Logo
Latest Blog

गर्भधारणेची योग्य वेळ, जाणून घ्या ओवुलेशन कालावधी म्हणजे काय?

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

गर्भधारणा होण्यासाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही केव्हा ओवुलेट करतात हे समजणे गरजेचे आहे. त्यासाठी ओवुलेशन म्हणजे काय, ओवुलेशन प्रक्रिया, ओवुलेशन स्टेजेस, ओवुलेशन ट्रॅक कसे करावे याविषयी या लेखात चर्चा केली आहे. ओवुलेशन कॅलेंडर, डिजिटल ट्रॅकिंग, बसाल बॉडी टेम्परेचर अशा पद्धतींनी ओव्यूलेशन काळ ओळखून योग्य वेळी प्रयत्न केल्यास यशस्वी गर्भधारणा होते.

तुम्ही जर ‘आई’ होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, ''ओवुलेशन डे'' चे महत्त्व तुम्ही जाणले पाहिजे. कारण ‘’ओवुलेशन डे’’ तुम्ही प्रेग्नेंट राहाल कि नाही हे ठरवतो. त्यासाठी जाणून घ्या ओवुलेशन ची भूमिका.

ओवुलेशन म्हणजे काय?

स्त्रियांच्या ओव्हरीज दर महिन्याला १-१ बीज परिपक्व होते. पूर्ण मॅच्युअर झालेले एग्ज अंडाशयाकडून फॅलोपि नलिकांकडे सोडले जातात. मॅच्युअर झालेले एग अर्थात फर्टिलायझेशन साठी तयार असलेल्या स्त्रीबीजाला ''ओव्युम'' म्हटले जाते. आणि ज्या काळात स्त्रीबीज आणि स्पर्म फर्टाईल होऊ शकतात त्या कालावधीला ओवुलेशन पिरिएड असे म्हणतात.

ओवुलेशन केव्हा होते?

‘ओवुलेशन डे’ चे महत्त्व

महिलांना त्यांच्या ओवुलेशन सायकल ची प्रक्रिया आणि कालावधी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा काळ ''गर्भधारणा होण्यासाठी'' आणि ''गर्भधारणा रोखण्यासाठी'' निर्णायक घटक आहे. तुम्हाला गर्भधारणा होण्यात यश मिळत नसेल तर याचे एक कारण हेही असू शकते कि, तुमचा इंटरकोर्स चा कालावधी चुकीचा असू शकतो.

तुम्ही ओव्यूलेट होत आहेत कि नाही हे कसे समजेल?

ओवुलेशन चा मागोवा घेण्यासाठी अनेक पद्धती चा वापर केला जातो.

  1. मासिक पाळी चक्र : तुमचे मासिक पाळी चक्र किती दिवसांचे आहे त्यातून १४ वजा केल्यास ‘’ओवुलेशन डे’’ मिळतो.
    • २१ दिवसांचे मासिक पाळी चक्र : ओवुलेशन डे ७ वा आणि चांगला प्रजनन कालावधी ५, ६ व ७ वा दिवस.
    • २८ दिवसांचे मासिक पाळी चक्र : ओवुलेशन डे १४ वा आणि चांगला प्रजनन कालावधी १२, १३ व १४ वा दिवस.
    • ३५ दिवसांचे मासिक पाळी चक्र : ओवुलेशन डे २१ वा आणि चांगला प्रजनन कालावधी १९, २० व २१ वा दिवस.
    • ४० दिवसांचे मासिक पाळी चक्र : ओवुलेशन डे २६ वा आणि चांगला प्रजनन कालावधी २४, २५  व २६ वा दिवस.
  2. ओवुलेशन प्रेडिक्टर किट : ओवुलेशन प्रेडिक्टर किट हे गर्भधारण चाचणी (HCG टेस्ट) प्रमाणेच काम करतात.
  3. ओवुलेशन कॅलेंडर: सर्वात लांब पाळी किती दिवसांनी आली; या संख्येतून ११ वजा करावे. सर्वात लहान पाळी किती दिवसांनी आली ; या संख्येमधून १८ वजा करावेत. सर्वात लांब मासिक पाळी ३१ दिवस असेल आणि सर्वात लहान पाळी १८ दिवस असेल तर तुमचा ओवुलेशन काळ १०-२० दिवसांचा असतो.
  4. बसाल बॉडी टेम्परेचर : ओवुलेशन काळात बॉडी टेम्परेचर मध्ये वाढ होते. परंतु हि पद्धत अगदी अचूक नाही. यासोबत आणखी इतर पद्धतींचा वापर करणे योग्य ठरते.

