‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर‘ मध्ये उपचारांसाठी सर्वसमावेशक आणि समग्र दृष्टिकोन (होलिस्टिक अप्रोच) वापरला जातो. केवळ मेडिकल उपचारांपर्यंत मर्यादित न राहता शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी लाइफस्टाइल मॉडिफिकेशन केले जाते. यामुळे गर्भधारणेसाठी स्वास्थ्य उत्तम बनते. शिवाय IUI, IVF आणि अन्य ऍडव्हान्स IVF उपचारांचा सक्सेस रेट वाढतो.
अंडाशयाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी काय करावे? कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या प्रकारचे योगा करावे हे आपण जाणून घेऊ. योग्य प्रकारचा आहार आणि जीवनशैली तुमच्या अंडाशयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. महिलांमध्ये स्त्रीबीजांचा राखीव साठा उपलब्ध असल्यामुळे स्त्रीबीजांची संख्या वाढणे शक्य नसते. तरीदेखील स्त्रीबीजांची क्वालिटी सुधारण्यासाठी, वेळेवर ओव्यूलेशन होण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार आणि योगा महत्त्वाची भूमिका बजावतात.
गर्भधारणेत अंडाशयांची भूमिका
गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली स्त्रीबीजे विकसित करण्याचे काम अंडाशय करतात. अंडाशयांकडून गर्भधारणेसाठी मॅच्युअर स्त्रीबीजं सोडण्याचे (ओव्यूलेशनचे) काम केले जाते. सोबतच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन अंडाशयांकडून प्रोड्युस केली जातात. यापैकी इस्ट्रोजेन हार्मोन ची मात्रा स्त्रीबीजांचा विकास दर्शवते. तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन गर्भाशयाचे अस्तर (एन्डोमेट्रियम) बनवण्याचे काम करते. थोडक्यात, प्रोजेस्टेरॉन हार्मोन गर्भ रुजण्याच्या (एम्ब्रयो इम्प्लांटेशन) प्रक्रियेत आवश्यक असतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स मासिक पाळीचे नियमन करतात.
अस्वास्थ्यकार अंडाशयांमुळे अंडाशयाची कार्य बिघडतात आणि पॉलिसिस्टिक ओवरियन सिंड्रोम (PCOS), प्रायमरी ओवरियन इन्साफीशियन्सी (POI), अन्य ओव्यूलेशन समस्या, ओवरियन सिस्ट, ओवरीयन कॅन्सर, मासिक पाळी संबंधित समस्या, गर्भाशयाच्या अस्तराच्या समस्या निर्माण होऊ शकतात. परिणामी वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो.
अंडाशयाच्या उत्तम कार्यासाठी, जसे कि – रक्ताभिसरण, स्त्रीबीजांचा विकास, वेळेवर ओव्यूलेशन, नियमित मासिक पाळी आणि हार्मोन ची योग्य पातळी राखण्यासाठी नियमित योगाभ्यास आणि पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
अंडाशयाच्या स्वास्थ्यासाठी आहारातील ‘अँटिऑक्सिडंट’ ची भूमिका
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आहारातील अँटिऑक्सिडंट्स अंडाशयाचे चांगले आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि बीटा-कॅरोटीन सारखे अँटिऑक्सिडंट्स, शरीराला हानिकारक असणाऱ्या ‘फ्री रॅडिकल्स’ ना निष्क्रिय करण्याचे काम करतात. अंडाशयांना नुकसान पोहचवणारे हे रॅडिकल्स नष्ट झाल्यामुळे अंडाशय स्वस्थ राहण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात केल्यास इंफ्लेमेशन कमी होते आणि पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी सारखी बेरी वर्गातील फळे, नट्स आणि पालेभाज्या समाविष्ट करून तुम्ही अंडाशयांचे आरोग्य सुधारू शकतात. हे पदार्थ अँटिऑक्सिडंट-समृद्ध असतात आणि अंडाशयाच्या कार्याला समर्थन देतात. शिवाय ते गर्भाशयाच्या कॅन्सर चा धोका कमी करू शकतात.
अंडाशयातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ‘योगा’
अंडाशयासोबतच संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठीचा मार्ग म्हणजे ‘योगा’. ओटीपोटावर ताण आणणारी योगाआसन अंडाशयाचे स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत करतात. तसेच अंडाशयातील रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत करतात. अर्धांगासन, वज्रासन, भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन यांसारखे आसन शरीरातील ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते.
नियमितपणे योगाभ्यास करून, तुम्ही तुमच्या अंडाशयातील रक्त प्रवाह सुधारण्याबरोबरच संपूर्ण आरोग्य सुधारू शकता.
अंडाशयाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ‘डाएट’
खालील पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अंडाशयाच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
बेरी : स्त्रीबीजे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी बेरी वर्गातील फळे चांगली असतात. स्ट्रॉबेरी, ब्ल्यू बेरी, ब्लॅक बेरी, रस बेरी अशा बेरीज चा आहारात समावेश करा.
पालेभाज्या : पालक, लेट्युस, ब्रोकोली, केल, मेथी अशा पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, लोह यांसारखे अँटिऑक्सिडेन्ट भरपूर असतात.
