वीर्यात शुक्राणू नसण्याचे कारण काय?
अझूस्पर्मियाच्या कारणांमध्ये निम्न स्तराच्या जीवनशैली पासून ते वैद्यकीय स्थिती पर्यंत अनेक कारणे असू शकतात. अझूस्पर्मिया चे एक सामान्य कारण म्हणजे शुक्राणू वाहून नेणाऱ्या ‘व्हास डिफरेन्स’ नलिकेत ब्लॉकेज असणे. यामुळे शुक्राणू बाहेर पडण्यापासून रोखले जातात. याशिवाय हार्मोनल इम्बॅलन्स, इंडोक्राइन डिसऑर्डर किंवा सिस्टिक फाइब्रोसिस सारख्या अनुवांशिक विकारांमुळे शुक्राणू पुरेशा प्रमाणात बनत नाहीत. अधिक तापमानात काम केल्याने शुक्राणू मरतात. शिवाय व्यसने, धूम्रपान, अल्कोहोल चे सेवन किंवा अत्याधिक ताणतणाव यांमुळे शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होतो.
डॉक्टर अझूस्पर्मिया चे निदान कसे करतात?
- सीमेन अनालिसिस : कोणत्याही शुक्राणू समस्यांसाठी वीर्य तपासणी (सीमेन अनालिसिस) हि टेस्ट केली जाते. सीमेन टेस्ट मध्ये पुरुषांचे सीमेन सॅम्पल लॅब मध्ये तपासले जाते. यावेळी शुक्राणूंची संख्या, गती आणि रचना तपासली जाते.
- मेडिकल हिस्टरी : सुरुवातीला फर्टिलिटी डॉक्टर वंध्यत्वाचे अचूक आणि सखोल निदान करण्यासाठी तुमचा वैद्यकीय इतिहास घेतील.
- स्क्रोटम अल्ट्रासाउंड : पुनरुत्पादक अवयवांची तपासणी करण्यासाठी अल्ट्रासाउंड करतील.
- ब्लड टेस्ट : टेस्टोस्टेरॉन, फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), अँड्रोजेन, डायबेटिज, थायरॉईड, टीबी अशा काही रक्त तपासण्या गरजेनुसार केल्या जातील.
वंध्यत्वाचे कारण अझूस्पर्मिया असेल तर काय करावे?
वीर्यात शुक्राणू नसल्यामुळे तुम्ही वंध्यत्वाचा सामना करीत असाल तर, या स्थितीत फर्टिलिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. तुमचे आणि तुमच्या स्त्री जोडीदाराच्या वंध्यत्व समस्येचे निवारण करण्यासाठी डॉक्टर तुमच्या काही तपासण्या करतील आणि अचूक निदान करतील. तुमच्या परीक्षणानुसार डॉक्टर तुम्हाला योग्य उपचार पर्याय सुचवतील. तुमचे वय आणि अझूस्पर्मिया चे कारण यानुसार तुम्हाला कधी बेसिक उपचारांनी रिझल्ट मिळू शकतो तर कधी ऍडव्हान्स फर्टिलिटी उपचारांची गरज लागू शकते.
अझूस्पर्मिया चे कारण शुक्राणूवाहिनी ब्लॉकेज असल्यास गर्भधारणेसाठी काय करावे?
शुक्राणूवाहिनीत ब्लॉकेज असणे किंवा सिस्ट असल्यामुळे शुक्राणू बाहेर पाडण्यात अडथळा निर्माण होतो आणि वीर्यात शुक्राणूंची अनुपस्थिती दिसून येते. हि एक मेडिकल कंडिशन आहे आणि फर्टिलिटी डॉक्टर यावर इलाज करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम फर्टिलिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
या स्थितीत शुक्राणू मिळवण्यासाठी २ उपचार पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे सर्जरी करून ब्लॉकेज दूर करणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे TESA/PESA, MESA, मायक्रो-TESE असे आधुनिक उपचार पर्याय वापरून स्पर्म मिळवणे शक्य आहे. या पद्धतीमध्ये भूल देऊन सुई च्या माध्यमातून टेस्टीज मधून स्पर्म मिळवले जातात. त्यानंतर IUI किंवा IVF उपचार वापरून गर्भधारणा होऊ शकते.
स्पर्म प्रोडक्शन होत नसल्यामुळे अझूस्पर्मिया असल्यास गर्भधारणेसाठी काय करावे?
तुमच्यामध्ये शुक्राणूंची निर्मिती कमी प्रमाणात होत असली तरीही, चिंता करण्याचे कारण नाही. कारण तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्हाला स्वास्थ्य जीवनशैली चा स्वीकार करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये पोषक अन्नाचे सेवन करावे. ताणतणावावर नियंत्रण ठेवावे. भरपूर प्रमाणात झोप घेतल्यास गर्भधारणेसाठी पुरेशा प्रमाणात शुक्राणूंची निर्मिती होते. या स्थितीत डॉक्टर तुम्हाला तुमच्या स्थितीनुसार, हार्मोनल औषधे किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुचवतील. यामुळे शुक्राणू निर्मितीत सुधार होऊ शकतो.
