IVF प्रक्रिया : स्टेप-बाय-स्टेप

आई-बाबा व्हायची प्रचंड इच्छा असूनही पालक होण्यात अपयशी होत असलेल्या आशावादी जोडप्यांसाठी IVF अर्थात इन विट्रो फर्टिलाइजेशन ही उपचार पद्धती एक वरदानच आहे. ही उपचार पद्धती गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

Share This Post

IVF ला सामान्यतः टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया म्हणूनही ओळखलं जातं. IVF हे गर्भधारणा व्हावी यासाठी वैद्यकीय संशोधकांकडून विकसित करण्यात आलेले प्रगत फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि पुरूषाचे शुक्राणू हे लॅबमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र करण्यात येते आणि या मिश्रणातून गर्भ निर्माण करण्यात येतो. हा गर्भ स्त्रीच्या शरीरात सोडला जातो, ज्यामुळे गर्भधारणा होते.

पूर्वीपेक्षा आता IVF तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. असे असले तरीही ही प्रक्रिया नेमकी कशी असते याबाबत अनेकांना काहीच कल्पना नसते. म्हणूनच या ब्लॉग मधून IVF प्रक्रिया नेमकी कशी असते? हे स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊ.

पहिली स्टेप

IVF प्रक्रियेमधील सर्वात पहिली स्टेप म्हणजे IVF सेंटरशी संपर्क करणे. वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करणं आणि आहे त्या परिस्थितीवर मात करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं हेच जोडप्यांसाठी मोठं आव्हान असतं. त्यामुळे संपर्क करण्याची हीच पहिली स्टेपच अनेकांसाठी सगळ्यात कठीण असते. पण लक्षात घ्या, तुम्ही एकटे नाही आहात. जगभरातील लाखो-करोडो जोडपी आज वंध्यत्वाचा सामना करत असून अनेकांनी IVF वर विश्वास ठेवून आपलं आई-बाबा व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तुम्ही देखील स्वतःवर आणि IVF च्या ॲडव्हान्स तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर शी संपर्क साधा. संपर्क साधताच आपल्या समोर उपचारांसाठी कोण-कोणते पर्याय आहेत, याबाबत आमची एक्सपर्ट टीम आपल्याला मार्गदर्शन करेल.

पहिली भेट

वंध्यत्वावर मात करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे प्राथमिक सल्लामसलत. या भेटीदरम्यान आमचे तज्ज्ञ डॉक्टर आलेल्या जोडप्याची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री समजून घेण्यासाठी काही आवश्यक वैद्यकीय चाचण्या करतील.

पेल्विक स्कॅन (Pelvic Scan) – महिला जोडीदाराच्या अंडाशय (Ovaries) आणि गर्भाशयाची (Uterus) तपासणी करण्यासाठी इंटर्नल पेल्विक अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जाते.

नर्स सोबत सल्लामसलत (Nursing Consultation) – वंध्यत्व उपचारांची माहिती असलेल्या स्पेशालिस्ट नर्स तुम्हाला भेटून तुमच्या एकंदरीत ट्रीटमेंट प्लॅन विषयी सांगतील.

स्क्रीनिंग टेस्ट (Screening Test) – जोडीदारांमधील प्रत्येकाच्या प्रजनन स्वास्थ्या विषयी जाणून घेण्यासाठी काही आवश्यक स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातील. महिला जोडीदाराने फॉलिक ॲसिड घेणे सुरू केले नसल्यास ते सुरू करण्याचा सल्ला दिला येईल.

समुपदेशन (Counselling) – वंध्यत्वाचा सामना करणं हे अनेकांसाठी भावनिक दृष्ट्या आव्हानात्मक व वेदनादायक असू शकतं. याविषयी नातेवाईक आणि मित्रांशी मोकळेपणाने बोलण्यात संकोच वाटू शकतो. अशा वेळी जोडप्याला एक मानसिक आधार म्हणून क्लिनिक मध्ये समुपदेशनाची सोय करण्यात आलेली असते.

IVF सायकल मधील महत्त्वपूर्ण टप्पे

डाऊन रेगुलेशन (Down Regulation):

डाऊन रेगुलेशन ही प्रक्रिया संपूर्ण IVF सायकलमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात स्त्रीबीजांच्या (eggs) निर्मितीवर वैद्यकीय नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांच्या सहाय्याने स्त्रीच्या शरीरातील सामान्य हार्मोनची निर्मिती तात्पुरती थांबवली जाते. यामुळे डॉक्टरांना स्त्रीच्या शरीरात आवश्यक त्या स्त्रीबीजांची संख्या वाढवण्यासाठी नियंत्रित हार्मोन थेरपी देणे शक्य होते. हे औषध सामान्यतः इतर प्रक्रियांच्या तुलनेत काही आठवडे आधी सुरु केले जाते. डाऊन रेगुलेशनमुळे अंडाशयाच्या (ovaries) कामावर नियंत्रण ठेवून फॉलिकल्सची (follicles) संख्या नियंत्रित करता येते.

