IUI म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयात थेट निरोगी, निवडक स्पर्म पोहोचवण्याची प्रक्रिया, ज्यामुळे स्त्रीबीजांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते आणि गर्भधारणेस मदत होते.
पण लक्षात ठेवा — IUI केलं म्हणजे यश मिळेलच असं नाही. यशाची शक्यता वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
चला, पाहूया त्या 10 खास टिप्स ज्या IUI यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतात.
टिप 1 – योग्य वेळेत IUI करणे
IUI उपचारांच्या बाबतीत योग्य वेळ साधणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
ओव्ह्युलेशनचा महत्त्वाचा टप्पा – स्त्रीच्या मासिक पाळीच्या सायकलमध्ये अशी एक वेळ येते जेव्हा स्त्रीबीज परिपक्व होऊन बाहेर पडते, ज्यास ओव्ह्युलेशन म्हणतात. हे साधारण 12-16 व्या दिवशी होते, पण प्रत्येक महिलेची पाळीची सायकल वेगळी असल्याने डॉक्टर सोनोग्राफी, हार्मोनल चाचण्या आणि ओव्ह्युलेशन प्रेडिक्टर किटच्या मदतीने योग्य दिवस ठरवतात.
वेळ का महत्त्वाची आहे? – स्त���रीबीज फक्त 12-24 तास टिकून राहते. योग्य वेळी शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचले तरच फर्टिलायझेशनची शक्यता जास्त असते.
डॉक्टरांचा अनुभव महत्त्वाचा – अनुभवी डॉक्टर योग्य दिवशी IUI शेड्यूल करून यशाची शक्यता वाढवतात.
IUI नेहमी डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशीच आणि वेळेत करणे अत्यावश्यक आहे. टायमिंग चुकल्यास संधी वाया जाऊ शकते.
हे देखील वाचा: IUI failure होण्याची कारणे आणि अयशस्वी IUI नंतर यशस्वी ...
टिप 2 – उपचाराआधी हेल्दी डायट सुरू करा
निरोगी शरीर = निरोगी प्रेग्नंसी हे सूत्र इथे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे IUI उपचार सुरू करण्यापूर्वी हेल्दी डायट सुरू करायला हवं.
प्रोटीनचा समावेश – अंडी, मासे, पनीर, दूध, डाळी आणि कडधान्ये यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ स्त्रीबीजांची गुणवत्ता सुधारतात.
हिरव्या भाज्या व रंगीत फळे – पालक, मेथी, ढोबळी मिरची, गाजर, बीट, संत्री, स्ट्रॉबेरी यांत अँटिऑक्सिडंट्स आणि फॉलिक अँसिड मुबलक असतात.
हेल्दी फॅट्स – अक्रोड, बदाम, जवसाच्या बीया हे सर्व हेल्दी फॅट्स आहेत. जे हार्मोनल बॅलन्स राखतात.
जंक फूड टाळा – पॅकेज्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, जास्त साखर, तळलेले पदार्थ हार्मोनल बदल करतात.
पाणी पिण्याचे महत्त्व – पुरेसं पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रिप्रोडक्टीव ऑर्गन (प्रजनन अवयव) चांगले कार्य करतात.
हे देखील वाचा: IUI फेल होने के कारण और असफल IUI के बाद सफल गर्भधारण
टिप 3 – वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणा (Overweight) किंवा कमी वजन असणे (Underweight) — हे दोन्हीही गर्भधारणेसाठी अडथळा निर्माण असतात. वजन नियंत्रित ठेवल्याने IUI च्या यशाची शक्यता 15-20% ने वाढू शकते.
लठ्ठपणाचे दुष्परिणाम – PCOS, हार्मोनल असंतुलन, स्त्रीबीज परिपक्व न होणे.
कमी वजनाचे दुष्परिणाम – ओव्ह्युलेशन नीट न होणे, पाळीची अनियमितता.
योग्य BMI राखणे – BMI 18.5–24.9 या दरम्यान ठेवणे एकंदरीत आरोग्यासाठी उत्तम असते.
काय करावे? – हलका व्यायाम, चालणे, योगासने, हेल्दी डायट.
हे देखील वाचा: वंध्यत्व म्हणजे काय? Infertility कारणे, लक्षणे आणि उपचार
टिप 4 – स्ट्रेस कमी करा
मन शांत असेल तर शरीरही उपचारांसाठी तयार राहतं.
स्ट्रेसचे दुष्परिणाम – ताणामुळे Cortisol वाढतो, जो ओव्ह्युलेशन आणि हार्मोनल संतुलनावर वाईट परिणाम करतो.
