युटेराइन इन्फेक्शन आणि इन्फर्टिलिटी
गर्भाशयाचे इन्फेक्शन, ज्याला एंडोमेट्रायटिस देखील म्हणतात. हे इन्फेक्शन मुख्यतः गर्भाशयाच्या मुखातून गर्भाशयात प्रवेश करते आणि इतरत्र पसरू लागते. याला युटेराइन इन्फेक्शन म्हणतात. हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण असू शकते.
गनोरिया, कॅलॅमिडीया सारखे विविध बॅक्टरीया किंवा सेक्श्युअल ट्रान्समिटेड (STI) बॅक्टरीयांमुळे युटेराइन इन्फेक्शन होते.अशा विविध प्रकारच्या इन्फेक्शन मुळे रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक मध्ये अडथळा निर्माण होतो. शुक्राणूंच्या प्रवासात अडथळा येतो. रिप्रॉडक्टिव्ह अवयवांना सूज येते, जळजळ होते. गर्भाशयाचे अस्तर आणि गर्भनलिका खराब होऊ शकतात. एकंदरीतच फर्टिलिटी रेट कमी होतो आणि वंध्यत्व येते. तेव्हा वेळीच इन्फेक्शन वर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच इन्फेक्शन होऊ नये यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
युटेराइन इन्फेक्शन चे प्रकार, लक्षणे आणि कारणे :
१) एंडोमेट्रायटिस :
एंडोमेट्रायटिस ही अशी स्थिती आहे जिथे इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या भिंतीच्या अस्तरांना (युटेरियन वॉल) सूज येते. यामुळे ओटीपोटात वेदना, योनीतून असामान्य रक्तस्राव आणि ताप यांसारखी लक्षणे दिसू शकतात. एंडोमेट्रायटिस हा सामान्यतः बाळाच्या जन्मानंतर किंवा गर्भपातानंतर गर्भाशयात प्रवेश करणाऱ्या बॅक्टरीयांमुळे होतो. याशिवाय लैंगिक संपर्काद्वारे किंवा सर्जरी सारख्या वैद्यकीय प्रक्रियांद्वारे पसरलेल्या संसर्गामुळे देखील युटेराइन इन्फेक्शन होऊ शकते. अनुपचारित एंडोमेट्रायटिस मुळे वंध्यत्व येऊ शकते.
२) PID (पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज) :
पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (PID) हा एक गंभीर संसर्ग आहे जो गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयांसह महिलांच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांना प्रभावित करतो. हे सामान्यत: क्लॅमिडीया किंवा गनोरिया सारख्या उपचार न केलेल्या सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) मुळे होते. परंतु बाळाचा जन्म किंवा मिसकॅरेज दरम्यान जीवाणू संसर्गामुळे देखील होऊ शकतो. लक्षणांमध्ये ओटीपोटात वेदना, योनीतून असामान्य स्त्राव, वेदनादायक लघवी आणि ताप यांचा समावेश असू शकतो. उपचार न केल्यास, PID मुळे वंध्यत्व, दीर्घकालीन पेल्विक वेदना आणि एक्टोपिक गर्भधारणा यासारख्या दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकतात.
प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व
गर्भाशयाच्या संसर्गाची लक्षणे अनुभवणाऱ्या महिलांनी वेळीच वैद्यकीय उपचार घेतल्यास फर्टिलिटी आरोग्य उत्तम राहते. गर्भाशयाच्या संसर्गाविरूद्ध काही खबरदारी घेतल्यास गर्भाशयाचे आरोग्य उत्तम राहते आणि गर्भधारणेत गुंतागुंत टाळता येऊ शकते. तसेच रिप्रॉडक्टिव्ह आरोग्यावर होणारा दीर्घकालीन परिणाम टाळता येतो. उपचारांमध्ये सामान्यतः इन्फेक्शन दूर करण्यासाठी आणि पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी अँटिबायोटिक्स चा समावेश असतो.
युटेरियन इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे?
लाइफस्टाइल चेंजेस आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीने युटेराईन इन्फेक्शन पासून बचाव करणे शक्य आहे. त्यासाठी खालील गोष्टी करा.
१) हायजिन (स्वच्छता) :
इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छतेच्या गाईडलाईन पाळणे आवश्यक आहे. यामध्ये स्वच्छ धुतलेले, सुती, मऊ आणि सैल कापडे परिधान करणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, जननांगांची स्वच्छता राखणे यांचा समावेश होतो. स्वच्छतेसाठी हार्ड सोप, सुगंधी प्रॉडक्ट, डचिंग यांचा वापर टाळा. असे प्रॉडक्ट बॅक्टरीया चे नैसर्गिक संतुलन बिघडवतात आणि इन्फेक्शन चा धोका वाढतो. स्वच्छतेसाठी PH सोप चा वापर करा.
रिप्रॉडक्टिव्ह सर्जरी नंतर किंवा बाळाच्या जन्मानंतर आणि मासिक पाळी दरम्यान विशेष स्वच्छता राखणे गरजेचे असते.
२) योग्य आहार :
पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन करावे. यामुळे इम्युनिटी स्ट्रॉन्ग राहते आणि संसर्गास प्रतिकार होतो. काही खाद्यपदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात. इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉन्ग ठेवण्यासाठी तुमच्या आहारात दही, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी जास्त असलेली फळे, लीन प्रोटीन सारख्या प्रोबायोटिक-समृद्ध अन्नाचा समावेश करा. हे पदार्थ तुमच्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन राखू शकतात आणि इम्यून सिस्टीम ला सपोर्ट करू शकतात.
