचवतील.
अधिक जाणून घ्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांच्याकडून.
- सर्वप्रथम कपल ची मेडिकल हिस्टरी घेतली जाते. ज्यामध्ये वंध्यत्वाचा कालावधी, पूर्वी झालेल्या सर्जरी, इतर शारीरिक आजार, पूर्वी केलेले उपचार, आधी गर्भधार���ा झाली असेल तर त्याविषयी माहिती घेतली जाते.
- इन डेप्थ इव्हॅल्युएशन करून वंध्यत्व समस्येचे अचूक निदान केले जाते.
- कपल च्या सध्याच्या स्थितीनुसार गर्भधारणेसाठी प्रभावी उपचार पर्याय सुचवला जातो.
- शुक्राणूंच्या कमीचे कारण हार्मोनल असंतुलन असेल, तर मेडिसिन ने स्पर्म काउंट वाढवला जातो.
- शुक्राणूंच्या कमीचे कारण जीवनशैलीशी संबंधित असेल तर, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन केले जाते. काही टिप्स आणि डाएट देऊन जीवनशैलीत सुधार केला जातो.
- व्हेरीकोसेल, ऑब्स्ट्रक्शन असल्यास सर्जिकल उपचार केले जातात.
- गरजेनुसार IUI, IVF, ICSI, IMSI, PICSI असे उपचार केले जातात.
४) शुक्राणूंची संख्या बॉर्डरलाईन असेल तर नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते का?
प्रति मिलिटिलर वीर्यातील शुक्राणूंची संख्या १५ मिलियन हुन कमी असेल तर तुमचा 'लो स्पर्म काउंट' असल्याचे म्हंटले जाते. या स्थितीला 'ऑलिगोस्पर्मीय' असेही म्हणतात. तुमची शुक्राणू संख्या १५ मिलियन च्या आसपास असेल आणि गर्भधारणेत अडचण येत असेल तर फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करा. प्रत्येकाचा वंध्यत्व प्रवास वेगळा असतो. गर्भधारणेसाठी कुणाला IUI ची गरज लागते, कुणाला IVF ची, तर कुणाला ऍडव्हान्स IVF-ICSI किंवा TESA/PESA/MESA अश्या स्पर्म रिट्राइवल टेक्निक ची आवश्यकता लागते. आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा निश्चितपणे होऊ शकते.
५) व्हेरिकोसेल मुळे शुक्राणूंची कमी असल्यास या उपचाराने यशस्वी गर्भधारणा होते.
व्हॅरिकोसेल ही अशी स्थिती आहे जिथे अंडकोषातील नसा सुजतात आणि त्यामुळे अंडकोषांमध्ये रक्त प्रवाह रोखला जातो. यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे जोडप्यांना गर्भधारणा करणे कठीण होते. या स्थितीत सर्जिकल उपचारांच्या मदतीने व्हेरिकोसेल दुरुस्त केली जाते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शुक्राणू उत्पादन वाढते. सर्जरी नंतर शुक्राणू संख्येत वाढ होते आणि तुम्ही नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकतात.
६) लो स्पर्म काउंट सोबत अन्य शुक्राणू समस्या असल्यास गर्भधारणेसाठी काय करावे?
वंध्यत्व समस्येसाठी केलेल्या तपासणीत शुक्राणू संक्रमण, मोटिलिटी, मॉर्फोलॉजिकल समस्या निदर्शनास आली असेल तर ऍडव्हान्स IVF उपचार पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतो. जसे कि-
- इक्सी : जेव्हा शुक्राणू स्वतःहून स्त्रीबीज फर्टीलाइज करू शकत नाही तेव्हा इंस्ट्र्युमेंट च्या साहाय्याने स्त्रीबीजामध्ये स्पर्म इंजेक्ट करून गर्भ बनवला जातो.
- इम्सी/पिक्सी : या प्रक्रियेत मॉर्फोलॉजिकली बेस्ट शुक्राणूंची फर्टिलायझेशन साठी निवड करणे शक्य आहे. असा चांगल्या क्वालिटीचा शुक्राणू स्त्रीबीजात इंजेक्ट करून गर्भ बनवला जातो.
- जेनेटिक टेस्टिंग : शुक्राणू असामान्यता असल्यास DNA डॅमेज, डीएनए फ्रॅगमेंटेशन किंवा क्रोमोजोम ऍबनॉर्मलिटी असण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे बाळात व्यंग किंवा डाऊन सिंड्रोम सारखा आजार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जेनेटिक टेस्टिंग करून उत्तम क्वालिटीचा गर्भ ट्रान्स्फर साठी निवडला जातो आणि त्यामुळे स्वस्थ बाळासह गर्भधारणेची शक्यता वाढते.
- इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाइड फार्मास्युटिक्स मध्ये प्रकाशित झालेला आणि रूरल टर्शरी केअर सेंटर ऑफ सेंट्रल इंडिया ने १० वर्ष केलेल्या रिसर्च स्टडी च्या परिणामांनुसार, लो स्पर्म काउंट मुळे वंध्यत्वाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
- गेल्या १० वर्षांत भारतात पुरुष वंध्यत्वात लक्षणीय वाढ झालेली नाही.
- ३४.१४% पुरुषांना ऑलिगोस्पर्मीय (शुक्राणूंची कमी) दिसून आली.
- १९.३५% पुरुषांमध्ये शुक्राणूंची गती, मॉर्फोलॉजी आणि संख्या कमी होती. ऑलिगोअस्थेनोटेराटोझुस्पर्मिया होता.
- १०.७०% पुरुषांना अझूस्पर्मिया म्हणजेच अशुक्राणू समस्या होती.
reference: www.ijogr.org/joual-article-file/766

