Logo
Latest Blog

आधुनिक स्पर्म रिट्रायवल टेक्निक आणि गर्भधारणेतील त्यांची भूमिका

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

'स्पर्म रिट्रायवाल टेक्निक' म्हणजे काय?

स्पर्म रिट्रायवाल टेक्निक म्हणजे पुरुषांच्या अंडकोषातून थेट शुक्राणू मिळवण्याचे तंत्र. आधुनिक ART तंत्रज्ञान अर्थात फर्टिलिटी उपचारांसाठी स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरले जाते. पुरुष वंध्यत्वाच्या विविध प्रकारच्या समस्यांसाठी स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून शुक्राणू मिळवले जातात. असे शुक्राणू स्त्रीबीजांसोबत फर्टीलाइज करून गर्भ बनवला जातो. IVF किंवा ICSI सारख्या ट्रीटमेंट, अझूस्पर्मिया, लो स्पर्म काउंट, शुक्राणूवाहिनी ब्लॉकेज अशा अनेक स्थितीत स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून गर्भधारणा करणे शक्य आहे.

शुक्राणू मिळवण्याची प्रक्रिया

वंध्यत्व समस्येत फर्टिलिटी उपचार घेत असलेल्या जोडप्यांमध्ये पुरुष साथीदारासाठी स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरतात. हि प्रक्रिया गर्भधारणेसाठी मदत करते. स्पर्म रिट्रायवाल टेक्निक उपचार प्रक्रियेत भूल देऊन एपिडिडायमस किंवा टेस्टीज मधून शुक्राणू, ऊतक किंवा फ्ल्युइड मिळवले जाते. याचा वापर IVF उपचारात गर्भधारणेसाठी केला जातो.

आधुनिक स्पर्म रिट्रायवाल टेक्निक

  • TESA (टेस्टिक्युलर स्पर्म एस्पिरेशन) : TESA ला कधीकधी टेस्टिक्युलर फाइन नीडल एस्पिरेशन (TFNA) असेही म्हणतात. TESA चा वापर अझूस्पर्मिया चे निदान करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी पण केला जातो. प्रक्रियेदरम्यान भूल देऊन सुई च्या माध्यमातून अंडकोषातून शुक्राणू मिळवले जातात.
  • PESA (पर्क्यूटेनियस एपिडिडायमल स्पर्म एस्पिरेशन) :ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया च्या स्थितीत म्हणजेच शुक्राणूवाहिनीत ब्लॉकेज असल्यास PESA उपयुक्त आहे. हि तुलनेने कमी खर्चिक प्रक्रिया आहे. यासाठी उच्च प्रतीच्या मायक्रोस्कोप ची आवश्यकता नसते. प्रक्रियेदरम्यान एपिडिडायमस मधून द्रव काढून शुक्राणू मिळवले जातात. परंतु या पद्धतीने शुक्राणू मिळत नाहीत तेव्हा सर्जरीची आवश्यकता असते.
  • MESA (मायक्रोसर्जिकल एपिडिडायमल स्पर्म एस्पिरेशन) : या प्रक्रियेदरम्यान सर्जिकल मायक्रोस्कोप च्या मदतीने एपिडिडायमिस ट्यूबमधून थेट शुक्राणू मिळवले जातात. MESA च्या मदतीने निरोगी शुक्राणू मिळवणे शक्य आहे. असे शुक्राणू क्रायोप्रिझर्वेशन पद्धतीने फ्रिज केले जाऊ शकतात. MESA एक सुरक्षित स्पर्म रिट्रायवाल टेक्निक असून सर्जरी साठी स्किल-मायक्रोसर्जन ची आवश्यकता असते.
  • TESE (टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन) : TESE चा वापर अझोस्पर्मियाचं कारण शोधण्यासाठी केला जातो. प्रक्रियेदरम्यान नर्व्ह ब्लॉक ऍनेस्थेशिया (भूल) दिला जातो. काही कट देऊन शुक्राणू मिळवले जातात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वेदना होत नाहीत.
  • मायक्रो TESE : शुक्राणू कमी प्रमाणात तयार होतात तेव्हा मायक्रो TESE उपचार वापरले जातात. नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया स्थितीत मायक्रो TESE उपयुक्त पद्धती आहे. या तंत्राचा वापर करून सर्वाधिक शुक्राणू तयार होणारे क्षेत्र शोधले जाते आणि तेथील टिश्यू मिळवले जातात.
  • टेसा मॅपिंग : या उपचार प्रक्रियेदरम्यान टेस्टीज भोवती अनेक सुया लावून नीडल ऍस्पिरेशन केले जाते. ऍस्पिरेशन ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी ऊतकांचे नमुने काढण्यासाठी वापरली जाते. ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया आणि नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया स्थितीत TESA मॅपिंग केले जाऊ शकते.

'स्पर्म रिट्रायवाल टेक्निक' ची आवश्यकता कुणाला असते?

  • इजॅक्युलेशन समस्या : रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन स्थितीत शुक्राणू उलट दिशेने प्रवास करतात आणि ब्लॅडर मध्ये जमा होतात. अशावेळी नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने युरीन मधून शुक्राणू अलग करून मिळवणे शक्य आहे. परंतु ड्राय इजॅक्युलेशन, इरेक्शन समस्या असल्यास स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून शुक्राणू मिळवले तर फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते.
  • ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया : अझूस्पर्मिया म्हणजे वीर्यत शुक्राणू नसतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया स्थितीत शुक्राणू तयार होतात, पण शुक्राणूवाहिनीत अडथळा असल्यामुळे वीर्यात शुक्राणू नसतात. या स्थितीत गर्भधारणेसाठी स्पर्म रिट्रायवाल टेक्निक फायदेशीर ठरतात.
  • नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया : या स्थितीत शुक्राणू बनत नाहीत किंवा वीर्यात शुक्राणू दिसणार नाहीत इतक्या कमी प्रमाणात बनतात. अशा वेळी आधुनिक स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून शुक्राणू मिळवून आधुनिक IVF उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
  • वासेक्टॉमी : हि एक गर्भनिरोधक शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये शुक्राणूवाहिनी ब्लॉक केली जाते. अनेकदा वासेक्टॉमी सर्जरी नंतर जोडपे गर्भधारणेचे नियोजन करतात. तेव्हा स्पर्म रिट्रायवल  टेक्निक सहित आधुनिक IVF उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते.
  • वेरिकोसिल : या स्थितीत टेस्टिकल ला ऑक्सिजन पुरविणाऱ्या नसा रुंदावतात. परिणामी शुक्राणूंची निर्मिती कमी प्रमाणात होते. नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया चे कारण वेरिकोसिल असते तेव्हा स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून शुक्राणू मिळवणे शक्य आहे.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वेदनादायक आहेत का?

टेस्टिक्युलर स्पर्म एस्पिरेशन किंवा टेस्टिक्युलर ��िश्यू एक्सट्रॅक्शन प्रक्रिया भूल देऊन केल्या जात असल्यामुळे वेदनारहित असतात. परंतु सर्जरीनंतर काही काळ सौम्य ते मध्यम वेदना होऊ शकतात. त्या औषधांनी कमी करता येतात.

स्पर्म रिट्रायवाल प्रक्रियेस किती वेळ लागतो?

टेस्टिक्युलर बायोप्सी सारख्या प्रक्रियेस ३0 मिनिटे ते १ तास लागतो. पण, PESA किंवा TESE सारख्या अधिक जटिल तंत्रांना १-२ तासांचा कालावधी लागू शकतो.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
आधुनिक स्पर्म रिट्रायवल टेक्निक आणि गर्भधारणेतील त्यांची भूमिका