३) हायड्रेटेड राहा :
भरपूर पाणी प्या. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत इन्फेक्शन असलेल्या रुग्णांनी भरपूर पाण्याचे सेवन करावे. किंवा टरबूज, संत्री, सरबत, दही अशा पाणीदार पदार्थांचा आहारात समावेश करावा.
४) नियमित STI तपासणी करा :
जळजळ, खाज, पुरळ, सूज, अशी इन्फेक्शन ची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावा. STI स्क्रीनिंग टेस्ट जरुरी आहे. वेळीच लैंगिक संक्रमित आजाराचे निदान झाले तर पुढील पेल्विक ट्रान्समिटेड इन्फेक्शन (PID) चा धोका टाळता येतो.
५) नियमित आरोग्य तपासणी :
नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रिनिंग चाचण्या युटेराइन इन्फेक्शन लवकर ओळखण्यात मदत करतात. त्यामुळे इन्फेक्शन ला प्रतिकार करणे शक्य होते.
योनीवाटे रक्तस्त्राव, ताप, ओटीपोटात वेदना, इन्फर्टिलिटी, दुर्गंधी, पुरळ, जळजळ यांसारखी आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. लवकर ओळख आणि उपचार केल्याने इन्फेक्शन चा प्रसार टाळता येतो. फर्टिलिटी आरोग्यासाठी डॉक्टरांच्या नियमित भेटींचे नियोजन करा. आणि इन्फेक्शन समस्येचे त्वरित निराकरण करा.
६) अँटिबायोटिक्स आणि पेन रिलिफ्स :
इन्फेक्शन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले अँटिबायोटिक्स घ्या. मात्र अँटिबायोटिक्स चा अतिवापर टाळा. याशिवाय जळजळ, सूज, वेदना कमी करण्यासाठी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.
७) जोखीम टाळणे :
– सुरक्षित संबंध : सेक्श्युअल इंटरकोर्स दरम्यान प्रोटेक्शन टूल्स चा वापर केल्यास STI इन्फेक्शन चा धोका टाळता येतो.
– ओबेसिटी आणि डायबेटिज : मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या क्रोनिक आणि दीर्घकालीन आजारांमुळे देखील गर्भाशयाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. जीवनशैलीतील बदल आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांद्वारे ओबेसिटी आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करावे.
८) एक्सरसाइज आणि शारीरिक हालचाल :
तुमच्या दिनचर्येत ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करा. वज्रासन, भुजंगासन, धनुरासन, बटरफ्लाय यांसारखे ओटीपोटावर ताण आणणारे योगासन केल्यास गर्भाशयाच्या आरोग्यासह तुमच्या एकूण आरोग्याला चालना मिळते.व्यायामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि इम्यून सिस्टीम स्ट्रॉन्ग बनते.
९) तणाव नियंत्रण :
उच्च तणावाची पातळी सुद्धा तुमची इम्यून सिस्टीम कमकुवत करू शकते. ज्यामुळे तुम्हाला संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते. माइंडफुलनेस, योग किंवा मेडिटेशन, श्वसन क्रिया केल्यास तणाव कमी होतो आणि गर्भाशयाच्या आरोग्यास चालना मिळते.
१०) योग्य IUI चा वापर :
गर्भनिरोधक डिवाइस निवडताना डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडा आणि डॉक्टरांकडून इन्सर्ट करा. यामुळे संसर्ग आणि इतर गुंतागुंत टाळता येते.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
युटेराइन इन्फेक्शन चे निदान कसे करतात?
शारीरिक तपासण्या आणि इमेजिंग टेस्ट वापरून युटेराइन इन्फेक्शन चे निदान केले जाते. योनीमार्गातील बॅक्टरीया ओळखण्यासाठी युरीन, योनीतील रक्तस्त्राव किंवा टिश्यू चे नमुने तपासले जाऊ शकतात. ब्लड टेस्ट मध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींची वाढलेली पातळी तपासली जाते, जी इम्यून सिस्टीम दर्शवते.
युटेराइन इन्फेक्शन कसे होते?
अस्वच्छता किंवा लो इम्यून सिस्टीम मुळे जेव्हा बॅक्टेरिया योनीमार्गातून गर्भाशयात प्रवेश करतात तेव्हा युटेराइन इन्फेक्शन होते. पुढे जाऊन ते फेलोपियन ट्यूब आणि अंडाशयांपर्यंत पसरते.
युटेराइन इन्फेक्शन वर उपचार न केल्यास काय होते?
युटेराइन इन्फेक्शन म्हणजेच गर्भाशयातील इन्फेक्शन किंवा PID इन्फेक्शन. उपचार न घेतल्यास फेलोपियन ट्यूब ब्लॉक होतात आणि नैसर्गिक गर्भधारणा अशक्य होते. योनीमार्गातून शुक्राणू देखील प्रवेश करू शकत नाहीत. शुक्राणूंची बॅक्टेरिया अडथळा ठरतात. परिणामी वंध्यत्व येते.
युटेराइन इन्फेक्शन साठी कोणते उपचार केले जातात?
गर्भाशयाला संसर्ग झाल्यास, स्त्रियांना किमान ४८ तास सलाईन द्वारे अँटिबायोटिक औषधे दिली जातात. त्यानंतरही काही स्त्रियांना ओरल मेडिकेशन ची आवश्यकता असते. युटेराइन इन्फेक्शन साठी ७ ते १४ दिवस केल्या जाणाऱ्या व्हजायना थेरपी देखील आहेत, ज्यामध्ये व्हजायनल मेडिसिन दिले जातात.