Logo
Latest Blog

IUI अयशस्वी होण्याची कारणे आणि अयशस्वी IUI नंतर यशस्वी गर्भधारणेची शक्यता

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

IUI किंवा इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन हा तुलनेने प्रथम श्रेणीतील फर्टिलिटी ट्रीटमेंट पर्याय आहे ज्याची शिफारस वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना केली जाते. का? कारण PCOS, एनोव्हुलेशन, किंवा शुक्राणूंच्या समस्यांशी संबंधित असलेल्यांसाठी IUI हा सर्वात योग्य उपचार पर्याय आहे. बहुतेक जोडपी IUI ला प्राधान्य देतात कारण ते शुक्राणू अंड्याच्या जवळ ठेवून नैसर्गिक गर्भधारणेची प्रक्रिया वाढवते. सोबतच हा उपचार पर्याय इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट्स च्या तुलनेत कमी खर्चिक आहे. पण, इतर प्रगत फर्टिलिटी ट्रीटमेंट्सपेक्षा IUI चे यश दर कमी आल्याचे कळते.

डॉ. नरहरी मळगांवकर, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर चे मुख्य IVF कंसल्टंट सांगतात, "एक फर्टिलिटी विशेषज्ञ म्हणून मला विचारला जाणारा सर्वात कॉमन प्रश्न म्हणजे, "IUI फेल का होते?" कारण इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) मध्ये अनेक व्हेरिएबल्स असतात. जर तुम्ही प्रोजेनेसिस मध्ये ट्रीटमेंट घेत असाल तर आम्ही तुमच्या फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि शुक्राणूंची गुणवत्ता पाहून सुरुवात करू. परंतु इतर फर्टिलिटी क्लिनिक मध्ये तुमचे सगळे टेस्ट आणि चेकअप करून सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा IUI फेल गेले, तर त्याचे कारण काय?

तुमच्या IUI success साठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात जसे:

  • अंड्यांची उत्तम गुणवत्ता.
  • शुक्राणू आणि अंड्यांच मिलन फेलोपियन ट्यूब मध्ये होणं.
  • भ्रूण यशस्वीरित्या गर्भाशयात रोपण झाले पाहिजे.

ट्रीटमेंट मधील प्रत्येक स्टेप हि योग्य रित्या पार पडणे गरजेचे आहे. जर एकही प्रक्रिया चुकली, तर IUI अयशस्वी होण्याची शक्यता वाढते.

IUI फेल का होते?

IUI Failure in Marathi | IUI Treatment Failure Reasons

IUI च्या यशाचा दर जोडप्याच्या फर्टिलिटी हेल्थ वर अवलंबून असतो. त्यामुळे स्त्री आणि पुरुष घटकांचे योग्य मूल्यमापन करणे आवश्यक आहे. यासोबतच लठ्ठपणा, थायरॉईड इत्यादींशी (main reasons for iui failure) संबंधित इतर घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे.
जरी IUI चा उद्देश गर्भधारणेची शक्यता वाढवणे आहे, तरी IUI च्या यशाचा दर सांगणे कदाचित आव्हानात्मक असेल. कारण प्रत्येक जोडप्याचा ट्रीटमेंट ला प्रतिसाद वेगळा असतो.

Click here to read in English:

Causes of IUI Failure and Chances of Successful Pregnancy After Failed IUI

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ क्लिक करे:

IUI असफल होने के कारण और असफल IUI के बाद सफल गर्भधारण की संभावना

IUI अयशस्वी होण्याची कारणे

Causes of IUI Failure

IUI फेलियर चे कॉमन कारणे:

  • महिलेचं वाढलेलं वय
  • शुक्राणूंची खराब गुणवत्ता
  • लो ओव्हेरिअन रसर्व
  • गर्भधारणेची वेळ
  • अनएक्सप्लिनेड इंफेर्टिलिटी (unexplained infertility)
  • इतर अज्ञात वंध्यत्व परिस्थिती

स्त्रीबीजांची खराब गुणवत्ता:

जसजसे स्त्री चे वय वाढत जाते तसतसे तिच्या स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता खालावत जाते ज्यामुळे क्रोमोसोमल ऍबनॉर्मलीटीएस (chromosomal abnormalities)असण्याची शक्यता वाढते आणि गर्भाची निर्मिती स्वस्थ होत नाही.

वय:

IUI सारख्या उपचारांचा विचार करताना वय हा एक निर्णायक घटक असतो. सर्वसाधारणपणे, वयानुसार स्त्री व पुरुषांची फर्टिलिटी हेल्थ खालावते. यामुळे केवळ नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यातच नव्हे तर फर्टिलिटी ट्रीटमेंट्स च्या परिणामकारकते वरही परिणाम होऊ शकतो.

शुक्राणूंची खराब गुणवत्ता:

पुरुषांमध्ये वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता, प्रमाण आणि गतिशीलता अनेक कारणांमुळे खराब होते. म्हणून, जेव्हा फर्टिलिटीचा विचार केला जातो, तेव्हा पुरुषांच्या वयाचा पण तेवढाच विचार करणं गरजेचं आहे.