एवोकॅडो : मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले हे फळ हार्मोन चे नियमन करते.
नट्स आणि सीड्स : बदाम, अक्रोड आणि फ्लेक्ससीड्स, चिया सीड्स सारख्या सीड्स मध्ये OMEGA-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. जे अंडाशयाबरोबरच रिप्रॉडक्टिव्ह आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
फिश : सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन मध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे इंफ्लेमेशन कमी करतात आणि फर्टिलिटीला प्रोत्साहन देतात.
डेअरी प्रोडक्ट : लो फॅट असलेले दूध, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन D आणि प्रोटीन असतात.
अंडाशयाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी काही ‘योगासन’
कोब्रा पोज (भुजंगासन) : अंडाशय आणि गर्भाशयाला रक्त प्रवाह वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. सोबतच मासिक पाळी नियंत्रित करण्यास मदत करते.
बटरफ्लाय पोज : हे आसन केल्याने ओटीपोटावर हलकासा दाब येतो. त्यामुळे अंडाशय आणि गर्भाशयाला देखील उत्तेजन मिळते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन आणि अंडाशयांचे कार्य अधिक चांगले होते.
बो पोज (धनुरासन) : धनुरासनाचा नियमित सराव केल्यास ओवरीयन स्टिम्युलेशन सुधारते. तसेच अंडाशयातील रक्ताभिसरण सुधारते. ओटीपोटातील इंफ्लेमेशन कमी करणे आणि ओवरीयन सिस्ट पेन कमी करण्यासाठी धनुरासन उपयुक्त आहे.
वज्रासन : हे आसन अंडाशय उत्तेजित करून आणि हार्मोन पातळी संतुलित करून, PCOS आणि मासिक पाळी समस्या दूर करण्यात मदत करू शकते.
सन सॅल्यूटेशन (सूर्यनमस्कार) : वजन नियंत्रित राखणे, PCOS लक्षणे कमी करणे आणि हार्मोन संतुलन राखण्यासाठी सूर्यनमस्कार मदत करतात.
स्ट्रेस चा अंडाशयावर होणारा परिणाम आणि उपाय
तणावाचा आपल्या अंडाशयांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. अंडाशयाच्या अनारोग्यामुळे अनियमित मासिक पाळी येते. स्त्रीबीजांची क्वालिटी घसरते. वेळेवर ओव्यूलेशन होत नाही. परिणामी वंध्यत्व येते. जेव्हा महिला ताणतणावात असते, तेव्हा तणावाचे नियंत्रण करण्यासाठी शरीर कॉर्टिसॉल आणि अड्रेनलाईन नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात तयार करते. या अँटी स्ट्रेस हार्मोन च्या वाढत्या पातळी मुळे इतर उपयुक्त हार्मोनचे संतुलन बिघडते आणि अनओव्यूलेशन समस्या येते. दीर्घकालीन ताणतणावामुळे इंफ्लेमेशन समस्या होते, ज्यामुळे अंडाशयाच्या कार्यावर परिणाम होतो.
अंडाशयाच्या आरोग्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तुमच्या दिनचर्येत योगा, प्राणायाम आणि ध्यानधारणेचा समावेश केल्यास फायदा होतो. पुरेशी व शांत झोप घेतल्यास आणि पुरेसा व पोषक आहार घेतल्यास अंडाशयांवरील ताण कमी होण्यास मदत होते. हार्मोनची पातळी नियंत्रित राहते. आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन स्ट्रेस रिडक्शन टेक्निक वापरून तुम्ही अंडाशयाचे कार्य सुधारू शकतात. तसेच रिप्रॉडक्टिव्ह आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकतात.
रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ साठी पाण्याचे महत्त्व
तुमच्या अंडाशयाचे आणि एकूणच फर्टिलिटी आरोग्य राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. हायड्रेटेड राहिल्याने हार्मोन पातळी नियंत्रित करण्यास, निरोगी स्त्रीबीजांना प्रोत्साहन देण्यास मदत होते आणि अंडाशयातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. पाण्याच्या कमी पातळीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स, ओव्यूलेशन समस्या आणि मासिक पाळीतील नियमिततेवर परिणाम होतो. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी, इंफ्लेमेशन कमी करण्यासाठी आणि रिप्रॉडक्टिव्ह अवयवांच्या आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे. तेव्हा, भरपूर पाण्याचे सेवन करावे.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
अंडाशयांच्या आरोग्यासाठी कोणती पथ्ये पाळावी?
तुम्ही जर PCOS किंवा अंडाशयाच्या इतर समस्यांनी ग्रस्त असाल तर, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबीयुक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा. कारण ते हार्मोनल संतुलनात व्यत्यय आणू शकतात आणि अंडाशयांच्या कार्यास हानी पोहोचवू शकतात.
अंडाशयाचे आरोग्य नैसर्गिकरित्या कसे सुधारावे?
सिस्ट किंवा अंडाशयाच्या इतर समस्यांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
– रिलॅक्सेशन टेक्निक वापर करा.
– पोषक आहार घ्या.
– भरपूर पाणी प्या.
– व्यायाम किंवा योगा करा.
– नियंत्रित वजन राखा.