ताण कमी करण्याचे मार्ग – ध्यान, योग, श्वसनाचे व्यायाम, आवडते छंद जोपासणं.
मानसिक/ भावनिक आधार – जोडीदार, कुटुंब, मित्र यांच्याकडून मानसिक आधार मिळवा.
टिप 5 – धूम्रपान, मद्यपान व कॅफिन टाळा
धूम्रपान – स्पर्म काउंट कमी होतो, स्त्रीबीजांची गुणवत्ता घटते.
मद्यपान – हार्मोनल बॅलन्स बिघडतो आणि गर्भाला हानी होऊ शकते.
जास्त कॅफिन – दिवसाला 1-2 कप पेक्षा जास्त कॉफी/चहा टाळा.
हे देखील वाचा: गर्भधारणा होत नसेल तर काय करावे ? टिप्स फॉलो करा
टिप 6 – डॉक्टरांनी सुचवलेली औषधे आणि सप्लिमेंट्स वेळेवर घ्या
फॉलिक ॲसिड – बाळाच्या मेंदू व स्पायनल कॉर्डच्या विकासासाठी फॉलिक ॲसिड आवश्यक असते.
हार्मोनल औषधे – स्त्रीबीज परिपक्व होण्यासाठी व ओव्ह्युलेशन योग्य वेळी होण्यासाठी हार्मोनल औषधे मदत करतात.
विटॅमिन D, आयर्न, झिंक – रिप्रोडक्टिव हेल्थसाठी (प्रजनन आरोग्य) महत्त्वाचे आहे.
वेळेवर डोस घेणे – डोस चुकवल्यास परिणाम कमी होऊ शकतो.
टिप 7 – IUI नंतरची काळजी घ्या
आराम – IUI ची प्रक्रिया झाल्यानंतर 30 मिनिटे क्लिनिकमध्ये आराम करा.
जड काम टाळा – जड वजन उचलणे, उड्या मारणे, जास्त धावपळ नको.
सामान्य हालचाल – हलके चालणे, घरातली छोटी कामं करू शकता.
आरोग्यदायी आहार सुरू ठेवा – पौष्टिक आहार व पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा:
टिप 8 – स्पर्म हेल्दी ठेवणे
आहार – प्रोटीन, ओमेगा-3, झिंकयुक्त पदार्थ यांचा आहारात समावेश करा.
उष्णता - उष्ण वातावरणात काम करणे टाळा. उष्णतेमुळे स्पर्म काउंट कमी होतो. लॅपटॉप मांडीवर ठेवू नका.
नियमित व्यायाम – नियमीतपणे व्यायाम व शारीरिक हालचाल सुरू ठेवणं महत्वाचं आहे. पण लक्षात घ्या - ओव्हरएक्सरसाइज करणेही नुकसान पोहोचवू शकते.
मद्यपान व धूम्रपान बंद – मद्यपान व धूम्रपान बंद केल्याने स्पर्म क्वालिटी सुधारते.
---------------
टिप 9 – धीर आणि सकारात्मकता ठेवणे
पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही – काही वेळा 3-4 प्रयत्न लागतात.
मानसिक तयारी – अपयश आले तरी प्रयत्न सुरू ठेवा.
सकारात्मक दृष्टीकोन – आत्मविश्वास ठेवा, कारण मानसिक ऊर्जा शरीरावरही परिणाम करते.
---------------
टिप 10 – योग्य डॉक्टर आणि फर्टिलिटी सेंटरची निवड
अनुभवी डॉक्टर – ज्या डॉक्टरांना IUI उपचारांमध्ये जास्त अनुभव आहे अशाच डॉक्टरांची/ फर्टिलिटी सेंटरची निवड करा.
आधुनिक सुविधा – लॅब, अल्ट्रासाऊंड, प्रशिक्षित स्टाफ हे सर्व पहा.
आरामदायी वातावरण – जिथे तुम्हाला प्रश्न विचारायला आणि समजून घेण्यासाठी मोकळेपणा मिळतो.
---------------
निष्कर्ष -
IUI हा वंध्यत्वावर मात करण्याचा एक सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग आहे. पण यश मिळवण्यासाठी केवळ उपचारच नाही, तर तयारी, योग्य जीवनशैली, डॉक्टरांचा सल्ला आणि मानसिक तयारी हे सर्व तितकेच महत्त्वाचे आहे.
या 10 टिप्स पाळून तुम्ही पालकत्वाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकता.