गर्भधारणेची वेळ:

ओव्हुलेशननंतर 12-24 तासांच्या आत शुक्राणू उपस्थित नसल्यास, फॅलोपियन ट्यूबमधील अंडी विघटित होईल. त्यामुळे शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळेला खूप महत्त्व आहे.

एंडोमेट्रियल अस्तर:

यशसस्वी गर्भधारणेसाठी गर्भाशयाचे अस्तर योग्य असणे अनिवार्य आहे. पातळ किंवा खराब झालेले एंडोमेट्रियल अस्तर फलित अंड्याला पोकळीशी जोडणे कठीण करू शकते.

लो ओव्हेरिअन रिझर्व:

अनेक स्त्रियांना अनियमित ओव्हुलेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो ज्यामुळे वेळेत स्त्रीबीज तयार होऊ शकत नाही परिणामी - गर्भधारणा राहण्यात अडचण निर्माण होते.

प्रोजेस्टेरॉन:

प्रोजेस्टेरॉन या हार्मोन ला मेडिकल भाषेत 'द प्रेग्नन्सी हार्मोन सुद्धा म्हणतात. गर्भधारणेचा प्रयत्न करताना प्रोजेस्टेरॉन हा एक अविभाज्य भाग आहे. बहुतेकदा स्त्रिया प्रोजेस्टेरॉनच्या कमतरतेने ग्रस्त असल्यामुळे त्यांना गर्भधारणा राहण्यात त्रास होतो.
या हार्मोनची कमतरता हे आययूआय अयशस्वी होण्याचे एक प्रमुख कारण आहे.

IUI फेलियरची लक्षणे

IUI Failure Symptoms

IUI फेलिअरची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, अपयशी गर्भपात होऊ शकते.
यासोबतच आययूआय अयशस्वी ह��ण्याची इतर लक्षणांच शोध घेण आवश्यक आहे (IUI failure symptoms)

  • मासिक पाळी सुरू होणे
  • असामान्य योनि स्राव
  • तीव्र क्रॅम्पिंग किंवा अस्वस्थता

किती IUI प्रयत्न करणे योग्य आहे?

How many IUI cycles are good?

प्रत्येक IUI सायकलमध्ये 35 वर्षांखालील महिलांसाठी 10-20 टक्के यशाचा दर असतो. जसजसे सायकल्स ची संख्या वाढते, तशीच गर्भधारणेची शक्यताही वाढते. परिणामी, तुम्हाला तीन प्रयत्नांनंतर गर्भवती होण्याची 30-60% शक्यता असते.
वयाचा महत्त्वपूर्ण प्रभाव लक्षात घेता 35 वर्षांखालील महिलांसाठी IVF विचार करण्यापूर्वी फर्टिलिटी डॉक्टर IUI ची शिफारस करतात. या काही कपल्स मध्ये काळजीपूर्वक, ही संख्या सहा पर्यंत वाढविली जाऊ शकते. तुमचे वय 35 पेक्षा जास्त असल्यास डॉक्टर आवई नाही तर निवफ ची शिफारस करतील.
यासोबतच, ओव्हेरिअन रिसर्व वयोमानानुसार कमी होत जातो म्हणून, कोणतेही फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी, त्यांची तपासणी करून घेणे मददगार ठरेल.

IUI फेलियर नंतर काय?

Next Step After Failed IUI

दोन ते तीन वेळा IUI चा प्रयत्न करून देखील जर जोडप्याला यश नसेल येत तर तुमचे IVF डॉक्टर तुम्हाला विविध पर्यायांची शिफारस करू शकतात. या व्यतिरिक्त वंध्यत्वाचे दुसरे कारण असल्यास त्यावर अभ्यास करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
सामान्यतः दोन किंवा अधिक IUI सायकल्स फेल झाल्यास कपल्स ला IVF चा विचार करावासा वाटेल. IUI च्या यशाचा दर पाहता, काही जोडप्यांनी IVF चा पर्याय उत्तम वाटेल.
यासोबतच, कधी कधी काही जोडप्यांमध्ये, अनेक अयशस्वी IUI आणि नंतर अचानक नैसर्गिक रित्या गर्भधारणा राहण्याच्या पण संभावना आहेत.
शेवटी, तुमच्यासाठी कोणते पर्याय योग्य आहेत हे समजून घेणे तुमच्यावर आणि तुमच्या डॉक्टरांवर अवलंबून आहे.
आम्ही जाणतो फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणे सोपे नाही. अयशस्वी उपचारांमुळे तुमच्या आर्थिक भावनिक, आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ज्यामुळे नैराश्य येणं स्वाभाविक आहे.
पण हे खर आहे की एक किंवा दोन अयशस्वी IUI सायकल्स चा अर्थ असा नाही की IUI कधीच यशस्वी होणार नाही. तुम्हाला कदाचित अधिक वेळ लागेल किंवा वेगळ्या उपचार योजनेची आवश्यकता असेल.
वारंवार IUI फेल होत आहे? प्रोजेनेसिस मध्ये तुमच्या संपूर्ण फर्टिलिटी क्षमतेच्या मूल्यांकनापासून ते यशस्वी IUI उपचारासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास करण्यापर्यंत, सर्व सेवा एकाच छताखाली मिळवा!