ओवुलेशन होण्याची लक्षणे

  • सर्विकल म्युकस
  • बसाल बॉडी टेम्परेचर वाढणे
  • ब्रेस्ट टेन्डरनेस
  • ब्लॉटिंग
  • ओटीपोटात थोडेसे दुखणे
  • हलका रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणे
  • डिस्चार्ज च्या थिकनेस मध्ये बदल होणे
  • इन्क्रिज सेक्स ड्राइव्ह
  • मूड चेंज
  • अपेटाइट चेंज
  • वास, चव उत्तेजित होणे

ओवुलेशन न होण्याची लक्षणे

  • जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल, तर तुमचे ओवुलेशन डिस्टर्ब्  असण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय,
  • हायपरप्रोलॅक्टिनेमिया
  • PCOD/PCOS
  • मेनोपॉज
  • प्रायमरी ओव्हरीयन इंसफीशियंशी
  • अमेनोरिया : एक किंवा अधिक पेरीएड्स न येणे अशा समस्या दिसून येतात.

ओवुलेशन न होण्याची कारणे

ओवुलेशन प्रक्रियेमध्ये हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लॅन्ड, GnRH गोनाड्रोपामाईन हार्मोन, अड्रेनल ग्लॅण्डस, थायरॉईड ग्लॅन्ड, ओव्हरीज कार्यरत असतात.

  • हायपोगोनॅडिज्म : हायपोथॅलॅमस मधून  गोनाड्रोपामाईन हार्मोन रिलीज झाला नाही तर पिट्युटरी ग्लॅन्ड ला LH निर्माण करण्यासाठी कोणताही संदेश मिळत नाही.
  • पिट्युटरी ग्लॅन्ड खूप कमी FSH (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) व  LH (ल्युटेनायझिंग हार्मोन) हार्मोन तयार करतात.
  • अंडाशय खूप कमी इस्ट्रोजेन हार्मोन रिलीज करतात.
  • हायपोप्रोलॅकटोमॅनिया : यामध्ये पिट्युटरी ग्लॅन्ड अधिक प्रोलॅक्टिन तयार करतात.
  • टेस्टेस्टेरॉन ची मात्रा वाढणे
  • थायरॉईड ची मात्रा वाढणे
  • PCOD/PCOS
  • डायबेटिज
  • लठ्ठपणा किंवा वजन कमी  होणे
  • ताणतणाव
  • काही औषधांचे सेवन
  • ओव्यूलेतरी डिसफंक्शन

ओवुलेशन ट्रीटमेंट

  1. मेडिकेशन : हार्मोनल बॅलन्स केला जातो.
  2. लाइफस्टाइल मॉडिफिकेशन : जीवनशैली जसे कि आहार, व्यायाम आणि सवयी यामध्ये बदल केला जातो. वजन कमी केले जाते.
  3. व्हजायनल अल्ट्रासाउंड : याद्वारे फॉलिकल चा विकास आणि ओवुलेशन प्रक्रिया ट्रॅक केली जाते. गरजेप्रमाणे दररोज काही दिवस फॉलिकल ची वाढ तपासली जाते. योग्य वेळी फॉलिकल फुटण्यासाठी इंजेक्शन दिले जाते आणि इंटरकोर्स करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते.
  4. IUI : इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन
  5. IVF : इन विट्रो फर्टिलायझेशन

ओवुलेशन संबंधित अधिक विचारले जाणारे प्रश्न

१) ओवुलेशन म्हणजे काय?

ओव्हरीज मधून मॅच्युअर एग बाहेर येण्याची प्रक्रिया म्हणजे ओवुलेशन. अंडाशयातून फॅलोपियन नलिकेकडे स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया म्हणजे ओवुलेशन. ओव्हरीज एग्ज रिलीज करतात म्हणजे ओव्यूलेश होय.

२) Ovulation Period काय असतो?

सामान्य २८ दिवसांचे मासिक पाळी चक्र असेल तर ओवुलेशन डे १४ वा असतो. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजावे. मासिक पाळी चक्रातून १४ हि संख्या वजा केल्यास ओवुलेशन डे कळतो.

३) ओवुलेशन काळात केव्हा गर्भवती होऊ शकतात?

स्पर्म्स ने गर्भाशयात प्रवेश केल्यानंतर ५ दिवस जिवंत राहू शकतात. तर, स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्यानंतर १२ ते २४ तास जिवंत राहू शकते. त्यामुळे तुमच्या ओवुलेशन डे च्या दोन दिवस आधी इंटरकोर्स केल्यास गर्भधारणेचे चान्सेस वाढतात.

४) ओवुलेशन किट/ओवुलेशन टेस्ट स्ट्रीप अचूक असते का?

ओवुलेशन किट १०० टक्के अचूक नसले तरी ९९ टक्के अचूक असते. त्यामध्ये ५ ते १० पट्ट्या असतात. ओवुलेशन किट हा सर्वात अचूक पर्याय समजला जातो. तुमच्या टेस्ट मध्ये डिजिटल रीडर असेल तर, चाचणी अधिक अचूक ठरू शकते.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
गर्भधारणेची योग्य वेळ, जाणून घ्या ओवुलेशन | Ovulation in Marathi