लाइफस्टाइल मॉडिफिकेशन आणि मेडिकेशन ने पॉजिटीव्ह रिझल्ट मिळत नाहीत तेव्हा, डॉक्टर तुम्हाला ऍडव्हान्स फर्टिलिटी उपचारांची गरज लागते. स्पर्म रिट्रायवाल टेक्निक, IVF, ICSI, IMSI, PICSI असे अनेक आधुनिक उपचार पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला निश्चितपणे गर्भधारणा होऊ शकते.
हार्मोनल समस्या किंवा इंडोक्राइन डिसऑर्डर मुळे वीर्यात शुक्राणू नसल्यास काय करावे?
बऱ्याचदा हार्मोनल विकार, पिट्युटरी ग्लॅन्ड चे विकार, पिट्युटरी कँसर यांमुळे गर्भधारणेसाठी आवश्यक एवढ्या प्रमाणात शुक्राणू तयार होत नाहीत. शुक्राणू अत्यंत कमी प्रमाणात बनतात, त्यामुळे वीर्यात शुक्राणू दिसून येत नाहीत आणि डॉक्टर अझूस्पर्मिया असल्याचे निदान करतात. परंतु अंडकोषात खूप कमी प्रमाणात शुक्राणू उपस्थित असतात. अशा वेळी मायक्रो TESE किंवा पेसा सारखे स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून टेस्टिकल किंवा एपीडीडायमास मधून स्पर्म कलेक्ट केले जातात. आणि IUI, IVF किंवा ICSI उपचारांनी खात्रीशीर गर्भधारणा होऊ शकते. सुरुवातीला डॉक्टर फर्टिलिटी मेडिसिन किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वापरून शुक्राणू निर्मितीत सुधार करण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यासाठी तुमचे वय कमी असावे हि कंडिशन असते.
अनुवांशिक विकारामुळे अझूस्पर्मिया असेल तर गर्भधारणेसाठी काय करावे?
सिस्टिक फायब्रॉइसिस सारख्या अनुवांशिक विकारांमुळे वीर्यात शुक्राणू नसतील तेव्हा देखील TESE सारख्या स्पर्म रिट्रायवाल टेक्निक वापरून शुक्राणू मिळवले जातात. या स्थितीत IUI, IVF, ICSI, IMSI, PICSI सारख्या आधुनिक उपचारांनी निश्चितपणे गर्भाधान शक्य आहे. याउलट जेव्हा अनुवांशिक कारणामुळे शुक्राणू बनत नसतील तर मात्र तुम्हाला डोनर एग ची मदत घ्यावी लागते. हि एक कायदेशीर आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचे बाळ होऊ शकते.
अझूस्पर्मिया स्थितीत स्वतःचे मुल होऊ शकते का?
होय. नक्की! अझूस्पर्मिया स्थितीत गर्भधारणा आव्हानात्मक ठरू शकते, पण स्वतःचे मूल होऊ शकते. हार्मोनल थेरपी किंवा टेस्टिक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शन (TESE) सारख्या सर्जरी उपचारांनी थेट वृषणातून शुक्राणू प्राप्त केले जातात. शुक्राणू पुनःप्राप्ति नंतर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) किंवा इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) सारख्या ऍडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट ने निश्चितपणे गर्भधारणा होऊ शकते.
अझूस्पर्मिया स्थितीत डोनर ची गरज लागू शकते का?
अझूस्पर्मिया ही अशी स्थिती आहे जिथे पुरुषाच्या वीर्यात शुक्राणूंची मोजणी करता येईल इतके शुक्राणू उपस्थित नसतात. हे हार्मोनल असंतुलन, अनुवांशिक विकृती, रिप्रॉडक्टिव्ह अवयवांतील अडथळे किंवा जन्मजात दोषामुळे होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, अझूस्पर्मिया चा इलाज सर्जरी, हार्मोनल थेरपी किंवा मेडिसिन ने केला जातो. पण गंभीर अझूस्पर्मिया असलेल्या व्यक्तींसाठी किंवा जेव्हा इतर उपचार अयशस्वी ठरतात तेव्हा, मात्र तुम्हाला दात्याच्या शुक्राणूंची गरज लागू शकते. दात्याचे शुक्राणू वापरून इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक (ART टेक्निक) चा वापर करून तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते.
आययूआय मध्ये दात्याचे शुक्राणू थेट मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात. तर IVF मध्ये दात्याचे शुक्राणू आणि मातेचे स्त्रीबीज वापरून गर्भ बनविले जातात आणि मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जातात. यामुळे गर्भधारणेचे चान्सेस अनेक पटींनी वाढतात.