IUI वेदनादायक आहे का?

उत्तर: IUI ही तुलनेने वेदनारहित प्रक्रिया आहे पेशंट ला अस्वस्थ वाटू शकत पण भूल देण्याची आवश्यकता नाही.

IUI ट्रीटमेंट नंतर काय काळजी घ्यावी?

उत्तर: IUI ट्रीटमेंट नंतर खालील गोष्टींची काळजी घ्यावी:

  • स्ट्रेस फ्री आणि रिलॅक्स राहा
  • ट्रीटमेंट नंतर ४८ तासांसाठी अधिक शारीरिक श्रमाचे काम करू नका
  • ट्रीटमेंट नंतर ४८ तासांसाठी शारीरिक संबंध टाळा
  • दररोज ३-४ लिटर पाणी प्या
  • ताजे फळं आणि भाज्या खा
  • हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खा
  • दररोज ३-४ फळं खा

ट्रीटमेंट नंतर काय करू नये?

उत्तर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषधं खाऊ नका

  • स्ट्रेस घेणं टाळा
  • अनियमित वेळी झोपणं टाळा
  • जंक फूड आणि कॅफेन टाळा
  • जड सामान उचलणे टाळा
  • सिग्रेट आणि अल्कोहोल च सेवन करू नये
  • अतिरिक्त व्यायाम करू नये
  • स्विमिन्ग करू नये

IUI ट्रीटमेंट साठी किती शुक्राणू वापरले जातात?

उत्तर: सर्वसाधारणपणे, IUI यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंच्या नमुन्यावर प्रक्रिया केल्यानंतर गतीशील शुक्राणूंची संख्या अंदाजे 5 दशलक्ष किंवा त्याहून अधिक असायला हवी.

IUI नंतर मी दुचाकीने प्रवास करू शकते का?

उत्तर: तुम्ही IUI नंतर दुचाकीने प्रवास करू शकता. प्रवासाचा गर्भधारणेवर परिणाम होत नाही.

IUI पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होते का?

उत्तर: IUI सक्सेस अनेक घटकांवर अवलंबून असते, ट्रीटमेंट ची वेळ,शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता, स्त्रीचे वय, फर्टिलिटी औषध सारख्या इतर गोष्टींचा समावेश आहे म्हणूनच प्रत्येक जोडप्यासाठी IUI पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असं नाही.

IUI नंतर प्रवास करू शकतो का?

उत्तर: होय, तुम्ही इंजेक्टेबल फर्टिलिटी औषधे वापरत नसाल तर IUI ज्या महिन्यात होते त्या महिन्यात तुम्ही प्रवास करू शकता.

IUI उपचारानंतर विश्रांती घेणे आवश्यक आहे का?

उत्तर: IUI नंतर विश्रांती घेणे आवश्यक नाही कारण शुक्राणू गर्भधारणेनंतर पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतात. याव्यतिरिक्त, निरोगी शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात चार किंवा पाच दिवसांपर्यंत जगू शकतात.

IUI नंतरच्या दिवशी मी कामावर जाऊ शकतो का?

उत्तर: IUI प्रक्रियेनंतर रुग्ण सामान्यत: दैनंदिन कार्यामध्ये रुजू होऊ शकतो बेडरेस्ट आवश्यक नाही, परंतु कमी तीव्रते चे काम आणि व्यायाम केले पाहिजेत.

IUI साठी कोणता दिवस योग्य आहे?

उत्तर: बहुतेक IUI ओव्हुलेशन शोधल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी केले जातात. तुमच्या IVF डॉक्टर कडून तुमच्या प्रक्रियेची वेळ आणि योजना तयार केली जाईल.

IUI फेल झाल्यानंतर काय करावे?

उत्तर: अयशस्वी IUI नंतर, IVF हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण तुमच्या फर्टिलिटी परिस्तिथी नुसार तुमचे IVF डॉक्टर तुम्हाला योग्य असे पुढील ट्रीटमेंट सांगतील.

IUI फेलियर चे करणे काय आहेत?

उत्तर:

  • महिलेचं वाढलेलं वय
  • शुक्राणूंची खराब गुणवत्ता
  • लो ओव्हेरिअन रिसर्व
  • गर्भधारणेची वेळ
  • अनएक्सप्लिनेड इंफेर्टिलिटी (unexplained infertility)
  • इतर अज्ञात वंध्यत्व परिस्थिती

IUI फेलियरची लक्षणे काय आहेत? (IUI failure symptoms)

उत्तर: IUI फेलिअरची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, अपयशी गर्भपात होऊ शकते.
यासोबतच आययूआय अयशस्वी होण्याची इतर लक्षणांच शोध घेण आवश्यक आहे (IUI failure symptoms)

  • मासिक पाळी सुरू होणे
  • असामान्य योनि स्राव
  • तीव्र क्रॅम्पिंग किंवा अस्वस्थता

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
IUI failure होण्याची कारणे आणि अयशस्वी IUI नंतर यशस्वी गर्भधारणा