ओव्हेरियन स्टिम्युलेशन (Ovarian Stimulation):  

ओव्हेरियन स्टिम्युलेशन हा IVF प्रक्रियेतला दुसरा टप्पा आहे, ज्यामध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवशी सोनोग्राफीद्वारे फॉलिकल्सची स्थिती तपासली जाते आणि स्त्रीच्या शरीराला योग्य हार्मोन्सचा डोस दिला जातो. हा डोस घेतल्याने अंडाशयात अनेक फॉलिकल्स तयार होतात. साधारणतः दहा ते बारा दिवसांच्या औषधोपचारांनंतर, फॉलिकल्स तयार होतात आणि त्यातील स्त्रीबीज पूर्णतः विकसित करण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं. या प्रक्रियेद्वारे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

ओव्हम पिकअप (Ovum Pickup): 

ओव्हम पिकअप हा टप्पा ओव्हेरियन स्टिम्युलेशननंतर येतो. इंजेक्शन दिल्यानंतर 34 ते 36 तासांमध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये उपाशी येण्यास सांगितलं जातं. भूल दिल्यानंतर सोनोग्राफीच्या सहाय्याने अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर काढली जातात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून, सोनोग्राफीद्वारे डॉक्टर अत्यंत काळजीपूर्वक स्त्रीबीज काढतात. ही प्रक्रिया साधारणतः 20 ते 30 मिनिटे चालते, आणि नंतर थोडावेळ रुग्णाला विश्रांती घ्यायला सांगितली जाते.

एम्ब्रियो कल्चर (Embryo Culture):

एम्ब्रियो कल्चर हा टप्पा IVF प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये स्त्रीबीजांमध्ये स्पर्म इंजेक्ट केले जातात किंवा एकत्र ठेवले जातात. लॅबमध्ये तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशीपर्यंत एम्ब्रियोस (गर्भ) वाढवले जातात. जर फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करण्याची गरज भासली, तर हे एम्ब्रियोस विशेष थंड तापमानात (Cryopreservation) ठेवले जातात. एम्ब्रियोच्या वाढीचे सातत्याने निरीक्षण केले जाते, कारण या प्रक्रियेत एम्ब्रियोच्या गुणधर्मांची आणि गुणवत्ता तपासली जाते.

एम्ब्रियो ट्रान्सफर (Embryo Transfer):  

एम्ब्रियो ट्रान्सफर हा IVF सायकलचा अंतिम आणि निर्णायक टप्पा आहे. या प्रक्रियेत तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी तयार झालेला एम्ब्रियो गर्भाशयात (uterus) रोपण केला जातो. ही प्रक्रिया साधारणतः पेनलेस असून, त्यासाठी अनेस्थेशियाची गरज नसते. एम्ब्रियो ट्रान्सफरनंतर रुग्णाला तीन ते चार तास विश्रांती घ्यायला सांगितले जाते आणि त्यानंतर तिला घरी सोडले जाते. गर्भाशयात एम्ब्रियो रोपण झाल्यावर त्याची वाढ सुरू होते आणि गर्भधारणा सुरू होते.

ब्लड टेस्ट आणि प्रेग्नेंसी टेस्ट: 

एम्ब्रियो ट्रान्सफरनंतर साधारणतः दोन आठवड्यांनी स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी काही ब्लड टेस्ट केल्या जातात. या टेस्टमधून ती स्त्री गर्भवती आहे की नाही, हे डॉक्टरांना समजते. यानंतरची गर्भधारणेची प्रक्रिया सामान्य गर्भधारणेप्रमाणेच असते. परंतु IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या महिलांसाठी सातत्याने IVF तज्ज्ञांची भेट घेणे आणि त्यांचे सल्ले घेणे महत्वाचे असते. निरोगी गर्भधारणा आणि सुखरूप प्रसूतीसाठी आवश्यक त्या तपासण्या आणि उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.

निष्कर्ष

वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्याने मनात कुठलीही शंका न बाळगता सर्वप्रथम विशेषज्ञ डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे. IVF च्या मदतीने आज अनेक जोडप्यांनी आपलं आई-बाबा व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तूम्ही देखील तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, आणि आजच जवळच्या IVF सेंटरला भेट द्या.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।

Essential Nutrients Your Body Needs When Pregnant

During pregnancy, you provide all of the nutrition your baby requires. As a result, you may need more nutrients in your body while you’re pregnant. Taking prenatal vitamins and eating healthy foods will help you get all the nutrients you and your baby require throughout your pregnancy.